Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

वांगी भात

ग
गणपा
Sun, 09/02/2012 - 15:04
काय मंडली काय चाल्लावं? रैवारचं नल्ली बल्ली फोडलावं कं नाय? आज जल्ला आमच्या हतं मार्केट बंद. आन माजा फिरीज पन रोडावलता. त्यात हतं मिपावं एकाव-एक धागेकाडुन, मिपाशी कुक मंडली माजं डोस्कं फिरवुन रायली. जल्ला त्यातला एक पदार्थ घरान अशेल तर शप्पत. फिरीजमन डोकावलं ता एक वांगं तेवरंच भेटलं. आता ह्याचा काय कराचां म्हनुन थोडा डोस्कं खाजवलन. थोडं सामानाची जुलवा जुलवं केली नं ह्यो बग मीनी काय केला तं. आवरलं असेन तर मंग कसं काय केला त सांगतव. वांगं आवरत नसेन तर इकरुनच कल्टी मारली तरी चालन. सगल्यान पैलं तर वांगींभात मसाला आना मार्केटान. नय भेटला तरी वांदा नाय. मी सांगतं नं कसा बनवाचा तो.. २ मोठे चमचे चना डाल. २ मोठे चमचे उडिद डाल. २ चमचे धने (नसतीन तरं धना पुड) ३-४ लाल सुक्या मिरच्या (त्यावं नसतीन तर लाल तिखटं.) १ छोटा चमचा मेथी दाने. १ छोटा चमचा जीर. १ छोटा चमचा खसखस. थोडा हिंग. २-३ वेलच्या. दालचिनी १ इंच. ३-४ लौंगा ह्ये जकलं कोरडंस भाजुन घ्याचं. (मिरची नं धने नसतीन तर त्या पावडरी गॅस बंद केल्यावं टाकाच्या. सगलं गार झाल्यावं मिक्सरान टाकुन पाऊडर करुन घ्याची. (माजी मोठी माय त्यात सुकं खोबरं बी टाकाची. पन मंग तो मसाला जास्त दिस टिकाचा नाय, लगेच वापरावा लागाचा. म्हनून मीनी नाय घात्ला.) वाटान घाटन झाला तं आता मेन डिशकडे वलु. पैले एक वाटी भात मोकला शीजवून घ्या. तुमाना बासमती आवरत असनं तर तो घ्या पण त्ये काय कंपल्सरी नाय. मीनी तर सादा कोलम घेतला. हा पण भात एकदम सुट्टा झाला पायजे. नाय तर वांग्याची खिचडी खावी लागल. १ लहान चमचा मोहरी. १-१ लहान चमचा चना डाल, उडीद दाल. (या दोनी १०-१५ मिनिट पान्यात भिजवाच्या.) कडीपत्ता ३-४ हिरव्या मिरच्या. १/२ चमचा हलद. २ मोठे चमचे सुकं खोबरं. थोडी चींच (आंबट आवडत असन तर.) तमाल पत्र. ४-५ चमचे तेल. मीठ. येक वांगं. (लहान असतीन तर ५-६.) १ कांदा बारीक चिरलेला. सगल्यान पैले कढईत तेल तापवुन घ्यांच. तेल तापलं की त्यान मोहरी, चनाडाल-उडीदडाल टाकाची. थोडं परतल्यावं त्यात कडीपत्ता मिरची कांदा तमाल पत्र टाकुन परतुन घ्याचं. वांग्याच्या लहान फोरी करुन घ्याच्या. कांदा गुलाबी झाल्यावं मंग त्यात वांग्याच्या फोरी घालाच्या. थोडावेल शिजल्यावं मंग त्यात हलद घालाची. वांगं शिजा लागलं की मंग त्यात ३ चमचे वांगी भात मसाला टाकाचा. ५ मिनटानी त्यात सुक खोबरं टाकाचं. आवरत असन तर मंग चींचेचा कोल टाकाचा. (पण चींच, वांग शिजल्या नंतरच टाकं हा बाला, नाय तर मग वांदा व्हाचा.) मीठ टाकांचं. मसाला नं वांगं शिजलं की मंग त्यात शिजवलेला भात टाकुन एकत्र कराचा. झाकान लावून एक वाफ काराची. मना तललेला वांग पण लय आवरतं. म्हनुन मग मी ४ वांग्याचे काप पन केले. मंग कं बगतं कं बाला? येना जेवाला.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 18064 views

💬 प्रतिसाद
प
प्रास Sun, 09/02/2012 - 15:14 नवीन
मिपाबल्लवाचार्यांनी फारच त्रास दिलाय ब्वॉ आज... असो. पुन्हा एकदा धागा पाहिला. तूर्तास...
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sun, 09/02/2012 - 15:24 नवीन
आज दुपारी एके ठिकाणी दाबुन झालेलं बासुंदिचं जेवण,का कोण जाणे कळेनासं व्हायला लागलय... कुठेतरी हादडीला जाव लागणार ;)
  • Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच Sun, 09/02/2012 - 15:26 नवीन
करुन पाहावा लागेल !!! (वांग आणि भात कसा लागत असेल अशा विचारात असलेला) मराठी अन्ना.
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Sun, 09/02/2012 - 15:26 नवीन
वाईट्ट....!
  • Log in or register to post comments
क
कौशी Sun, 09/02/2012 - 15:30 नवीन
जमलाय वांगीभात..आवडला.
  • Log in or register to post comments
स
सुहास झेले Sun, 09/02/2012 - 15:42 नवीन
मिपाचे नावाजलेले बल्लव व सुगरणी, ह्यांनी एकदम छळवाद मांडला आहे. हल्ली मिपावर येताना इनोचा पुरेसा स्टॉक जवळ बाळगणे गरजेचे आहे ;) अवांतर - गणपा रॉक्स :) :)
  • Log in or register to post comments
र
रेवती Sun, 09/02/2012 - 15:42 नवीन
अरे गेल्या काही दिवसांत मिपावर रोजच जिभेचे (की नजरेचे) चोचले पुरवले जातायत. ;) पाकृ आवडली. मी वेगळ्या पद्धतीने हा भात करते. तुझ्या कृतीमध्ये थोडा सौधिंडीयन भास होतोय. तरी इकडे पाठवून दिल्यास मी तोंडभरून कौतुक करेनच!
  • Log in or register to post comments
ग
गणपा Sun, 09/02/2012 - 15:57 नवीन
तुझी पद्धत पण कळु दे ना आम्हाला. :) कुरीयरच्या पैश्यात थोडेसे पैसे जोडुन मीच यावं म्हणतो एकदा उसात. ;)
  • Log in or register to post comments
र
रेवती Sun, 09/02/2012 - 23:12 नवीन
अरे कढई गरम झाल्यावर किसलेलं सुकं खोबरं भाजून घ्यायचं, मग थोड्या तेलावर मिरी, दालचिनी, लवंगा, धणे, जिरे परतायचे. ते काढून तांदळाच्या प्रमाणात तेल वाढवायचं, त्यात फोडणी नेहमीची, बे लिव्हज् , बडी ईलायची एक किंवा दोन, कढीपत्ता, त्यावर वांग्याच्या फोडी परतून मग अर्धा तास आधी धूवून ठेवलेले तांदूळ व काजू हलक्या हाताने परतायचे. आधणाचे पाणी घालून गोडा मसाला, तिखट, आत्ता परतलेला मसाला बारीक करून व थोडं आंबट ताक. किंचित साखर. भात शिजत आल्यावर बाजूने तूप सोडायचे. वाढताना वरून ओलं खोबरं, कोथिंबीर, तूप. ही कृती नक्की अशीच असते का हे माहित नाही. थोडी या नातेवाईकानं सांगितलेली तर थोडी दुसर्‍या कोणी. ;) एकदा नवीन लग्न झालेली मुलगी कृती विचारायला लागली की सगळ्या सिनियर बायका आपापल्या कृत्या उत्साहाने सांगतात. तशातला प्रकार. :)
  • Log in or register to post comments
ग
गोंधळी Sun, 09/02/2012 - 15:54 नवीन
मस्त. रविवार असुनही सगळ्या शाकाहारी पा.क्रु. बघुन आनंद झाला.
  • Log in or register to post comments
स
सानिकास्वप्निल Sun, 09/02/2012 - 16:34 नवीन
आज मिपाकरांची दिवाळी आहे...काय एक-से-एक पाकृ आहेत :) वांगीभाताचा हा प्रकार खूप आवडल्या गेला आहे करुन बघणारच :)
  • Log in or register to post comments
प
पैसा Sun, 09/02/2012 - 18:38 नवीन
जल्लां, कं लिव्हलां, कं लिव्हलां! लैच आवरला रं बाला!
  • Log in or register to post comments
स
सूड Sun, 09/02/2012 - 20:39 नवीन
तुमच्या रेशिपीपरीस लिवायची टाईल आवाडली मना.
  • Log in or register to post comments
क
कच्ची कैरी Mon, 09/03/2012 - 04:34 नवीन
भाषा समजायला थोडा वेळ लागला पण रेसेपी उत्कृष्ट दिसतेय ,नक्कीच करुन बघेल .
  • Log in or register to post comments
भ
भरत कुलकर्णी Mon, 09/03/2012 - 04:51 नवीन
जबरदस्त. यशस्वी पाकृ.
  • Log in or register to post comments
प
प्रभो Mon, 09/03/2012 - 09:13 नवीन
वांगी आणी भात दोन्हीही आवडत नाहीत... सो पास.
  • Log in or register to post comments
ख
खडीसाखर Mon, 09/03/2012 - 11:35 नवीन
खुप दिवसांपासुन या पाकाकृती च्या शोधात होते. धन्यावाद! :) आणि नेहमीप्रमाणेच उत्कृष्ठ सादरीकरण!!
  • Log in or register to post comments
म
मेघवेडा Mon, 09/03/2012 - 13:14 नवीन
बल्लवांगीश्वरेश्वराचा विजै असो! मिपाच्या या बाब्याल्या बल्लवाकडून प्युव्वर भेज पाकृ बघून भरून पावलो!
  • Log in or register to post comments
न
नाना चेंगट Mon, 09/03/2012 - 13:29 नवीन
चान चान ;)
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Tue, 09/04/2012 - 03:10 नवीन
ह्ये नव हाय? आमी जरा येगळा करताव. पर असो . गणपाश्टाईल म्हणजे भारीच असणार न्हाय का? सगळ्यात भारी भाषेचा तडका. लय आवडला.
  • Log in or register to post comments
न
निनाद Tue, 09/04/2012 - 07:45 नवीन
वांगी भात हा प्रकार मी जन्मात खाल्ला नसता पण गणपाशेटच्या पा कृ ने माझे मन पालटले हो! भारी...
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 09/04/2012 - 08:05 नवीन
बाला,जल्ला किती भारी भारी पदार्थ बनवतोस ! ;)
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Tue, 09/04/2012 - 08:18 नवीन
या विकांताला करायला सांगेन; )
  • Log in or register to post comments
S
sagarpdy Tue, 09/04/2012 - 08:39 नवीन
कोणाला? ;)
  • Log in or register to post comments
इ
इरसाल Tue, 09/04/2012 - 08:58 नवीन
लय भारी येक पायाच्या कोंबरीचा तिक्कट भात बनवलाय. आनि ते तुकरे पन मोप भारी बोल.
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Tue, 09/04/2012 - 15:53 नवीन
वाट चुकलेला गणपा गवताळ प्रदेशात परत आलेला बघून भयानक आनंद झाला. आता जरा आळस सोडून पाकृ संपादन करा आणि वांग्याच्या कापाची पण पाकृ द्या.
  • Log in or register to post comments
ग
गणपा Tue, 09/04/2012 - 16:05 नवीन
कापांची पाककृती फार वेगळी नाही काही. काप करून ते मीठाच्या पाण्यात थोडावेळ बुडवून ठेवले. लाल तिखट + आलं लसून वाटण + मीठ + २ चमचे तेल + वांगी भात मसाला* एका भांड्यात एकत्र करून मग ते वांग्याच्या कापांना लावून ठेवले १० मिनिट. आणि नंतर तव्यावर शॅलो फ्राय केले. *वर त्याची कृती दिली आहेच.
  • Log in or register to post comments
ए
एस Tue, 09/04/2012 - 17:36 नवीन
प्रचंड आवडली आहे
  • Log in or register to post comments
ज
जाई. Tue, 09/04/2012 - 19:34 नवीन
झकास
  • Log in or register to post comments
प
प्राध्यापक Wed, 09/05/2012 - 16:26 नवीन
गणपाभौ ,लै बेष्ट पाकृ,फोटु न तर जीवच घेतला,पोटातल्या जठर्,आतडे,स्वादुपिंड,प्लिहा(हे कुठ असत माहित नाही) इत्यादी अवयवांनी असहकार पुकारला आहे, हे फोटो पाहील्या वर आता दुर्वांकुर ची थाळी जरी कुणी फुकटात खाउ घालतो म्हणल तरी गिळवणार नाही,आता वांगी भातच पाहीजे. (तुमच्या पाक्रुंचा आणी वांगी भातचा जबरदस्त फ्यान,) प्राध्यापक.
  • Log in or register to post comments
स
स्वाती२ गुरुवार, 09/06/2012 - 14:32 नवीन
ओह! मसाला वेगळा आहे हा. मी नेहमी काळा मसाला घालून करते. आता एकदा असा करुन बघेन. जोडीला पेठकरकाकांच्या कृतीने कढी गोळे!
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 13 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 17 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 21 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा