Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
कलादालन

माझी नवीन चित्रे

च
चित्रगुप्त
Tue, 07/19/2011 - 11:52
माझी काही नवीन चित्रे: ही चित्रे माझ्या अनेक वर्षांच्या चित्रकलेतील खटाटोपींतून हळूहळू विकसित होत गेलेल्या स्वतःच्या शैलीतील आहेत. चित्र सुरु करताना ते कसे होणार आहे, म्हणजे बरे वाईट असे नव्हे, तर या चित्रात मी काय काय आणि कसे चित्रित करणार आहे, याची काहीही पूर्व कल्पना मला नसते. एक एक चित्र अनेक दिवस चालत रहाते... सुरुवतीला काही अनिश्चित असे रंग-आकार कॅनव्हास वर पसरवून ठेवतो, त्यातूनच कल्पनेला चालना मिळत जाऊन चित्र आकार घेत जाते. असे असले, तरी माझ्या अनेक चित्रात प्राचीन जागा, मंदिरे, राजवाडे, वडाच्या पारंब्या, मातीची घरे, ढग वगैरे असते... याचे कारण मी अनेक वर्षे अतिशय आवडीने अश्या अनेक जागांवर जाऊन, तिथे बसून चित्रे काढत आलो आहे... हल्लीची चित्रे मात्र अमूक अश्या विशिष्ट जागांची नसून माझ्या अनुभवातून आकार घेत जाणारी काल्पनिक चित्रे आहेत आणखी चित्रे खालील दुव्यावर बघता येतीलः http://www.flickr.com/photos/sharad_sovani/

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 7823 views

💬 प्रतिसाद
प
परिकथेतील राजकुमार Tue, 07/19/2011 - 12:02 नवीन
Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Wed, 07/20/2011 - 06:05 नवीन
चित्रगुप्तांना चित्र गुप्तरितीने सादर करण्याची सवय दिसते आहे असे वाटते. मागल्या चित्राच्या धाग्यातही असेच झाले होते. चित्रात बारकावे फारच छान चित्रीत केले आहेत. शैलीही छान आहे. मुर्त आहे.
  • Log in or register to post comments
अ
अमोल केळकर Tue, 07/19/2011 - 12:04 नवीन
गुप्त झालेली चित्रे दिसू लागली मस्त :) अमोल
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Tue, 07/19/2011 - 12:11 नवीन
झकास चित्रं काढता की द्येवा... लोकांच्या पाप-पुण्याच्या डेबिट क्रेडिट वेंट्र्या मारता मारता एव्हढा वेळ मिळतो तरी कुठून म्हणतो मी. ;)
  • Log in or register to post comments
म
मृत्युन्जय Tue, 07/19/2011 - 12:13 नवीन
सुंदर चित्रे आहेत. सालं आम्हाल हे असलं कधी जमलं नाही आणि जमायचं बी नाही.
  • Log in or register to post comments
प
पिंगू Tue, 07/19/2011 - 12:37 नवीन
हेहेहे चित्रकलेत नेहमीच दांड्या उडायच्या. पण इथे तर चित्रकारिता धो धो बरसते आहे. लगे रहो चित्रगुप्तजी.. - (अडाणी चित्रकार) पिंगू
  • Log in or register to post comments
ख
खादाड Tue, 07/19/2011 - 12:50 नवीन
खुप छान !!
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Tue, 07/19/2011 - 14:01 नवीन
अतिशय छान चित्र.. विषेश करुन दूसर्या चित्रातील गर्द रंग खुपच छान वाटत आहे.. आणि पहिल्या चित्रातील गणपती, बुरुजाशेजारी चालणारा एक परिवार हे चित्रकाराच्या मनाचे वेगळेच तरंग दाखवत आहेत.
  • Log in or register to post comments
ब
बहुगुणी Tue, 07/19/2011 - 16:59 नवीन
दोन्ही चित्रे आवडली. दक्षिण-पूर्व इटली मधल्या मटेरा या भागातील पुरातन घरांची आठवण झाली, राहवत नाही म्हणून इथे त्या स्थळाची चित्रे टाकतो आहे: Image removed.
  • Log in or register to post comments
N
Nile Tue, 07/19/2011 - 17:45 नवीन
असेच एक जॉर्डनचे. Image removed.
  • Log in or register to post comments
स
स्मिता. Tue, 07/19/2011 - 17:19 नवीन
दोन्ही चित्रे छानच! दुसरे जास्त आवडले. शांत रंग जास्त असल्याने डोळ्यांनाही एकप्रकारची शांतता मिळते.
  • Log in or register to post comments
य
यकु Tue, 07/19/2011 - 17:29 नवीन
खूप आवड्ली दोन्ही चित्रे! :)
  • Log in or register to post comments
स
स्वानन्द Tue, 07/19/2011 - 17:37 नवीन
मस्त!!
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Wed, 07/20/2011 - 00:03 नवीन
ही कोणती शैली म्हणायची? -रंगा
  • Log in or register to post comments
स
सहज Wed, 07/20/2011 - 03:12 नवीन
तुम्ही काढलेल्या दोन्ही चित्रांबद्दल कृपया अजुन माहीती द्यावी.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 07/20/2011 - 05:44 नवीन
पहिल्या चित्रातला गणपती बाप्पा लय आवडला... :) (कला प्रेमी)
  • Log in or register to post comments
र
राघव Wed, 07/20/2011 - 09:12 नवीन
खूप आवडले. पण चित्राच्या पार्श्वभूमीबद्दल थोडे लिहाल का? आम्हा सर्वांना मूळ संदर्भ नीट समजून घेण्यासाठी सोपे पडेल अन् चित्र बघतांनाचा आनंदही द्विगुणीत होईल. :) राघव
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Mon, 08/08/2011 - 23:21 नवीन
खालील लेखांमध्ये याबद्दल वाचा: http://misalpav.com/node/18741 http://misalpav.com/node/18587
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त गुरुवार, 07/21/2011 - 09:25 नवीन
चित्रांबद्दल थोडेसे लिहिले आहे, आणखी पुढे कधीतरी...
  • Log in or register to post comments
ग
गणपा गुरुवार, 07/21/2011 - 11:18 नवीन
छान आहेत. आवडली.
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते गुरुवार, 07/21/2011 - 10:33 नवीन
आवडली चित्रे.
  • Log in or register to post comments
स
सहज गुरुवार, 07/21/2011 - 11:28 नवीन
चित्रे छान आहेत. आता तुम्ही मोठे कलाकार आहात तर आम्ही काय बोलायचे. माध्यम, रंग, एक चित्र पूर्ण व्हायला किती वेळ लागतो. चित्राचे विषय कसे निवडता इ वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments
आ
आत्मशून्य गुरुवार, 07/21/2011 - 11:34 नवीन
सुरुवतीला काही अनिश्चित असे रंग-आकार कॅनव्हास वर पसरवून ठेवतो, त्यातूनच कल्पनेला चालना मिळत जाऊन चित्र आकार घेत जाते.
खरोखर छान. स्वप्न सत्यामधे उतरवणे फार कमी लोकांना साधते. चित्र पाहताना त्यामधे खरोखर हरवल्यासारखे वाटते
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 44 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 56 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    19 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    19 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा