Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

व्हेजिटेबल्स अँड एग फ्राईड राईस

स
सानिकास्वप्निल यांनी
Wed, 08/29/2012 - 00:31  ·  अन्न हे पूर्णब्रह्म
अन्न हे पूर्णब्रह्म
. साहित्यः दीड वाट्या बासमती तांदळाचा मोकळा शिजवलेला भात ३-४ अंडी फेटून घेतलेली १ वाटी पातळ उभा चिरलेला कोबी १ वाटी पातळ उभा चिरलेला गाजर १ वाटी पातळ उभी चिरलेली भोपळी मिर्ची १/२ वाटी बारीक चिरलेली फरसबी १/२ कप कांद्याची पात चिरुन पातीचे कांदे उभे चिरुन १/२ टेस्पून आले १ टेस्पून लसूण दीड टेबल्स्पून सोया सॉस दीड टेबल्स्पून हॉट चिली सॉस (आवडीप्रमाणे कमी-जास्त) १ टेबल्स्पून स्वीट चिली सॉस १ टीस्पून पांढरी मिरपूड (आवडीप्रमाणे कमी-जास्त) मीठ लागले तर तेल . पाकृ: प्रथम नॉन-स्टीक पॅनमध्ये फेटलेली अंडी घालून चमच्याने सतत हलवत रहावे. जसे जसे अंडी शिजू लागतील तसे ते गोळा होऊ लागेल. (स्क्रॅम्बल्ड एगप्रमाणे) अंडी पूर्ण शिजली की बाजूला काढून ठेवावी. . त्याच पॅनमध्ये तेल गरम करुन घ्यावे व त्यात बारीक चिरलेले आले + लसूण चांगले परतवून घ्यावे. त्यात चिरलेला पातीचा कांदा व फरसबी घालून ४-५ मिनिटे परतावे. आता त्यात चिरलेला कोबी व भोपळी मिरची घालावी. आच मध्यम असावी. सगळ्यात शेवटी चिरलेला गाजर व कांद्याची पात घालावे व ३-४ मिनिटे परतावे. सगळ्या भाज्यांचा थोडा करकरीतपणा (क्रंचीनेस) असला पाहिजे. . आता त्यात सोया सॉस, हॉट चिली सॉस, स्वीट चिली सॉस व पांढरी मिरपूड घालून सगळे एकत्र करावे. चव घेऊन बघावे, लागले तरचं मीठ घालावे, सगळ्या सॉसमध्ये मीठ असते. (भातात ही शिजवताना मीठ घातले होते) आता त्यात शिजवलेली अंडी व शिजवलेला भात घालून नीट मिक्स करावे. सगळ्या भाताला सॉस व भाज्या नीट लागल्या पाहीजे. झाकून एक वाफ काढावी. . गरमा-गरम व्हेजिटेबल - एग फ्राईड राईस खाण्यासाठी तयार आहे. आवडत असल्यास तुम्ही व्हेज किंवा चिकन मंच्युरियन बरोबर किंवा हनी - चिली पोटॅटो बरोबर सर्व्ह करु शकता. .

वाचनखूण लावा
| 63985 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा


  • Log in or register to post comments
  • 63985 views

M
Mrunalini Wed, 08/29/2012 - 01:03 नवीन
मस्त एकदम.... :) तोंपासु
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Wed, 08/29/2012 - 14:48 नवीन
+१. असेच म्हणतो. बाकी "तोंपासु" वाचून चैनीज/जाप्नीज डिश आहे की काय असे वाटले क्षणभर ;)
  • Log in or register to post comments
ब
बहुगुणी Wed, 08/29/2012 - 01:12 नवीन
मस्त पदार्थाची निवड आणि अप्रतिम मांडणी! (अंड्याऐवजी तसंच अंड्याव्यतिरिक्त टोफू घालून फ्राईड राईस खाल्लेला आहे, तोही आवडतो. तळलेला टोफू 'क्रंची' लागत असला तरी स्टीम्ड टोफू हा प्रकृतीला आधिक चांगला असं ऐकलंय.)
  • Log in or register to post comments
ब
बहुगुणी Wed, 08/29/2012 - 01:13 नवीन
दोनदा आल्याने...
  • Log in or register to post comments
र
रेवती Wed, 08/29/2012 - 02:29 नवीन
अरे वा!! चांगला प्रकार आहे. भाताचा रंग, भाज्या सगळं छान दिसतय......एकदम रंगीबेरंगी! ही पाकृ अंडे न घालताही करता येईल असे वाटते. ;) आमच्यासारख्यांची सोय झाली.
  • Log in or register to post comments
क
कौशी Wed, 08/29/2012 - 03:15 नवीन
मस्तच जमलाय भात...
  • Log in or register to post comments
अ
अस्मी Wed, 08/29/2012 - 06:57 नवीन
वाह...मस्स्त, छान , सुरेख :) एकदम सह्ही पाकृ आणि फोटो तर लाजवाब!!
  • Log in or register to post comments
अ
अक्षया Wed, 08/29/2012 - 07:39 नवीन
नेहमी प्रमाणेच अप्रतिम.. :)
  • Log in or register to post comments
S
sagarpdy Wed, 08/29/2012 - 07:51 नवीन
पाकृ करून पाहण्यात येईल. फोटू झकास! :) अवांतर : हा राइस खरोखर चॉपस्टिकस वापरून खाता येतो का ?
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Wed, 08/29/2012 - 08:18 नवीन
मस्तं. पाककृती आणि छायाचित्रं दोन्ही झकास. sagarpdy प्रमाणेच मलाही प्रश्न पडला आहे. चॉपस्टीक्स् वापरून हा भात खाता येईल? मला वाटते चॉपस्टीक्स् वापरून खायचा भात जरा गिचका गोळा असतो. एवढा मोकळा फडफडीत नसतो. अर्थात, मी कधी प्रयत्न केलेला नाही मला काटा-चमचाच आवडतो (कारण, जमतो). 'व्हेजिटेबल-एग फ्राईड राईस' नांव गोंधळात टाकणारे आहे. कारण 'व्हेजिटेबल फ्राईड राईस' हे शाकाहारी भाताचे नांव कानवळणी पडले आहे. ह्या भाताला 'व्हेजिटेबल्स अँड एग फ्राईड राईस' असे नांव जास्त समर्पक वाटते.
  • Log in or register to post comments
स
सानिकास्वप्निल Wed, 08/29/2012 - 09:42 नवीन
चॉपस्टीक्स् हा सादरीकरणाचा भाग म्हणून वापर केला आहे, तरीही चॉपस्टीक्स् कसे वापरतात ह्याचे कुतूहल किंवा शिकण्याची हौस म्हणा हव तर म्हणून मी विकत आणले आहे पण अजून काही त्याने खाणे जमले नाही, प्रयत्न सुरु आहे :) पेठकर काका म्हणतात तसा चॉपस्टीक्सचा वापर छोटे तुकडे किंवा गिचका ,गोळा भात असतो तो उचलण्यास सोयीचे पडते, तरीही जो मोकळा, कोरडा (लाँग ग्रेन राईस) भात असतो तो खाण्यास ही चॉपस्टीक्स् वापरु शकता. खालील माहिती आंजावरून घेतली आहे. In chopstick-using cultures, food is generally made into small pieces; however, some chopstick designs have carved rings encircling the tips to aid in grasping larger pieces of food. Short grain rice sticks together well, as does medium grain rice. Long grain rice, which has more amylose, is more commonly found in the Western world. Amylose is a long, straight, starch molecule that does not gelatinize when cooked. So, this type of rice is "fluffy" and the end result is more dry. The method of cooking determines the moisture, but even if long grain rice is cooked with more water, it will not stick together the same way medium or short grain rice will—it will just become a mass of mush at the bottom of the pot. The different types of starches in rice give the different varieties their unique texture and characteristics. Chopsticks are easier to use on short and medium grain rice, as the rice will clump together, but can still be used comfortably on long grain rice. Additionally, in traditional Chinese culture, holding the rice bowl up to the mouth and using chopsticks to transfer the rice directly into the mouth is considered proper eating etiquette. The types of rice used make no difference under this etiquette since rice is rarely served on the plate in China.
  • Log in or register to post comments
S
sagarpdy Wed, 08/29/2012 - 10:00 नवीन
प्रयत्न करून बघतो :)
  • Log in or register to post comments
आ
आनंदी गोपाळ Fri, 08/31/2012 - 18:42 नवीन
माझ्या निरिक्षणानुसार चॉपस्टिक्स (भात) "ढकलण्यासाठी" वापरतात. तो बाऊल असा तोंडाजवळ धरून भात भराभर तोंडात ढकलत जेवता येते. नूडल्स कोणत्याही काट्याचमच्याने खावे तसे चॉपस्टीक्सने उचलून खाता येते. मोठे 'पिसेस' सहज उचलता येतात.. पण मुख्यतः ढकलणे!
  • Log in or register to post comments
स
सानिकास्वप्निल Wed, 08/29/2012 - 16:50 नवीन
पाकृचे नाव बदलले आहे व्हेजिटेबल्स अँड एग फ्राईड राईस असे ठेवले आहे धन्यवाद
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Wed, 08/29/2012 - 16:57 नवीन
धन्यवाद सानिकास्वप्निल, नांव बदलाचे स्वागत आहे.
  • Log in or register to post comments
ध
धनुअमिता Wed, 08/29/2012 - 08:46 नवीन
मस्त. अप्रतिम.
  • Log in or register to post comments
इ
इरसाल Wed, 08/29/2012 - 08:52 नवीन
सध्या जवळपास रोजच चिकन फ्राइड राइस, वेज फ्राइड राइस, एग्ग फ्राइड राइस, शेजवान फ्राइड राइस वर जोर आहे. मज्जा येतेय एवढेच.
  • Log in or register to post comments
क
कॉमन मॅन Wed, 08/29/2012 - 09:11 नवीन
छानच..
  • Log in or register to post comments
ग
गणपा Wed, 08/29/2012 - 09:16 नवीन
आहाहा काय ते फोटु........ तोंडात जिव्हारसाची त्सुनामी उठली आहे.
  • Log in or register to post comments
क
कॉमन मॅन Wed, 08/29/2012 - 09:37 नवीन
"तोंडात जिव्हारसाची त्सुनामी उठणे.." वाक्प्रचार खूपच आवडला. अवांतराबद्दल क्षमस्व..
  • Log in or register to post comments
स
स्मिता. Wed, 08/29/2012 - 09:49 नवीन
पहिलाच फोटू कसला टेम्टिंग आहे! मस्तच... तुझ्या पाकृ करून खाण्यापेक्षा फक्त बघत रहाव्याश्या वाटतात :)
  • Log in or register to post comments
क
कॉमन मॅन Wed, 08/29/2012 - 10:01 नवीन
तुझ्या पाकृ करून खाण्यापेक्षा फक्त बघत रहाव्याश्या वाटतात
अहो पण केल्याशिवाय बघता कशा येणार..?
  • Log in or register to post comments
स
स्मिता. Wed, 08/29/2012 - 10:15 नवीन
बघायच्या म्हणजे इथल्या फोटोतच बघायच्या! (कारण एवढं हाय क्लास सादरीकरण मला जमणारच नाही ;) )
  • Log in or register to post comments
क
कॉमन मॅन Wed, 08/29/2012 - 10:18 नवीन
प्रांजळ खुलाश्याबद्दल आभारी आहे..
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 08/29/2012 - 10:09 नवीन
@तुझ्या पाकृ करून खाण्यापेक्षा फक्त बघत रहाव्याश्या वाटतात >>> १०००++++
  • Log in or register to post comments
प
पैसा Wed, 08/29/2012 - 14:05 नवीन
सगळे फोटो अप्रतिम. पाकृ खूप सोपी आणि छान दिसणारी! झक्कास!
  • Log in or register to post comments
च
चिंतामणी Wed, 08/29/2012 - 14:11 नवीन
बाकी नेहमी प्रमाणेच. XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX XXXXXXXXXXXXXXXXXXXXX XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX एक गोष्ट लै भारी. व्हेजिटेबल - एग फ्राईड राईस अशी एकत्रच पाकृ असल्याने "ही पाकृ अंडे घालून कशी करायची" असा ठरावीक (वाह्यात) प्रश्ण विचारणा-यांची बोलती बंद झाली.
  • Log in or register to post comments
ग
गवि Wed, 08/29/2012 - 14:26 नवीन
छान आहे पाककृती.. करुन पाहण्याची इच्छा होईल अशी. याचं नाव वेजिटेबल एग फ्राईड राईस असं न ठेवता, एग & व्हेजीज फ्राईड राईस किंवा एग फ्राईड राईस विथ वेजिटेबल्स / वेजीज असं काही ठेवलं असतं तर व्हेजिटेबल शब्दाने सुरुवात केल्यावर येणारा "शुद्ध वैष्णो ढाबा" इफेक्ट येणार नाही.
  • Log in or register to post comments
र
राणि Wed, 08/29/2012 - 16:08 नवीन
अप्रतिम पाककृती......
  • Log in or register to post comments
ए
एस Wed, 08/29/2012 - 17:38 नवीन
एकतर आधीच जाम भूक लागलीय आणि त्यात ही अप्रतिम पाकृ वाचली. त्यामुळे जी अवस्था झालीय त्याबद्दल तुमचा निषेध असो... :) मी कितीतरी वेळ तो पहिला फोटो पाहत बसलोय... :(
  • Log in or register to post comments
ज
जाई. Wed, 08/29/2012 - 19:47 नवीन
वाह
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 08/30/2012 - 10:08 नवीन
आणि खालील वाक्य तर खासच,,, "गरमा-गरम व्हेजिटेबल - एग फ्राईड राईस खाण्यासाठी तयार आहे."
  • Log in or register to post comments
च
चिंतामणी गुरुवार, 08/30/2012 - 10:11 नवीन
>>>आवडत असल्यास तुम्ही व्हेज किंवा चिकन मंच्युरियन बरोबर किंवा हनी - चिली पोटॅटो बरोबर सर्व्ह करु शकता. हनी - चिली पोटॅटोची पाकृ झटकन देउन टाक.
  • Log in or register to post comments
च
चिंतामणी गुरुवार, 08/30/2012 - 10:11 नवीन
>>>आवडत असल्यास तुम्ही व्हेज किंवा चिकन मंच्युरियन बरोबर किंवा हनी - चिली पोटॅटो बरोबर सर्व्ह करु शकता. हनी - चिली पोटॅटोची पाकृ झटकन देउन टाक.
  • Log in or register to post comments
स
सानिकास्वप्निल गुरुवार, 08/30/2012 - 11:06 नवीन
लवकरचं देण्यात येईल :) धन्यवाद
  • Log in or register to post comments
च
चिंतामणी गुरुवार, 08/30/2012 - 11:14 नवीन
:)
  • Log in or register to post comments
क
कच्ची कैरी गुरुवार, 08/30/2012 - 11:08 नवीन
अप्रतिम! अप्रतिम ! अप्रतिम ! याशिवाय दुसरा काही शब्दच सुचत नाहीये :)
  • Log in or register to post comments
श
शुचि Fri, 08/31/2012 - 02:55 नवीन
चविष्ट असणारच...... सुंदर दिसते आहे.
  • Log in or register to post comments
स
सुहास झेले Sat, 09/01/2012 - 06:42 नवीन
काय बोलावे सुचत नाही आहे..... किती स्तुती करणार आणि कितीवेळा? :) :) एकदम भन्नाट रेसिपी :) :)
  • Log in or register to post comments
अ
अमोल केळकर Sat, 09/01/2012 - 07:24 नवीन
१ नंबर :) अमोल केळकर
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 09/01/2012 - 08:23 नवीन
मस्त ! :)
  • Log in or register to post comments
म
मिरची Sat, 09/01/2012 - 08:50 नवीन
जबर्या......नक्कीच करुन बघेन...... अवांतर पण महत्त्वाचे......या पा.क्रुंना वाचणखुण साठवा ही सुविधा का नाही?
  • Log in or register to post comments
स
सोत्रि Sat, 09/01/2012 - 08:55 नवीन
शॉल्लिट! - (तोंपासु) सोकाजी
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    20 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    20 hours 17 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    20 hours 18 minutes ago
  • सुंदर !!
    20 hours 21 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    20 hours 24 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा