Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

कॉकटेल लाउंज : बॉईलरमेकर (BoilerMaker)

स
सोत्रि
Fri, 08/31/2012 - 03:08

Book traversal links for कॉकटेल लाउंज : बॉईलरमेकर (BoilerMaker)

  • ‹ कॉकटेल लाउंज : Almonda Amarita
  • Up
  • कॉकटेल लाउंज : गोवन समर ›
'कॉकटेल लाउंज' मालिकेतील आजचे कॉकटेल आहे "बॉईलरमेकर (BoilerMaker)" पार्श्वभूमी: अगदी सुरुवातीला जेव्हा 'फक्त चढवण्यासाठी' पिण्याचे दिवस होते तेव्हा पेग सिस्टीम असलेल्या हॉटेलमध्ये गेल्यावर, पेगनुसार पिण्यामुळे 'पिण्यावर' मर्यादा यायची (खरेतर हे 'खिशाला न परवणारे असल्यामुळे' असे असयला हवे :D ). त्यावर उपाय म्हणून मी एक पद्धत माझ्यापरीने शोधून काढली होती. व्हिस्कीचा एक पेग मागवायचा आणि एक बियर मागवायची. पाणी किंवा सोडा ह्याऐवजी बियर व्हिस्कीमध्ये मिक्स करून प्यायची. ह्या एक पेग आणि एक बियर ह्या फॉर्म्युल्यामुळे काम एकदम 'स्वस्तात मस्त' होउन जायचे. त्यावर बियरचा आणखी एक टिन हाणला की मग तर काय एकदम इंद्रपुरीतच... रंभा उर्वशी डाव्या उजव्या बाजुला... ;) आता साग्रसंगीत कॉकटेल्स बनवायला लागल्यावर ह्या भन्नाट कॉंबीनेशनचे काही कॉकटेल आहे का त्याचा शोध घेतला, त्याचा परिपाक म्हणजे आजचे कॉकटेल बॉईलरमेकर!
प्रकार बियर कॉकटेल
साहित्य
कॅनेडियन राय व्हिस्की
(पर्याय म्हणुन दुसरी कोणतीही व्हिस्की चालेल)
1 औस (30 मिली)
बियर 1 टिन
ग्लास बियर ग्लास आणि शॉट ग्लास
कृती: ह्या कॉकटेलचीची कृती अतिशय सोप्पी आहे. बियर ग्लास बिरयरने अर्धा भरून घ्या आणि शॉट ग्लास मध्ये व्हिस्की ओतून घ्या. आता तो शॉट ग्लास अलगदपणे बियर ग्लासमध्ये सोडा. हा ग्लास खाली जाताना हलकासा 'डुब्बुक' असा आवाज करतो तो इतका खास असतो की शब्दात वर्णन करणे निव्वळ अशक्य... आता उरलेली बियर ओतुन ग्लास टॉप-अप करा. चलातर मग, पोटंट आणि थंडगार बॉइलरमेकर तयार आहे :)

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 14511 views

💬 प्रतिसाद
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 08/31/2012 - 03:30 नवीन
डुब्बुक... :-D --^--^--^--^--^--^--^--^--^--^--^--^--^--^--^--^--^--^--^--^--
  • Log in or register to post comments
म
मी_आहे_ना Fri, 08/31/2012 - 05:58 नवीन
फ्रायडे मूडमध्ये 'डुब्बूक'ल्या गेलो आहे.... :)
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Tue, 09/04/2012 - 16:40 नवीन
+१. असेच म्हणतो. (टीटोटलर असूनही नादमयतेने नादावलेला) बॅटमॅन.
  • Log in or register to post comments
S
sagarpdy Fri, 08/31/2012 - 07:10 नवीन
रम + बियर ला काय म्हणतात हो?
  • Log in or register to post comments
स
सोत्रि Sun, 09/02/2012 - 10:03 नवीन
रम + बियर ह्या कॉकटेलला 'Gentleman' असे नाव आहे. - ( साकिया ) सोकाजी
  • Log in or register to post comments
च
चिगो Fri, 08/31/2012 - 09:26 नवीन
एकदम सहज जमेबल आहे हे काॅकटेल.. आवडेश..
  • Log in or register to post comments
ग
गणपा Fri, 08/31/2012 - 09:30 नवीन
अच्छा तर याला बॉईलमेकर असं सोफेस्टिकेटेड नावही आहे तर.... बरेच जणांकडुन ऐकलं होतं की एका शॉटमध्ये, विमानाला रॉकेट्चं इंजीन लावलं की जे होईल तो इफेक्ट येतो म्हणुन हा प्रकार करुन पाहिला होता. पण छ्या राव दोन गल्लास संपवून बी काय फरक पडला नाय. अर्थात तुमच्यावानी गल्लासात गल्लास नटाकता सगळं एकत्र केल व्हतं. आता असबी करुन पाह्यतो.
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Fri, 08/31/2012 - 11:33 नवीन
तुमाला सवयी लागल्यात स्कॊच अन् साजुक बियरच्या. येक डाव रॊयल च्यालेंज /स्ट्यागचा स्मॊल आणि क्यानन धा हजारची बियर वापरुन ह्योच प्रयोग करुन मंग बोला. ;-) सोकाजीआण्णा, जुन्या दिवसांची याद दिलवलीस भैय्या! चांगभलं, धळिराम (सचिव, आ र्य मदिरा मंडळ)
  • Log in or register to post comments
ग
गोंधळी Sat, 09/01/2012 - 18:22 नवीन
आयला गणपाभाउ_संपादक ही पी-रे-पी ह्या कंपुतले आहेत तर.
  • Log in or register to post comments
म
मोहनराव Fri, 08/31/2012 - 09:56 नवीन
एकदम सोप्प आहे.. करायला हरकत नाही...
  • Log in or register to post comments
ग
गवि Fri, 08/31/2012 - 10:37 नवीन
उत्तम आहे. शॉट लागत असणार.. सोपंही आहेच. धन्यवाद. प्रश्नोपनिषद सुरु: -ग्लासात ग्लास टाकल्याने नजाकत किंवा प्रेझेंटेबिलिटी वाढते आहे का? -एकात एक ग्लास टाकल्याने बाहेरचा मोठा (पक्षी बियरचा) ग्लास संपत आला की उलटा करुन पिताना अथवा बॉटम्स अप करताना आतला ग्लास घरंगळून ओठांवर तडमडत नाही का? -शिवाय पहिलं संपलं की दुसर्‍यांदा हेच ड्रिंक घ्यायचं असल्यास आतला ओला ग्लास बोटांनी / चिमट्याने काढून घ्यायचा परत भरुन आत सोडायचा किंवा प्रत्येक रिपीटिशनला एक नवा मोठा ग्लास आणि एक नवा शॉट ग्लास घ्यायचा हे दोन्ही उपक्रम पिण्यात व्यत्यय आणतात का? -की रिपीट करण्याची गरज भासत नाही? त्यापेक्षा छोटा ग्लास भरुन व्हिस्की आधीच मोठ्या ग्लासात वतून वर बियरचा टॉप अप का करु नये? प्रश्नोपनिषद समाप्त.
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Fri, 08/31/2012 - 11:43 नवीन
अरे, काय तबियतीनं पिणं आहे की नाही? आपण फक्त जाम रिचवण्याचा विचार करायचा, बाकीचे कश्ट घेण्यासाठी एखादी हसिंन साकी ठेवावी! ;-) क्येम सोकाजी?
  • Log in or register to post comments
म
मराठे Fri, 08/31/2012 - 19:01 नवीन
बियर ग्लास आणि शॉट ग्लास च्या ऐवजी फुलपात्र आणि दह्याची वाटी घेऊन करता येईल का ? ;-) ('अंड न घालता करता यील का?' महान मिपापरंपरेला स्मरून)
  • Log in or register to post comments
ग
गणपा Fri, 08/31/2012 - 19:10 नवीन
ओ मराठे, मग फुलपात्रात ताक आणि वाटीत काय खारी लस्सी घेण्याचा विचार हाय काय ? ;)
  • Log in or register to post comments
स
सोत्रि Fri, 08/31/2012 - 19:29 नवीन
पास! - (साकिया) सोकाजी
  • Log in or register to post comments
स
सोत्रि Fri, 08/31/2012 - 19:28 नवीन
गवि, ह्या सर्व प्रश्नोपनिषदाचे एकच उत्तर, एकदा घरी या आणि काय तो सोक्षमोक्ष लावा. हे आमंत्रणच समजा :) असो,
ग्लासात ग्लास टाकल्याने नजाकत किंवा प्रेझेंटेबिलिटी वाढते आहे का?
नक्कीच, फ्लेयर बारटेंडींग हा एक प्रकार तो असतो आणि त्याच्या अंतर्गत हे मोडते.
एकात एक ग्लास टाकल्याने बाहेरचा मोठा (पक्षी बियरचा) ग्लास संपत आला की उलटा करुन पिताना अथवा बॉटम्स अप करताना आतला ग्लास घरंगळून ओठांवर तडमडत नाही का
नाही. ही एक कला आहे. जी फ्लेयर बारटेंडींगचाच एक भाग आहे.
-शिवाय पहिलं संपलं की दुसर्‍यांदा हेच ड्रिंक घ्यायचं असल्यास आतला ओला ग्लास बोटांनी / चिमट्याने काढून घ्यायचा परत भरुन आत सोडायचा किंवा प्रत्येक रिपीटिशनला एक नवा मोठा ग्लास आणि एक नवा शॉट ग्लास घ्यायचा हे दोन्ही उपक्रम पिण्यात व्यत्यय आणतात का? -की रिपीट करण्याची गरज भासत नाही?
उत्तर एकच, ते बार टेंडरवर सोपवून खुषाल इंद्रपुरीत जायची तयारी करावी. :)
त्यापेक्षा छोटा ग्लास भरुन व्हिस्की आधीच मोठ्या ग्लासात वतून वर बियरचा टॉप अप का करु नये?
हीच तर खरी गंमत आहे. जेवणात मीठंच लागते चवीसाठी, मग ते पाककृतीत न टाकता, ते जेवण वाढल्यावर वरूनही घालता येईल की, पण आपण तसे करत नाही ;) - ( साकिया ) सोकाजी
  • Log in or register to post comments
ग
गोंधळी Fri, 08/31/2012 - 11:34 नवीन
ह्याला(धाग्याला) खरचं पाक -क्रुती हा विभाग योग्य आहे का?
  • Log in or register to post comments
आ
आनंदी गोपाळ Fri, 08/31/2012 - 18:49 नवीन
तो क्या आप इसे ना-पाक क्रुती बोलेंगे? तोबा तोबा!!
  • Log in or register to post comments
स
सोत्रि Fri, 08/31/2012 - 19:12 नवीन
अगदी माझ्या मनातला प्रश्न विचारलात! मलाही ह्या विषयावरील प्रत्येक नविन धागा टाकताना नेमका हाच प्रश्न पडतो! संमं ह्याचे त्वरेने निराकरण करावे अन्यथा रोषास तयार रहावे असा मी प्रस्ताव मांडतो! (तो फाट्यावर मारला गेल्यअस अज्याबात हरकत नाही, ते मिपाधर्माला अनुसरूनच असेल ;) ). - (मिपाधर्म पाळणारा ) सोकाजी
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Sat, 09/01/2012 - 15:56 नवीन
'जे न चाखे रवि' असा विभाग सुरु करावा काय?
  • Log in or register to post comments
आ
आंबोळी Sat, 09/01/2012 - 18:58 नवीन
मयगृह साकित्य तर्रा पिव्य पेयकृती दारू हे पुर्णद्रव्य दारूदालन पिटकंती ढोसाना नवे पेयन
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Wed, 09/05/2012 - 06:32 नवीन
आंबोळ्या या सर्वांपेक्षा हे नाव अगदी योग्य वाटेल "कंदील"
  • Log in or register to post comments
त
तर्री Fri, 08/31/2012 - 13:42 नवीन
शिंपल हटके !
  • Log in or register to post comments
प
पैसा Fri, 08/31/2012 - 19:27 नवीन
यावेळेला अन्याच्या होस्टेल पुलावासारखी कमीत कमी वस्तूंमधे तयार केलेली पाकृ दिसतेय.
  • Log in or register to post comments
स
सोत्रि Fri, 08/31/2012 - 19:55 नवीन
होय गं! लैच तक्रारी होत्या की सगळ्यांन घरी जमेल अशी पाककॄती दे म्हणून... - ( साकिया ) सोकाजी
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Fri, 08/31/2012 - 19:32 नवीन
हे असंच अधिक काहीतरी हवय राव! ;-)
  • Log in or register to post comments
स
सोत्रि Sat, 09/01/2012 - 08:33 नवीन
श्रामो, भावना पोहोचल्या :) - (गदगदीत) सोकाजी
  • Log in or register to post comments
क
कुंदन Fri, 08/31/2012 - 19:48 नवीन
मस्त रे सोकाजीराव.
  • Log in or register to post comments
श
शिल्पा ब Fri, 08/31/2012 - 19:51 नवीन
कोणतेही दोन वेगवेगळे अल्कोहोलिक ड्रिंक्स एकत्र केले की " टुण्ण" होता येत असावं का? लोकांना खुप वेळा " एकच काय ते प्या", "ड्रींक्स मिक्स करु नका" असं बोलताना ऐकलंय म्हणुन विचारलं. बाकी पाकृ छान.
  • Log in or register to post comments
ए
एस Fri, 08/31/2012 - 20:18 नवीन
tschüß
  • Log in or register to post comments
इ
इंद्रवदन१ Fri, 08/31/2012 - 23:09 नवीन
साके बॉम्ब पण असंच असतं ना ? किरीन बीअर मध्ये गरम साके
  • Log in or register to post comments
स
सोत्रि Sat, 09/01/2012 - 08:31 नवीन
काय राव एकदम नॉस्टॅल्जिक केलेत तुम्ही. जपानमधले 'मद'भरे नशीले दिवस आठवून राहिले. हा घ्या साके बॉम्ब... - ('साके'या) सोकाजी
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 09/01/2012 - 04:31 नवीन
झक्कास..
  • Log in or register to post comments
न
निश Sat, 09/01/2012 - 09:16 नवीन
ताडी निरा दारु ह्या गोष्टिंचा मिपा वर अतिरेक झाला आहे. पुण्यात आताच ८०० मुलांच्या बाबतीत घडलेली घटनेवरुन बोध घ्यावा लागेल आपल्याला. आता तरी मिपावरुन ह्या गोष्टी बंद होउ द्यात.
  • Log in or register to post comments
स
सर्वसाक्षी Sun, 09/02/2012 - 08:30 नवीन
निश साहेब एखाद्या संध्याकाळी चार मित्र जमा करुन अंमळ दोन घोट घेतल्याने कुणी व्यसनी होत नाहीत वा अशी कृती वाचुन कुणाला मद्यपानाचा मोह होत नाही. आणि ज्याला मद्यपान करायचे आहे तो मिपावर आदेश येण्याची वाट पाहत नसतो. त्या ८०० मधले किती मिपाकर आहेत याचाही एकदा शोध घ्या. मी स्वत: प्रसंगोपत्त बिअर घेतो अन्य काही नाही पण तरीही मी सोत्रिंच्या कॉकटेल लाउंजमध्ये आवर्जुन येतो आणि एखादा मनुष्य या विषयावर इतक्या व्यासंगाने लिहितो याचे कौतुक करतो. ज्यांना निरनिराळी पेये प्यायची आवड आहे ते सक्रिय दाद देत असतील आणि आनंद उपभोगत असतील. मी निरनिराळे रंग, पेले आणि पेये पाहण्यात आनंदी होतो. निशभाऊ, संकेतस्थळावरील लेख, चर्चा, कविता, पाकृ, भटकंत्या, कलाकृति वगैरे सगळे स्वयंसेव्य भोजनासारखे असते (मराठीत त्याला बुफे म्हणतात). नाना रुचिचे नाना पदार्थ इथे सजवलेले आणि मांडलेले असतात. जे आपल्याला आवडेल ते त्याचा आस्वाद घ्यायचा, जे आवडत नाही ते सोडुन द्यायचे. उगाच जे आपल्याला आवडत नाही त्याला नावे का बरे ठेवावीत? ते पदार्थ दुसर्‍या कुणाला आवडत असतात आणि म्हणुनच ते ठेवलेले असतात. इथे लोक येतात ते चार घटका विरंगुळा म्हणुन. इथले लेख वाचुन कुणी दारुडे होतील किंवा परमार्थाला लागतील असा विचार पटत नाही. समाजात मद्यपानाचे प्रमाण वाढते आहे, अल्पवयात मद्यपान सुरु करणे बरे नव्हे - कदाचित यामुळे कुणी उमेदीचे आयुष्य दारुतही वाया घालवु शकतो पण याला जबाबदार आहे ती बदलती सामाजिक परिस्थिती. याचबरोबर मद्यपान न केल्याने काही कमीपणा येत नाही हेही खरे आणि कुणाच्या आग्रहाला बळी पडुन पिऊ नका हे मुलांना सांगणे आवश्यक आहे हे खरे. तुमचा विचार चुकीचा नाही मात्र यासाठी जागरुकतेचे प्रयत्न करावेत. आपण इथे मद्यपानाचे वाढते प्रस्थ यावर चर्चेचा प्रस्ताव अवश्य मांडा पण अशा लेखात असे मतप्रदर्शन करुन रंगाचा भंग करु नका. या लेखात काय असेल ते शिर्षकातच स्पष्ट आहे तेव्हा जे लोक लाउंज वाचायला येतात ते आवडीने येतात आणि आनंदी होतात. ज्यांना या विषयात रस नाही वा याचे कौतुक नाही ते येणारच नाहीत. स्पष्टोक्तिबद्दल क्षमस्व!
  • Log in or register to post comments
स
सोत्रि Sun, 09/02/2012 - 09:54 नवीन
धन्यवाद सर्वसाक्षीजी! खरंतर निश यांचा प्रतिसाद वाचल्यावर काय उत्तर द्यावे हेच कळत नव्हते. आणि अनुल्लेखाने टाळताही येत नव्हते. पण तुमचा प्रतिसाद अगदी समर्पक आणि संयत आहे. पुन्हा एकदा धन्यवाद! - ( रस घेऊन मद्यपान करणारा ) सोकाजी
  • Log in or register to post comments
न
निश Mon, 09/03/2012 - 07:58 नवीन
सर्वसाक्षी साहेब, मी रंगाचा भंग केला नाही आहे. मी सोत्री साहेबांचि आधिच माफी मागितली आहे माझ्या प्रतिसादात. लक्षात घ्या मी नविन धागा काढुही शकलो असतो तुम्ही म्हणता तसा पण काय होत त्या धाग्यावर काही काही वेळा इतके थिल्लर प्रतिसाद येतात की हसाव की रडाव तेच कळत नाही. त्या धाग्याचा मुळ विषयच हरवुन जातो. राहता राहीला तुमचा मुद्दा खर तर आंतरजालावर सगळे वाईट गोष्टी मुबलक प्रमाणात बघायला व वाचायला मिळतात माझा मुद्दा इतकाच होता की आपण स्वताहुन त्यात अजुन भर घालायचि कि मी भर घातल्यामूळे काय फरक पडणार आहे मी माफक प्नमाणात करतो माझ काय वाईट झाल असा विचार करुन पण सर सगळे च तसा नाही विचार करत दारु बाबतित ते लोक फार लवकर व्यसनी होतात. घाटात गाडी चालवताना रस्त्याच्या बाजुला फलक लावलेला असतो पुढे घाट आहे गाडि वेगात चालवु नका कारण पुढे अपघात होउ शकतो वेगामुळे होतो अस नाहीच पण फलक असतो सावध करण्यासाठि तसच समजा माझा वरिल प्रतिसाद. सोत्रि साहेबांकडे अतिशय उत्तम लेखन कला आहे. मी त्यांच्या लेखनाचा चाहता आहे. मला जे वाटल ते मी लिहिल त्यात त्याना दुखावण्याचा हेतु अजिबात नव्हता.
  • Log in or register to post comments
च
चिगो Sun, 09/02/2012 - 13:51 नवीन
"मी काय म्हणतो, थोडा घ्याच चहा..” सौ. सखाराम गटणे :-)
  • Log in or register to post comments
प
पप्पु अंकल Sat, 09/01/2012 - 14:14 नवीन
झटपट गवि होण्याचा ऊत्तम मार्ग (उडण्याच्या तयारीत असलेला)पप्पु
  • Log in or register to post comments
ग
गवि Fri, 07/19/2013 - 14:09 नवीन
भा.प्र.वे.प्रमाणे शुक्रवारी संध्याकाळी पावणेसहाला खास जनहितार्थ हा धागा वर काढत आहे. ...धन्यवाद..
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा Fri, 07/19/2013 - 14:11 नवीन
काढा काढा, गटारी पण जवळच आली आहे आता. ;)
  • Log in or register to post comments
म
माझीही शॅम्पेन Sat, 07/20/2013 - 19:51 नवीन
अरेरे आज हा धागा लवकर पहिला असता तर कॉक-टेल काय घ्याव हा प्रश्न निकालात निघाला असता .. (पार्टी मिस झालेली माझीही अपसेट शेंपेन)
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    23 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    23 hours 16 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    23 hours 17 minutes ago
  • सुंदर !!
    23 hours 19 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    23 hours 23 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा