अगदी सोपी कणकेची/गव्हाच्या पिठाची बिस्किटे (एगलेस व्हीट अल्मन्ड कुकीज)
कुकीज बनवायचे खूप दिवसापासून मनात होते. आणि मला मैदा वापरायचा नव्हता. कणकेची बिकिटं बनवायची होती. म्हणजे केव्हाही खाता येतील, कितीही खाता येतील अशी हेल्दी आणि टेस्टी बिस्कीटं बनवायची होती :-)
जनरली खाण्याच्या पदार्थात ‘हेल्दी आणि टेस्टी’ यापैकी कोणतीतरी एकच गूण असतो :-) मागे एकदा नेटवरून रेसिपी पाहून एक रेसिपी बनवली. ती बिस्किटं हेल्दी होती पण टेस्टी नव्हती. मग थोड्या अजून रेसिपी पाहून त्यात मला हवा असलेला बदल करून बनवलेली बिस्किटं खूप मस्त, टेस्टी आणि Crunchy झाली. तीच रेसिपी इथे देत आहे. नक्की करून पहा.
साहित्यः
१ कप गव्हाचे पीठ, १ स्टिक अनसॉल्टेड बटर (रूम टेंपरेचरला आलेले), पाऊण कप पिठीसाखर, १ चिमूटभर मीठ, अर्धा टीस्पून वेलची पूड, १/४ कप बदाम
कृती:
१) बदामाचे फ्लेक्स (लहान तुकडे) करून घ्या. त्यातले थोडे बिस्किटं सजवायला बाजूला काढून ठेवा.
२) एका बाऊलमध्ये गव्हाचे पीठ, बटर, पिठीसाखर, मीठ, वेलचीपूड, बदामाचे फ्लेक्स हाताने चुरून घाला.
३) मिश्रण चांगलं मळून त्याचा एक गोळा करून घ्या. मळताना गरज वाटली तर १-२ चमचे बटर/तूप अजून घाला.
४) ओव्हन 360 °F ला प्रिहिट करायला लावा. एका कुकी शीटला अल्युमिनियम फॉइल लावून घ्या.
५) मळलेल्या मिश्रणाच्या गोळ्याचे आता लहान लहान (पेढ्याएवढे) गोळे करून घ्या. त्यावर बदामाचे फ्लेक्स लावून बिस्किटं थोडी चपटी बनवून कूकीशीटवर एकमेकापासून बर्यापैकी अंतरावर ठेवा. (कारण बेक केल्यानंतर कुकीजचा साइझ जवळजवळ दुप्पट होतो.)
६) ओव्हन प्रिहिट झाल्यानंतर ५ मिनिटांनी ही कुकीशीट ओव्हनमध्ये ठेवा.
७) १८ मिनिटांनी कूकीशीट ओव्हनमधून बाहेर काढा. आणि कुकीज चांगल्या थंड होऊ द्या.
(कुकीज पूर्ण थंड झाल्याशिवाय त्यांना हात लावू नका. अन्यथा कुकीज मोडतील.)
८) थंड झाल्या की ह्या क्रंची, क्रिस्पी कुकीजची मजा लुटा.
टीपः
१) ही बिस्किटे मोठ्या प्रमाणावर करायची जितके कप गव्हाचे पीठ घ्यालं तितके टेबलस्पून बटर जादा घाला. उदा. २ कप गव्हाचे पीठ घेतले तर त्यात (दीड कप पिठीसाखर, २ चिमूट मीठ, १ टीस्पून वेलची पूड, १/२ कप बदाम, २ स्टिक्स अनसॉल्टेड बटर आणि) २ टेबलस्पून बटर जादा घाला.
२) बदामाऐवजी तुम्हाला हवे ते ड्रायफ्रूट वापरू शकता.
३) कुकीज चांगल्या चपट्या करून मग बेक करायला ठेवा. नाहीतर नंतर कुकीज चावायला त्रास होईल.
४) १ स्टिक अनसॉल्टेड बटर = १/२ कप अनसॉल्टेड बटर = ८ टेबलस्पून अनसॉल्टेड बटर

(फुकट मिळत असतील तर !!!! )