गोप्या घाटातून शिवथर घळीत !!!
गोप्या घाटातून शिवथर घळीत !!!
गावात मोजकीच खोपटं आहेत. सगळी मंडळी शेतावर कामाला गेलेली. शाळेला सुट्टी असल्यामुळे सगळी चिल्लीपिल्ली वाडीभर नाचत होती त्यांना ब्रेड आणि बिस्कीटं दिली आम्ही बांधून आणलेले भूकलाडू सोडले आणि त्यावर तुटून पडलो. शेतात काम करणार्या एकाने आरोळी मारून विचारलं... "कुनीकडं निघालांत रं पोरांहो ~ ??" त्याला घळईत चाललोय सांगताच तो म्हणाला, लवकर निघा नाहीतर अंधारल्यावर अवघड काम होऊन बसंल ... "त्याची बत्तीशी काही अगदीच खोटी ठरली नाही"
आम्ही साडेतीनला गोपे सोडलं आणि घाटाकडे निघालो. निघाल्या पासून एकदाही म्हणावा तसा पाऊस लागला नव्हता असा विचार मनात डोकावताच, पावसाची एक जोरदार सर चिंब भिजवून गेली. वातावरणात मस्त गारवा आला होता. परत वाट चुकलो, गोप्यातून पाहीलेल्या एका कातकर्याच्या झापापाशी आलो. तर तिथे घरात कुणी नाही !! कचरे नावाचा हा गोपालक त्याच्या जनावरांना चरायला घेऊन गेला होता. लांबवर एक इरलं घातलेली आकृती दिसली आणि मी आणि ऋषीकेश त्या दिशेने धावलो. आधीच खूप ऊशीर झाला होता त्यामूळे त्याला ठळक वाटेपर्यंत बरोबर घेतला. एकदाचं आम्ही घाटाच्या माथ्यावर येऊन ठेपलो.
डावीकडून देवेंद्र, प्रशांत, ऋषीकेश, राहूल आणि वसुधा
गोप्या घाटाच्या माथ्यावर मी :)
थोडे फार फोटो काढून घाट उतरायला सुरूवात केली. खाली कोकण फारच सुंदर दिसत होतं. घाटासमोरच्या डोंगरांवरून २-३ मोठ्ठे धबधबे आपल्या जीवाची पर्वा न करता त्या खोल दरीत कोसळत होते. ज्युरॅसिक पार्कच्या लॉस्ट वर्ल्ड मधे आल्यासारखे वाटत होते.
अजून लांबचा पल्ला गाठायचा होता. थोडे फोटो काढून तिथून काढता पाय घेतला. वाटेत एका ठिकाणी उजवीकडून कर्नावडीतून येणारी वाट येऊन मिळते.
सरळ खालची वाट पकडून एका छोट्या वाडीवर आलो. तिथून पाणपिशव्या भरून घेतल्या आणि कसबे शिवथरची वाट धरली. गावात आल्यावर एका मावशीला चहा कुठे मिळेल म्हणुन विचारले तर, "कशाला कुठं जाता मीच टाकते चहा बसा पडवीवर... " असे म्हणून ती माऊली घरात अंतर्धान पावली. चहा पिता पिता गप्पा रंगल्या आणि गावातली ३-४ म्हातारी माणसं जमली. "कश्यापाई हिंडता अशा डोंगररर्यांतून भ्या नाही का वाटत ??" या त्यांच्या भाबड्या प्रश्नाला काय उत्तर द्यावं हा प्रश्न मला पडला !! वसुधा आमच्या सोबत गोप्या उतरून आली याच त्या म्हातार्यांना फार कौतूक वाटलं.पावणेआठ झाले होते. अंधार पडलाच ...वाटेत झाडोर्यामधे काजव्यांची सभा भरली होती. मग आम्ही कुंभे शिवथर, अंबेशिवथर करीत अंधारातच शिवथर घळीत पोहोचलो तेव्हा ८.३० झाले होते. प्रशांत आणि देवेंद्रने घरी परत यायचा निर्णय मोडीत काढला होता. सगळेच दमले होते. साडे आठ तास चालून पायात गोळे आले होते. वर मठात जाताच आम्हाला गर गरम भात आमटी, भाजी पोळी, जिलेबी आणि ताक असे प्रसादाचे जेवण मिळाले. आणखी काय हवे !! गरमा गरम जेवून आम्ही वरच्या हॉलमधे निद्रधीन झालो. पावणेपाच चा गजर लावला होता. सकाळी पाचला काकडआरती होती. तोंड धुवून खाली आलो. पहाटे पहाटे घळी मधे फार प्रसन्न वातावरण होते. ६.३० ला आरती संपल्यावर चहा घेतला आणि घळीवरून पडणार्या धबधब्याकडे गेलो तिथे यथेच्छ क्लिकक्लिकाट करून न्याहारीला बसलो.
वरंधाघाटात जाऊन भजी न खाणं म्हणजे काशीला जाऊन दर्शन न घेता परत येण्यासारखे आहे. हे असले पातक न करता आम्ही यथेच्छ भजी हादडून घेतली. तेव्हड्यात त्या भजीवाल्या कडून एका इंडीकावाल्याची माहीती मिळाली. तो इंडीकावाला एकटाच होता. आणि आम्ही चार. गाडी १ और आदमी पांच !! झालं तर मग, त्याने आम्हाला थेट सिंहगडरोडलाच आणून सोडले. दोन दिवस मोबाईल गाडी आणि शहरी जीवनापासून लांब राहून पुढचा आठवडा जगण्यासाठी ताजेपणा भरून घेतला आणि पुण्यात परतलो. येताना मन पुढल्या आठवड्याचा ट्रेक ठरवण्यात गुंतले होते हे वेगळे सांगायला नकोच !!!
गोप्या घाटाच्या माथ्यावर
यंदाच्या पावसाळ्यातल्या पहिल्या मोठ्या ट्रेकची आखणी झाली. नेहमीचेच लोकप्रसिध्द किल्ले फाट्यावर मारून सह्याद्रीतल्या थोड्या अनगड वाटांवर उंडारायचं अशी खुणगाठ मनाशी आधीच बांधली होती. मढ्या आणि उपांढ्या घाटातून समर्थांच्या शिवथर घळीत बर्याचदा उतरलो होतो त्यामुळे यावेळेस गोप्याघाटाशी सलगी करण्याचा निर्णय घेतला. गोप्या घाटात येऊन बरीच वर्षे लोटली होती. त्यामुळे हा ट्रेक मला खूप दिवसांपासून खुणावत होता. सुरुवातीला ८-१० जणांनी येण्याची इच्छा दर्शविली पण आदल्या दिवशी रात्री मी, राहूल, वसुधा आणि ऋषीकेश इतकीच टाळकी शिलकीत होती. रात्री सहज म्हणून ऑनलाईन आलो आणि प्रशांतला एका दिवसात परत येऊ शकतोस शिवथर घळीतून ! असे आमिष दाखवले आणि प्रशांत आणि त्याचा मित्र देवेंद्र गळाला लागले. त्यांना याची कल्पना नव्हती की शनिवारच्या रात्री हेच दोघे परत यायचा त्यांचा निर्णय रद्दबातल करणार होते. ऋषीकेश तळेगावला रहात असल्याने तो शुक्रवारी रात्रीला माझ्या घरी मुक्कामास होता. शनिवारी सकाळी सातच्या सुमारास आम्ही सगळे स्वारगेटच्या एस्.टी. स्टँडवर गोळा झालो. ८.०० वाजता ची स्वारगेट - वेल्हा पकडून आम्ही पुणं सोडलं. त्या एस.टी. मधे बसल्यापासून का कुणास ठावूक पण मला एक सारखी पु.लं. च्या म्हैस मधल्या एस.टी. ची आठवण होत होती. मग मीही शेजारी बसलेल्या ऋषीकेशचा खांदा हा एस्.टी. महामंडळाने आपल्याला आंदण दिलेली उशी आहे, अशी समजूत करून घेतली. मार्गासनी फाट्यावर एस.टी. ला करकचून ब्रेक लागला आणि मी, माझी तात्पुरती उशी, आणि एस्.टी. मधला समस्त ऐवज एकदम पुढे फेकलो गेलो. माझी झोपमोड झाली आणि त्या ग्लानी मधेच तत्क्षणी मी म्हैस मधलं एक पात्र असून आता धर्मा मांडवकर येऊन एस्.टी.च्या डायव्हरला धरणार असे वाटले. पण सुदैवाने तसे काही झाले नाही. एका वडाप वाल्याने त्याची जीप अंगावर घातल्यामुळे हा ब्रेक लागला होता, हे मला खिडकीतून बाहेर पाहील्यावर कळाले. गाडी १०.०० ला वेल्ह्याला पोहोचली. ट्रेकची सुरुवात वडापाव हादडून केल्याशिवाय राहवत नाही त्यामूळे सगळ्यांनी दोन दोन वडापाव चोपून बाजारपेठेकडे कूच केले. कुंबळे ला जाणारी एस्.टी. संध्याकाळी ५.०० ला होती. म्हणून तिथल्या एका पिकअप वाल्याशी भाड्यावरुन घासाघिस सुरु झाली. तिथे थांबलेल्या एका म्हातार्याकडून कळले की कुंबळ्यातून गोप्या गावाकडे जाण्यासाठी उथळ जागेवरून नदी पार करावी लागेल त्या पेक्षा निगडे गावातून साकव (झाडांपासून बनवलेला पूल) पार करून पायवाटेने गोप्या गाठता येईल. मग ६०० रुपयात निगडे गावात सोडण्याच्या बोलीवर तो पिकअपवाला तयार झाला. जनता पिकअपमधे चढून बसली, वेल्हे - निगडे रस्ता फारच खराब आहे. पिकअपमधे खाली बसलो होतो त्यामुळे आमची बुडं जवळ जवळ चेपली होती. १२.०० वाजता निगड्यात उतरलो आणि गावतून साकवाची वाट धरली.
निगडे गावातून निघताना
पहिलंच वळण चुकलं आणि आम्ही जवळच्याच शेतात काम करणार्या गावकर्यांना शरणं गेलो. मला ग्रामीण बोलीभाषेत बोलायला प्रचंड आवडतं, मी पुढे सरसावून विचारलं, दाद्या, साकवं कुण्या अंगाला राहीला रं ?? तिकून अपेक्षित प्रतिप्रश्न, कुनीकडून आलासां ?? आम्ही पुण्याहून... "साकवांची वाट त्या तिकडं मागल्या अंगाला राहीली बगा ..." मग आपणहूनच तो दादा आम्हाला वाट दावायला आला. त्याच्याशी गप्पा मारत साकवाकडे निघालो. "यंदा पानी कमी झालंय नायं ...??", "ह्या टायमाला जरा कमीच हाय जोर.... ", "मंग काय काय लावलं हाय यंदाच्या मौसमाला ??", "आता बघा ह्यो खालच्या अंगाला भात टाकलाय, तिगडं वर पानी जरा कमी असतंया, तिगडं नाचणी !! आणि तुम्ही आलासां तिगडं तिळ लावला आहे." मग मी त्याला साकवाबद्दल विचारलं. तसा तो म्हणाला सरकारी कामं आमच्या पतूर पोहोचीत न्हाईत, म्हणून समद्या ग्रामस्थांनी मिळून नदीवर साकव घातला आहे. तो साकव पाहिल्यावर मी थक्क झालो.
नदीवरचा साकव
साकव पार करताना राहूल
त्या दादाचे आभार मानून एका वेळेस एकएकाने साकव पार केला आणि गोप्याच्या वाटेला लागलो. वाटेत ठिकठिकाणी भाताची शेतं विलक्षण हिरवाळली होती. मधे एक-दोन ठिकाणी वाट चुकलो. पण थोडा आजूबाजूला जाऊन अंदाज घेताच पुन्हा मुळपदावर आलो.
कामं सुरू झाली आहेत.
वार्यावर तरारणारी भाताची रोपं
एका धनगरपाड्यात शिरताच कुत्र्यांनी एकच हलकल्लोळ माजविला. त्यांच्यासाठी आमच्या रंगीबिरंगी वेषभूषा नवख्या होत्या. मग त्यांना पारले-जी चा नैवेद्य दाखवून एका मावशीला वाट विचारली. एका खोपटाच्या बाहेर एक सुतारदादा लाकडाचे औत बनवित बसला होता. त्याच्याशी चार शबूद बोलून आम्ही म्होरं चालते झालो.
धनगरपाडा
औताचं काम चालू आहे
तीन वाजता एकदाचे ते गोप्या गाव आलं आणि "आपल्या पोटात एक भांड असतं, त्यात जीव नावाची गोष्ट पडली की हायसं वाटतं...." असं काहीसंस झालं. गावाच्या थोडं अलिकडेच भाताच्या शेतात बाया बापे मिळून लावणी साठी भाताचे गठ्ठे बांधीत होते. त्यांचे थोडे फोटो काढले. काम करताना ते सगळे त्यांच एक लोकगीत म्हणत होते. त्यांचे ते गाणं मी मोबाईल मधे रेकॉर्ड करून घेतलं.
भाताचे भारे बांधणं सुरू आहे
भाताचे भारे बांधणं सुरू आहे
भाताचे भारे बांधणं सुरू आहे
आम्ही ठाकरं ठाकरं ....या रानाची पाखरं ...
भाताचे भारे बांधणं सुरू आहे
हिरवीगार भाताची रोपं
हिरवीगार भाताची रोपं
एक चिमूरडी डोक्यावर इरलं घेऊन बांधावर बसली होती. तिच्या चेहर्यावरच्या निरसागसतेने थेट काळजालाच हात घातला. तिच्या हातात वसूधाने एक बिस्कीटचा पुडा दिला आणि आम्ही एका बंद घराच्या पडवीत पडलो.
घाटाच्या माथ्याकडे जाताना

ज्युरॅसिक पार्कची अनुभूती
शिवथर घळीतला प्रसिध्द जलप्रपात
|| जय जय रघुवीर समर्थ ||
|| जय जय रघुवीर समर्थ ||
प्रशांत आणि देवेंद्र सव्वासातच्या एस्.टी. ने पुण्याकडे निघाले. आम्ही मात्र वरंधात थांबणार होतो त्यामुळे थोडे निवांत होतो. न्याहारी उरकून दहा वाजता आम्ही घळ सोडली. बारसगाव फाट्यापर्यंत एस्.टी. आणि तिथून जीप पकडून वरंध्यात आलो. घाटातून दिसणारा नजारा मोठा विलोभनिय होता. फोटो काढून भजीच्या टपर्यांकडे मोर्चा वळविला.
💬 प्रतिसाद
स
स्वानन्द
Mon, 07/11/2011 - 15:13
नवीन
अफ्फलातून... पहिलाच फोटो काय जबर्या आहे!! वर्णन पण अगदी खुमासदार!!!
- Log in or register to post comments
स
सूड
Mon, 07/11/2011 - 15:19
नवीन
मस्तच !!
- Log in or register to post comments
श
श्रावण मोडक
Mon, 07/11/2011 - 15:21
नवीन
अरे ए, उलथ की तुला कुठं उलथायचं आहे तिथं. दर आठवड्याला का, रोज जा की तिकडं...
एक तर उलथतो, फोटो काढतो, मग लिहितो आणि ते सारं इथं टाकून डोक्याची मंडई करतो. ;)
- Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा
Mon, 07/11/2011 - 15:25
नवीन
=)) =)) =))
अगदी अगदी!
त्याचं कसं झालंय अन काय आहे ना...
जाव द्या! वरची सुध्याची स्वाक्षरी पुरेशी बोलकी आहे. ;)
- Log in or register to post comments
प
प्रभो
Mon, 07/11/2011 - 15:23
नवीन
मस्त फोटो!!
- Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा
Mon, 07/11/2011 - 15:23
नवीन
वाटलंच होतं हे इच्चिविद्रं असे भसाभसा फोटो टाकून जळवणार म्हणून. अरे, नाय आलो ह्यावेळी तुमच्याबरोबर..म्हणून असं करावं का? आँ?
आम्हीपण गेलो होतो कुंडलिका रिव्हर राफ्टिंगला...त्याचे फोटो नै टाकत पळ्ळ....
:D
साला, माझं गणित अंमळ चुकलंच वाटतं. ते राफ्टिंगच्या नादी लागायच्या ऐवजी तुझ्यासोबत आलो असतो तर जास्त मजा आली असती की राव. :)
असो. नेहमीचेच 'लय भारी' , 'सुरेख फोटो', वगैरे वगैरे कौतुकं करुन तुला उगं हरबर्याच्या झाडावर चढवण्यात येणार नाहीए... फक्त सुमडीमध्ये माझी जळजळ झालेली आहे हे गपचूप मान्य करून टाकलेलं आहे. ;)
- Log in or register to post comments
आ
आंबोळी
Fri, 07/15/2011 - 17:53
नवीन
सुमडीमध्ये माझी जळजळ झालेली आहे हे गपचूप मान्य करून टाकलेलं आहे.
भटक्या,
हा लेख वाचून आणि फोटू पाहुन एकाच वेळी तुला कडकडून मिठी मारावी असे पण वाटतय आणि त्याच बरोबर तुला यथेच्छ (आणि अर्वाच्य) शिव्या हासडाव्यात असे पण वाटतय......
भावना तुझ्या तू समजून घे...
धन्यवाद
- Log in or register to post comments
प
प्रियाली
Mon, 07/11/2011 - 15:24
नवीन
सर्वच चित्रे लोभस. सोबत वर्णनाने वेगळीच खुमारी आवडली.
हिरवीगार भातशेती, इरल्यातली चिमुरडी, आईला चिकटलेलं बाळ (माकडीणीचं असलं तरी आई-बाळातलं अतूट नातं तेच), धुक्यात विरघळणारे कडेकपारी सर्वच लोभस.
- Log in or register to post comments
श
शाहिर
Mon, 07/11/2011 - 16:13
नवीन
महान आहात हो तुम्ही ....
कुठून शोधता सर्व ??
डोळ्यांचे पारणे फेडले !!
- Log in or register to post comments
ग
गणेशा
Mon, 07/11/2011 - 18:08
नवीन
अप्रतिम .. निव्वळ अप्रतिम ...
काय काय पुन्हा वाचु आणि कुठले कुठले फोटो पुन्हा पुन्हा पाहु असे झाले आहे.
ती निरागस मुलगी तर खुपच गोड आहे.
अप्रतिम
- Log in or register to post comments
क
कवितानागेश
Mon, 07/11/2011 - 19:08
नवीन
आता मला रडू येइल! :(
- Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा
Tue, 07/12/2011 - 08:59
नवीन
>>आता मला रडू येइल!
रडायचं कशाला ते? छान गोग्गोड हशायचं...ते झाड बघ..झाऽऽड...फोटोतलं आहे ते..खरं खरं नै कै...हाश बघु आता...
>>आजचा सुविचारः चुकीच्या टैमाला चुकीची घाई करु ने मान्सानं!
=)) =)) =)) =))
इतका आचरटपणा बरा नव्हे हं. त्या मिक्याला वाईट वाटेल ना. ;)
- Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते
Tue, 07/12/2011 - 09:50
नवीन
हे मात्र धम्याला लै पटंल! काय रं धम्या? व्हय की नाही? ;)
- Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा
Tue, 07/12/2011 - 09:59
नवीन
त्यो ड्वायलॉक माझाच है! आन्भवातून आल्याला. ;)
माऊनं त्या ड्वायल्वॉकला परशिद्दी दिल्याली है यवडंच.
- Log in or register to post comments
श
श्रावण मोडक
Tue, 07/12/2011 - 10:14
नवीन
जाणकारांनी खुलासा करावा... ;)
- Log in or register to post comments
ज
जातीवंत भटका
Tue, 07/12/2011 - 10:34
नवीन
जरा काहीतरी कळेल असे बोला रे !!
नाहीतर व्यनि करा ;)
- Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा
Tue, 07/12/2011 - 11:02
नवीन
तुर्त तुला काही कळायची गरज नाही. आणि जेव्हा कळेल तेव्हा काऽही उपयोग असणार नाही. ;)
ठेविले अनंते रहावे तैसेचि...चित्त्ती असु द्यावे समाधाऽऽन!!!!
जातीवंत हलकट.
- Log in or register to post comments
श
श्रावण मोडक
Tue, 07/12/2011 - 11:07
नवीन
मी आहे अजून. ;)
- Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा
Tue, 07/12/2011 - 11:31
नवीन
आचार्य,
आलात का? क्षमा करा हं, चुकून बसलो तुमच्या खुर्चीत. आता ह्याचं प्रायश्चित्त घ्यायलाच हवं.
-धम्याभैय्या देवासकर. ;)
- Log in or register to post comments
प
प्राजु
Mon, 07/11/2011 - 20:14
नवीन
अशक्य.. केवळ अशक्य आहेत सगळे फोटो.
- Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते
Mon, 07/11/2011 - 20:45
नवीन
का?
- Log in or register to post comments
छ
छोटा डॉन
Tue, 07/12/2011 - 06:48
नवीन
तेच ना !
- छोटा डॉन
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Mon, 07/11/2011 - 21:08
नवीन
आधी तो पुल,नंतर ती गोंदश गोंदश लहान मुग्गी,मग भात शेती,मग तो रान रस्ता,नंतर जुरासीक पार्क्चं लॉस्ट वर्ल्ड,पुढे शिवथरघळ,आणी शेवटी वरंध्याचा बोनस...आणी जोडीला हे अदभुत प्रवास वर्णन...तो फिर क्या केहेने?....ही सगळी वारी आपण केलीत आणी आंम्हालाही घडवलीत,,,मनःपूर्वक धन्यवाद...
- Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर
Mon, 07/11/2011 - 21:22
नवीन
काय तो लॉस्ट वर्ल्डवाला फोटो रे.. अहाहा
अवांतर : हे असे फोटो पहायचे आणि आपणच जाऊन आलो असं समजून ग प पडायचं...
- Log in or register to post comments
ए
एक तारा
Tue, 07/12/2011 - 10:58
नवीन
अगदी खरं
- Log in or register to post comments
क
कुंदन
Mon, 07/11/2011 - 21:26
नवीन
अप्रतिम...
- Log in or register to post comments
म
मेघवेडा
Mon, 07/11/2011 - 21:42
नवीन
बाबारे भटक्या, कसले विलक्षण फोटो आहेत! का जीव घेतो एकेकाचे? पाऽऽपं!!
थक्क होऊन बघत राहिलो राव पाच मिनिटं! अफाट!! 'द लॉस्ट वर्ल्ड' वाला फोटू तर जीवघेणाच!
- Log in or register to post comments
च
चतुरंग
Tue, 07/12/2011 - 05:03
नवीन
खरोखर उच्च! __/\__
शिवथर मला कायमच आवडत आलंय. वरंध्याचे फोटू बघून दे दण्ण पावसात केलेला ट्रेक आठवला.
शिवथरचा तो धबधबा बघताक्षणीच मला समर्थांच्या ओळी आठवतात -
गीरीचे मस्तकी गंगा ।
तेथुनि चालिली बळे ।
धबाबा लोटती धारा ।
धबाबा तोय आदळे ॥
-रंगा
- Log in or register to post comments
स
स्पा
Tue, 07/12/2011 - 05:12
नवीन
फोटो पाहून खपल्या गेलो आहे :D
अहाहा .. निसर्गाची किमयाच न्यारी
जा भ काका , आम्हाला बोलवा पुढच्या वेळेस ;)
अवांतर: सर्व फोटोत contrast खूप जास्त वाटतोय, फोटो शॉप मध्ये वाढवलाय का ?
- Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश
Tue, 07/12/2011 - 05:30
नवीन
शिवथरघळ आणि परिसर याला 'सहस्त्रधारा' सोडून अजुन दुसरा शब्द सापडलेला नाही!. केवळ सुंदर परिसर, वस्ती, प्रवास आणि चित्रांकीत-प्रवासवर्णनही!
येऊ द्यात अजून
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Tue, 07/12/2011 - 05:34
नवीन
मस्त रे भटक्या. यावेळी तरी तुझ्याबरोबर तिकडे यायला जमले नाही पुढच्या वेळी नक्कीच येईन. फार पूर्वी उपांड्याच्या वाटेने शिवथरघळीत उतरलो होतो त्याची आठवण झाली.
- Log in or register to post comments
फ
फारएन्ड
Tue, 07/12/2011 - 06:33
नवीन
वर्णन पुन्हा वाचणारच, पण ही आधी फोटोज ना दाद! जबरदस्त फोटो आहेत. एकदम आवडले!
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Tue, 07/12/2011 - 07:08
नवीन
काय कटकट आहे राव..........
एक तर स्वतः ऐश करायची, भटकून यायचं, वाफाळती भजी खायची, इकडे फटु टाकायचे आणि ते पण एवढे ढासु की दिसले नाहीत तर रिफ्रेश करत करत एक एक बघत बसायचे. ४- ४ वेळा रिफ्रेश करावं लागलं मला सगळे फटु बघता यावेत म्हणून ...
बट वर्थ इट.
मस्त रे भाऊ.
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Tue, 07/12/2011 - 07:09
नवीन
काय कटकट आहे राव..........
एक तर स्वतः ऐश करायची, भटकून यायचं, वाफाळती भजी खायची, इकडे फटु टाकायचे आणि ते पण एवढे ढासु की दिसले नाहीत तर रिफ्रेश करत करत एक एक बघत बसायचे. ४- ४ वेळा रिफ्रेश करावं लागलं मला सगळे फटु बघता यावेत म्हणून ...
बट वर्थ इट.
मस्त रे भाऊ.
- Log in or register to post comments
प
प्रास
Tue, 07/12/2011 - 09:22
नवीन
आपल्याला साष्टांग नमन आहे.
तुमच्या या भटकंतीचे वर्णन आणि फोटो झक्कास म्हणजे एकदमच झक्कास आहेत.
ही शिंची जगण्यामागची फाल्तू झकाझकी संपेल ना तेव्हा आम्हीपण अशीच भटकंती करणार.....
आणि त्याचे फोटू इथे टाकून सर्वांची जळवणार..... ;-)
सध्या संपूर्ण खाक झालेला, :-)
- Log in or register to post comments
व
विसुनाना
Tue, 07/12/2011 - 09:26
नवीन
फोटो पाहून आणि वर्णन वाचून भान विसरलो.
-असेच विचारतो.;)
- Log in or register to post comments
ग
गवि
Tue, 07/12/2011 - 10:05
नवीन
अद्भुत अनुभव आणि सुंदर चित्रण. धबधब्यांचे फोटो तर स्वर्गीयच.
मस्त भटकलात पावसाळ्यात..
मजा आहे बुवा तुमची.. :)
- Log in or register to post comments
ग
गवि
Tue, 07/12/2011 - 10:06
नवीन
प्रकाटाआ
- Log in or register to post comments
म
मालोजीराव
Tue, 07/12/2011 - 11:05
नवीन
अहाहा भटकेराव दिल खुश झाला बगा....लई ऐतिहासिक जागी गेल्ता बगा तुमी....हिरडस मावळच दि एंड आन जावळीची सुरुवात, त्या घळीच्या वरल्या अंगाला चंद्रराव मोऱ्यांच्या वाड्याच अवशेष हायेत...नेक्ष्ट टाइम नक्की बगा आन आमालाबी फोटू दावा !
- Log in or register to post comments
स
स्मिता.
Tue, 07/12/2011 - 11:36
नवीन
खूपच सुंदर फोटो! आधीच सर्वांनी एवढी तारीफ केलीये की मी आणखी काय बोलणार?
फोटोचे ऑब्जेक्ट तर सुंदर आहेतच पण तुमचं फोटोग्रफी स्किल पण लई भारी. हिरवा रंग असा की फोटोत पाहूनही डोळे शांत झाले :)
- Log in or register to post comments
न
नि३सोलपुरकर
Tue, 07/12/2011 - 13:05
नवीन
मित्रा खूप सुंदर फोटो आणि छान वर्णन.
पुढील भटकंतीस हार्दीक शुभेच्या...
नि३
(पुढील भटकंतीच्या आवतानाची वाट पाहणारा)
- Log in or register to post comments
N
Nile
Tue, 07/12/2011 - 14:43
नवीन
आठवड्याच्या हिशेबानं ट्रेकचे बेत आखणारे म्हणजे नशिबवान दिसता!
- Log in or register to post comments
च
चित्रा
Tue, 07/12/2011 - 15:29
नवीन
सुंदर फोटो.
- Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश
Wed, 07/13/2011 - 07:34
नवीन
खल्लास फोटो आहेत, आत्ताच्या आत्ता सॅक पाठीवर टाकून पावसात, दर्याडोंगरात भटकायला जावेसे वाटायला लागले आहे..
स्वाती
- Log in or register to post comments
क
कोकणप्रेमी
Wed, 07/13/2011 - 09:35
नवीन
खुप सुंदर फोटो आणि छान वर्णन. पुढील भटकंतीस हार्दीक शुभेच्चा.......
- Log in or register to post comments
म
मनराव
Wed, 07/13/2011 - 09:58
नवीन
मस्तच रे...........
त्या चिमुरडीचे फोटो विशेष आवडले......... :)
- Log in or register to post comments
म
मृत्युन्जय
Wed, 07/13/2011 - 11:15
नवीन
अशक्य फोटो, वर्णन आणि ट्रेक. क्यामेरा कुठला व्हाता?
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Wed, 07/13/2011 - 19:50
नवीन
नो फर्दर कमेण्ट्स.
अर्धवटराव
- Log in or register to post comments
र
रमेश आठवले
गुरुवार, 07/14/2011 - 14:56
नवीन
निसर्गाचे असे फोटो पाहून डोळे निवतात.
- Log in or register to post comments
व
विलासराव
गुरुवार, 07/14/2011 - 17:30
नवीन
आनी जिप्सीने हा ट्रेक केला होता.
राजगड ते कुंभे शिवथर. तेथुन सरळ मुंबई गाठली.
शिवथर घळ पहायची राहीली ती राहीलीच.
आमचे काही फोटो:
https://picasaweb.google.com/vilasshinde69/RAJGADTOKUMBHESHIVTHARTREK
- Log in or register to post comments
- 1
- 2
- ›
- »