Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • दोसतारः शाळेत लग्न लागते (१)
  • आणि माऊंट किनाबालू सर झाला...
  • भिवंडी ची दवंडी
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ४: रोमांचक मुन्स्यारीच्या वाटेवर!
  • अंडा घोटाला-बालकथा
  • उत्तर कर्नाटकातील याना शिखरे.
  • सी पी बेरार सर्किट
  • बाई माझी कंबर लचकली..
  • !!! नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • !!! नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
कलादालन

फुलपाखरु भाग १

म
मदनबाण
Tue, 11/01/2011 - 04:57
  • फुलपाखरु भाग २

Book traversal links for फुलपाखरु भाग १

  • फुलपाखरु भाग २ ›

*टिप :--- सॉफ्टवेयर वापरुन कोणताही बदल केलेला नसुन फोटो फक्त रिसाईझ केले आहेत.

(पाखरु प्रेमी हौशी फोटुग्राफर) ;)


  • Log in or register to post comments
  • 19706 views


वाचनखूण लावा
| 19706 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
प
प्रचेतस Tue, 11/01/2011 - 05:07 नवीन
सुरेख फोटू रे बाणा. फुलपाखरे खूपच छान टिपली आहेत. आम्ही फुलपाखरांचे फोटू काढायला जावं तर ती खट्याळ लगेच उडून जातात. :(
  • Log in or register to post comments
ग
गवि Tue, 11/01/2011 - 05:11 नवीन
मस्त रे..
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Tue, 11/01/2011 - 05:11 नवीन
मस्तच!! काँक्रिटच्या जंगलात तुला बरी फुलपाखरं गवसली.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 11/01/2011 - 05:18 नवीन
काँक्रिटच्या जंगलात तुला बरी फुलपाखरं गवसली. ठाण्यात ओवळेकरवाडी फुलपाखरांच्या बागेसाठी प्रसिद्ध आहे,दिवाळीत मित्र म्हणाला चलतोस का ? मी म्हणालो येतो. :) जयपाल बरोबर तिथे जायचा विचार बर्‍याच वेळा आला होता,पण काही जमलं नाही.
  • Log in or register to post comments
र
रेवती Tue, 11/01/2011 - 14:55 नवीन
भारी आलेत फोटू.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 11/01/2011 - 05:15 नवीन
मस्त रे.........!!! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ग
गवि Tue, 11/01/2011 - 05:55 नवीन
अरे फुलपाखरांचे फोटो काढणं हे महान पेशन्सचं काम आहे. फोटो काढायला त्यांनी स्थिर बसणं हेच महाकठीण. कौतुक आहे तुझं.. मबा, तुझे फोटो इतके मस्त आहेत की फक्त त्यांची ब्यूटी बघावी.. माहितीची गरजच नाही, पण कधीकधी नावाने ओळखून आपली फुलपाखरांशी मैत्री जास्त वाढते असा अनुभव असल्याने न राहवून लिहितोय. स्ट्राईप्ड टायगर, ब्लू टायगर आणि (कदाचित) ब्लू पॅन्सी अशी तीन फुलपाखरं दिसताहेत. पैकी स्ट्राईप्ड टायगर आणि ब्लू टायगर ही दोन्ही वाईट चवीची आहेत (पक्ष्यांच्या दृष्टीने.. गैरसमज नसावा). स्ट्राईप्ड टायगरच्या अळ्या अतिशय रंगीबेरंगी आणि भयंकर असतात. रुईच्या किंवा वडाच्या झाडावर फीड करतात. ब्लू टायगर वाघनखीच्या (भिंतीवर चढणारा वेल वाघनखीच ना?) पानांवर फीड करतात. ही झाडे माहीत असली की ती अळी मिळवता येते. मग घरी बरणीत ठेवून तिला तीच पानं आणून काही दिवस दिली की तिथेच ती कोष करते (त्यासाठी एक झाडाची काडी बरणीत तिरकी ठेवावी. काही दिवसांनी कोष पारदर्शक होऊन बाहेरुनच आतलं बनलेलं फुलपाखरु (फोल्डेड!!) दिसायला लागतं.. ९९ टक्के कोष पहाटेपहाटे उघडतात. सुरळीसारखं ओलसर पाखरु बाहेर येऊन त्या काडीवर लटकतं.. मग पंख हळूहळू उलगडतात. पंख ओले असताना फुलपाखरु अत्यंत असहाय्य असतं. पंख लवकरच वाळून कडक होतात. दहा पंधरा मिनिटांत काडी घराबाहेर न्यायची की ते भुरकन उडून जातं. या सगळ्या प्रक्रियेत अत्यंत अ‍ॅडिक्टिव्ह आनंद आहे...
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Tue, 11/01/2011 - 06:46 नवीन
फुलपाखरांचा तुमचा अभ्यास कमाल आहे गवि. कोषातून बाहेर येत असलेले फुलपाखरू पाहणे नक्कीच आनंददायी अनुभव असेल.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 11/01/2011 - 07:17 नवीन
धन्यवाद विहारी... :) तुमच्यामुळे फुलपाखरां संदर्भात नविन माहिती कळाली... :) स्ट्राईप्ड टायगर, ब्लू टायगर आणि (कदाचित) ब्लू पॅन्सी अशी तीन फुलपाखरं दिसताहेत. असांच कुठलासा टायगर कोशातुन नुकताच बाहेर आला होता,त्याला टिपण्याची नामी संधी मला त्यावेळी मला मिळाली. तो फोटु मी पुढच्या भागात टाकीन. :)
  • Log in or register to post comments
ग
गवि Tue, 11/01/2011 - 07:30 नवीन
वा वा. टाक लवकर तो फोटो. (कदाचित) ब्लू पॅन्सी अशासाठी म्हटलं की त्याचे पंख मिटलेले आहेत, म्हणून बाहेरची बाजूच दिसतेय. आणि आता फुलपाखरांचा छंद सुटून पंधरा वर्षं झाली आहेत. तू सुंदर दिवसांची आठवण करुन दिलीस म्हणून खूप आभारी आहे. ठाण्यात अशी फुलपाखरांची बाग आहे हे ऐकून आनंद झाला. मी पण येतो तुझ्यासोबत, कधी जाणार असलास तर. अरे प्रत्येक फुलपाखराला ठराविक झाडाचीच पानं लागतात, आणि तसली झाडं आपल्या आजुबाजूला लावली तर फुलपाखरांची बाग बनवता येते. आम्ही फुलपाखरांच्या फॅन मित्रांनी कॉलेजात असताना एका संस्थेच्या एकरभर जागेवर असं प्लॅन करुन प्लँटेशन केलं आणि तिथे फुलपाखरांचं अक्षरशः पीक आलं होतं.. त्याविषयी कधीतरी सांगीन..विशेष म्हणजे परिसरातल्या जवळजवळ सर्व जातींच्या फुलपाखरांनी हजेरी लावली. तिथे तू फोटो काढायला हवा होतास.
  • Log in or register to post comments
ब
बहुगुणी Tue, 11/01/2011 - 10:11 नवीन
गवि: मस्त माहिती देताय, त्या 'फुलपाखरी प्लँटेशन'विषयी सविस्तर लेख लिहाच!
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानराम Tue, 11/01/2011 - 07:51 नवीन
सुरेख
  • Log in or register to post comments
व
वपाडाव Tue, 11/01/2011 - 08:20 नवीन
छान किती दिसते फुलपाखरु..... !!!
  • Log in or register to post comments
अ
अन्या दातार Tue, 11/01/2011 - 13:06 नवीन
वप्या, आधी छानच्या आधी 'अय्या' लिहायचे विसरलास का?? ;)
  • Log in or register to post comments
द
दादा कोंडके Tue, 11/01/2011 - 09:10 नवीन
वरून चौथं फुलपाखरु फुलांपेक्षा कचर्‍यावरच जास्त दिसतं!
  • Log in or register to post comments
क
कच्ची कैरी Tue, 11/01/2011 - 11:33 नवीन
वॉव !!!! मदनबाण तुम्ही काढलेले फोटो आणि गविंनी दिलेली माहिती मस्तच! धागा उघडल्याचे सार्थक झाले.
  • Log in or register to post comments
म
मीनल Tue, 11/01/2011 - 15:09 नवीन
सुंदर. अप्रतिम
  • Log in or register to post comments
प
पैसा Tue, 11/01/2011 - 15:13 नवीन
सगळेच फोटो आणि गविनी दिलेली माहिती मस्त!
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 11/01/2011 - 19:33 नवीन
प्रत्येक चित्रात फोकस अतिशय छान साधला आहेस आणि फुलांची पार्श्वभूमी अचूक निवडली आहेस. पेशन्सला दाद. गविंनी दिलेली माहितीसुद्धा अतिशय मनोरंजक आहे. एक लेख होऊन जाउदे राव. -रंगा
  • Log in or register to post comments
स
सुहास झेले Wed, 11/02/2011 - 06:22 नवीन
व्वा व्वा... लई भारी... !! पुढचा भाग लवकर येऊ देत.
  • Log in or register to post comments
स
सुधांशुनूलकर Wed, 11/02/2011 - 10:09 नवीन
फोटो खूप छान आले आहेत. क्र. २ फोटोमधलं फुलपाखरु आहे 'ग्रास डेमन'. हे छोटंसं फुलपाखरु स्किपर (फॅमिली हेस्परिडी) या जातीचं आहे. पावसाळा आणि हिवाळा-उन्हाळा या ॠतूंमधे ग्रास डेमनच्या पंखांवरची रंगसंगती वेगवेगळी असते. स्किपर जातीच्या फुलपाखरांचं वैशिष्ट्य म्हणजे, यांच्या अळ्या पानाची बोगद्यासारखी गुंडाळी करून त्यात रहातात. त्या बोगद्यातच त्यांचा कोष होतो. यांचे डोळे मोठाले असतात. फोटो क्र. ४ मधलं फुलपाखरू 'कॉमन बुशब्राऊन' आहे (ब्लू पँझी नव्हे). अधिक माहिती इथे वाचा. गविंनी लिहिलंय : काही दिवसांनी कोष पारदर्शक होऊन बाहेरुनच आतलं बनलेलं फुलपाखरु (फोल्डेड!!) दिसायला लागतं.. ९९ टक्के कोष पहाटेपहाटे उघडतात. सुरळीसारखं ओलसर पाखरु बाहेर येऊन त्या काडीवर लटकतं.. मग पंख हळूहळू उलगडतात. पंख ओले असताना फुलपाखरु अत्यंत असहाय्य असतं. पंख लवकरच वाळून कडक होतात. दहा पंधरा मिनिटांत काडी घराबाहेर न्यायची की ते भुरकन उडून जातं. या सगळ्या प्रक्रियेत अत्यंत अ‍ॅडिक्टिव्ह आनंद आहे... अगदी खरं आहे ते ! रेड पियरो या जातीच्या फुलपाखराचा संपूर्ण जीवनक्रम मी दीड-दोन इंचावरून चित्रित (व्हिडिओ चित्रण) केला आहे. त्यात फुलपाखरू कोषातून बाहेर येताना स्पष्टपणे दिसतं. फुलपाखराच्या जन्माविषयी एक फार सुंदर आठवण लिहीन तेव्हा तो व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करीन. बाकी, फुलपाखरांवरच्या धाग्यांना सुरुवात केली ती जागुताईंनी (माझ्या आठवणीप्रमाणे). एका नव्या, इंटरेस्टिंग विषयाला सुरुवात केल्याबद्दल त्यांचे आभार मानायला हवेत !
  • Log in or register to post comments
म
मराठमोळा Wed, 11/02/2011 - 10:32 नवीन
खुपच सुंदर.. मस्त फोटु.. एकदम आवडेश. :)
  • Log in or register to post comments
ज
जाई. Wed, 11/02/2011 - 14:25 नवीन
छान आलेत फोटो
  • Log in or register to post comments
प
पूनम ब Wed, 11/02/2011 - 15:20 नवीन
अप्रतिम..खूपच सुरेख आहेत सर्व फोटो..
  • Log in or register to post comments
द
दत्ता काळे Wed, 11/02/2011 - 15:27 नवीन
फोटो सुरे़ख आले आहेत.
  • Log in or register to post comments
अ
अतुल पाटील Wed, 11/02/2011 - 17:10 नवीन
अप्रतिम
  • Log in or register to post comments
प
पिंगू Wed, 11/02/2011 - 18:29 नवीन
बाणाकडून जरा वेगळ्या पाखरांची अपेक्षा होती.. ;) - (बाणाचा मित्र) पिंगू
  • Log in or register to post comments
प
प्रकाश१११ Wed, 11/02/2011 - 18:36 नवीन
निव्वळ अप्रतिम .खूप आवडले.!!
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 11/03/2011 - 05:33 नवीन
प्रतिक्रिया देणार्‍या सर्व मंडळींचा म्या लयं लयं आभारी हाय. :) लवकरच पुढचा भाग टाकेन.
  • Log in or register to post comments
५
५० फक्त गुरुवार, 11/03/2011 - 07:22 नवीन
लै भारी फोटो,
  • Log in or register to post comments
न
नरेंद्र गोळे गुरुवार, 11/03/2011 - 14:14 नवीन
वा! बुवा. सुंदर फोटो काढले आहेत. आवडले. कमालीची स्पष्टता आणि सापेक्षपृथकता (रिझोल्युशन) आहे प्रकाशचित्रांच्या कडांमधे. सुरेख.
  • Log in or register to post comments
स
सोत्रि गुरुवार, 11/03/2011 - 14:26 नवीन
खुप छान फोटो! - (मन फुलपाखरू झालेला) सोकाजी
  • Log in or register to post comments
स
सुहास.. गुरुवार, 11/03/2011 - 15:29 नवीन
कॅमेरा फॉर्मात रे, आता लेखणी पण येवु देत !
  • Log in or register to post comments
ह
हुकुमीएक्का गुरुवार, 06/05/2014 - 20:37 नवीन
फोटो सुंदर आलेत. चौथा आणि शेवटचा तर एकदम झकास.
  • Log in or register to post comments
ए
एस Fri, 06/06/2014 - 09:19 नवीन
@सुधांशुनूलकरसाहेबः
रेड पियरो या जातीच्या फुलपाखराचा संपूर्ण जीवनक्रम मी दीड-दोन इंचावरून चित्रित (व्हिडिओ चित्रण) केला आहे. त्यात फुलपाखरू कोषातून बाहेर येताना स्पष्टपणे दिसतं. फुलपाखराच्या जन्माविषयी एक फार सुंदर आठवण लिहीन तेव्हा तो व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करीन.
@गविसाहेब:
गवि: मस्त माहिती देताय, त्या 'फुलपाखरी प्लँटेशन'विषयी सविस्तर लेख लिहाच!
दोघांनाही - नेकी और पूछपूछ? आत्तापर्यंत टाकला नसेल तर कृपया टाका आणि टाकला असेल तर लिंक द्या. बादवे, मदनबाण - खूप छान प्रतिमा.
  • Log in or register to post comments
ह
हुकुमीएक्का Fri, 06/20/2014 - 18:49 नवीन
फुलपाखरांचे फोटो काढताना फोटोग्राफरचा खरा कस लागतो. कारण जराशी हालचाल झाली की फुलपाखरू उडून जाते. त्यामुळे कॅमेरा सेटिंग, बॅकग्राऊंड, व जास्त हालचाल न करता कॅमेरा सेट करणे ह्या सर्व गोष्टींसाठी खुप वेळ जातो. Patience खुप लागतात. फोटो छानच आलेत. *good*
  • Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम Fri, 11/21/2014 - 16:03 नवीन
मस्त!
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 22 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 34 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 36 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 38 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 42 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: Adarsh
    नोंदणी: Sat, 06/03/2023 - 14:22
  • सदस्य: Ganesh Shivaji…
    नोंदणी: Tue, 05/30/2023 - 11:22
  • सदस्य: अनिल गलगली
    नोंदणी: Sat, 05/27/2023 - 20:18
  • सदस्य: Prachi Dhawade
    नोंदणी: Sat, 05/27/2023 - 16:09
  • सदस्य: मनोज28
    नोंदणी: Sat, 05/27/2023 - 08:06
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा