भरलेली भेंडी....
प्रथम बाजारात प्रसन्न मनाने जाऊन अर्धा किलो ताज्या ताज्या कोवळ्या अन लहान भेंड्या आणाव्यात.
घरी आल्यावर त्याच प्रसन्न मुडमधे स्वच्छ पुसुन घेउन त्याचे देठ आणि शेपटी काढुन टाकावी. भेंडी मधे उभी चिर मारुन घ्यावी की त्यात मसाला नीट भरता येइल.
मसाल्यासाठी साहित्य :- ५ ते ६ टेबलस्पुन हरबर्याच्या डाळीचे पीठ थोड्या तेलावर भाजुन घ्यावे, चिंचेचा कोळ अर्धी वाटी, ओले खोबरे १.५ वाटी, शेंगदाण्याचे कुट १ वाटी, मीठ, मिरची अथवा तिखट, कोथिंबीर.
कृती :- भेंडी चिरताना आलेला कंटाळा एफ़ एम अथवा मोबाईलवरील आवडती गाणी ऐकुन घालवावा. वरील सर्व साहित्य एकत्र करुन मिक्सरवरुन काढावे.
या मिश्रणाचा साधारण घट्ट गोळा व्हावयास हवा. तर हे सारण गाणी ऐकतच भेंडीमधे भरावे जसे वांग्यात भरतो. या भेंड्या भरता भरता माइक्रोवेवच्या काचेच्या पसरट भांड्यात ठेवाव्यात. माइक्रोवर साधारण ५ मिनीटे या भरलेल्या भेंड्या वाफ़वुन घ्याव्यात. ज्याम्च्याकडे मायकोवेव्ह नाहीय त्यांनी चाळणीवर ठेवुन वाफ़वुन घ्याव्यात. वफ़वलेल्या भेंड्या थोड्याशा तेलावर फ़ोडणीला टाकुन खरपुस होईपर्यंत परतुन घ्याव्यात...
नुसत्या खाल्ल्या तर छान लागतातच पण मग बायको/ आई ओरडेल ना म्हणुन चपातीबरोबरच खायला घ्याव्यात...

💬 प्रतिसाद
ल
लीलाधर
Wed, 09/05/2012 - 08:06
नवीन
लई म्हणजे लई आवडीची है बगा आमची :) येक नंबर ओ श्रद्धा तै पाव किलो भरली भेंडी द्या पाठवून डब्यातून :) म्हणजे पोळी = खायला लई मज्जा येईल ओ.......
- Log in or register to post comments
श
श्रद्धा.
Wed, 09/05/2012 - 08:13
नवीन
:) नक्की पाठवुन देइन हो.... पण असे किती दिस ताईन पाठवत र्हायचं?????
- Log in or register to post comments
ल
लीलाधर
Wed, 09/05/2012 - 08:20
नवीन
जोपर्यंत आमच्या लीलाबाई घरात येत न्हाईत ना तोपर्यंत ;)
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Wed, 09/05/2012 - 08:32
नवीन
कोण ह्या ली-ला बै?
- Log in or register to post comments
ग
गवि
Wed, 09/05/2012 - 08:35
नवीन
लीलाधर, आपले घोडे आवर..!!
धीर नाही धरलास तर लीला कशी धरणार?.
- Log in or register to post comments
र
रमताराम
Wed, 09/05/2012 - 14:58
नवीन
=)) . च्यामारी इथे लोळायची स्मायली पायजे राव.
(लक्ष्मीधर) रमताराम
- Log in or register to post comments
स
स्पा
Wed, 09/05/2012 - 08:33
नवीन
लीलाबाई
चचा लैच उतावीळ झालायेस लेका.. :D
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Wed, 09/05/2012 - 10:57
नवीन
@भेंडी चिरताना आलेला कंटाळा एफ़ एम अथवा मोबाईलवरील आवडती गाणी ऐकुन घालवावा.
वरील सर्व साहित्य एकत्र करुन मिक्सरवरुन काढावे.>>>
@या मिश्रणाचा साधारण घट्ट गोळा व्हावयास हवा.>>>
@ तर हे सारण गाणी ऐकतच भेंडीमधे भरावे जसे वांग्यात भरतो. या भेंड्या भरता भरता माइक्रोवेवच्या काचेच्या पसरट भांड्यात ठेवाव्यात. माइक्रोवर साधारण ५ मिनीटे या भरलेल्या भेंड्या वाफ़वुन घ्याव्यात. ज्याम्च्याकडे मायकोवेव्ह नाहीय त्यांनी चाळणीवर ठेवुन वाफ़वुन घ्याव्यात. वफ़वलेल्या भेंड्या थोड्याशा तेलावर फ़ोडणीला टाकुन खरपुस होईपर्यंत परतुन घ्याव्यात... नुसत्या खाल्ल्या तर छान लागतातच पण मग बायको/ आई ओरडेल ना म्हणुन चपातीबरोबरच खायला घ्याव्यात...>>>
=============================================================
बाप...रे...काय ती म-हान लेखनशैली...! भेंडी....,,,फ्राय झालो राव आपण...!
- Log in or register to post comments
५
५० फक्त
Wed, 09/05/2012 - 10:59
नवीन
कशी येउ मी नांदायला बाई, ************** ही लावणी ऐकली आहे का ?
- Log in or register to post comments
च
चिंतामणी
गुरुवार, 09/06/2012 - 07:47
नवीन
मस्त.
भेंडीप्रिय असलेले पराशेट कुठे आहेत??
- Log in or register to post comments
ज
ज्योति प्रकाश
गुरुवार, 09/06/2012 - 12:09
नवीन
आजच करुन बघितली.छान झाली.
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
Fri, 09/07/2012 - 12:58
नवीन
आवडेश एकदम.
- Log in or register to post comments
क
कुंदन
Fri, 09/07/2012 - 16:46
नवीन
असेच म्हणतो.
- Log in or register to post comments
म
मदनबाण
Fri, 09/07/2012 - 16:22
नवीन
मस्त ! :)
- Log in or register to post comments