Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

सुरनळ्या

ज
ज्योति प्रकाश
Sun, 09/02/2012 - 13:05
साहित्यः-एक वाटी जाडे तांदूळ(शक्यतो जुने असावे) एक वाटी आंबट ताक मूठभर पोहे एक वाटी खवलेला नारळ पाव चमचा हळद अर्धा चमचा मेथी दाणे. गूळ चवीप्रमाणे मीठ तूप. कृती :- तांदूळ धुऊन घ्यावे.मेथी व ताक घालून ४-५ तास भिजत घालावे.बारीक वाटून घ्यावे. नंतर त्यात खवलेले खोबरे,पोहे,मीठ्,हळद व गूळ घालून १०-१२ तास झाकून ठेवावे.तव्याला अथवा फ्राय पॅनला तूप लावून जाडसर पीठ पसरावे.जाळीदार सुरनळ्याच्या कडा तांबूस झाल्या की न उलटता काढाव्या.पीठ तव्यावर पसरले की वर झाकण ठेवावे म्हणजे वरील बाजू पण शिजेल. गरम असतानाच तुपाबरोबर खायला द्यावे. (ह्याचप्रमाणे उसाच्या रसाच्या सुरनळ्या पण करतात्.त्यात ताकाऐवजी तांदुळ रसात भिजत घालावे.बाकी कृती वरिलप्रमाणे).

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 5622 views

💬 प्रतिसाद
म
मन१ Sun, 09/02/2012 - 13:24 नवीन
घरगुती चवीची पाकृ आवडली.
  • Log in or register to post comments
र
रेवती Sun, 09/02/2012 - 13:31 नवीन
हेच म्हणते. वेगळा पदार्थ आहे हा.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sun, 09/02/2012 - 14:26 नवीन
व्वा,,,,व्वा....! मस्त मस्त हाय. :)
  • Log in or register to post comments
ग
गणपा Sun, 09/02/2012 - 15:50 नवीन
चला न्याहारीसाठी अजुन एक पदार्थ मिळाला. :)
  • Log in or register to post comments
स
सानिकास्वप्निल Sun, 09/02/2012 - 16:41 नवीन
सुरनाळी बघून भूक लागली आहे :) झक्कास एकदम
  • Log in or register to post comments
श
शुचि Sun, 09/02/2012 - 17:38 नवीन
फारच छान.
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Sun, 09/02/2012 - 17:57 नवीन
जरा हटके दिसतेय स्वीट डिश ! छान .
  • Log in or register to post comments
स
सुहास झेले Sun, 09/02/2012 - 17:58 नवीन
मस्त मस्त.... :) :) इतक्या खादाडी धाग्यांवर प्रतिक्रिया दिलीय... शब्दसंपदा खुंटली ;-)
  • Log in or register to post comments
प
पैसा Sun, 09/02/2012 - 18:11 नवीन
मस्त आवडता पदार्थ! जाळी पण अप्रतिम पडलीय आणि या सुरनळ्या अशा जरा खरपूस मस्त लागतात. तुपाऐवजी नारळाच्या रसात गूळ घालून त्याबरोबर पण चांगल्या लागतात.
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Tue, 09/04/2012 - 03:14 नवीन
पहिल्यांदा ऐकला हा प्रकार. मस्तच असणार.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 14 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 18 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 22 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा