Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

लसुनी मश्रुम आणि बेबी कॉर्न.

प
प्रभाकर पेठकर
गुरुवार, 09/13/2012 - 13:59
DSC_03880001
साहित्यः बटण मश्रूम १०-१२ नग बेबी कॉर्न १०-१२ नग तेल २ ते ३ मोठे चमचे (टेबल स्पून) लसूण २ ते ३ मोठे चमचे कांदा १ मोठा टोमॅटो १ मध्यम हळद १/२ लहान चमचा ( टी स्पून) तिखट १/२ लहान चमचा गरम मसाला १/२ लहान चमचा मीठ चवीनुसार कोथिंबीर मुठभर तयारी: मश्रूमचे चार चार तुकडे करून घ्या. बेबी कॉर्नचे (तिरपे) तुकडे करून घ्या. २ ते ३ मोठे चमचे होतील एवढा लसूण बारीक चिरुन घ्या. कांदा बारीक चिरुन घ्या. टोमॅटो मिक्सर मधून फिरवून त्याची प्यूरे करून घ्या. कोथिंबीर बारीक चिरुन घ्या. कृती: एखाद्या छोट्या कढईत अथवा फ्राय पॅन मध्ये तेल गरम करा. तेल चांगले तापले की त्यात बारीक चिरलेला लसूण टाकून मध्यम आंचेवर लाल होई पर्यंत परतुन घ्या. लसूण लाल झाला की त्यावर बारीक चिरलेला कांदा लाल होईस्तोवर परतुन घ्या. कांदा नीट परतला गेला की त्यावर ३ मोठे चमचे टोमॅटो प्यूरे टाकून परता. त्यावर मीठ, हळद, तिखट, गरम मसाला टाकून परतत राहा. आता त्यावर मश्रूम टाकून परता. मश्रूम मध्ये पाण्याचा अंश जास्त असतो त्यामुळे पाणी टाकताना सांभाळून. आपल्याला रस्सा भाजी करायची नसून अंगचाच मसाला असला पाहिजे. थोड्यावेळाने मश्रूमला पाणी सुटेल. गरज भासल्यास अगदी १-२ मोठे चमचे (टेबलस्पून) पाणी टाकून परतत राहा. मश्रूम जसे शिजत जातील तसे आकाराने जरा लहान होतील. साधारण शिजले की त्यात बेबी कॉर्न आणि, सजावटी साठी थोडी बाजूला ठेवून, कोथिंबीर घाला. मंद आंचेवर शिजवा. गरज भासेल त्या नुसार १-२ चमचे पाणी घाला. बेबी कॉर्न जरा करकरीतच राहू द्या. आता भाजी बाऊल मध्ये काढून उरलेल्या कोथिंबीरीने सजवा. शुभेच्छा...!

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 8953 views

💬 प्रतिसाद
ज
जाई. गुरुवार, 09/13/2012 - 14:44 नवीन
झकास
  • Log in or register to post comments
S
sagarpdy गुरुवार, 09/13/2012 - 14:52 नवीन
कातील!
  • Log in or register to post comments
ग
गणपा गुरुवार, 09/13/2012 - 14:56 नवीन
तोंपासु
  • Log in or register to post comments
र
रेवती गुरुवार, 09/13/2012 - 15:41 नवीन
अगदी मस्त! हा प्रकार पोळीबरोबर खाण्याचा आहे की स्नॅक म्हणून?
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर गुरुवार, 09/13/2012 - 16:25 नवीन
पोळी, परोठा, फुलका, पुर्‍या इ.इ. बरोबर, मुख्य पदार्थ म्हणून जेवणात.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस गुरुवार, 09/13/2012 - 16:54 नवीन
येकदम जबरी झालीय पाकृ.
  • Log in or register to post comments
न
निवेदिता-ताई गुरुवार, 09/13/2012 - 16:58 नवीन
मस्तच
  • Log in or register to post comments
स
सानिकास्वप्निल गुरुवार, 09/13/2012 - 17:00 नवीन
पाकृ आवडली :)
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव गुरुवार, 09/13/2012 - 17:49 नवीन
ही पाकृ मला जमेल असं वाटतय :) अर्धवटराव
  • Log in or register to post comments
ज
ज्योति प्रकाश गुरुवार, 09/13/2012 - 20:03 नवीन
जबरदस्त पाकृ व फोटो .
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 09/13/2012 - 20:12 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
च
चिंतामणी गुरुवार, 09/13/2012 - 21:32 नवीन
सुरेख. मश्रुम (अनेकांना याचे वावडे असते) आणि बेबी कॉर्न दोन्ही गोष्टी आणि त्यांचे कॉम्बीनेशन आवडते. फक्त जरा लसुणाचीच भिती आहे. तरीसुद्धा ट्राय करणारच. अवांतर- जरा थोडे अजून फोटू टाकायचा प्रयत्न करा.
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी गुरुवार, 09/13/2012 - 22:47 नवीन
बघायलाच इतकी आकर्षक आहे तर खायला किती खास असेल...
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस गुरुवार, 09/13/2012 - 23:23 नवीन
जनातलं: सुरेख फोटो... पेठकरबुवांच्या रेसेपीबद्दल काय बोलणार, ती फक्कड असतेच. डिशची चवही सुरेखच असणार... मनातलं: ते बेबी-कॉर्न घातल्यानंतर आणि कोथिंबीर घालायच्या अगोदर जर चार खाडीची सुंगटा त्यात घातली तर काय बहार येईल!! नाय म्हणजे जी भाजी आता अप्सरास्वरूप आहे ती देवतास्वरूप होईल!!!! :)
  • Log in or register to post comments
प
पिंगू Fri, 09/14/2012 - 06:40 नवीन
पिडाकाका, पण आमच्यासारख्या गवताळांसाठी ती दैत्यासम होईल, त्याचं काय.. :)
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Fri, 09/14/2012 - 06:50 नवीन
कुठल्याही पाककृतीत स्वतःच्या आवडीनुसार आणि स्वजोखमीवर हवे तसे बदल करण्यास परवानगी आहेच. जे कांही नवनिर्माण होईल ते (उत्तम झाल्यास) मिपावर, अगदी स्वतःची पाककृती म्हणून, उपलब्ध करून द्यावे.
  • Log in or register to post comments
प
पियुशा Fri, 09/14/2012 - 08:07 नवीन
रेसेपी झकास अन सोपी आहे :) पण ज्यांना मश्रुम आवडत नाही त्यांनी पनीर वापरले तर चालेल ? पनीर अन स्वीट कॉर्न कॉम्बो कसा लागेल ?
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Fri, 09/14/2012 - 10:31 नवीन
पनीर वापरले तर चालेल ? पनीर अन स्वीट कॉर्न कॉम्बो कसा लागेल ? उत्तर वरती दिले आहे.
  • Log in or register to post comments
प
पियुशा Fri, 09/14/2012 - 08:07 नवीन
रेसेपी झकास अन सोपी आहे :) पण ज्यांना मश्रुम आवडत नाही त्यांनी पनीर वापरले तर चालेल ? पनीर अन स्वीट कॉर्न कॉम्बो कसा लागेल ?
  • Log in or register to post comments
क
कच्ची कैरी Fri, 09/14/2012 - 08:25 नवीन
एकदम झक्कास्स्स्स्स्स्स्स !!!!!!!
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Fri, 09/14/2012 - 10:35 नवीन
काकानु मश्रुमला पर्याय सांगा. 'तुम्हीच ठरवा' वैग्रे उत्तर नको. तुम्हीच सुचवा.
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Fri, 09/14/2012 - 16:58 नवीन
मश्रूमला पर्याय (गुणवत्ते नुसार), टोफू. अर्थात बिनकर्ड. गुणवत्तेचा विचार नाही करायचा म्हंटलं तर पनीर, भोपळी मिरची, ओले मटार इ.इ.इ. मांसाहारात, बोनलेस चिकनचे तुकडे. सर्व टाळून नुसत्या बेबी कॉर्नची भाजीही चांगली लागेल.
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Sat, 09/15/2012 - 08:48 नवीन
धन्याचे वादस हो काका. :)
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 09/14/2012 - 13:19 नवीन
आहाहा... आधीच मश्रूम मला फार आवडते,त्यात बेबी कॉर्न ! काय मस्त चव लागत असेल ! :)
  • Log in or register to post comments
प
पैसा Fri, 09/14/2012 - 17:18 नवीन
असल्या पाकृ फक्त हाटेलात खायच्या असतात असा आतापर्यंत समज होता!
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Sat, 09/15/2012 - 02:46 नवीन
.
  • Log in or register to post comments
इ
इरसाल Sat, 09/15/2012 - 05:44 नवीन
लसुण व मशरुम हे आवडते पदार्थ आहेत. करुन पहावी म्हणतो.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Mon, 10/01/2012 - 07:00 नवीन
काल हा पदार्थ ट्राय केला. घरात फक्त मला मश्रुम्स आवडतात अश्या समजातून कमी केला होता. पण या पाकृत दिलेली मापे-प्रमाण जराही न चुकवता केला आणि इतका मस्त झाला होता की फोटो काढण्यापुरताही राहिला नाही ;) आभार!
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Mon, 10/01/2012 - 07:02 नवीन
फक्त टोमॅटो अधिक लाल असल्याने की काय माहित नाही पण ग्रेव्ही लालचुटुक झाली होती.. चवीला ब्येष्ट असल्याने फार विचार केला नाही.. मात्र वरचा रंग आणायला काही वेगळे करावे लागते का? (हाटेलातही असाच रंग असतो)
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Mon, 10/01/2012 - 12:54 नवीन
जाई., sagarpdy, गणपा, रेवती, वल्ली, निवेदिता-ताई, सानिकास्वप्निल, अर्धवटराव, ज्योति प्रकाश, अत्रुप्त आत्मा, चिंतामणी, श्रीरंग_जोशी, पिवळा डांबिस, पिंगू, पियुशा, कच्ची कैरी, परिकथेतील राजकुमार, मदनबाण, पैसा, पैलवान, इरसाल, ऋषिकेश सर्वांना धन्यवाद. @चिंतामणी, >>>> जरा थोडे अजून फोटू टाकायचा प्रयत्न करा. आवश्यकता भासत नाही. जी गोष्ट शब्दात वर्णन करून समजते त्यासाठी छायाचित्र देणे मला पटत नाही. अंतिम पदार्थ कसा दिसेल हे शब्दात वर्णन करता येणार नाही म्हणून आणि पाककृतीला आकर्षकता यावी म्हणून तेवढे एक छायाचित्र मी टाकतो. @ॠषिकेश, टोमॅटो पेक्षा जे तिखट वापरले ते बदलून पाहा. काही काही तिखटात खायचा रंग आधीच मिसळलेला असतो. असे तिखट सर्वस्वी टाळावे. काश्मिरी मिरच्याही रंगाला खुप लाल असतात. त्या आणि त्याचे तिखट टाळावे. साधे बिन रंगाचे आणि मध्यम तिव्रतेचे तिखट वापरावे. भारतात कुसुम ब्रँडची दोन तिखटे मिळतात. एक सर्वसाधारण तिखट आहे ते बिन रंगाचे असते. दुसरे आहे रेशीमपत्ती. ते मध्यम लाल, मध्यम तिव्र आणि चवीला चांगले असते. मी सहसा तेच वापरतो. रंगाची गरज असेल तर काश्मिरी मिरच्या वापरतो. कुसुम ब्रँड मिळत नसेल तर गुंटूर आणि बॅडगी मिरच्या चांगल्या आहेत. अन्यथा कुठलेही बिन किंवा कमी रंगाचे पण चांगल्या चवीचे तिखट वापरावे. तिखटात रंग, चव आणि तिखटपणा हे तिन गुणधर्म पाहावे लागतात. हे तिन्ही गुणधर्म एकाच प्रकारच्या मिरचीत मिळत नाही. तेंव्हा दोन प्रकारच्या मिरच्या मिसळून तिखट बनवावे. जसे, काश्मिरी+बेडगी किंवा काश्मिरी +गुंटूर किंवा बेडगी+गुंटूर इ.इ.इ.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 13 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 17 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 21 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा