Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

झटपट पौष्टिक वड्या

न
नूतन
Sun, 10/07/2012 - 10:08
vadi साहित्यः ओट्स २ वाट्या पिस्ता, बदाम, खारीक, आक्रोड, शेंगदाणे यांचे जाडसर कूट १ वाटी वेलची पूड १/४ चहाचा चमचा चिरलेला गूळ २ वाट्या पाणी २ चहाचे चमचे साजुक तूप १ चहाचा चमचा पिस्ता बदाम काप सजावटीसाठी कृति १ तव्यावर मंद आचेवर ओट्स हलके भाजुन, एका भांड्यात काढ्न घ्यावे. २ पिस्ता, बदाम, खारीक, आक्रोड व शेंगदाणे यांचे जाड्सर कूट ओट्समध्ये मिसळावे. ३ वेलची पूड वरील मिश्रणात मिसळुन घ्यावी. ४ पॅनमध्ये गूळ, पाणी व तूप एकत्र करुन मध्यम आचेवर ठेवावा व सतत ढवळत राहावे. ५ गूळ विरघळून उकळी येऊ लागल्यावर आंच कमी करुन एक दोन मिनिटे ढवळत राहावे. ६ गॅसवरील पॅन खाली उतरवून त्यात तयार केलेले ओट्स चे मिश्रण घालावे व ते दोन मिनिटे ढवळावे. ७ घट्टसर गोळा झाल्यावर तूप लावलेल्या ट्रे मध्ये मिश्रण थापावे. ८ सजावटीसाठी वर पिस्ता-बदाम काप लावावेत. ९ मिश्रणाचा गरम पणा थोडा कमी झाल्यावर वड्या आखुन घ्याव्यात. १० मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यावर वड्या पाडाव्यात. (दिलेल्या प्रमाणात साहित्य घेतल्यास फोटोतील आकाराच्या २० वड्या होतात)

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 8151 views

💬 प्रतिसाद
प
प्रचेतस Sun, 10/07/2012 - 10:21 नवीन
फोटो बघूनच जीव खल्लास. बाकी ह्या वड्या अंमळ जास्तच पौष्टिक आहेत.
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Sun, 10/07/2012 - 10:31 नवीन
वा..वा.. पौष्टीक चैन.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sun, 10/07/2012 - 10:50 नवीन
अरे काय छळवाद आहे हा पाकृंचा विभाग!
  • Log in or register to post comments
द
दादा कोंडके Sun, 10/07/2012 - 10:55 नवीन
मस्तच!
  • Log in or register to post comments
प
पियुशा Sun, 10/07/2012 - 11:21 नवीन
फोटो झक्कास आलेला आहे , झटपट पौष्टिक वड्या आवडल्या :)
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 10/07/2012 - 11:30 नवीन
क्या बात है....! टपालानं मागवायचे ठरले तर किती खर्च येईल :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sun, 10/07/2012 - 11:39 नवीन
फोटू पाहुनी जीवच गेला... आणी दिवाळीची हवाही लागली :-)
  • Log in or register to post comments
ग
गणपा Sun, 10/07/2012 - 13:59 नवीन
लै भारी. पटकन उचलुन घ्याव्याश्या वाटतायत वड्या.
  • Log in or register to post comments
स
सानिकास्वप्निल Sun, 10/07/2012 - 19:24 नवीन
छानच :)
  • Log in or register to post comments
ज
जाई. Sun, 10/07/2012 - 19:57 नवीन
वाह !!!!!!!!
  • Log in or register to post comments
र
रेवती Sun, 10/07/2012 - 20:16 नवीन
अरे वा!! पौष्टीक असल्याने खाताना वाईटही वाटणार नाही हो न्युटनताई. फोटू गोड आलाय.
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Mon, 10/08/2012 - 03:16 नवीन
हो फोटो गोड आहेच अन घरात ओटस पण आहेत. करुनच बघते आता.
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Mon, 10/08/2012 - 07:31 नवीन
ओटसच्या वड्या छान दिसत आहेत, स्वाती
  • Log in or register to post comments
ज
ज्योति प्रकाश Mon, 10/08/2012 - 11:27 नवीन
ओट्स मिळत नसल्यास दुसरे काय वापरता येईल?
  • Log in or register to post comments
ख
खादाड Mon, 10/08/2012 - 11:44 नवीन
वड्या छानच असतील :)
  • Log in or register to post comments
स
सूड Mon, 10/08/2012 - 12:10 नवीन
वड्या आवडल्या पण किती दिवस टिकतात ? का करायच्या नि खायच्या सरळ ? रेशिपीत आय मीन गूळ कढवताना पाणी घातलंय म्हणून विचारलं.
  • Log in or register to post comments
न
नूतन Mon, 10/08/2012 - 18:18 नवीन
सर्वांचे आभार. ह्या वड्या प्रयोग म्हणुन केल्या होत्या. पण बर्‍या झाल्या म्हणुन शेअर केल्या. या वड्या आठ दिवस टिकायला हरकत नाही, पण तितके दिवस शिल्लक राहील्या तर..
  • Log in or register to post comments
न
नक्षत्र Tue, 10/23/2012 - 22:01 नवीन
खरच खुप छान आहेत..
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    19 hours 45 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    19 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    19 hours ago
  • सुंदर !!
    20 hours 1 minute ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    20 hours 4 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा