Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
कलादालन

दामिनी

म
मराठे
Mon, 08/15/2011 - 01:30
कालच्या दिवसभर घरात खूपच गरम होत होतं. टिव्ही वरून संध्याकाळी थोडा पाउस असेल असं सांगत होते पण सात साडेसात पर्यंत आकाशात कसल्याही संशयास्पद हालचाली दिसेनात. घरात उकडत होतं म्हणून बाहेर ग्यालरीत येउन बसलो. थोडावेळ गेला नसेल तोच वारा सुरू झाला आणि बघता बघता आकाश भरून आलं. हा हा म्हणता विजांचा कडकडाट सूरू झाला आणि दणदणीत शॉवरबाथ घेतल्यासारखा पाऊस सुरू झाला. विजांचं तांडव बघताना दोन दोन मिनिटांच्या विडियो क्लिप्स रेकोर्ड केल्या आणि त्यातून विजांचे मस्त शॉटस मिळाले.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 4584 views

💬 प्रतिसाद
श
शिल्पा ब Mon, 08/15/2011 - 03:27 नवीन
छान आहेत.
  • Log in or register to post comments
ज
जाई. Tue, 08/16/2011 - 13:54 नवीन
+१
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Mon, 08/15/2011 - 05:56 नवीन
पाहिल्यावर 'कड कडाड कड्ड " असा साउंड इफेक्ट आपोआप आला साहेब!
  • Log in or register to post comments
च
चिंतामणी Mon, 08/15/2011 - 06:03 नवीन
श्रावणात असे दृश्य सहसा दिसत नाही. छान फोटो आहेत.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Mon, 08/15/2011 - 08:28 नवीन
झकास फोटू. बाकी विडियो क्लिप्स वरून तुम्ही शॉट घेतले आहेत पण जर स्टिल कॅमेर्‍यातून फोटो काढायचे असतील तर सेटींगबद्दल काही माहिती देउ शकाल का? अवांतरः शीर्षक वाचून अंमळ गैरसमज झाला होता व या सिनेमाबद्दल काही आहे असे वाटले होते. :) Image removed.
  • Log in or register to post comments
म
मराठे Mon, 08/15/2011 - 14:13 नवीन
वरिल सर्व फोटो/विडियो माझ्या फोनवरून काढले आहेत.. (आयत्या वेळी हाती लागेल अशा ठिकाणी क्यामेरा असेल तर शपथ) ;) त्यामुळे साध्या विडियो क्लिप काढल्या.. मग विडियो एडिटींग सॉफ्टवेअर मधून त्यातल्या फ्रेम्स फोटो म्हणून सेव्ह केल्या (लिनक्स वापरतो मी घरी, त्यावर अशी सॉफ्टवेअरं भरपूर आहेत.. मी पहिलं जे सापडलं तेच वापरलं.. नाव आठवत नाहीये. पाहिजे असल्यास घरी गेल्यावर बघून सांगतो.)
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र Mon, 08/15/2011 - 14:39 नवीन
शटर स्पीड हाय.. अपार्‍चर स्मॉल, आय एस ओ लो.. पण थोडे स्वतःच करुन पहायला लागेल..
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Mon, 08/15/2011 - 17:53 नवीन
"शटर स्पीड लो" अशी सुरुवात करावी असे वाटते. कॅमेरा हलू नये म्हणून तिपाईवर रोवावा.
  • Log in or register to post comments
अ
अन्या दातार Mon, 08/15/2011 - 19:19 नवीन
मी केलेल्या प्रयत्नांवरुन सांगतो १/५० वगैरे शटर स्पीड पुरतो. आयएसओ कमी ठेवा (१००) एक्स्पोजर (एफ स्टॉप) १०-११ पर्यंत ठेवा. तिपाई वापरायची गरज पडेल असे वाटत नाही. काही दिवसांतच फोटो इथे देईन :) अजुन एक दुसरा ओप्शन आहे ज्यात तिपाई गरजेची आहे. पण सध्या ते आठवत नाही :(
  • Log in or register to post comments
म
मनराव Wed, 08/17/2011 - 06:34 नवीन
+१
  • Log in or register to post comments
म
मर्द मराठा Tue, 08/16/2011 - 03:49 नवीन
अगदी तंतोतंत कोणालाच सांगता येणार नाही.. सर्व त्या त्या वेळच्या भौगोलीक वातावरणावरती अवलंबून आहे (प्रकाश, ढग वगैरे).. तरी ही खाली दिलेली कृती मदत करू शकेल.. तुमचा डीएसएलआर असेल तर ... आय एस ओ १००० च्या वर ठेवा... सुरुवातीला शटर प्रायोरीटी हा शूटिंग मोड करा.. कंटीन्युअस फ्रेमवर फिरवा (म्हणजे एकापेक्षा जास्त छायाचित्रे सलग घेतली जातील).. आणि शटर स्पीड १/१००० सेकंद ठेवा.. काही छायाचित्रे घेऊन पहा.. जे ठीक आले असतील त्यांचे फ आकडे पाहा.. शूटींग मोड 'मॅन्युअल' करा.. शटर स्पीड वरचाच कायम ठेवुन... वर नोंद केलेला फ आकडा सेट करा... अजून काही चित्रे घ्या... नंतर फ आकडा (F Stop) तुमच्या लेन्सचा कमीत कमी असेल तीतपर्यंत न्या.. तुमचा कॅमेरा जास्त आय एस ओ ला नॉईस दाखवत नसेल तर तो वाढवून (२००० ते ३००० पर्यंत) शटर स्पीड थोडा कमी केलात तरी चालेल... आणि हो हे सगळे तिपाई असेल तर मस्त जमते.. नाही तर कशावर तरी कॅमेरा ठेवायचा... पण बरीच सर्कस करावी लागते.. साध्या पॉइंट आणि शूट कॅमेर्‍याने काढताना... 'क्रिडा' हा शूटींग मोड ठेवा... ह्या मोड मधे कॅमेरा जास्त शटर स्पीडला एका पेक्षा जास्त फ्रेम्स घेतो.. त्यामुळे क्लिक केल्यावरही हात बराच स्थिर ठेवावा लागतो... हे कॅमेरे तितके चपळ नसल्याने... जिथे विजांचा चकचकाट होतोय.. तिथे कॅमेर्‍याची लेन्स करून क्लिक चे बटण अर्धे दाबून धरून ठेवावा... जेणे करून कॅमेरा फोकस होतो आणि एक्स्पोसर मीटर केले जाते... वी़ज पून्हा चमकली की पूर्ण कळ दाबा ..
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Tue, 08/16/2011 - 05:18 नवीन
धन्यवाद. वास्तविक पॉइंट आणि शूट कॅमेर्‍याने स्पोर्टस मोड वापरून बराच प्रयत्न केला होता, पण फोटो बरेच हलले होते. आता परत प्रयत्न करण्यासाठी येथे (पक्षी पुण्यात) विजा चमकण्यासाठी मे महिन्यापर्यंत वळवाच्या पावसाची वाट पाहावी लागणार. :(
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 08/16/2011 - 17:58 नवीन
वीजे इतक्याच चपळाइने काढलेले फोटो...छान,छान...मस्त मस्त...:
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 48 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    19 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    19 hours ago
  • सुंदर !!
    19 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    19 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा