Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

झटपट सांजोरी.

ज
ज्योति प्रकाश
Sat, 09/08/2012 - 16:55
साहित्य:-उरलेला शिरा. भिजवलेली कणिक (थोडी सैल भिजवलेली असावी). थोडे दुध. पिठीसाखर. तूप. कृती :- उरलेल्या शिर्यात थोड्या दुधाचा हबका मारावा व थोडी पिठीसाखर घालून चांगले मिक्स करावे. पुरणपोळीप्रमाणे कणकेच्या पिठात शिर्याचे सारण भरावे.व तव्यावर तूप सोडून सांजोरी चांगली खरपूस भाजावी. साजुक तुपाबरोबर खाण्यास तयार झटपट सांजोरी.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 8066 views

💬 प्रतिसाद
त
तर्री Sat, 09/08/2012 - 17:15 नवीन
गेल्या काहे दिवसात एकदम रापचिक पा.कृ. येथे येत होत्या. त्यानंतर ही साधीशी पाकृ. केटरीना , करीना नंतर जानकी काकू याव्या तशी. काकू बाई प्रेमळ दिसत आहेत.
  • Log in or register to post comments
प
पक पक पक Sat, 09/08/2012 - 18:41 नवीन
:) लै झाक जानकी काकु.. :tongue:
  • Log in or register to post comments
ग
गोंधळी Sat, 09/08/2012 - 17:59 नवीन
सोपी आणि मस्त पा.क्रु.
  • Log in or register to post comments
प
पैसा Sat, 09/08/2012 - 18:29 नवीन
सोपी पाकृ. आणि शिर्‍याचा उपयोग करण्याची आयडिया आवडली.
  • Log in or register to post comments
क
कच्ची कैरी Sun, 09/09/2012 - 03:44 नवीन
अच्छा तुम्ही याला सांजोरी म्हणतात का ?? आमच्याकडे करंजीच्या गोल प्रकाराला सांजोरी म्हणतात .
  • Log in or register to post comments
ड
डावखुरा Sun, 09/09/2012 - 05:56 नवीन
तरीही चुकलात...सांजोरी मध्ये मोहन भरलेले असते..
  • Log in or register to post comments
इ
इरसाल Mon, 09/10/2012 - 08:14 नवीन
त्या मोहनचा जीव गुदमरत नाही का हो सांजोरीमधे. बादवे : आमच्याकडे करंजीला सांजरी म्हणतात. (अहिराणी मधे) बाकी ही बनवलेली वस्तु पुरणपोळी सदृश्य दिसत आहे. छान लागावी. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
ड
डावखुरा Tue, 09/11/2012 - 07:40 नवीन
रवा तुपात थोडासा भाजुन घ्या..[१ चमचा तुप =४ वाटी रवा] थोडा तांबडा करुन घ्या.. ३वाटी पिठी साखर+ थोडेसे दुध टाकुन [जास्त गोळा नको फक्त ओलसर] + हवी असल्यास थोडी वेलदोडे पुड+खोबर्याचा बारीक कीस पण टाकु शकतात.. **ह्या मोहनचा जीव गुदमरत नाही उलट त्याला आनंद होतो फराळाच्या डीश मध्ये जायला मिळाल्याने.. ;) अवांतर : आणि मैद्याच्या सारणात हे मोहन भरुन[पुरण्पोळीसारखे] पुरीएवढ्या लाटुन तुपात्/तेलात तळुन काढा आणि खातांना परत गावराणी तुपासोबत चापा..सांजोरी अति अवांतर : तुमाच्या फोटोत दिसत असलेली वस्तु करंजी सदृश्य दिसत आहे त्यात ओले किंवा कोरड्या खोबर्याची खिरापत करुन भरली की त्याला करंजी म्हणतात.. दोन्ही अतिशय फेव्हरेट पदार्थ आहेत.. :)
  • Log in or register to post comments
म
मोहनराव Mon, 09/10/2012 - 16:11 नवीन
मला का भरतात त्यामध्ये? ;)
  • Log in or register to post comments
ड
डावखुरा Tue, 09/11/2012 - 07:41 नवीन
:)
  • Log in or register to post comments
ड
डावखुरा Sun, 09/09/2012 - 05:58 नवीन
मस्त पाकृ..पण त्यासाठी आमच्याकडे शिराच उरत नाही.. पुढच्यावेळेला..शिरा मुद्दाम जास्त करना पडीन्न.. झकास-झटपट..
  • Log in or register to post comments
ख
खादाड Sun, 09/09/2012 - 12:54 नवीन
छान झट्पट पा.क्रु.
  • Log in or register to post comments
B
bhaktipargaonkar Mon, 09/10/2012 - 10:57 नवीन
सुरेखच...माझही आज्जी करायची हे असं ...कधी घट्ट वरण उरलं कि मग ते पुराणा सारखं शिजवून त्याच्या पोळ्या करून द्यायची...आधीच गोडघाशे आम्ही ..चटक मटक करून गट्टम करून टाकायचो
  • Log in or register to post comments
स
सानिकास्वप्निल Mon, 09/10/2012 - 11:43 नवीन
खूप छान आमच्याकडे ह्याला सांज्याच्या पोळ्या असे म्हणतात :)
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 09/10/2012 - 17:06 नवीन
नविन पाकॄ कळली ! :)
  • Log in or register to post comments
न
निवेदिता-ताई गुरुवार, 09/13/2012 - 05:50 नवीन
खुप छान
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 14 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 18 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 22 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा