Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

पावभाजी विथ आईस्क्रीम लस्सी

ख
खडीसाखर
Sat, 09/01/2012 - 22:23
पावभाजी साठी साहित्यः १. बटाटे,फुलगोबी,हिरवे वाटाणे,फरसबी,सिमला मिर्ची, (एकुण इन्ग्रेडीएंट्स मध्ये बटाटे साधारण ४०%,फुलगोबी ३०%,हिरवे वटाणे १०%,फरसबी १०%, सिमला मिर्ची १०%) २. १ मोठा कांदा, ३. १ मोठा टोमॅटो, ४. ४-५ लसुण पाकळ्या,१/२ इंच आले, ५. २ मोठे चमचे तेल, ६. १ मोठा चमचा रेडीमेड पावभाजी मसाला, ७. हळद (१/४ टीस्पुन), ८. तिखट,मीठ (चवीनुसार), ९. बटर, १०. पाव, ११. कोथींबीर पावभाजी ची कृती: १. फुलगोबी,फरसबी,सिमला मिर्ची चिरुन घ्या. हिरवे वाटाणे सोलुन घ्या. बटाटे सोलुन चिरुन घ्या. २. या सगळ्या चिरलेल्या भाज्या कुकर ला लाऊन शिजवुन घ्या (साधारण ४ शिट्ट्या - मध्यम आचेवर). ३. कांदा, टोमॅटो चिरुन घ्या. आले-लसुण पेस्ट करुन घ्या. माझ्याकडे मिक्सर नसल्याने मी आलं-लसुण किसुन घेतलंय. ४. एका कढईत तेल तापायला ठेवा. तेल तापल्यावर त्यात चिरलेला कांदा टाकुन तो गुलाबी रंगाचा होईपर्यंत परता. ५. त्यात आलं-लसुण पेस्ट टाकुन पेस्ट हलकी ब्राउन होईपर्यंत परता. ६. टोमॅटो टाकुन परता. ७. थोडे तेल सुटायला लागले की हळद्,तिखट्,मीठ,पावभाजी मसाला टाकुन परता. ८. कुकर मध्ये शिजवलेल्या भाज्या रवी वापरुन स्मॅश करुन घ्या. ९. कढईतल्या मसाल्यांना तेल सुटायला लागले की त्यात स्मॅश केलेल्या भाज्या टाकुन चांगले परतुन घ्या. १०. भाजी पाचेक मिनीटे शिजली की कोथींबीर आणि १ टीस्पुन बटर टाकुन आणखी २ मिनीटे शिजवा आणि भाजी तयार! ११. आता एक पॅन थोडा गरम करुन घ्या. पावाला मधुन चाकुने कापुन,दोन्ही बाजुंनी बटर लाऊन पॅनमध्ये मस्त खरपुस भाजुन घ्या. १२. गरम गरम पावभाजी थोडं बटर टाकुन,बारीक चिरलेला कांदा,लिंबु आणी पावांसोबत पेश करा :) (कोथींबीर संपल्यामुळे ती 'सजावटी' मध्ये मिसींग आहे :-( ) आईस्क्रीम लस्सी साठी साहित्यः १. घट्ट दही-१ मोठे चमचे, २. साखर -४ टीस्पुन, मीठ - चिमुटभर, ३. वॅनिला आईस्क्रीम कृती: १. दही,साखर,मीठ ब्लेंडर मध्ये पाचेक मिनीटे घुसळुन घ्या. २. सर्व्ह करताना एका ग्लास मध्ये लस्सी ओतुन वरुन वॅनिला आईस्क्रीम टाका. शुभेछा :)

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 9000 views

💬 प्रतिसाद
श
शुचि Sat, 09/01/2012 - 23:02 नवीन
सुरेख मस्त!!! खूप आवडली पाकृ व फोटो.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sun, 09/02/2012 - 01:55 नवीन
काय अत्याचार चाललेत राव पहाटे पहाटे.
  • Log in or register to post comments
ब
बहुगुणी Sun, 09/02/2012 - 02:55 नवीन
काँबिनेशन कसं लागेल माहित नाही, पण लस्सीही इंटरेस्टिंग वाटते आहे, धन्यवाद!
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Sun, 09/02/2012 - 03:11 नवीन
पण एवढ्या सुंदर पाककॄती मध्ये 'फुलगोबी' व 'सिमला मिर्ची' हे शब्द सारखे खड्यासारखा मध्ये मध्ये येत होते.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Sun, 09/02/2012 - 03:15 नवीन
आईसक्रीम लस्सी एकदम जीवघेणी आहे :-D
  • Log in or register to post comments
र
रेवती Sun, 09/02/2012 - 03:30 नवीन
अशी पावभाजी आयती करून मिळाली तर किती बरं वाटेल. ;) तुम्हाला पाव जास्त भाजलेले आवडत नाहीत का? तरीही छान दिसतायत. लस्सी चांगली दिसतिये पण एकच प्याला ;) लस्सीसाठी पाच मिनिटं घुस़ळण जास्त नाही का वाटत? की वेळ ही अंदाजे दिली आहे?
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 09/02/2012 - 06:23 नवीन
छान... :)
  • Log in or register to post comments
स
सुहास झेले Sun, 09/02/2012 - 07:34 नवीन
पावभाजी पेक्षा लस्सी हिट आहे ;)
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 09/02/2012 - 10:03 नवीन
लैच भारी. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ज
जाई. Sun, 09/02/2012 - 10:13 नवीन
सुपर्ब
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sun, 09/02/2012 - 10:57 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
ख
खडीसाखर Sun, 09/02/2012 - 11:29 नवीन
सर्वांच्या उत्स्फुर्त प्रतिसादांकरिता धन्यवाद :) @रेवती ताई : हो हो, लस्सी घुस़ळण्याची वेळ अंदाजेच दिलेली आहे ;-)
  • Log in or register to post comments
प
पैसा Sun, 09/02/2012 - 11:33 नवीन
मिक्सर नसल्याने अडून न बसता केलेली पावभजी छान झालीय! दोन्हीचे फोटो एकदम झक्कास!
  • Log in or register to post comments
क
कच्ची कैरी Sun, 09/02/2012 - 12:35 नवीन
लस्सी बघुन तोंडाला पाणी सुटले
  • Log in or register to post comments
स
सानिकास्वप्निल Sun, 09/02/2012 - 12:38 नवीन
दोन्ही पाककृती छान झाल्या आहेत :) लस्सी जास्त आवडल्या गेली आहे :)
  • Log in or register to post comments
भ
भरत कुलकर्णी Sun, 09/02/2012 - 12:45 नवीन
दोन्ही (की तिनही) पाकृ छान आहेत वादच नाही, पण तिनही पदार्थ वेगवेगळे असतांना उगाचच एकत्र दिलेत म्हणून एकच पाकृ गणली जावू शकत नाही.
  • Log in or register to post comments
ग
गणपा Sun, 09/02/2012 - 14:03 नवीन
मिपावर स्वागत. लस्सी जास्त आवडली. तुमच्या पोतडीतल्या अन्य पाककृत्याही येउंदेत. :)
  • Log in or register to post comments
प
प्रास Sun, 09/02/2012 - 14:12 नवीन
तुम्ही नवीन असलात तरी आमची नेहमीचीच प्रतिक्रिया, धागा पाहिला. तूर्तास....
  • Log in or register to post comments
ड
डावखुरा Mon, 09/03/2012 - 05:38 नवीन
भुक भडकवली..
  • Log in or register to post comments
च
चावटमेला Mon, 09/03/2012 - 07:53 नवीन
लस्सी छानच दिसतीये. ह्या वीकांताला ट्राय केली जाईल..
  • Log in or register to post comments
इ
इरसाल Tue, 09/04/2012 - 06:52 नवीन
ह्या लस्सीला आमच्याकडे "घमंडी लस्सी " म्हणतात.
  • Log in or register to post comments
स
सुमीत भातखंडे Wed, 09/05/2012 - 14:43 नवीन
ऑल टाइम फेवरिट..
  • Log in or register to post comments
म
मैत्र Sun, 09/30/2012 - 00:37 नवीन
दोन वेळा करून पाहिली..बेष्ट झाली पावभाजी. आत्तापर्यंतची सगळ्यात उत्तम जमलेली पाव भाजी होती माझी.. फक्त भाज्यांचं प्रमाण पेठकर काकांच्या या पावभाजीचं (http://www.misalpav.com/node/816) घेतलं.. खूप धन्यवाद!
  • Log in or register to post comments
द
दादा कोंडके Sun, 09/30/2012 - 09:35 नवीन
पण पावभाजीमध्ये चमचाभर सुक्या बोंबलाची पूड टाकली नाही तर त्याला 'ती' चव येत नाही.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 13 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 17 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 21 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा