निसर्गरम्य ताम्हीणी
निसर्गरम्य ताम्हीणी
रविवारी ताम्हीणीला जायचे नक्की झाले आणि पावसाळ्यातल्या पहिल्या वहिल्या भटकंती साठी आम्ही सकाळी ७.०० ला पुणं सोडलं. आयत्या वेळेस कोणीतरी गळणं !!! या नेहमीच्या रुढीला छेद न देता सतिश, प्रिया आणि प्रशांतने टांग मारली होती. ते लोक कशी न पटणारी कारणं देत होते या एका विषयावर बोलताना आम्ही प्राजक्ताने आणलेल्या संतोष बेकरीच्या पॅटीसचा फडशा पाडला. जाताना ठरल्या ठिकाणी चहा झाला. वाटेत पु.ल.कथाकथन, संदीप खरे या फर्माईशी पु-या करण्याची जबाबदारी माझ्याकडे होती. आमच्या कंपू मधे नव्याने आलेली आणि इतक्या वेळ गप्प असलेली सोनाली, संदीपची गाणी गुणगुणत होती. जाताना चार दोन ठिकाणी थांबून करवंदे तोडणे, मुळशी धरण न्याहाळणे, (लघू) शंकाचे निरसन इ. इ, कार्यक्रम उरकून गाडी अखेरीस ताम्हीणीला पार्क झाली. ताम्हीणी गाव मुळशी धरणाच्या फुगवट्याच्या अगदी शेवटच्या टोकाला आहे.
अत्यंत निसर्गरम्य असलेल्या या गावाच्या तीन बाजूंस डोंगररांगा आणि एका बाजूस धरणाचं पाणी आहे. गावात विंझाई देवीचे मोठे मंदीर आहे. मंदीराबाहेरील काही वीरगळ आणि सती-शिळा पाहून त्या श्रीशिवाजी महाराजांच्या थोड्या आधीच्या काळातल्या वाटतात. देवीचे दर्शन घेऊन आम्ही मोर्चा देवराईकडे वळवला.
वीज पडून जळालेला बांबू
पायवाटेवर मधेच एका वाळलेल्या बांबूच्या बेटावर वीज पडून गेल्यावर उध्वस्त झालेले अवशेष दिसले. पाजाताना वाटेत लागणारे ३-४ ओढे पार करून आम्ही दाट वनराईत दडलेल्या एका छोटेखानी खोपटवजा देवळात आलो.
डाव्या बाजूला झाडांत लपलेले कौलारू देऊळ दिसत आहे.
त्या देवळाचे छप्पर इतके बुटके आहे की तुम्हाला अक्षरशा: रांगत आत शिरावे लागते.
आत सुस्पष्ट अशी एकही मुर्ती नाही, पण तिथेच पडलेल्या खणा नारळाच्या खुणा, ते मंदीर देवीचेच आहे हे सांगत होत्या. दर्शन घेऊन बाहेर पडलो. थोडं पुढे जाताच एक मोठा ओढा आडवा आला.
मग कोणाला काही सांगावे लागले नाही. सगळी जनता त्या वाहत्या पाण्यात स्वता: सोबत इतरांनाही धुवून काढायला लागली. एक कुत्रा गावापासून आमची सोबत करून होता. तो देखिल एक ब-यापैकी उथळ जागा पाहून त्यात लोळू लागला. श्रीकांत शितल या दांपत्याने बाकी जनतेवर पाण्याने हल्ला चढविला होता. ७वीत असलेल्या हर्षदाने तर नाकात पाणी गेल्यावर भोकाडच पसरलं. सगळ्यांना सांभाळता सांभाळता माझ्या नाकी नऊ आले होते. तीन-चार तास यथेच्छ पाण्यात उच्छाद मांडून झाल्यानंतर जनतेला आपल्याला पोट नावाचा अवयव असल्याची जाणीव झाली आणि आमची पावलं गावाकडे वळाली. तिथे थोडी खादडी करून गाड्या पुण्याकडे हाकल्या. मॉन्सूनची सुरुवात धम्माल झाली आहे. भेटू लवकरचं !!
-- जातीवंत भटका
अशीच काही छायाचित्रे ....
-- जातीवंत भटका



मग कोणाला काही सांगावे लागले नाही. सगळी जनता त्या वाहत्या पाण्यात स्वता: सोबत इतरांनाही धुवून काढायला लागली. एक कुत्रा गावापासून आमची सोबत करून होता. तो देखिल एक ब-यापैकी उथळ जागा पाहून त्यात लोळू लागला. श्रीकांत शितल या दांपत्याने बाकी जनतेवर पाण्याने हल्ला चढविला होता. ७वीत असलेल्या हर्षदाने तर नाकात पाणी गेल्यावर भोकाडच पसरलं. सगळ्यांना सांभाळता सांभाळता माझ्या नाकी नऊ आले होते. तीन-चार तास यथेच्छ पाण्यात उच्छाद मांडून झाल्यानंतर जनतेला आपल्याला पोट नावाचा अवयव असल्याची जाणीव झाली आणि आमची पावलं गावाकडे वळाली. तिथे थोडी खादडी करून गाड्या पुण्याकडे हाकल्या. मॉन्सूनची सुरुवात धम्माल झाली आहे. भेटू लवकरचं !!
-- जातीवंत भटका
अशीच काही छायाचित्रे ....






💬 प्रतिसाद
ग
गणेशा
Mon, 06/20/2011 - 13:45
नवीन
जातिवंत भटक्याचे पुन्हा एकदा कलादालनात स्वागत !
फोटो आवडले .. अशीच काही छायाचित्रे जास्त छान आले आहेत.
फोटो कमी देण्याचे काही कारण ??
- Log in or register to post comments
ज
जातीवंत भटका
Mon, 06/20/2011 - 19:43
नवीन
अरे पाऊस होता बराच .... त्यामुळे फार वेळ कॅमेरा बाहेर नाही काढता आला.
- Log in or register to post comments
आ
आत्मशून्य
Wed, 06/22/2011 - 15:09
नवीन
कोरीगड्ला पण असाच अनूभव आला होता म्हणून यापूढे अशा ट्रीपना सोबत छत्री न्यायचीच अस ठरवलं आहे, ज्यामूळे धोधो पावसातसूध्दा कॅमेरा वाचवत फोटो मनसोक्त काढता येतील अशी अपेक्षा आहे.
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
Mon, 06/20/2011 - 13:52
नवीन
ज ब र्या द स्त !
फटू आणि वर्णन दोन्ही अप्रतिम. शेवटच्या फटूतीला काकुंचे हास्य एकदम निर्व्याज का काय म्हणतात ते.
*बाटली अजुनही न मिळाल्याने येवढीच प्रतिक्रिया देण्यात आली आहे याची नोंद घ्यावी.*
- Log in or register to post comments
क
किसन शिंदे
Mon, 06/20/2011 - 13:57
नवीन
मस्त आहेत सगळेच फोटू!
अवांतरः काय रे भटक्या? बरयाच दिवसांनी या दालनात भटकलास, होतास कुठे?
- Log in or register to post comments
ज
जातीवंत भटका
Mon, 06/20/2011 - 19:47
नवीन
जरा ऑफिसचा लोड वाढल्यामुळे वेळच नाही झाला. आता पावसाळा आल्यामुळे पाय घरी थांबणार नाही आणि हात लिहायचे थांबणार नाहीत ... :)
- Log in or register to post comments
D
Dhananjay Borgaonkar
Mon, 06/20/2011 - 14:13
नवीन
एक नंबर आहेत सगळे फोटो. साहेबा अजुन फोटो टाक की राव. एवढ्याने पोट नाही भरल बघ.
- Log in or register to post comments
श
शैलेन्द्र
Mon, 06/20/2011 - 14:27
नवीन
मस्त फोटो..
DSLR आहे ना? :)
- Log in or register to post comments
म
मृत्युन्जय
Mon, 06/20/2011 - 14:44
नवीन
कल्ला फोटो आहेत सगळे. मुळशीची ट्रिप बेष्ट झालेली दिसतिये. मुळशीच्या ट्रिपला आम्ही काढलेला असाच एक फटु:

- Log in or register to post comments
ज
जातीवंत भटका
Mon, 06/20/2011 - 19:39
नवीन
मस्तच रे !!!
- Log in or register to post comments
प
प्रास
Mon, 06/20/2011 - 15:06
नवीन
तुमची ही पावसाळ्याच्या सुरूवातीची भ्रमंती आवडली आपल्याला! फोटोही नेहमीप्रमाणे छानच!
मात्र तो जळालेल्या बांबूचा फोटो काही नीट सुधरला नाही बघा.....
(लेख दोन वेळा प्रकाशित झाल्याने प्रतिक्रियाही दोन वेळा प्रकाशित करत आहे) ;-)
- Log in or register to post comments
म
मृत्युन्जय
Mon, 06/20/2011 - 15:13
नवीन
मात्र तो जळालेल्या बांबूचा फोटो काही नीट सुधरला नाही बघा.....
तो वीज पडुन जळालेला बांबु आहे हे त्यांनी लिहिले नसते तर फोटो काढता काढता बाइक घसरल्यामुळे पडता पड्ता चुकुन निघालेल्या बाइकच्या टायरचा तो फोटो आहे अशी माझी समजुत झाली असती बघा. ;)
- Log in or register to post comments
प
प्रास
Mon, 06/20/2011 - 15:53
नवीन
नक्की नक्की!
नाहीतर,
ओल्या डांबरातून गेलेल्या ट्रॅक्टरच्या चाकांचा माग....
म्हणूनही सदर फोटो खपला असता.
;-)
- Log in or register to post comments
ज
जातीवंत भटका
Mon, 06/20/2011 - 19:38
नवीन
खि खि खि !!!
मला वाटलंच होतं ... म्हणूच त्या फोटोखाली शिर्षक टाकले आहे. :)
मायक्रो मारला आहे त्या जळक्या बांबूचा.... उगाच आपले काहीतरी ... खि खि खि :)
- Log in or register to post comments
स
स्वानन्द
Mon, 06/20/2011 - 15:17
नवीन
अफलातून!!!
- Log in or register to post comments
स
स्मिता.
Mon, 06/20/2011 - 15:33
नवीन
सगळे फोटु आवडलेत.
शेवटचा तर मस्तच!
- Log in or register to post comments
आ
आत्मशून्य
Mon, 06/20/2011 - 15:37
नवीन
जळालेला बांबु आहे हे वाचल्यानंतर कळाले, आधी तो बाइकचा घासलेला टायर कलात्मक अभिव्यक्तीने दाखवला आहे काय असच वाटलं होतं.
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Mon, 06/20/2011 - 16:38
नवीन
मस्त फोटो मित्रा रे,
पण भटकंती अगदी थोडीशी केलीस. प्लस व्हॅलीकडे गेलातच नाही का? मध्ये निवेच्या पुढून पिंपरी-भांबर्डे मार्गे लोणावळ्याला रस्ता जातो ते माहीतच असेल. आता रस्ता बर्यापैकी चांगला झाला आहे. त्या रस्त्यावर तर सह्याद्रीचे खूप सारे रंग विखुरलेले दिसतात.
- Log in or register to post comments
ज
जातीवंत भटका
Mon, 06/20/2011 - 19:35
नवीन
अरे नाही गेलो रे जास्त पुढे ... तब्येत थोडी डाऊन आहे. वेळेला ... म्हणून अगदीच घरी बसण्यापेक्षा जाऊन आलो देवराईत.
- Log in or register to post comments
प
प्रभो
Mon, 06/20/2011 - 20:33
नवीन
छान फोटो!!
- Log in or register to post comments
इ
इरसाल
Tue, 06/21/2011 - 13:40
नवीन
अतिशय उत्तम.
सावरीच्या झाडावरील सरडा आवडला.
सगळेच फोटो छान आहेत.
- Log in or register to post comments
ज
जागु
गुरुवार, 06/23/2011 - 08:03
नवीन
खुपच सुंदर.
- Log in or register to post comments
म
मदनबाण
गुरुवार, 06/23/2011 - 08:52
नवीन
मस्तच... :)
- Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 06/23/2011 - 09:04
नवीन
!
- Log in or register to post comments
त
तुझ्याच शोधात....
गुरुवार, 06/30/2011 - 14:34
नवीन
मला कामेर्याच प्रकार सा॑गाल का?
बाकी फोटो खुपच छान आलेत हो...
- Log in or register to post comments
म
मेघवेडा
गुरुवार, 06/30/2011 - 19:56
नवीन
झकास फोटो!
- Log in or register to post comments