क्लाऊड ९..
क्लू नंबर वन वॉज व्हेन यू नॉक्ड ऑन माय डोअर..
क्लू नंबर टू वॉज द लुक दॅट यू वोअर..
दॅट्स व्हेन आय न्यू इट वॉज अ प्रिटी गुड साईन..
समथिंग वॉज राँग अप ऑन क्लाऊड नंबर नाईन..
धुवांधार पाऊस पडत होता. कारच्या विंडशिल्डवरुन थळाथळा पाणी निथळत होतं आणि समोरचं काही दिसायला लागायच्या आत नव्या धारा बदबदून येत होत्या.
वेल इट्स लाँग वे अप अँड वुई वोंट कम डाऊन टुनाईट..
वेल इट मे बी राँग बट बेबी इट शुअर फील्स राईट..
ब्रायन अॅडम्सचं हे गाणं ऐकता ऐकता मी समोरच्या धापा टाकणार्या वायपर्सकडे बघत होतो..बर्याच कोरड्या दिवसांनी ताण दिल्यावर आता मात्र पाऊस असा काही आला होता की जसे भळभळून आलेले आनंदाश्रू.. आयला आवरतच नायत..
क्लाऊड नंबर नाईन.. नाईन.. नाईन.. गुणगुणता गुणगुणता आपोआपच असं झालं की मी तातडीने लोणावळ्याच्या "क्लाऊड नाईन" कडे जायचं ठरवलं.. आणि दुसर्या दिवशी तिथे धडकलो सुद्धा..
लायन पॉईंटच्या पुढे हा हिलटॉप रिसॉर्ट आहे. लोणावळ्यातल्या मरणाच्या ट्रॅफिक जामने मला जमिनीवर आणलं.. पण पुढे अंबे व्हॅली रोड पुन्हा नऊ नंबरच्या त्या जादुई ढगाकडे घेऊन जायला लागला. पाऊस इमानदारीत साथ देत होता..
धुकंही मधेच हलकं मधेच गडद.. ईश्वर मोठ्ठाले नि:श्वास टाकत असावा.
"क्लाऊड नाईन"ला पोहोचलो तेव्हा बाकीच्या ढगांशी शर्यत लावून त्यांना मागे टाकत आलो होतो. पण ते मागून मला गाठायला येताना दिसलेच..
सर्वात आधी पावसाला नेवैद्य दाखवणं आलं..
मग निवार्याची जागा.. आपली खोली कोणती त्याची खात्री करुन घेतलेली बरी असते. काय आहे की नंतर सापडायला सोपी जाते..
नजर के सामने एक रास्ता जरुरी है..
भटकते रहेने का भी सिलसिला जरुरी है..
कुठल्याही नव्या ठिकाणी गेलो की मी एक ठिकाण हेरुन ठेवतो. ते माझं ठिकाण.. मग तिथे असेपर्यंत वेगवेगळ्या वेळी त्या ठिकाणाचे रंगढंग बघत बसायचे. माझं ठिकाण पक्कं झालं. ही जागा माझी.
चर्र थंडीत तिथे बसून आता लांब शून्यात पाहात राहायचं. ब्रायन अॅड्म्स काही पाठ सोडणार नाही..
अँड देअर एंट नो प्लेस इआय वुड रादर बी..
अँड वी काण्ट गो बॅक बट यू आर हियर विथ मी..
द वेदर इज रियली फाईन.. अप ऑन क्लाऊड नंबर नाईन..
आता ही जागा नक्की वेगळी दिसेल.. प्रश्न फक्त वेळ बदलण्याचा आहे. आणि ती बदलेलच..
तोपर्यंत बघण्यासाठी इथे मला खूप मोठ्ठा कॅनव्हास आहे..
वेळ चालला.. हातात घड्याळ नसलं तरी वेळेची जाणीव सर्वच सेन्सेसना होतेय..
ठिकाणाचे रंग बदलताहेत. हिरव्याकरड्या शेड्स.. आणि एकदम धुवांधार पाऊस येऊन कॅनव्हास धुतला त्याने. मग सगळं क्षणभर स्वच्छ स्वच्छ..
मग पुन्हा एकदा शुभ्र रंगाचा ब्रश घेऊन रंगकाम सुरु.. शुभ्रांधळं होण्याचा भास.
ऑल दॅट आर लेफ्ट आर शेड्स ऑफ ग्रे..
रात्री थंडी बोचून अन ढोसून उठवायला लागली तेव्हा शेवटी उठून आपल्या निवार्याकडे जाऊ म्हटलं. पण आसमंत भारित झाला होता. ऑलरेडी स्वप्नातच असताना पुन्हा हॉटेलच्या खोलीत जाऊन झोपण्याची गरज काय? म्हणून मग तिथेच रेंगाळत राहिलो. हा खेळ मस्त होता. लहानपणी जसे बॉल आणि बॉलर दोघेही अंधारात दिसेनासे होईस्तोवर क्रिकेट खेळायचो त्यातलाच प्रकार.
ऐक.. मी तुला क्लाऊड नाईन गाणं म्हणून दाखवतो.. अर्धांगिनीला आणखी थोडावेळ या स्वप्नात ठेवण्यासाठी मी उपाय काढला.. गाणं पुढे चालू..आठवेल तसं..
सो बेबी टुनाईट लेट्स लीव्ह द वर्ल्ड बिहाईंड..
अँड स्पेंड सम टाईम अप ऑन क्लाऊड नंबर नाईन..वेल वी वोंट कम डाऊन टुनाईट..
नो वी वोंट कम डाऊन टुनाईट..
वी कॅन वॉच द वर्ल्ड गो बाय..
अप ऑन क्लाऊड नंबर नाईन...
सगळं धूसर दिसायला लागलं. वातावरण, वेळ आणि सूर.. खरंच खूप धूसर... पुन्हा अश्रू..?! आनंदाश्रू?
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments