Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
कलादालन

सायंकालीन छटा....

म
मकरन्दबेहेरे
गुरुवार, 12/15/2011 - 19:37
सायंकालीन छटा आजकाल तीच्या चेहर्‍यावर प्रतिबिंबित होत असतात आणि त्या छटा पाहुन मला अग्निज्वालांनी होरपळत असलेल निर्वात अंतरिक्ष स्वप्नात दिसते आणि मी जागा होतो आणि कुणा मदमत्त जोडप्याला हवी हवीशी रात्र मला भयाण वाटु लागते आणि मी ती स्मशान शांतता भंग पावु नये म्हणुन तोंडावर हात ठेवुन मी आक्रोश करु लागतो आणि शेवटाच्या विश्वापर्यंत जाउन येतो आणि त्याच वेळेला देवळाच्या गाभार्‍यात माझ नाव घुमत असत आणि विश्वेश मात्र शांतपणे बसलेला असतो बेहेरे मकरंद ११०२२०८०

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3128 views

💬 प्रतिसाद
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 12/15/2011 - 20:07 नवीन
परत त्येच... गल्ली चुकल कि वो पुन्ना ... ह्ये कविता असतय ना,त्ये कि नै 'जे न देखे रवी' ला टाका हो... नविन आलासा वाटतं मि.पा.वर स्वागत हो तुमचं :-)
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत राजवाडे गुरुवार, 12/15/2011 - 23:57 नवीन
कविता जबरदस्त लिहिली आहेस मित्रा!!! आणखी येऊ देत. कवितेचा शेवट आवडला.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Fri, 12/16/2011 - 04:01 नवीन
छंद नको मज, नकोत वृत्ते अलंकारही नकोत भलते गद्यामध्ये 'एण्टर' पेरुनि मुक्तछंद लिहिणार.. मीही कवि होणार! -----कवि श्री मेघवेडा. ;)
  • Log in or register to post comments
प
पियुशा Fri, 12/16/2011 - 06:23 नवीन
@ वल्ली काय हे ? गद्यामध्ये 'एण्टर' पेरुनि मुक्तछंद लिहिणार त्याना मार्ग दाखवा जरा ;)
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Fri, 12/16/2011 - 08:50 नवीन
त्यांचा मार्ग त्यांनीच शोधून काढायला हवा आता. ;)
  • Log in or register to post comments
ग
गवि Fri, 12/16/2011 - 08:56 नवीन
आणि त्या छटा पाहुन मला अग्निज्वालांनी होरपळत असलेल निर्वात अंतरिक्ष स्वप्नात दिसते आणि मी जागा होतो आणि कुणा मदमत्त जोडप्याला हवी हवीशी रात्र मला भयाण वाटु लागते आणि मी ती स्मशान शांतता "आणि" शब्दाचा अतिरेक झाला आहे. बाकी काही समजले नाही हा वाचकाचा, पक्षी माझा दोष असणार. -जे देखे कवि, ते न देखे गवि.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    16 hours 52 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 4 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 8 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 11 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा