पिवळा खडक राष्ट्रीय उद्यान (येलो स्टोन)
नमस्कार मंडळी,
बर्याच दिवसांपासून गाजत होते की पिवळा खडक राष्ट्रीय उद्यानात (येलो स्टोन) जायचे. अखेर संयुक्त राज्यांच्या स्वातंत्र्य दिवसाचा (४ जुलै ) चा मुहूर्त निघाला. आणि जवळ जवळ दीड महिना आधी आरक्षण करून (तंबू ठोकायला पण आरक्षण !!) निघालो. आता प्रवास वगैरे काही सांगत बसत नाही फक्त काही मित्राचा (अमोल बेदरकर) कॅमेरा वापरून काढलेले छायाचित्र (प्रकाशचित्र) टाकण्याचा प्रयत्न करतो. कॅमेरा आहे canon t3 रेबेल - २ लेन्स वापरल्या होत्या. एक मिळणारी आणि दुसरी लांबची.
सुरवात झाली बेअर टूथ खिंडीच्या रस्त्यांनी. आता अर्धा उन्हाळा (इकडचा) संपला तरी इकडे बर्फ.
मग कूक सिटी मधून ईशान्येच्या प्रवेशद्वारातून आत शिरलो .. थोडे पुढे जातो तर एके ठिकाणी बरेच लोक उभे दिसले .. थांबलो तर कळले, एक अस्वल होते पण आता निघून गेले. तरीही भरपूर बायसन (रेडे ??) पाहून पुढे निघालो.
त्यानंतर रस्त्यात पाटी दिसली sulphur cauldron अशी. मस्त उकळत्या गंधकाचा वास येत होता. शाळेतल्या प्रयोगशाळेची आठवण झाली.
शेवटी मुक्कामी येऊन कसा बस तंबू ठोकला
दुसर्या दिवशी निघून येलो स्टोन सरोवर पहिले.
मग पहिले old faithful geyser - गरम पाण्याचे कारंजेच जणू. बरोबर ९० मिनिटांनी ते उडते म्हणून त्याला फेथफुल म्हणतात. खरच त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते उडालेही.
असे बरेच गरम पाण्याचे झरे पहिले - वेस्ट थंब, ग्रांड प्रिझमाटिक
प्राणी ही भरपूर पहिले
आणि धबधबे .. बापरे .. !!
विकी वरचा येलो स्टोन चा दुवा देतो आहे. काय आता तीच माहिती मी इकडे कशाला टाकू ..
www.en.wikipedia.org/wiki/Yellowstone_National_Park
मिपा करांना आवडतील असे वाटते. नाही आवडले तरी पहिला प्रयत्न म्हणून गोड मानून घ्या.
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments