माझं गाव
माझं गाव
मु पो . -नवेघर, आडिवरे, ता.राजापूर, जि. रत्नागिरी
हा पत्ता इतकी वर्ष नुसता ऐकून होतो, स्वतःच गाव असूनही फक्त एकदा लहानपणी ४ ते ५ तासांसाठी गेलो असेन. बास त्याव्यतिरिक्त आपल गावाला काहीच नाही , हेच मनावर ठसवले गेले होते.पण अचानक तिथल्या घराच्या व्यवहारासंबंधी कोर्टाची बोलणी सुरु झाली, तशी रीतसर नोटीस आमच्या काकांनी पाठवली, काही कागदपत्रांवर आमच्या सह्या आवश्यक होत्या आणि ती
संबंधित कागदपत्र मिळवण्याची जबाबदारी आमच्या तीर्थरूपांनी आमच्यावर टाकली. आता गावाला जाणे आलेच. अचानक ठरल्याने रेल्वेने जाण्याचा प्रश्नच नव्हता. बस चे तिकीट मिळाले, एकटा कुठे जाणार म्हणून एका मित्राला बरोबर घेतले. गावाला जाणार तेही माझ्या हक्काच्या.. डोक पूर्ण रिकाम होत, फक्त काकाशी फोन वर बोलण झालेलं होत. रात्री ९ ची डोंबिवलीला बस होती,ती यायला ९.३० वाजले, पण पनवेल च्या अलीकडे मजबूत ट्राफिक लागल आणि आणि १ दीड तास पनवेल क्रॉस करायलाच लागला. बस भयानक पॅक होती. चायला म्हटल इथेच १२ वाजून गेलेत, पोचणार कधी? पण बहुतेक पळस्पे क्रॉस झाल आणि रस्ता मोकळा झाला. तिथून म. रा. प. चा ड्रायवर जो पेटला ... अगगाग्गा .(अन्या दातार ने फोन वर म. रा. प पासून सावध राहायला सांगितल होत.. का ते आता पटलेलं होत ;) )
वोल्वो चालवणार्यांच्या थोतरीत मारेल, अशी बस हाणायला लागला. त्याचा भन्नाट स्पीड पाहून बहुतेक सगळे हादरलेलेच होते, मागे बसलेल्या २ ३ माणसांनी कंडक्टर ला सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न करून पहिला पण त्यांचे सारे प्रयत्न वडखळ फाट्यावर मारण्यात आले :D
घाटातही साहेब ८०- ९० खाली उतरत नव्हते हे पाहून द्वोळे पाणावले आणि कधी मिटले गेले कळलंच नाही. नंतर जाग आली ती "रत्नागिरी ,रत्नागिरी , उतरा उतरा" ..... या हाकांनी ... मित्राला उठवलं, घडाळ्यात पाहिलं बरोबर ५.३० झालेले होते. त्या साहेबांना मनोमन साष्टांग घालून खाली उतरलो. समोरच आडिवऱ्याला जाणारी पहिली बस पाहीली आणि त्यात चढलो. रत्नाग्री बाहेर बस पडली आणि बाहेरचा गार वारा लागताच दिल खुश हो गया. मस्त लाल मातीतली कौलारू घर, नारळ पोफळीच्या बागा, नुकत्याच पेटलेल्या चुलींमधून वर सरकणारा धूर....अन या सगळ्यांना कुशीत घेतलेलं धुक ....
१.
१अ.
पावस सुटल .. आणि गाव जवळ आल हे जाणवायला लागल.. आता दोन्ही बाजूंना आंब्याच्या , काजुंच्या बागा.. मधेच खाली दिसणारी लाल कौलारू घर .. एक दीड तासात आडिवर्याच्या पेठेत पोचलो आणि बस खडखडत पुढे 'नाट्याला' गेली . पोटात सणकून भूक लागलेली होती. पेठेतच महाकाली च देऊळ आहे, तीच दर्शन घेतल , आणि बाजूच्याच हाटेलात मस्त पोहे आणि मिसळीवर ताव मारला. अजून प्रवास संपला नव्हता.काकाला फोन करून सड्यावर उभ राहायला सांगितल . पुढे नवेघर पर्यंत २ किमी अंतर होत. मस्त चालत रमत गमत घरी आलो.
२. वडाच विस्तीर्ण झाड आणि बैलगाडी
३.हे खाली टोकाला दिसतंय ते माझ घर
४.मागच्या वर्षी घराला १२५ वर्ष पूर्ण झाली
गेल्या गेल्या काकूने मऊ भात वाढला.. सोबत लोणचं पापड आणि मस्त आल्याचा चहा .
५.आमची छोटीशी बाग
६.
७. एक छोटस अननस धरलेलं होत
८.तुळशी वृंदावन, त्यामागे चूल आणि बाजूला विहीर
९.
चुलीवर पाणी तापलं होतच. खाल्ल्यानंतर अंघोळीला पळालो. नंतर काकाबरोबर परत पेठेत आलो. महाकालीच आत जाऊन दर्शन घेतल.
१०.
११.देवळाच्या जीर्णोद्धाराच काम सुरुये
१२.या महाकालीच रूप पाहिलं कि कोल्हापूरची आठवण येते (फोटो काढायला परवानगी नाही - आंतरजालावरून साभार )
१३. विहिरीतून पाणी काढायचा हा वेगळाच जम्बो रहाट पाहीला
तलाठी हापिसातली काम मार्गी लावली. घरी आल्यावर मस्त ताणून दिली. डायरेक्ट जेवायलाच उठलो. दत्त जयंती असल्याने कोकणात ठिकठिकाणी मोठे उत्सव असतात, नाटकं, गाण्याचे कार्येक्रम, कीर्तनं सगळीधमाल असते. आमच्या गावातही दत्तच देऊळ होत . रात्री चंद्र ग्रहण असल्याने चारलाच दत्त जन्म साजरा करणार होते, मग कीर्तन होत. ४ ला देवळात गेलो.
१४.दत्त मंदिराकडे
देऊळ मस्त सजवलेलं होत.
१५.
आत जन्मोत्सवाची तयारी जोरात सुरु होती.
१६.
बाहेर बुवांच कीर्तन सुरु झाल.
१७.
थोडावेळ बसून आम्ही परत गाव भटकायला निघालो जेमतेम ५०- ६० उम्ब्र्याचं गाव असेल. मग तिथूनवर सड्यावर आलो.
१८.
१९.
थोड्यावेळाने काळोख पडायला लागला. सड्यावर बरेचदा चकवा लागतो असे काकाने बजावले होते.. आणि आम्ही नवीन . म्हणून वेळेवर खाली आलो . घरातले सर्व अजूनही देवळात होते. मग आम्ही मस्त बाहेर खुर्च्या टाकल्या आणि गफ्फा हाणत बसलो . सकाळी मोहवून टाकणारा परिसर संध्याकाळ होताचं भयाण वाटत होता :). आजूबाजूला किर्र झाडी , त्यात रातकिड्यांचा आवाज. पण देवळात चालणार्या कीर्तनाचा आवाज अख्या गावात ऐकू येत होता. रात्री जेवल्यानंतर आमच्या मित्राला चैतन्यकांडी ओढण्याची हुक्की आली. आता इथे काही दुकान नाही , पेठेत तंगड तोड करत जाव लागणार. बाहेर हा भयानक अंधार. पण त्याच्या मोबिल मध्ये टोर्च होता. (मला सज्जनगडावर आम्ही अंधारात आणि पावसात धाब्याच्या मारुती पाशी गेलेलो त्याची आठवण झाली). म्हटल चला जरा किडे करून येऊ. बाहेर पडल्यावर अंधार जाणवायला लागला. जेमतेम ३ ४ फुटांपर्यंत दिसत होत.
मागे वळून बघितल तर मिट्ट काळोख. चायला म्हटल डेंजर वाटतंय. अर्ध्या रस्त्यात पोचलो आणि ढुप्प.. मोबाईल स्वीच ऑफ !!! आधी एक दोन सेकंद काय झाल कळलंच नाही .... आजूबाजूचा अंधार जीव घेऊन अंगावर आला. आईचा .. मग जरा सावरलो.. चुकून वर बघितल ... तेजायला... वर ग्रहण लागत होत... आधीच काय कमी फाटलेली :D , मग जरा सावरलो.. पण घंटा काहीच दिसत नव्हत. तसंच पाय रेटत पुढे पुढे चालत राहिलो. कसेबसे एकदाचे रस्त्याला लागलो.. आता मध्ये मध्ये वस्ती होती . कसे बसे पेठेत पोचलो. चायला म्हटल आता परत जायचं आपल्याला. पण येई पर्यंत ग्रहण सुटलेलं होत, छान चंद्रबिंब दिसत होत . टिपूर चांदण पडलेलं होत.शिवाय दत्त मंदिरातील कार्येक्रम संपलेला असल्याने वाटेवर मध्ये मध्ये माणस दिसत होती. कसे बसे घरी येऊन झोपलो :)
दुसर्यादिवशी जायची वेळ आली तेंव्हा अजून १ २ दिवस रहाव अस वाटत होत. पण सुट्टी नसल्याने मनावर दगड ठेवून निघावच लागल. घराला एकदा डोळे भरून पाहून घेतल आणि निघालो.
पेठेतून ११.३० ची बस मिळाली. पावसला पोचेस्तोवर १२.३० झाले. स्वरूपानंदांचा छान आश्रम आहे पावसला. एकदम सुंदर आणि शांत ठिकाण आहे. दुपारी गरम गरम खिचडी आणि लोणच्याचा प्रसाद मिळतो. मस्तपैकी जेवलो.. थोडावेळ आजूबाजूला हिंडलो.. तिथे कोकम सरबतही झकास मिळते.. ते हि पिऊन झाले. मग रत्नागिरी बस पकडली. आता आमच्याकडे 3 ते ८ वेळ होता. तेवढ्या वेळात गणपतीपुळे आटपायचे होते.
परत रत्नागिरीला बस ची वाट बघणे आले. पण या वेळी एक सुखद धक्का बसला. गणपतीपुळ्यासाठी एक छोटीशी हिरव्या रंगाची मिडीबस आली. आणि अजिबात गर्दी नव्हती. मस्त आरामात बसलो . एका तासात गणपती पुळे.
२०.
२१.
अजिबात गर्दी नव्हती, बाप्पाच मस्त दर्शन झाल. समुद्र खुणावत होता, पण हातातल्या सामानाची काहीतरी सोय बघायची होती. मग तिथे जे अनेक बापट कुटुंब खानावळी चालवतात, त्यापैकी एका खानावळीत संध्याकाळच्या जेवणाची ऑर्डर दिली , आणि सामानही तिथेच ठेवले. समुद्रात मस्त भिजलो. भरपूर फिरलो.
२२.
२३.
२४. त्यातल्या त्यात फोटूग्राफी
२५.
२६.
२७.
२८.
कोकण मेव्याची खरेदी झाली. तोपर्यंत ७ वाजले होते, मग फतफत खानावळीत आलो. मस्त जेवण होत. आडवा हात मारला. मोदकांची ऑर्डर आधी द्यावी लागते, आयत्यावेळी मिळत नाहीत, म्हणून ते चापायचे राहिले. सामान घेतल आणि निघालो. मुख्य रस्त्यावर आलो... थोडावेळ बस ची वाट बघितली पण कसलाच चिन्ह दिसत नव्हत, एका माणसाला विचारल तर म्हणाला शेवटची बस कधीच गेली ...
बोंबला... प्रायवेट गाड्या सुद्धा नव्हत्या . लिफ्ट मागून बघितली कोणीही आमच्या अवताराकडे बघून थांबायला तयार नव्हते, जे थांबले त्यांना रत्नागिरीला जायचं नव्हत...
गाडीची वेळ जवळ येत होती... देवच नाव घेतल, म्हटल बाप्पा पोचंव रे वेळेवर :)
५ मिनिटात समोरून आमची सकाळची मिडी बस आली, तिची शेवटची फेरी होती. जीवात जीव आला. जाताना बशीत आम्ही दोघंच होतो. त्याने ४० मिनिटात आम्हाला रत्नागिरीत पोचवले. तिथून अजून एक बस करून स्टेशनात आलो. स्टेशन खच्चून भरलेलं होत. अर्थात रिसर्वेषण नव्हतंच. २ ट्रेन अशाच सुटल्या. चढायला मिळालंच नाही. शेवटी ११ च्या कोकण कन्येत कसबसं चढलो .. पुढे ठाण्यापर्यंत कसे पोचलो ते न लिहिलेलंच बर
असो पण कोकणात अशी पीड ट्रीप मारायला मजा आली. लाल डब्याने खूप साथ दिली. माझ्यामते कोकणातल्या मातीत अशी काही चुंबकीय शक्ती आहे कि ती आपल्या माणसांना ती कुठेही, मुंबई पुणे, नाशिक, दिल्ली, लंडन , अमेरिका , अगदी जगाच्या पाठीवर कुठेही असली तरी शेवटी आपल्याकडे खेचून घेतेच :)

💬 प्रतिसाद
म
मेघवेडा
Wed, 12/14/2011 - 12:31
नवीन
शेवटचं वाक्य अगदी खरंय महाराजा!
पहिल्यांदाच गेलेला दिसतोय गावाला? आडिवरे सुंदरच आहे आणि! फोटो आवडले. :)
- Log in or register to post comments
न
नंदन
Wed, 12/14/2011 - 21:01
नवीन
पूर्ण सहमत! फोटू झकास आलेत.
- Log in or register to post comments
प
पियुशा
Fri, 12/16/2011 - 06:07
नवीन
स्पावड्या कसले क्लास फोटो आहेत रे ,काय सुन्दर गाव आहे तुमचा !
वर्णन अन फोटु झक्कास :)
- Log in or register to post comments
५
५० फक्त
Wed, 12/14/2011 - 12:31
नवीन
स्पावड्या पुढची कोकण ट्रिप तुझ्या घरीच, पाहिजे तर पुण्याहुन तुला घ्यायला येतो डोंबिवलीत. तयार रहा.
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Wed, 12/14/2011 - 12:38
नवीन
भन्नाट फटु आहेत रे....!!!
मी गेलोय ह्या मंदिरात ९८ साली.
अडिवरे गावचा मित्र आहे माझा. खूप मस्त वाटतं.
भाट्याचा समुद्र किनारा पण सुंदर आहे.
- Log in or register to post comments
क
किसन शिंदे
Wed, 12/14/2011 - 12:42
नवीन
हम्म!!
- Log in or register to post comments
प
प्रीत-मोहर
Wed, 12/14/2011 - 12:55
नवीन
अगदी अगदी....
बाकी लेख व फटु मस्तच :)
- Log in or register to post comments
व
विशाखा राऊत
Wed, 12/14/2011 - 12:56
नवीन
स्पा जवर्दस्त. खरच कोकणामध्ये अशीच जादु आहे. फोटो सुरेख आहेत न वर्णन खुपच मस्त. :)
- Log in or register to post comments
स
स्मिता.
Wed, 12/14/2011 - 13:05
नवीन
गावाचे फोटो आणि वर्णन दोन्ही आवडले. सुरुवातीला असलेले गाव, घर आणि बागेचे फोटो १ नंबर!
- Log in or register to post comments
व
वपाडाव
Wed, 12/14/2011 - 13:06
नवीन
दुसरा फटु अत्त्युत्तम श्रेणीतला आहे.....गावाचं वर्णनही अपर्तीम प्रकारचे.....
- Log in or register to post comments
म
मन१
Wed, 12/14/2011 - 13:08
नवीन
हल्ल्ली मला कोकणातलीच पोरगी पटवावी व त्यानिमित्ताने तिथे येणे-जाणे सुरु ठेवावे असे वातू लागले आहे.
- Log in or register to post comments
ग
गवि
Wed, 12/14/2011 - 13:09
नवीन
लहानपणीच्या आडिवर्यातल्या खूप आठवणी आहेत..
कोंकणाविषयी जे म्हणतोयस ना.. ते फार पटलं रे.. मी कोंकण सोडून वीस वर्षं देशावर, पुण्यात, मुंबईत, गुजरातेत, तामिळनाडूत आणि कुठेकुठे राहिलो.. पण कोणी मी कुठचा म्हणून विचारलं की आतून उत्तर येतं: "मी रत्नांग्रीचा रे.."
डोळ्यात पाणी आणलंस स्पावड्या..
सगळं लिहिता येत नाही.. पण ग्रेट.. धन्यु..
- Log in or register to post comments
व
विशाखा राऊत
Wed, 12/14/2011 - 14:17
नवीन
+१
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Wed, 12/14/2011 - 13:23
नवीन
तुझ्या गावाचे चित्रदर्शी रूप खूपच भावले.
आम्ही आपली घाटावरची माणसं. पदरचे पैसे खर्च करूनच कोकणात २/३ दिवस राहणं आमच्या नशिबी. तुम्ही भाग्यवान.
- Log in or register to post comments
व
वपाडाव
Wed, 12/14/2011 - 13:49
नवीन
तुमी घाटावरची अन आमी घाटीची..... अधिक खुलासा "यकु उर्फ यशवंत एकनाथ" करतील.....
- Log in or register to post comments
ज
जाई.
Wed, 12/14/2011 - 13:30
नवीन
गावाचं वर्णन आणि फोटो छान आलेत
- Log in or register to post comments
स
सुहास झेले
Wed, 12/14/2011 - 13:34
नवीन
जबरा... !!!
कोकणात जायचं आहे गेले कित्येक वर्ष.... आता तुझं घर आहे म्हटल्यावर, हल्ला बोल ;)
- Log in or register to post comments
अ
अन्या दातार
Wed, 12/14/2011 - 13:57
नवीन
भारी वर्णन रे स्पावडू. तु म्हणतोस ते शेवटचे वाक्य जाम पटतंय. कोकणात गेल्यावर तिथून पायच काढवत नाही.
- Log in or register to post comments
ग
गणपा
Wed, 12/14/2011 - 14:22
नवीन
नॉस्टॅल्जीक करणारी प्रकाशचित्रं.
चला थोड्या उशिराने का होईना पण चुंबकाने आपलं काम बजावलच. :)
- Log in or register to post comments
म
मानस्
Wed, 12/14/2011 - 14:47
नवीन
छान लेख्..छान फोटो..
इतक्या छान गावात इतक्या वर्षात फक्त एकदा गेला होतात हे वाचून नवल वाटलं.
- Log in or register to post comments
प
प्रास
Wed, 12/14/2011 - 14:58
नवीन
लेखन झकास, कोकण छान, घर सुंदर आणि फोटो सुरेख.
तुझे काका राहत आहेत ते वडिलोपार्जित घर अजून तुमचंही आहेच ना रे?
- Log in or register to post comments
स
स्पा
गुरुवार, 12/15/2011 - 05:19
नवीन
@प्रास : हो सुदैवाने अजूनतरी घरावर आमचा अधिकार आहे
- Log in or register to post comments
प
प्रास
गुरुवार, 12/15/2011 - 12:14
नवीन
स्पा, कळल्यावर फोटो अजून आवडले गेले आहेत.
:-)
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 12/14/2011 - 15:01
नवीन
फोटू आणि वर्णनही आवडले.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
य
यकु
Wed, 12/14/2011 - 15:38
नवीन
स्पांडू तु मुंबईत कशाला र्हातो रे एवढं सुंदर गाव सोडून? :(
बाकी कोकणातले खेडे कसे असते ते फोटूतून आणखी दिसले असते तर आणखी मजा आली असती.
दोस्तहो, आता टूर डी कोकण काढाच!
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Wed, 12/14/2011 - 15:41
नवीन
अगदी अगदी. हेच मनात आले होते.
कोकण ट्रिप होवूच द्या आता.
- Log in or register to post comments
स
सूड
गुरुवार, 12/15/2011 - 05:46
नवीन
अगदी अगदी, माझ्यापण हेच मनात आलं होतं.
बाकी स्पा चांगला फटुकार आहे हे वरच्या फटुंमधून दिसतंच .
- Log in or register to post comments
प
प्यारे१
गुरुवार, 12/15/2011 - 06:26
नवीन
>>>बाकी स्पा चांगला फटु आहे
असे वाचले. असो.
कॉकनात कंदी जावाचा? ;)
- Log in or register to post comments
व
विश्वनाथ मेहेंदळे
गुरुवार, 12/15/2011 - 17:38
नवीन
मी ते वाक्य "बाकी स्पा चांगला टुकार आहे....." असे वाचले. दचकलो, मग परत वाचले आणि तिसरे महायुद्ध टळले म्हणून निश्वास सोडला.
बाकी, फोटो मस्तच.... जाऊ रे एकदा सगळे मिळून कुठेतरी. तुम्ही लोक बनवा प्लान (आणि तडीस पण न्या ;-) )
- Log in or register to post comments
स
सोत्रि
गुरुवार, 12/15/2011 - 06:18
नवीन
मी आत आहे ;) I'm in!
चलोssss कोकण !
अवांतरः स्पावड्या, फटू लै म्हणजे लैच भारी!
- (घाटी) सोकाजी
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 12/15/2011 - 13:05
नवीन
अंssss असं काय तें? मी पण,मी पण...!
- Log in or register to post comments
इ
इंटरनेटस्नेही
Wed, 12/14/2011 - 15:51
नवीन
+१ हेच आणि असेच म्हणतो.
सर्व फोटो आणि प्रवासवर्णन आवडले. :)
-
(कुडाळ/मालवणचा) इंट्या.
- Log in or register to post comments
प
प्रभो
Wed, 12/14/2011 - 16:11
नवीन
मस्त फटू आणी वर्णन रे स्पावड्या!!
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Wed, 12/14/2011 - 19:39
नवीन
स्पावडू भारी रे एकदम...! या वर्णनातली अनेक वाक्य क्षणाक्षणाला अंगावर रोमांच उभे करत होती...माझं गाव कोकणात नावापुरतच आहे.पण अजोळ मात्र कोकणातच आहे...हरिहरेश्वर. कोकणातलं सगळं असच जवळच्या माणसासारखं मनावर ठसा उमटवणारं आहे.समुद्र/नारळ/सुपार्या/अंबे/काजु/कोकम-या सगळ्या नेहमीच्या गोष्टी झाल्या,पण तु वर्णन केलेल्या अंधार,त्यात ऐकु येणारे कीर्तन/भजनाचे सुर वगैरे गोष्टी जास्त रोमांचक असतात.माझ्या मामाच्या घरामागे बंदरावर स्मशान आहे.तिथली मडकी उचलण्या पासुन..ते हडक घरी(गोठ्यात)लपवण्या पर्यंत केलेली कमाल,त्यायोगे मावशीच्या हातचा नरवेलाच्या शिमटीनी खाल्लेला मार...!किती किती अठवणी आहेत...मला तर कधी कधी प्रचंड बेचैन वाटलं ना,की मी अजुनही स्वारगेटला जाऊन स्टँडवर वस्तीला असलेल्या पुणे-श्रीवर्धन गाडीचं दर्शन घेऊन येतो.मला गाडीवर डायवर/कंडक्टरनी रंगवुन लावलेला पुणे-श्रीवर्धन हा बोर्डं लाइफ सेव्हींग ड्रग सारखा वाटतो,कारण तो नुसता पाहिला तरी जिवात जीव येतो ना...! अता तुझं हे प्रवास वर्णन आणी फोटु बघुन माझ्या बेचैनीत भयंकर वाढ झालीये,त्यामुळे कदाचित मी आता कधिही गावाला पळुन जाण्याची दाट शक्यता वाटायला लागलीये...तु वर्णन करुन मोकळा झालास,आणी आमचे आता अ-वर्णनीय हाल सुरू झालेत :-(
- Log in or register to post comments
प
प्राजु
Wed, 12/14/2011 - 20:43
नवीन
मस्त लिहिले आहेस!!
- Log in or register to post comments
च
चिंतामणी
Wed, 12/14/2011 - 20:55
नवीन
सगळेच छान आहे. फोटोसुद्धा आणि वर्णनसुद्धा.
यकुंसारखे (थोडिशी दुरूस्तीकरून) मीसुध्दा म्हणतो "तु डोंबीवलीत कशाला र्हातो रे एवढं सुंदर गाव सोडून?"
ज्यांची कोकणात घरे आहेत त्यांचा हेवा वाटतो रे. आडीव-याच्या जवळच देवीहसोळला आमची कुलदेवता आहे. (आणि धोपेश्वर कुलदैवत. दोन्हिही राजापुर तालुक्यातच). तीथे जेंव्हा जाणे होते तेंव्हा परत येउ नये असेच वाटत असते.
एकच बाराकशी शंका. पाचव्या फोटोला तु "आमची छोटीशी बाग" असे म्हणले आहेस. पण तीथे बाग न म्हणता "वाडी" म्हणतात ना?
- Log in or register to post comments
स
स्पा
गुरुवार, 12/15/2011 - 05:25
नवीन
एकच बाराकशी शंका. पाचव्या फोटोला तु "आमची छोटीशी बाग" असे म्हणले आहेस. पण तीथे बाग न म्हणता "वाडी" म्हणतात ना?
घरासमोर नारळ - पोफळी, केळी, वेग्रे लावल्या असतील , तर बागच म्हणतात.
पण १ २ एकरी जागेवर जर उत्पन्ना करता आंब्याची कलम, रातांबे, काजू वेग्रे लावले असतील , तर मग अशा "मोठ्या बागांना" 'वाडी' म्हणतात :)
- Log in or register to post comments
S
sneharani
गुरुवार, 12/15/2011 - 05:24
नवीन
मस्त वर्णन अन फोटोही!
आता कोकण पहावच म्हणते!!
:)
- Log in or register to post comments
र
रम्या
गुरुवार, 12/15/2011 - 06:41
नवीन
>>हा पत्ता इतकी वर्ष नुसता ऐकून होतो, स्वतःच गाव असूनही फक्त एकदा लहानपणी ४ ते ५ तासांसाठी गेलो असेन>><<
हे बाकी आवडलेलं नाही.
बाकी फोटो आणि लिखाण आवडले.
- Log in or register to post comments
स
सविता००१
गुरुवार, 12/15/2011 - 06:59
नवीन
स्पा, खूप सुंदर लिहिलं आहेस आणि फोटो पण खल्लास. कोकण म्हणजे भन्नाटच आहे. तिथून परत यावेसे कधीच वाटत नाही.
- Log in or register to post comments
५
५० फक्त
गुरुवार, 12/15/2011 - 12:02
नवीन
धागा मस्तच, फोटो पण मस्तच
'''माझ्यामते कोकणातल्या मातीत अशी काही चुंबकीय शक्ती आहे कि ती आपल्या माणसांना ती कुठेही, मुंबई पुणे, नाशिक, दिल्ली, लंडन , अमेरिका , अगदी जगाच्या पाठीवर कुठेही असली तरी शेवटी आपल्याकडे खेचून घेते''
पण या शेवटाशी असहमत, अशी चुंबकीय शक्ती कोकणच काय सगळ्याच ठिकाणच्या मातीत हे असतं, जसं आपल्याला कोकणातुन मुंबईत येउन असं वाटतं, तसंच रशियातल्या एखाद्या बर्फाळ खेड्यातल्या माणसाला मॉस्कोत येउन वाटतच असेल ना , तेवढंच काय मला सोलापुरातुन पुण्यात येउन पण असं वाटतंच, माझ्या सोलापुरातल्या मातीत पण अशी शक्ती आहेच.
- Log in or register to post comments
ग
गवि
गुरुवार, 12/15/2011 - 12:11
नवीन
-१
- Log in or register to post comments
म
मेघवेडा
गुरुवार, 12/15/2011 - 12:23
नवीन
दणदणीत -२
- Log in or register to post comments
स
सूड
गुरुवार, 12/15/2011 - 15:07
नवीन
+१
सध्या बदलापूराबद्दल मला असंच काहीसं वाटतंय !!
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
गुरुवार, 12/15/2011 - 17:06
नवीन
५० रावांची जोरदार सहमत. कोकणाची ओढ आहेच पण ती फार तर ४/५ दिवसांची, गेला बाजार महिनाभरपर्यंत, पण नंतर मन मात्र पिंपरी चिंचवडातच खेचत राहणार. तिथेही तीच चुंबकीय शक्ती कार्यरत आहे शेवटी. ;)
- Log in or register to post comments
ग
गवि
गुरुवार, 12/15/2011 - 17:18
नवीन
- ४
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
गुरुवार, 12/15/2011 - 17:26
नवीन
तसेही बदलापूर, ठाणे, मुंबई हे कोकणातच येते असे माहित आहे ब्वा. ;)
- Log in or register to post comments
ग
गवि
गुरुवार, 12/15/2011 - 17:32
नवीन
+१
- Log in or register to post comments
अ
अन्या दातार
गुरुवार, 12/15/2011 - 17:26
नवीन
कितीही दूर गेलो तरी खरा कोल्हापूरकर कोल्हापुरशी असलेली आपली नाळ तोडूच शकत नाही.
(सांगलीत जन्मलेला, कोकणात दरवर्षी नेमाने कुलदैवताच्या पुजेस जाणारा कोकणस्थ व खरा कोल्हापुरकर) अन्या
- Log in or register to post comments
५
५० फक्त
गुरुवार, 12/15/2011 - 17:30
नवीन
सांगलीत जन्मलेला, कोकणात दरवर्षी नेमाने कुलदैवताच्या पुजेस जाणारा कोकणस्थ व खरा कोल्हापुरकर
हे काय शादी. कॉम ला टाकता टाकता इथं टंकलय का चुकुन श्री. अन्या दातार.
- Log in or register to post comments
- 1
- 2
- ›
- »