Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
कलादालन

ट्रेक टु नाणेघाट छे, ब्रेक टु नेचर - भाग २

५
५० फक्त
Wed, 09/21/2011 - 19:47

Book traversal links for ट्रेक टु नाणेघाट छे, ब्रेक टु नेचर - भाग २

  • ‹ ट्रेक टु नाणेघाट छे, ब्रेक टु नेचर
  • Up
नमस्कार मंड्ळी, या भागात फक्त फोटोच आहेत, बहुतेक उरलेले सगळे अर्थात काही वगळुन, ट्रिपला आलेल्या मेंबरांच्या विनंती वजा आदेशाला मान देउन सर्व मान्य फोटो टाकत आहे, सर्व प्रकारच्या फोटोसाठी सदर सदस्यांना व्यनि करावेत ही विनंती. नाय तर काय हि लोकं यायची नाय ओ, कोकण ट्रिपला पुढच्या महिन्यात... हे फोटो सगळ्यांनीच काढलेले आहेत.. जबराट फ्रेम त्यातच अजुन एक आणि अजुन भरपुर अजुन एक जबराट मॅक्रो.. पत्थराच्या छातीवर उमललेला गालिचा... नभ उतरु आलं धेनु घेउन जाय .... निसर्गातले डोंगर अन माणसानं बांधलेले सिमेंटचे बंधारे सगळ्यांनाच व्यापुन उरलेली हिरवाई म्या राजाय इतं, नानाच्या अंगठ्याच्या कड्यावरचा सोनेरी काठ अजुन एक वॉलपेपर साठी.. आणि या नंतर मस्ती आणि मजा नको न्याहा़ळु नितळ काया.... इथं पाण्याला ओढ बेकार होती, एका मोठ्या दगडाला अडकलो म्हणुन हे लिहु शकतोय नाहीतर मला भेटायला दवाखान्यातच यावं लागलं असतं.. ह्याला अन मालोजीला धुवुन काढायचा राहिला, म्होरच्या टायमाला असो, एवढा गोंधळ घालुन एक गागल तोडुन अन एकाचा चष्मा हरवुन, अन दोघा तिघांच्या हाता पायाला जखमा घेउन परत, पुन्हा त्या खराब रस्त्यावरुन वाटेत जुन्नरला बटाटेवडे व चहा घेतला, अंधारायला लागलं होतं, विनोदच्या भावानं सकाळी पाठवलेला मेसेज आम्हाला आता मि़ळाला होता, पण आता आमच्या डोक्यात वाईनरीला जायचं होतं, नारायणगावच्या पुढं ५-१० किमिला असलेल्या वायनरीमध्ये पोहोचलो पणं आम्हाला थोडा उशिर झाला असल्यानं वायनरी पाहता आली नाही, मग तिथल्या हाटेलात हे पाहिलं अन हे पिलं, हा ड्रम बहुधा रिकामा होता, आता सवयीनं काही च्यालेंज आहे का चार ड्र्म द्रव प्यायचं वैग्रे चवकशी केली, तसं काहि नाही तिथं. आमच्या माहिति अधिका-यांनी पुरवलेल्या माहितीनुसार बाटलीतल्या वाईनमध्ये सिओ२ तयार होण्यासाठी त्या खमध्याला ९२११.३२४ अंशात अशा प्रकारे ठेवतात की आंतरराष्ट्रीय परांचलन गतीने प्रत्येक सेकंदाला त्या बाटलीत सुमारे एक दशांश सुपरिय अनंत सिओ२ तयार होतो. या थोड्या सरळ आहेत म्हणजे यात सिओ२ तयार झालेला असावा आमच्यासाठी बाटलीची काच उत्तम क्वालिटिची आहे अन वरच्या स्टिकरचे पिरिंट पण छान आहे, आत काय का असेना ही खरंतर नंतर घेतली होती, आधी ही खालची अन हे प्रत्येकाचे सेपरेट स्टाइलचे गिलास, ही थोडी कलाकारी सापड्लं हे त्या वायनरीचं नाव जेवणात स्टार्टरच जास्त घेतले होते अन शेवटी हैदराबादी बिर्यानी, खिचडी खाउन ट्रिपला न आलेल्यांना शिव्या घालुन लास्ट फोटो काढुन परत निघालो. आता फोटोखाली नावं टाकावीत एवढे अनोळखी नाही कुणी यात. आणि हो महत्वाचं राहिलं हे सगळं फक्त ७५० /- प्रत्येकी मध्ये साध्य करु शकलो. अन एंडला दोन फोटो मिंटी अन धनाजीच्या गाडीचे, असो, नेहमीप्रमाणे या ट्रिपमध्ये पण पुढच्या ट्रिपची घोषणा केली गेली, नवरात्र ते दिवाळी या दरम्यान कोकणात जायचं ठरवत आहोत, या नेहमीच्या मेंबरांना सोडुन कुणी येणार असेल तर मला किंवा वल्लीला व्यनि करा, माहिती कळवली जाईल. ट्रिप शक्यतो ८,९ च्या शनिवार व रविवार असेल, शुक्रुवारी मुक्कामाला जाउन रविवार संध्याकाळी परत येणे असा बेत आहे. माझं म्हणाल तर या वर्षीच्या १२ उत्तरीकहाण्यांपैकी ही ७ वी कहाणी सुफल संपुर्ण.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 10487 views

💬 प्रतिसाद
इ
इंटरनेटस्नेही Wed, 09/21/2011 - 20:01 नवीन
मस्त मस्त! वाईनचे एवढे फोटो पाहुन प्रचंड जळजळ झालेली आहे. कुठे फेडाल ही पापं?
  • Log in or register to post comments
म
मी-सौरभ गुरुवार, 09/22/2011 - 06:13 नवीन
वाईन सोड रे ईंट्या... पाण्यातल्या मासोळ्यांचे फोटो तर लै भारी आलेत. पण ते ईथे टाकता येण्यासारखे नाहीत ;)
  • Log in or register to post comments
स
सुहास झेले गुरुवार, 09/22/2011 - 06:34 नवीन
अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र... प्रायव्हेट धागा काढता येईल का त्यासाठी ;-) :D
  • Log in or register to post comments
म
मालोजीराव गुरुवार, 09/22/2011 - 08:08 नवीन
हेच म्हणतो ...'२१ वर्षांवरील फक्त ' असा धागा वेग्रे काढता आला तर पहा ;)
  • Log in or register to post comments
प
प्रभो Wed, 09/21/2011 - 20:40 नवीन
झकास!!
  • Log in or register to post comments
स
सुहास झेले Wed, 09/21/2011 - 20:41 नवीन
चिअर्स !! :)
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Wed, 09/21/2011 - 20:46 नवीन
मस्त फोटो सफर झाली
  • Log in or register to post comments
स
स्पा गुरुवार, 09/22/2011 - 04:32 नवीन
रापचिक फोटो फुलांचे तर अप्रतिम आलेत.. चायचं वाय्नारीत.. वप्या फुल टर्राट्ट पाडलेल दिसतंय :D
  • Log in or register to post comments
ध
धन्या गुरुवार, 09/22/2011 - 05:08 नवीन
मस्तच रे पन्नास. तसा वयाच्या तेविसाव्या वर्षांपर्यंत मी खेडयातच वाढलो. भातशेती, गाई - म्हशी, गावाच्या बाजूने वाहणारी काळ नदी या सार्‍यांच्या अंगाखांद्यावर खेळत लहानाचा मोठा झालो. पुढे यथावकाश खेडं सुटलं, आकाशात भरार्‍या मारल्या. परंतू पायाखालची माती मात्र सुटली नाही. त्यामुळे डोंगर दर्‍यांनी, नदी नाल्यांनी साद घातली की माझ्याही नकळत मी त्या हाकेला ओ देदतो... असो. एका सुंदर दिवसासाठी आमच्या मिपाकर मित्रांचे आभार. आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या विनंतीला मान देऊन कार्यकर्त्यांचे "खास" फोटो इथे न डकवल्याबद्दल तुमचेही खास आभार. अर्थात असे फोटो डकवायचे असे ठरवले असते तर "आमच्याबरोबर" तुम्हीही सुटला नसतात हे विनम्रपणे सांगू ईच्छितो ;)
  • Log in or register to post comments
५
५० फक्त गुरुवार, 09/22/2011 - 07:06 नवीन
' अर्थात असे फोटो डकवायचे असे ठरवले असते तर "आमच्याबरोबर" तुम्हीही सुटला नसतात हे विनम्रपणे सांगू ईच्छितो'' मी आधीच सुटलेला आहे, म्हणुन तर ते फोटो टाकलेले नाहीत, मुख्य कारण हेच आहे, तुमचं उगा निमित्त आहे.
  • Log in or register to post comments
म
मालोजीराव गुरुवार, 09/22/2011 - 19:18 नवीन
फोटू न डकवल्यामुळे पन्नास आणि धनाजीराव यांनी सुटकेचा निश्वास टाकलेला आहे. (संदर्भ : निश्वास टाकल्याचा आवाज वारज्याहून कात्रज पर्यंत पोचला गेलेला आहे ) - मालोजीराव
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस गुरुवार, 09/22/2011 - 05:17 नवीन
सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर धबधबांच्या स्वरूपात उगम पावणार्‍या या निर्झरांना पावसाळ्यात कमालीचे अवखळ स्वरूप प्राप्त होते. सदस्यांनी या खळाळत्या पाण्यात डुंबण्याचा पुरेपूर आनंद लुटला. इतके भिजून झाल्यावर वप्या तर बेक्कार कुडकुडायला लागलं. मग जुन्नरच्या चहाशिवाय पर्याय नव्हता. नारायणगावची वायनरीचे हाटेल लै भारी. पब्लिक वाईनचा आस्वाद घेण्यात मग्न होतं आणि आम्ही दोघं तिघं वाफाळत्या सूपचा ;). तिथं मस्त दोनेक तास घालवून परत निघालो ते १२ वाजेपर्यंत पुण्यात पोहोचलो. आणि हो, ५० फक्त यांनी गाडी सुरेख चालवलीच पण धनाजीरांचा मात्र रात्री गाडी चालवण्याचा पहिलाच अनुभव होता आणि त्यात ते पूर्णपणे यशस्वीही झाले त्याबद्दल त्यांचे खास अभिनंदन आणि विशेष धन्यवाद.
  • Log in or register to post comments
म
मी-सौरभ Mon, 09/26/2011 - 15:41 नवीन
आम्हा प्रवाशांकडून आभारपूर्वक चांगला डायवर हे प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात यील...
  • Log in or register to post comments
व
वपाडाव गुरुवार, 09/22/2011 - 06:33 नवीन
ढिंक चिका ढिंक चिका ढिंक चिका ढिंक चिका ए ए ए ए ढिंक चिका ढिंक चिका ढिंक चिका ढिंक चिका ए ए ए ए ढिंक चिका ढिंक चिका ढिंक चिका ढिंक चिका ए ए ए ए
  • Log in or register to post comments
ध
धन्या गुरुवार, 09/22/2011 - 07:25 नवीन
शाजीजमे जाऊंगा, पराठा खाऊंगा, पतियाळा लस्सी मैं पिऊंगा रे ढिंक चिका ढिंक चिका ढिंक चिका ढिंक चिका ए ए ए ए
  • Log in or register to post comments
ग
गवि गुरुवार, 09/22/2011 - 06:41 नवीन
उत्तम. ती जोई वाईन.. गोड पण मस्त.. भेटूया का यंदाच्या पुणे वाईन फेस्टिवल मधे ? पाण्यात डुंबण्याची मजा अफलातून आहे. जाम मजा केलीत राव.. फोटोही जबरी आलेत..
  • Log in or register to post comments
स
सोत्रि Sat, 09/24/2011 - 07:32 नवीन
भेटूया का यंदाच्या पुणे वाईन फेस्टिवल मधे ?
अगदी नक्की! पन्नास आणि गवि, व्यनी आणि फोनाफोनी करून ठरवुयात. - (फेस्टिव्ह) सोकाजी
  • Log in or register to post comments
म
मी-सौरभ Mon, 09/26/2011 - 15:36 नवीन
णोमिणेशण...
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ गुरुवार, 09/22/2011 - 07:06 नवीन
कर लेको ऐश.....! आमच्या नावाने थोडे तीर्थ दक्षिण दिशेला शिंपडले की नाही?
  • Log in or register to post comments
५
५० फक्त गुरुवार, 09/22/2011 - 07:19 नवीन
छे हो प्यारे, राहुन गेलं आता तुम्हाला एकदा घेउन जाउ अन काय शिंपडायचं का बुडवायचं ते करुन घेउ. ------------------------------------ एखाद्या सटवीच्या जोरावर सगळ्या भुतांमधलं सगळं कळतं असं वाटुन मतप्रदर्शन करणा-यांना आम्ही हायवेवर सुद्धा मारत नाही ...!!!
  • Log in or register to post comments
ध
धन्या गुरुवार, 09/22/2011 - 07:22 नवीन
एखाद्या सटवीच्या जोरावर सगळ्या भुतांमधलं सगळं कळतं असं वाटुन मतप्रदर्शन करणा-यांना आम्ही हायवेवर सुद्धा मारत नाही ...!!!
हे प्यारेच्या सहीचं विडंबन समजायचं की...
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ गुरुवार, 09/22/2011 - 08:16 नवीन
>>>>एखाद्या सटवीच्या जोरावर सगळ्या भुतांमधलं सगळं कळतं असं वाटुन मतप्रदर्शन करणा-यांना आम्ही हायवेवर सुद्धा मारत नाही ...!!! आयचा घो, बसवला टेम्पोत! काय रे हे? बाकी आमची स्वाक्षरी आम्ही आता, 'विचारजंत म्हणज सामान्यतः लोक काय म्हणतात ते पाहून मगच त्याच्याविरोधी मत मांडण्याची खाज असलेली जमात' अशी करण्याचा शिरेस विचार करत आहोत. काय म्हणता?
  • Log in or register to post comments
ग
गणेशा गुरुवार, 09/22/2011 - 08:55 नवीन
पाण्यात येथेच्छ डुंबण्याची मजा काही ओरच ,,, त्यात काल कढड्यावरील फोटो पाहुन माझी रायगड भेटा ही आठवली.. I missed a lot .
  • Log in or register to post comments
अ
अन्या दातार Fri, 09/23/2011 - 06:32 नवीन
>>पाण्यात येथेच्छ डुंबण्याची मजा काही ओरच ,,, म्हणूनच आम्ही तुला लै म्हंजे लैच मिस केले. पण काय करणार, तु तुझ्या 'मिस'मध्ये बिज्जी होतास ना ;)
  • Log in or register to post comments
प
प्रास गुरुवार, 09/22/2011 - 17:28 नवीन
दोन्ही धाग्यांना सामायिक प्रतिक्रिया देतोय. कसली भारी मज्जा केलीत राव! फोटो आणि त्यांचं शब्दांकन, एकदम लाजबाब!! एका चांगल्या ट्रेकची मस्त फलनिष्पत्ती झालेली दिसतेय. लगे रहो भैय्यालोक!!! :-)
  • Log in or register to post comments
द
दीप्स Fri, 09/23/2011 - 07:17 नवीन
मस्तच आहेत फोटो. (फक्त वाईन सोडली तर...)
  • Log in or register to post comments
स
सोत्रि Sat, 09/24/2011 - 07:35 नवीन
(फक्त वाईन सोडली तर...)
मला तर ब्वॉ फक्त वाइनचेच फोटो खुप्प खुप्प आवडले ;) - (वाइनने फाइन होणारा) सोकाजी
  • Log in or register to post comments
प
पियुशा Fri, 09/23/2011 - 12:54 नवीन
जबराट ! :)
  • Log in or register to post comments
स
सोत्रि Sat, 09/24/2011 - 07:39 नवीन
50 फक्त ह्यांचा तीव्र आणि त्रिवार निषेध! वायनरीला भेट देणार हे आधिच ठरले होते तरी ह्या ट्रीपबद्दल मला न कळवण्याबद्दल जाहीर निषेध! :( - (वाइन ऐवजी इनो घ्यावा लागलेला) सोकाजी
  • Log in or register to post comments
५
५० फक्त Sat, 09/24/2011 - 18:47 नवीन
ओ तिर वाईन निषेध कसला करताय, दपारचं जेवाया मिळालं नाही आणि जे पिणारे होते ते फार पिणार नाय म्हणाले, तेंवा डोक्यात आलं की उगा कुठंतरी इथं तिथं बसण्यापेक्षा इथं जावं, आधी तर शैक्ष्णिक सहल करणार होत्तो, वाईन बनवणेचा कार्खाना पाहणे पण ते बंद झालं होतं ते पाचाला बंद होत्तंय. पुन्हा कदी जायचं बोला, मस्तपैकी सकाळीच जाउ, जरा फिरा फिरी करुन तीनलाच येउन बसु इथं, हा फक्त न पिणारा डायवर पाहिजे नाय्तर रिक्षावाला, वाट बगणारा.
  • Log in or register to post comments
म
मी-सौरभ Mon, 09/26/2011 - 15:39 नवीन
तू आहेस की न पिणारा डायवर :)
  • Log in or register to post comments
आ
आत्मशून्य Sat, 09/24/2011 - 19:48 नवीन
असो, मला उधारीवर दूकानदाराने इनो देणे बंद केले आहे हीच काय ती या धाग्याची वैयक्तीक पातळीवर फलश्रूती म्हणता येइल.... (इनोसाठी इ.एम.आय. भरायला लागलेला) - आत्मशून्य
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 31 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 35 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 38 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा