Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

व्हेज समर रोल्स

स
सानिकास्वप्निल
गुरुवार, 09/06/2012 - 21:43
. साहित्यः राईस पेपर / शीट्स पातळ उभा चिरलेला कोबी पातळ उभं चिरलेलं गाजर पातळ उभी चिरलेली काकडी थोडे मीठ घालून उकडवून घेतलेल्या न्युडल्स (तुम्ही राईस न्युडल्स, पास्ता , काही ही वापरु शकता) १/२ टीस्पून पांढरी मिरपूड १ टेस्पून टोमॅटो सॉस स्वीट चिली सॉस सर्व्हींगसाठी . पाकृ: प्रथम एका ताटात थोडे पाणी घेऊन राईस पेपर / शीट्स दोन्ही बाजूने १० सेकंद भिजवून घ्या. भिजवलेली राईस पेपर / शीट्स एका कोरड्या ताटात किंवा चॉपींग बोर्डवर अलगदपणे ठेवा. (पाण्यात भिजवल्यामुळे नाजूकपणे हाताळावे) . . त्यावर उकडलेल्या न्युडल्स , गाजर, कोबी व काकडी ठेवा. थोडीशी पांढरी मिरपूड भुरभुरा व थोडासा टोमॅटो सॉस घाला. (जास्त सॉस घालू नका नाहीतर पेपर / शीट्स ओलसरपणामुळे फाटू शकतात) अलगदपणे रोल गुंडाळायला सुरुवात करा, कडा दुमडा व पुन्हा रोल गुंडाळा. असे सर्व रोल तयार करुन घ्या. . हे समर रोल्स तुम्ही स्वीट चिली सॉस बरोबर सर्व्ह करा. . नोटः ह्यात तुम्ही झुक्किनी, लेट्युस, मोडाचे मूग .इ. आवडीप्रमाणे भाज्या घालू शकता. ह्यात उकडलेल्या अंड्याचे स्लाईस ही घालू शकता. तेल अजिबात नसल्यामुळे आणी फक्त सॅलॅड असल्यामुळे पौष्टीक आहे. स्टार्टर / स्नॅक्स म्हणून सर्व्ह करु शकता. हवे असल्यास ह्याच शीट्स वापरुन तुम्ही स्प्रींग रोल म्हणून तळू शकता. आवडीप्रमाणे वेग-वेगळे सॉस वपरु शकता

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 12760 views

💬 प्रतिसाद
स
स्पंदना Fri, 09/07/2012 - 03:11 नवीन
आहा! किती नाजुक दिसताहेत. सुरेख!
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Fri, 09/07/2012 - 09:49 नवीन
+१.. याला पाकृ म्हणण्यापेक्षा कलाकृती म्हणणेच शोभेल...
  • Log in or register to post comments
र
रेवती Fri, 09/07/2012 - 03:25 नवीन
फारच नाजूक आणि रंगीबेरंगी आहेत. खाण्यापेक्षा बघत रहावेत असे! सगळे फोटू सुंदर आलेत. (फोटूही अलगदपणे काढले असावेत असे वाटत आहे.) पाकृ तशी सोपीही आहे. तुझ्याकडे पाहुणे आल्यावर हा प्रकार करू नकोस. खाण्याऐवजी बघत बसतील नुसते. ;)
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 09/07/2012 - 04:41 नवीन
लाजव्वाब दिख रहा है बाप.......! Image removed. क्या केहेने...! हाय हाय,हम फिदा हो गये। Image removed.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Fri, 09/07/2012 - 05:03 नवीन
काय खतरा झालीय पाकृ.
  • Log in or register to post comments
क
कच्ची कैरी Fri, 09/07/2012 - 05:54 नवीन
आजच मी व्हेज स्प्रिंग रोल बनवायचा विचार करत होते आणि लगेच तुझी एकदम झक्कास !! यम्मी !!! सुपरकूल !! रेसेपी मिळाली :) ह्याच नॉन -व्हेज व्हर्जन करुन बघेन :) धन्यवाद !
  • Log in or register to post comments
इ
इरसाल Fri, 09/07/2012 - 06:11 नवीन
काय बरे प्रतिसाद द्यावा ? बरं हे तांदळाचे पातळ कागद भारतात मिळतात काय? असल्यास कोणत्या अन्नसाखळीवाल्यांकडे ? स्प्रिंगरोल सारखे मैद्याचे चालावेत असा माझा अंदाज.( किंवा मोमोजसाठी असतात तसे)
  • Log in or register to post comments
म
मी_आहे_ना Fri, 09/07/2012 - 06:24 नवीन
नेहमीप्रमाणेच जबरदस्त पेशकश... इथे भारतात उन्हाळ्यात नाही तरी १५ ऑगस्टला बनवायला हरकत नाही, मधे एखादं "ब्लॅक ऑलिव्ह" लावून :)
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Fri, 09/07/2012 - 06:39 नवीन
व्वा....! पौष्टीक पाककृती बद्दल अभिनंदन आणि धन्यवाद. राईस पेपर शोधावा लागणार.
  • Log in or register to post comments
श
शिल्पा ब Fri, 09/07/2012 - 07:36 नवीन
छानच दिसताहेत, शिवाय पौष्टीक ! ते कागदासहीत खायचे का?
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Fri, 09/07/2012 - 09:52 नवीन
हो, हीच शंका विचारायची आहे, सानिकातै. कारण कागद काढला की खाणार कसं ?
  • Log in or register to post comments
इ
इरसाल Fri, 09/07/2012 - 10:51 नवीन
ते तांदळाच्या पिठाचे पातळ आवरण आहे.
  • Log in or register to post comments
स
सानिकास्वप्निल Fri, 09/07/2012 - 11:59 नवीन
तो कागद म्हणजे अगदीच कागद नाही ओ (एडिबल आहे तो )...तांदळाच्या पीठाचे पातळ आवरण आहे , पापडासारखे दिसते पण चवीला उकडीसारखे लागते. पाण्यात तो मऊ होण्यासाठीच भिजवायचा तो राईस पेपर काढून खायचा नाही त्याच्यासकट खायचं
  • Log in or register to post comments
प
पिंगू Sat, 09/22/2012 - 14:39 नवीन
सानिकाताई, राईस शीट ही तांदूळ आणि साबुदाणा एकत्र करुन बनवता येते..
  • Log in or register to post comments
स
सानिकास्वप्निल Mon, 09/24/2012 - 11:19 नवीन
खूप धन्यवाद माहिती दिल्याबद्दल :)
  • Log in or register to post comments
ह
हारुन शेख Fri, 09/07/2012 - 07:40 नवीन
लाजवाब ! तुमच्या स्वयंपाकघराला नक्कीच 'पंचतारांकित' दर्जा मिळालेला असणार.
  • Log in or register to post comments
५
५० फक्त Fri, 09/07/2012 - 09:49 नवीन
तुम्हाला मिशिलिन स्टार म्हणायचं आहे का ?
  • Log in or register to post comments
ह
हारुन शेख Fri, 09/07/2012 - 14:57 नवीन
पण ते फक्त तीन पर्यंतच देतात. इथे पाचपेक्षा एकपण कमी नाही चालायचा. ☆☆☆☆☆
  • Log in or register to post comments
ब
बाळ सप्रे Fri, 09/07/2012 - 07:58 नवीन
पुण्यात कर्वे रस्त्याजवळ एक "fine foods" नावाचे दुकान आहे जे फक्त आंतरराष्ट्रीय खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध आहे.. तिथे प्रयत्न करून बघतो हे तांदळाचे कागद मिळतात का.. बाकी पाकृ एकदम भारी.. या कागदात तुम्ही म्हटल्याप्रमाणे बरच काही गुंडाळता येईल :-)
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Fri, 09/07/2012 - 08:54 नवीन
पाककृती, चित्रीकरण, सादरीकरण, इ. सर्वकाही नेहमीप्रमाणे अजोड आहे. कोणत्या शब्दांत वर्णन करू? राइस पेपर सारख्या कागदांपासून(?) आंध्रात पुत्रेकुलू (पेपर स्वीट) नावाचा गोड पदार्थ बनवतात. अवांतर: मला मैसूरपाकाची पाककृती हवीय. कुणी पाकृ/ दुवा देऊ शकेल काय?
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Fri, 09/07/2012 - 10:16 नवीन
मला मैसूरपाकाची पाककृती हवीय. कुणी पाकृ/ दुवा देऊ शकेल काय? आंतरजालावर सर्व पाककृत्या मिळतात. गुगलून पाहा.
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Fri, 09/07/2012 - 10:23 नवीन
गुगलून पाहा.
पाहिल्यात आणि खूपश्या मिळाल्यात सुद्धा. पण मिपावरच्या पाकृ करून पाहताना जो आत्मविश्वास वाटतो, तो वाटत नाहीय. मिपावर यापूर्वी कुणी मैसुरपाकाची पाकृ मांडलीय का?
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Fri, 09/07/2012 - 09:18 नवीन
अतिशय सुंदर. :)
  • Log in or register to post comments
ग
गणपा Fri, 09/07/2012 - 09:24 नवीन
भलतीच नाजुक कलाकृती.
  • Log in or register to post comments
म
मृत्युन्जय Fri, 09/07/2012 - 11:01 नवीन
पाकृ नाजुक खरी आणी फटु सुद्धा लाजवाब. पण का ते महित नाही, ही पाकृ टेष्टी मात्र वाटत नाही. करुन किंवा विकत आणुन कधी खाईन असे वाटत नाही. प्रेझेंटेशन साठी मात्र १०० / १०० :)
  • Log in or register to post comments
स
सानिकास्वप्निल Fri, 09/07/2012 - 12:01 नवीन
करुन बघीतल्याशिवाय किंवा खाऊन बघीतल्याशिवाय कसे कळणार टेष्टी आहे का ते :) करुन बघा नाही आवडले तर राहिलं ... धन्यवाद
  • Log in or register to post comments
स
स्वाती२ Fri, 09/07/2012 - 14:34 नवीन
देखणे दिसतायत रोल्स!
  • Log in or register to post comments
स
सूड Fri, 09/07/2012 - 14:51 नवीन
बघत बसावं अशी पाकृ !!
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Fri, 09/07/2012 - 19:15 नवीन
अजीबात मजा नाहि आला... पण याला कारण डवखुर्‍याची बिर्याणी रेसीपी आहे. ति बिर्याणी आडवा हात मारुन पोट फुटेस्तो खायचे मांडे मनात शिकत असताना हि नाजुक साजुक स्टार्टर पाकृ बघितली... बिर्याणीचा रसभंग झाला :( अर्धवटराव
  • Log in or register to post comments
ग
गणपा Fri, 09/07/2012 - 19:40 नवीन
अर्ध्या तु वाईच उशिरा आलास लेका. आम्ही आधी सकाळी रोल्स हाणले आणि आता बिर्याणी. दोघांचाही लुत्फ घेतला. टीव टीव. ;)
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Fri, 09/07/2012 - 19:50 नवीन
नाव सार्थक करायची एकही संधी सोडत नाहि मी :P अर्धवटराव
  • Log in or register to post comments
प
पैसा Fri, 09/07/2012 - 19:22 नवीन
अतिशय देखणे रोल्स आहेत!
  • Log in or register to post comments
भ
भाग्या Wed, 09/12/2012 - 21:15 नवीन
मस्तच. मि पा वर प्रथमच लिहित आहे.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 09/14/2012 - 15:24 नवीन
मस्त ! :) (चायनीज स्प्रींग रोल्स प्रेमी) :)
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Fri, 09/14/2012 - 16:16 नवीन
य भारी....!
  • Log in or register to post comments
व
वैदेही बेलवलकर Fri, 10/26/2012 - 09:20 नवीन
काही पाककृती लॉगिन केल्यावरही दिसत नाहीत याचे कारण काय असू शकते?
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 14 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 18 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 22 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा