Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

लाह्यांचा खरवस.

ज
ज्योति प्रकाश
Mon, 09/10/2012 - 20:39
साहित्यः-२ वाट्या ज्वारीच्या लाह्या. १ वाटी काजू. १ वाटी खवलेले खोबरे. ८-९ चमचे साखर(गोडीप्रमाणे) अर्धा चमचा वेलचीपूड. दिड वाटी कोमट पाणी(नारळाच्या दुधासाठी). तूप. कृती :-प्रथम थोड्या गरम पाण्यात दोन तास काजू भिजत घाला.पाऊण वाटी कोमट पाणी घालून खोबरे वाटा व घट्ट पिळून दाट दूध काढा.परत उरलेले पाणी घालून दूध काढा.दोन्ही दूध एकत्र करा. भिजलेले काजू व लाह्या एकत्र करून मिक्सर मध्ये वाटा.त्यात साखर व दूध घालून गंधासारखी(देवाला लावण्यासाठी उगाळतात त्याप्रमाणे) पेस्ट करा. वेलचीपूड मिसळा. हे मिश्रण तूप लावलेल्या डब्यात ओता. हा डबा कुकरमध्ये ठेवून खरवस उकडा. थंड झाल्यावर खरवसाच्या वड्या कापा.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 8906 views

💬 प्रतिसाद
अ
अर्धवटराव Mon, 09/10/2012 - 21:21 नवीन
हि रेसिपी कुरीयन साहेबांना श्रद्धांजली म्हणायची काय?? अर्धवटराव
  • Log in or register to post comments
ग
गणपा Mon, 09/10/2012 - 21:26 नवीन
अफलातून पाककृती आहे.
  • Log in or register to post comments
स
सानिकास्वप्निल Mon, 09/10/2012 - 23:58 नवीन
अगदी हेच म्हणतेय.. छान पाकृ :)
  • Log in or register to post comments
म
मोदक Mon, 09/10/2012 - 23:12 नवीन
एग पुडींगचे व्हेज व्हर्जन आहे का..?
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Tue, 09/11/2012 - 07:42 नवीन
म्हंजे ही पाकृ अंडे घालून करता येणार नाही?? :( असो. सोपीच आहे कृती. पण आता इथे लाह्या शोधणे आले. ( खर्रेच! :( )
  • Log in or register to post comments
भ
भरत कुलकर्णी Tue, 09/11/2012 - 00:15 नवीन
अफलातून पाककृती आहे ही. एक कुतूहूल म्हणून खालील प्रश्न विचारतो: लाह्या म्हणजे काय? त्या कशा बनतात? हे कुणाकुणाला माहित नाही? हात वरती करा.
  • Log in or register to post comments
र
रेवती Wed, 09/12/2012 - 16:34 नवीन
अगदी वेगळी पाकृ आहे. आवडली. भकु, जोंधळे थोडावेळ पाण्यात भिजवतात, नंतर फडक्यात बांधून ठेवतात असे काहीसे आठवते. नंतर मात्र मोठा कुकर कोरडाच गरम करायचा आणि त्यात थोडे थोडे जोंधळे टाकून ते उडू नयेत म्हणून झाकण हातानेच अर्धवट धरायचे. तडतड करत लाह्या फुटतात. त्या काढून पुन्हा जोंधळे टाकायचे. नंतर चांगल्या लाह्या इतर गोष्टींसाठी वापरायच्या तर गणंग/ न फुटलेल्या/ अर्धवट फुटलेल्या लाह्यांपासून आणखी पदार्थ होतात. एकंदरीतच वाया काही घालवायचे नाही. :)
  • Log in or register to post comments
क
कच्ची कैरी Tue, 09/11/2012 - 03:46 नवीन
मस्त ,आत्ताच खाव्याश्या वाटत आहे :)
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Wed, 09/12/2012 - 09:56 नवीन
प्रेषक कच्ची कैरी Tue, 11/09/2012 - 07:16. मस्त ,आत्ताच खाव्याश्या वाटत आहे Smile अभिनंदन............... अभिनंदन........ अभिनंदन
  • Log in or register to post comments
म
मृत्युन्जय Tue, 09/11/2012 - 07:45 नवीन
वेगळीच पाकृ आहे. आता इथे कोमट पाणी शोधणे आले
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Tue, 09/11/2012 - 08:57 नवीन
जॉधळ्याच्याच हव्या का लाह्या? मक्याच्या नाही चालणार? करुन पाहेन म्हणते.
  • Log in or register to post comments
ज
ज्योति प्रकाश Tue, 09/11/2012 - 11:20 नवीन
मक्याच्या लाह्यांचा कधी करून बघितला नाही.केल्यावर मलाही सांगा कसा होतो ते.
  • Log in or register to post comments
त
तर्री Tue, 09/11/2012 - 09:03 नवीन
पा. कृ . आवडली. (करायला सांगण्यात येईल !) खरवस हा अत्यंत आवडता प्रकार. लई वेळा आभार !
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 09/11/2012 - 11:23 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
प
पैसा Tue, 09/11/2012 - 14:53 नवीन
काजू बिजू आहेत म्हणजे चव मस्त असणारच!
  • Log in or register to post comments
स
सूड Tue, 09/11/2012 - 18:02 नवीन
हटके रेशिपी. पण कुकरमध्ये ठेवून उकडायचा म्हणजे शिट्टी ठेवायची का काढायची ?
  • Log in or register to post comments
ज
ज्योति प्रकाश Tue, 09/11/2012 - 20:29 नवीन
कुकरची शिट्टी काढून खरवस उकदावा.
  • Log in or register to post comments
ज
जाई. Tue, 09/11/2012 - 18:21 नवीन
मस्त!!
  • Log in or register to post comments
श
शुचि Tue, 09/11/2012 - 23:34 नवीन
सुंदर अनवट पाकृ
  • Log in or register to post comments
न
निश Wed, 09/12/2012 - 07:45 नवीन
ज्योति प्रकाश जी , खरच पप्रतिम रेसिपी आहे ही. मस्त भारी रेसिपी
  • Log in or register to post comments
ह
हारुन शेख Wed, 09/12/2012 - 07:57 नवीन
आमच्याकडे खरवस खुपसारा खजूर आणि पिस्ते टाकून बनवतात. तुम्ही दिलेला प्रकार खूप वेगळा आहे. छानच असणार
  • Log in or register to post comments
ग
गवि Wed, 09/12/2012 - 09:04 नवीन
अश्याच आणखी जरा नेहमीपेक्षा वेगळ्या पाककृती हव्यात.. धन्यवाद..
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Wed, 09/12/2012 - 13:31 नवीन
कधी येऊ खायला ?
  • Log in or register to post comments
र
रमताराम Wed, 09/12/2012 - 17:02 नवीन
दोन वाट्या लाह्या की लाह्यांचं पीठ? दोन वाट्या लाह्यांबरोबर एक वाटी काजू नि एक वाटी खोबरं हे प्रमाण पाहता त्यांना लाह्यांचा खरवस म्हणायचा की काजू-खोबर्‍याचा? दोन वाटी लाह्या घेतल्या तर त्यांचं पीठ जेमतेम अर्धी वाटी होईल ना? लाह्या अल्पमतात जातायत ना.
  • Log in or register to post comments
ज
ज्योति प्रकाश Wed, 09/12/2012 - 20:31 नवीन
दोन वाट्या लाह्याच घ्यायच्या.पीठ नाही.लाह्या अल्पमत्तत जात नाहीत्.खर्वसात लाह्यांची चव येते.
  • Log in or register to post comments
ख
खडीसाखर Sun, 09/16/2012 - 18:22 नवीन
नेहमीपेक्षा वेगळी पाकृ.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 14 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 18 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 22 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा