Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
कलादालन

वारी - सज्जनगड

स
स्पा
Wed, 08/17/2011 - 07:43
बरेच दिवसांपासून सज्जनगड ला जायचे मनात होते, पण योग जुळून येत नव्हता,योगिराणाकागदावर उतरल्यापासून तर हि इच्छा प्रबळ झाली, आता काही झाले तरी जायचेच, एकट जाव लागल तरी बेहत्तर. अशाच एका संध्याकाळी सूड शी याबद्दल बोललो, त्यानेही चक्क एका फटक्यात येण्याची तयारी दाखवली, धाग्यावर किसानाही येतो असे म्हणाला होता, त्याला फोन केला, तो हि यायला तयार झाला, मग फटाफट बाकी मिपाकर ट्रेकरमित्रांना बोलावण धाडल, पण नेमके सगळे कुठल्या न कुठल्या कामात अडकलेले होते, शेवटी आम्ही तिघच निघालो. ठाण्याहून सातारा पर्यंत बस च आरक्षण केल्या गेल होतंच :) रात्री १२ ची बस होती, (नशीब युयुत्सुंची अशुभ पोर्णिमा १२ लाच संपत होती, म्हणजे नंतरचा प्रवास निर्धास्त होणार होता ;) ), ती यायला जवळ जवळ एक तास उशीर झाला. असो पण सकाळी सातार्याला ६ पर्यंत पोचलो. मस्त गारेगार वातावरण होत, नुकताच चिंब पाऊस पडून गेला होता. १) सज्जन गड ला जाणारी पहिली बस ७ ची होती. म्हणजे अजून बराच अवकाश होता, बाहेर आलो, मस्त गरम गरम चहा ढोसला. जरा तरतरी आली . २) मग बस ची वाट पाहू लागलो. बस चा पत्ताच नव्हता, शेवटी ७.३० ला पहिली बस आली, २० -२५ मीन सज्जनगडावर पोचलो, मधेच दिसणारा हा अजिंक्यतारा . वातावरण भन्नाट होत , ३) नागमोडी रस्ता ४) गडाकडे जाणारी वाट ५) ६) ७) ८) ९) गडावर पोचल्यावर सर्वात मोठी चिंता होती ती भक्त निवासात राहायला जागा मिळेल कि नाही, कारण एकतर शनिवार रविवार जोडून सुट्टी , आणि सोमवारी १५ ऑगस्ट ची सुट्टी. आमचा गडावर राहायचा बेत होता. पण नशिबाने आम्हाला मस्त रूम मिळाली १०) गॅलरीतून दिसणारं बाहेरच विहंगम दृश्य ११) बाहेरच दृश्य , फ्रेम मध्ये कैद केल्यासारखं वाटत होत १२) गडावरचे पिण्याच्या पाण्याचे तळे १३) जाऊन समान टाकल, अंघोळी उरकल्या आणि सर्वात आधी समर्थांच्या शेज घरात गेलो. तिथे अजूनही कल्याण स्वामींचे हंडे, समर्थांना शिवरायांनी दिलेला लाकडाचा मोठा पलंग, हनुमानाने हिमालयात समर्थांना दिलेली वस्त्र, समर्थांची गुप्ती, कुबडी आणि त्यात लपवलेली तलवार, इत्यादी सर्व गोष्टी व्यवस्थित जपलेल्या आहेत, ४०० वर्षांपूर्वीच्या त्या वस्तू पाहताना अंगावर काटा येतो :) तिथून बाहेर राम मंदिरात गेलो. गडावरील इतर इमारती . १४) १५) १६) राम मंदिर १७) त्याच त्या मूर्ती , खरतर पंचायतन अस नाव आहे, राम ,लक्ष्मण, सीता, मारुती आणि बहुतेक गरुड असावा. या मुर्त्या "आंधळ्या कारागिराने" घडवलेल्या होत्या. हे वाचून तर प्रचंड धक्का बसला. इतक्या सुरेख मुर्त्या मी क्वचितच पाहिलेल्या आहेत. तिथून परत प्रवेशद्वारावर आलो. भूक लागलेली होती. बाहेर ३.४ हाटेल आहेत, त्यातलाच एका हाटेलात मस्त मिसळीवर ताव मारला. परत एकदा चहा पिऊन गड भटकायला निघालो. १८) . अर्थात मी आधी जाऊन आल्याने वाटाड्या चा रोल माझाच होता :). १९) वेण्णा बाईंची समाधी २०) तिथून मागे एक पायवाट जाते, जी जास्त कोणाला माहित आहे असे वाटत नाही. तिथून आम्ही कड्यावर आलो. समोरच दृश्य बघून भानच हरपलं. भरून आलेल आभाळ, भन्नाट वारा, गवताळ पठार, समोर उरमोडीच प्रचंड पात्र, आभाळ आणि पाणी यातला फरकच कळत नव्हता , बराच वेळ तिथे बसलो, फोटो वेग्रे काढले. २१) २२) पेठेचा मारुती २३) २४) क.... क .... किसन.... :D २५) उरमोडी आणि काठावरची गाव २६) २७) २८) २९) उरमोडीवरच धरण ३०) सूड इन राजे पोज ३१) ३२) मागे फिरलो. गडावरच तळ बघितल, समोरची धर्मशाळा, तिथून पुढे अंगाई देवीच मंदिर ., या देवीची स्थापना समर्थांनी गडाच्या सुरक्षितते साठी केली होती. इथे बर्याच वेळा शिव समर्थ भेटीही होत असत. ३३) ३४) ३५) ३६) तिघांचा एकाच फोटोत यायचा प्रयत्न :) ३७) ३८) ३९) ४०) याचवेळी, अचानक धुक पसरायला लागला, आणि आसपासचा अवघा परिसर धुक्यात लपेटला गेला. मग आम्ही परत भक्त निवासात परतलो, तो पर्यंत जेवणाची वेळ झालेली होती. मस्त गरमागरम आमटी भात आणि भाजी आणि गावाची खीर . भूक सडकून लागलेली होती . जेवणाआधी वाढेपर्यंत नामस्मरण. तिकडचा इतका शिस्तीचा कारभार पाहून खूप बर वाटल. जेवून परत खोलीवर आलो. जरावेळ झोपलो. संध्याकाळी मागे धाब्याच्या मारुतीपाशी गेलो, ४१) ४२) ४३) ठोसेघर कडे जाणारा रस्ता ४४) ४५) धाब्याचा मारुती ४६) ४७) या पठारावर बर्यापैकी गर्दी होती, म्हणून इतकी मजा आली नाही. मग मी सूड आणि किसनला सांगितल कि रात्री याच पठारावर परत यायचं. अंधारात .... :) संध्याकाळी गडावर ६ ते ७ सामुदाईक उपासना असते. त्यात रामनाम, जोहार, इतर स्तोत्र , श्लोक, रामरक्षा, आणि मारुती स्तोत्र वेग्रे म्हटली जातात. आम्हीहि त्याला हजेरी लावली . तो १ तास खरच अविस्मरणीय होता, बाहेर पडणारा पाऊस , गारठवणारी थंडी. तिन्ही सांजेची वेळ , एकाच पट्टीत , खणखणीत आवाजात होणार स्तोत्रपठन . डोक एकदम शांत झाल :) बाहेर येई पर्यंत रात्रीच्या जेवणाची वेळ झाली. आता थंडी कायच्या काय वाढलेली होती, आणि आम्हाला जेवण उरकून पठारावर परत जायचं होत :) रात्री सुद्धा मस्त जेवलो, रूम वर आलो, थंडीचा जमेल तसा बंदोबस्त केला आणि आणि ब्याटर्या घेऊन परत निघालो, बाहेर दासबोध वाचन सुरु होत, बाहेर चालायला सुरुवात केली, आणि अंधारच साम्राज्य सुरु झाल.. कसे बसे वाट काढून चालत होतो. खाली काही गावातले लुकलुकणारे दिवे, बस या व्यतिरिक्त उजेड नव्हता... आणि जी शांतता होती, ती केवळ अविस्मरणीय! अपवाद बेडकांच्या ओरडण्याचा, आणि बेडूक तरी केवढे, लहान दगडा एवढे मोठे :) मग पावसाचा जोर कायच्या काय वाढला, आणि आम्ही परतीची वाट पकडली. रूम वर आल्यावर परत गप्पांना रंग चढला. सकाळी ५ ला उठलो. अंघोळी उरकून परत रामरायाच दर्शन घेतल आणि निघालो. पहिली बस ७.३० ची होती, पण ती गडावर आलीच नाही, खालच्या खाली निघून गेली, ४८) मग खाली फाट्यापर्यंत चालत आलो, थोड्यावेळाने तिकडे एक जीपड मिळाल, तिथून सातारा बस स्थानकापर्यंत आलो. तिथून स्वारगेट, स्वारगेट हून पनवेल, पनवेल हून डोंबिवली, आणि डोम्बिव्लीहून ठाकुर्ली, असा वाकडा तिकडा प्रवास करत संध्याकाळी ६ ला स्वारी घरी पोचली. मनात इच्छा असेल तर काहीही संकट येत नाही, हे परत जाणवले. सज्जनगडाची वारी फर्मास झाली .निसर्गाच्या कुशीत २ दिवस कसे गेले समजलंच नाही. असाच ट्रेक परत होईलच, तूर्तास रजा घेतो जय जय रघुवीर समर्थ

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 23191 views

💬 प्रतिसाद
म
मर्द मराठा Wed, 08/17/2011 - 18:40 नवीन
मस्त... भन्नाट ... अप्रतिम... दुसरे शब्दच नाहीत... छान सचित्र प्रवासानुभव आहेत... काही वर्षांपुर्वी केलेल्या सज्जनगड भटकंतीची आठवण करून दिलीत... धन्यवाद...
  • Log in or register to post comments
५
५० फक्त Wed, 08/17/2011 - 19:35 नवीन
मस्त रे जाम भारी जगलो तुमच्या बरोबर, अजुन काय सांगावे ? बाकी सज्जनगडावर, सोलापुरच्या सिद्धेश्वरला आणि जत जवळ यल्लमा देवीच्या देवळात मी फक्त जेवणासाठीच जातो, त्यामुळं तुमच्या या लेखातुन जरा धार्मिक माहिती मिळाली धन्यवाद. येताना उरमोडिच्या पुलाच्या खाली उतरला असता ना तर पाण्यात खेळायला जाम मजा आली असती तुम्हाला.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 08/17/2011 - 20:27 नवीन
फोटो आणी प्रवास वर्णन येक नंबर....फो.नं.-११...एखाद निसर्ग चित्र काढल्यासारखा वाटतो...आणी २५ व ४४ पाहून काइट ग्लायडींगची खुमखुमी येते....मस्त...:smile: अवांतरः- तिथे अजूनही कल्याण स्वामींचे हंडे, समर्थांना शिवरायांनी दिलेला लाकडाचा मोठा पलंग, हनुमानाने हिमालयात समर्थांना दिलेली वस्त्र, समर्थांची गुप्ती, कुबडी आणि त्यात लपवलेली तलवार, इत्यादी सर्व गोष्टी व्यवस्थित जपलेल्या आहेत, ४०० वर्षांपूर्वीच्या त्या वस्तू पाहताना अंगावर काटा येतो.....''''''यांचे फोटू काढू देत नाहीत काय?'''''' :wink:
  • Log in or register to post comments
प
प्राची Mon, 08/22/2011 - 06:34 नवीन
समाधी मंदिर आणि समर्थांच्या शेजघरात फोटो काढायला बंदी आहे.
  • Log in or register to post comments
स
सविता००१ गुरुवार, 08/18/2011 - 08:29 नवीन
केवळ मस्त फोटो आणि वर्णन.
  • Log in or register to post comments
स
स्पा गुरुवार, 08/18/2011 - 08:29 नवीन
'''''यांचे फोटू काढू देत नाहीत काय?'''''' खरतर फोटो काढू नयेत अश्या सूचना लावण्यात आल्या आहेत.. पण लक्ष ठेवायला माणूस नसतो.. आपण गुपचूप काढू शकतो, पण ते मनाला पटल नाही, म्हणून नाही काढले
  • Log in or register to post comments
स
सहज गुरुवार, 08/18/2011 - 08:44 नवीन
तीन तिघाडा काम बिघाडा हे मिथ बस्ट केल्या गेले आहे तर!! झकास!
  • Log in or register to post comments
म
मृत्युन्जय गुरुवार, 08/18/2011 - 08:52 नवीन
सज्जनगड नेहेमीच नतमस्तक करुन जातो रे देवा. तुमची सफरही उत्तम झाली म्हणायची. बाकी ११ वा फोटो मादक आहे रे.
  • Log in or register to post comments
द
दीप्स Sat, 08/20/2011 - 09:13 नवीन
अप्रतिम , तुझा हेवा वाटतो आहे . सज्जनगडला कधीपासून जायचे आहे पण अजूनही जमलेले नाहीये. आता तर काय फोटो पाहून खूप हुरूप आला आहे आता जाउनच येते विकांताल .
  • Log in or register to post comments
स
स्वानन्द Sat, 08/20/2011 - 11:17 नवीन
सगळे फोटो मस्त आले आहेत. ११ वा आणि ४० वा फोटो तर अप्रतीमच!!!
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Sun, 08/21/2011 - 07:00 नवीन
मस्त फोटो. मी फार फार पुर्वी भटकून आलेय इथे.
  • Log in or register to post comments
प
पैसा Sun, 08/21/2011 - 15:22 नवीन
स्पा, छान वर्णन आणि फोटो. खूप वर्षांपूर्वी सज्जनगडवर गेले होते, पण राहिले नव्हते. जरा अवेळी गेल्यामुळे प्रसाद संपला होता, पण दरवाजाजवळ एका घरी गरम पिठलं भाकरी मिळाली होती. शिवाय गडावर गुहा पाहिल्याचं आठवतं. आता पहायला मिळत नाही का?
  • Log in or register to post comments
क
केशवराव Sun, 08/21/2011 - 21:16 नवीन
गड्या , तोडलस ! २१ आणि २२ मस्त !
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Mon, 08/22/2011 - 01:23 नवीन
सुंदर रे स्पाउ!! हीच फौज घेउन पेठ चा किल्ला पहाता येतो का पहा, आत्त्ता या वेळी अतिशय सुंदर असत पेठ. वरील काही फोटो आवडले.
  • Log in or register to post comments
प
प्राची Mon, 08/22/2011 - 06:43 नवीन
सुंदर,अप्रतीम. एका महिन्यात दोनदा सज्जनगडाचे दर्शन घडवलेत,एकदा प्रत्यक्ष,आणि एकदा या लेखातून. सज्जनगडावरची गव्हाची खीर आणि त्यावर साजूक तूप..अहाहा..
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Fri, 11/25/2016 - 10:39 नवीन
सुरेख!
  • Log in or register to post comments
ज
जयन्त बा शिम्पि Fri, 11/25/2016 - 19:16 नवीन
माझा ,सौ.सह ,तेथे जाण्याचा विचार आहे, पण सज्जनगडावर रहाण्यासाठी ज्या खोल्या आहेत, त्यांचे आरक्षण करावे लागते काय? सर्वात गर्दी कमी कोणत्या महिन्यात असते ? तेथील व्यवस्थापकांचा भ्रमणध्वनी क्रमांक येथे देता येईल काय? मी बोरिवलीहुन थेट बोरिवली-सातारा बस ने जावू शकतो, पण सातारा येथून, सज्जन गडावर जाण्यासाठी बसेस किती वाजेपर्यन्त उपलब्ध असतात. सविस्तर माहिती येथे दिल्यास सर्वांचा फायदा होईल.
  • Log in or register to post comments
त
त्रिवेणी Sat, 12/24/2016 - 10:37 नवीन
दोघच जाणार असला तर लग्न झाल्याचे प्रुफ घेऊन जा. नाहितर प्रवेश नाही देत. तिथेच अजुन एक सोय केली आहे त्यांच्यातीलच एका ग्रुपने.तिथे काही प्रुफ लागत नाही पण त्यांचे बाथरुम,टाॅयलेट काॅमन आहे.
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Fri, 11/25/2016 - 20:27 नवीन
सुंदर लेख. फोटोही छान. वर्णन अप्रतिम.
  • Log in or register to post comments
स
सिरुसेरि Sat, 11/26/2016 - 04:39 नवीन
अप्रतिम प्रवास वर्णन व फोटो
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Sun, 12/25/2016 - 23:09 नवीन
भारीच यार तब्बल 5 वर्षांपूर्वीचा लेख वृत्तांत! तिघेही कसले लहान दिसत आहात !! ह्या लेखनाच्या निमित्ताने गडाच्या आठवणी जाग्या झाल्या , आता गडावर जायला कधी मिळणार आहे ते देव जाणे !! जय जय रघुवीर समर्थ अवांतर : काहीही म्हणा पण तब्बल 5 वर्षांपूर्वीचा लेख वाचूनही भारी वाटले , असे वाटले की आपणही आपल्या प्रत्येक ट्रिप चा वृत्तांत लिहून काढायला पाहिले , त्या निमित्ताने आठवणी ताज्या राहातील :)
  • Log in or register to post comments
ल
लाडू Tue, 12/27/2016 - 09:43 नवीन
इथे एक श्रीधर स्वामींचे कुटीर आहे. त्याचे फोटो आहेत का तुमच्याकडे ?
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Tue, 12/27/2016 - 17:43 नवीन
इथे एक श्रीधर स्वामींचे कुटीर आहे. त्याचे फोटो आहेत का तुमच्याकडे ?
प्रचि क्रं १५ मध्ये जी वास्तु दिसत आहे तीच श्रीधर कुटी आहे, तिथे आत मध्ये श्रीधर स्वामींची मुर्ती , एक सुंदर तसबीर आणि पादुका आहेत :) ( बाकी फोटो पहाताना लक्षात आले , प्रचि २० बहुतेक गंडला आहे , ती वेण्णास्वामींची समाधी नसावी बहुधा)
  • Log in or register to post comments
अ
अत्रन्गि पाउस Tue, 12/27/2016 - 12:04 नवीन
हा लेख आधी वाचायचा सुटला कसा हे काळात नाही ....पण असो ..
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Tue, 12/27/2016 - 12:17 नवीन
मस्तं रे स्पा!!
  • Log in or register to post comments
आ
आर्या१२३ Tue, 12/27/2016 - 12:32 नवीन
जय जय रघुवीर समर्थ! व्वाह....फार सुन्दर फोटो आणि वृत्तान्त! अगदी नॉस्टॅलजिक व्हायला झाल! ४ वर्षापुर्वी गेले होते.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 51 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 55 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 58 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा