बार्ली डोसा
नमस्कार मंडळी! 'या लेखकाने पाककृती विभागात सक्रिय लिखाण करण्याचं धाडस कसं केलं' असा विचार करून दचकू नका! ही पाककृती माझी नाही :-) तेंव्हा नि:शंक मनाने प्रयोग करा, हा पदार्थ फारच नामी होतो असा माझ्या जिभेचा दावा आहे!
अमेरिकेत राहूनही फक्त शाकाहारी आणि फक्त स्वहस्ते शिजवलेलंच खाणार्या आमच्या परिचयातील हिमबिंदू या तेलुगू कन्यकेने, 'नेहमी नवीन काहीतरी प्रयोग करून पहायचं' या वृत्तीने ही अनोखी डिश खायला घातल्याबद्दल आणि त्याची पाककृती पुरवल्याबद्दल मी कृतज्ञ आहे. माझा सहभाग फक्त ही पाककृती तुमच्यापर्यंत मराठीतून पोहोचवणे इतकाच आहे, डोसा आवडेल अशी आशा आहे.
[ज्यांना कल्पना नसेल त्यांच्यासाठी: बार्ली हे गव्हासारखं एक द्विदल धान्य, ते असं दिसतं:
]
डोसा:
१ कप बार्ली
१/४ कप उडीद डाळ
अर्धी वाटी चणा डाळ
१०-१२ मेथी दाणे
वरील सर्व पदार्थ सकाळी एकत्र भिजवून ठेवा.
संधाकाळी ८-१० तासांनी अर्धी वाटी पोहे ५ मिनिटे भिजवून, आधी भिजवलेल्या वरील मिश्रणात एकत्र करा, आणि हे सर्व मिक्सर मधून मऊ पेस्ट होईपर्यंत वाटून घ्या. आता हे मिश्रण रात्रभर उबदार जागी आंबवण्यास ठेवा. दुसर्या दिवशी सकाळी नेहेमीप्रमाणे डोसे करा. ६-८ डोसे होतील. ते खालील दुधी भोपळ्याच्या चटणीबरोबर गरम-गरम खायला द्या/घ्या.
दुधी भोपळ्याची चटणी:
हिमबिंदूने ही चटणी बरीचशी या दुव्यावर दिलेल्या कृतीने केली, फक्त तिने दुधी भोपळा शिजवण्यापासून सुरूवात करण्याऐवजी दुधी भोपळ्याचा तयार पल्प वपरला आणि त्यात चिंचेचा एक चमचाभर कोळ वापरला.
१०० ग्रॅम दुधी भोपळ्याचा पल्प आणि अर्ध्या लिंबाएवढा चिंचेचा कोळ हे दोन्ही एकत्र करून त्याला १ चमचा गरम तेलात खालीलप्रमाणे फोडणी द्या:
१ टेबल्स्पून उडीद डाळ, ती तांबूस/ ब्राऊन झाल्यावर,
२ टेबल्स्पून जिरं
चिमूटभर हिंग
१ लाल मिरची
६-८ उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या
२ लसूण पाकळ्या
६-७ पानं कडीपत्ता
हे क्रमाने घातल्यावर मग वरील दुधी भोपळा-चिंच मिश्रण घाला. आता १/२ चमचा हळद घालून ३-५ मिनिटे परता (कच्च्या दुधी भोपळ्याचा वास गेला पाहिजे).
नंतर हे परतेलेले मिश्रण १ मूठभर भाजलेले, सोललेले शेंगदाणे घालून मिक्सर मध्ये त्याची पेस्ट करा, आवश्यक वाटेल तितकेच पाणी घाला.
💬 प्रतिसाद
स
सानिकास्वप्निल
गुरुवार, 09/06/2012 - 21:46
नवीन
डोसा व चटणी अप्रतिम :)
नक्कीच बनवून बघीन
- Log in or register to post comments
ग
गणपा
गुरुवार, 09/06/2012 - 23:32
नवीन
हा प्रकार बराच पौष्टिक असणार याबद्दल दुमत नाही. चटणीचा ही नवा प्रकार कळला.
बहुगुणी काका ही पाककृती इथे दिल्याबद्दल आभारी आहे.
हिमबिंदूस ही आमचे आभार कळवा.
- Log in or register to post comments
ध
धनंजय
Fri, 09/07/2012 - 00:57
नवीन
काही वर्षांपूर्वी मी वेगवेगळी धान्ये भिजवून दोसे बनवण्याचे प्रयोग केले होते. पैकी बार्लीचा दोसा छान लागतो +१
चटणीची नवी कृती कळली.
हिमबिंदू व बहुगुणी दोघांना धन्यवाद.
त. क. बार्ली आणि गहू दोन्ही एकदल धान्ये आहेत. उडीद डाळ हे द्विदल धान्य आहे. एक आणि द्वि-दलाचे मिश्रण, शिवाय भिजवलेले, त्यामुळे दोसा पौष्टिक आहे.
- Log in or register to post comments
ब
बहुगुणी
Fri, 09/07/2012 - 18:41
नवीन
Barley is a monocot plant.
- Log in or register to post comments
श
शिल्पा ब
Fri, 09/07/2012 - 01:22
नवीन
चटणी नक्की करुन बघेन.
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Sat, 09/08/2012 - 00:07
नवीन
=)) =))
अर्धवटराव
- Log in or register to post comments
स
सहज
Fri, 09/07/2012 - 03:00
नवीन
करुन पाहीन!!
- Log in or register to post comments
र
रेवती
Fri, 09/07/2012 - 03:29
नवीन
बहुगुणींना इथे पाहून आश्चर्य वाटले. :)
ही पाककृती ग्रेट आहे. दुधीची चटणी पहिल्यांदाच पाहिली.
हिमबिंदूस धन्यवाद आणि तुम्हालाही.
माझ्याकडे पाव किलो तरी बार्ली आहे. पूर्वी एका पाकृसाठी आणली होती. आता हा पदार्थ करता येईल.
फोटूही छानच आलाय.
- Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर
Fri, 09/07/2012 - 06:34
नवीन
पूर्वी एका पाकृसाठी आणली होती.
नक्की कुठल्या पाककृतीसाठी?
इथे शेअर केल्यास आम्हीही घरच्या घरी प्रयत्न करून पाहू.
- Log in or register to post comments
र
रेवती
Fri, 09/07/2012 - 15:17
नवीन
बार्ली सूपची पाकृ एका पुस्तकात पाहिली व बार्ली आणि हिरवे वाटाणे असे घेऊन आले होते. ते सूप काही रेस्टॉरंटसारखे झाले नाही व उत्साह मावळला. ;) उरलेले वाटाणे भिजवून, उकडून एकदा पावभाजीत वापरून टाकले पण बार्ली शिल्लक आहे. :)
- Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर
Sat, 09/08/2012 - 10:00
नवीन
हात्तेरे की. मी उगीच, ग्लास वगैरे घेऊन, बसलो होतो पाककृतीची वाट पाहात.
- Log in or register to post comments
स
सन्जयखान्डेकर
Sun, 09/09/2012 - 13:30
नवीन
हात्तेरे की. मी उगीच, ग्लास वगैरे घेऊन, बसलो होतो पाककृतीची वाट पाहात.
अहो मग ताकाला जाऊन भांडे कशाला लपवायचे?
माफ करा परिचय नसताना प्रतिक्रिया दिली, पण राहवले नाही.
संजय
- Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर
Sun, 09/09/2012 - 15:26
नवीन
ताकाला जाऊन भांडे कशाला लपवायचे?
'ताकाला' गेलो असतो तर नसते लपविले भांडे..!
- Log in or register to post comments
र
रेवती
Mon, 09/10/2012 - 14:34
नवीन
हा हा हा.
नाही नाही. ते पेय नाही.
- Log in or register to post comments
ब
बहुगुणी
Sat, 09/08/2012 - 01:28
नवीन
आणि आश्चर्य का म्हणे? रेवतीताई, अहो मी इथे पाकविभागात नेहेमीच टपकतो..षटकार मारता येत नाही म्हणून मॅचच बघू नये असं थोडंच आहे :-)
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Fri, 09/07/2012 - 04:33
नवीन
अगदी छान...
आणी चटणीसाठी-खास हिमबिंदू यांना धन्यवाद :)
- Log in or register to post comments
क
कच्ची कैरी
Fri, 09/07/2012 - 05:36
नवीन
चटणीचा नविन प्रकार कळला :) आणि डोसाही पौष्टिक असल्याने दोघही रेसेपिज करुन बघितल्या जातील :)
- Log in or register to post comments
इ
इरसाल
Fri, 09/07/2012 - 05:40
नवीन
"बहुगुणी" डोसा.
हिमबिंदुचे आभार.
- Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर
Fri, 09/07/2012 - 06:31
नवीन
वा..वा.. काहीतर वेगळे, तरीही चविष्ट. नक्कीच करून पाहणार. धन्यवाद.
बार्लीच्या डोश्याबरोबर एखादा कॅन बिअरचा असेल तर अजून मजा येईल.
- Log in or register to post comments
म
मदनबाण
Fri, 09/07/2012 - 08:34
नवीन
अरे, हा तर एकदम वेगळाच प्रकार ! :)
हिमबिंदू चे कौतुक वाटले. :)
बाकी, बियर बनवण्यासाठी मुख्यतः बार्ली वापरली जाते.
- Log in or register to post comments
स
स्वाती२
Fri, 09/07/2012 - 14:23
नवीन
आवसम! चटणीची पाकृ पण छान !
बार्ली सूप, बार्ली पुलाव खाऊन कंटाळा आला होता. आता अधून मधून हे डोसे करता येतील.
- Log in or register to post comments
प
पैसा
Fri, 09/07/2012 - 14:26
नवीन
मस्त आयडिया आहे. करून बघणार. चटणीसुद्धा आवडली.
पाकृ देणार्या हिमबिंदू यांना आणि पाकृ आमच्यापर्यंत आणणार्या बहुगुणींना धन्यवाद!
- Log in or register to post comments
त
तर्री
Fri, 09/07/2012 - 14:37
नवीन
सगळे करून पाहणार आहेत. माझे येथेच तर जबरी वांधे !
( काही म्हणजे काही करता येत नाही )
बाकी सर्व पाककला मार्तंड प्रतिक्रिया देते झाले आहेतच. त्यास दुजोरा.
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
Fri, 09/07/2012 - 14:52
नवीन
पण साला डोसे करण्यात मजा नाही. कोणीतरी करून घालणारे पाहिजे. ;)
- Log in or register to post comments
र
रेवती
Fri, 09/07/2012 - 15:14
नवीन
कोणीतरी कश्याला? हक्काचं माणूस तळकोकणात वाट बघतय पण आम्हाला लग्नाची घाई नाही ना! काय करणार?
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
Fri, 09/07/2012 - 15:51
नवीन
अफवा पसरवणे हा कायदेशीर गुन्हा आहे बरे.
कोण.. कोण ?
- Log in or register to post comments
प
प्रीत-मोहर
Sat, 09/08/2012 - 08:21
नवीन
रैवारच्या खाल्ल्या डॉष्याला तरी जागायचे होतेस!!!!!
- Log in or register to post comments
स
स्मिता.
गुरुवार, 10/04/2012 - 17:16
नवीन
हेच आम्ही कधीचे कानीकपाळी ओरडून सांगतो पण कुणाला पटत नाही.
- Log in or register to post comments
त
तर्री
Fri, 09/07/2012 - 15:05
नवीन
प्रचंड , दारूण , भीषण , सहमत.
परा - जरा बघ कोण करून घालतो/तेय खायला ?
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
Fri, 09/07/2012 - 15:52
नवीन
तुमच्यासाठी ? माझ्यासाठी ? का दोघांसाठी? ;)
- Log in or register to post comments
त
तर्री
Mon, 09/10/2012 - 07:55
नवीन
अर्ध-स्वार्थी
- Log in or register to post comments
ब
बहुगुणी
Fri, 09/07/2012 - 18:45
नवीन
हिमबिंदूला नक्की कौतुक कळवेन, इथल्या महारथींनाही पाककृती आवडली यातच सगळं आलं.
पाककृती वाचणार्यांचे आणि टंकनकष्ट घेणार्या सर्व प्रतिसादकांचे आभार!
- Log in or register to post comments
र
रेवती
Mon, 09/10/2012 - 14:32
नवीन
आजच केला होता हा दोसा. चांगला झालाय. चटणी मात्र नारळाची केली आहे.
एक नवा पदार्थ कळवलात ते बरे झाले.
- Log in or register to post comments
प
पुष्करिणी
Mon, 09/10/2012 - 15:41
नवीन
बार्ली नसल्यानं फक्त चटणी केली काल, छानच झालीय.
- Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश
Wed, 10/03/2012 - 11:56
नवीन
डोशाचा आणि चटणीचाही नवाच प्रकार समजला,
स्वाती
- Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस
गुरुवार, 10/04/2012 - 05:39
नवीन
बार्लीची फक्त बीयर चांगली होते....
आणि ती आमची पत्नी घरच्याघरी उत्तम बनवते!! काय नंदन, खरां की खोटां?
:)
तेंव्हा पास....
- Log in or register to post comments
स
स्मिता.
गुरुवार, 10/04/2012 - 17:15
नवीन
कधी न ऐकलेली आणी पौष्टिक पाकृ आहे. करून बघायला हरकत नाही. पण आधी इकडे बार्ली शोधणे आले ;)
- Log in or register to post comments
र
रामदास
गुरुवार, 10/04/2012 - 18:11
नवीन
या विकांताला हिमबिंदू शोधणे आले.
- Log in or register to post comments