Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
कलादालन

' वर्षा सहल - ०१ - जुन २०११

५
५० फक्त
Mon, 06/13/2011 - 21:05
चिंब भिजलेले.... तुम्हाला हे गाणं माहितच असेल ना, चिंब भिजलेले झाडाखाली बसलेले.. चिंब भिजलेले झाडाखाली बसलेले.. काय नाही माहीत, असं कसं होईल, एवढं फेमस गाणं अन माहीत नाही, बघा बघा आठवा, छान पाउस पडतोय, आणि आजुबाजुला हिरवाई आहे, पाना पानातुन थेंब टपकताहेत आणि लांब कुठंतरी नदीच्या उफाणाचा आवाज येतोय, नेहमी करपट वाटणारे दगड पण जिंवत वाटतात, आणि त्यावेळी मनात हे गाणं घुमायला लागतं.. चिंब भिजलेले झाडाखाली बसलेले.. चिंब भिजलेले झाडाखाली बसलेले.. नाही आठवलं अजुन, अवघड आहे मग... अरे हो, तुम्ही परवा म्हणजे ११ ला कोरीगड्ला आलाच नव्हता ना, हातिच्या मग तुम्हाला कसं माहीत असणार हे गाणं, छे एका युगप्रवर्तक रचनेचा स्रुजनात्मक अविष्कार होताना पाहणं तुमच्या नशिबातच नव्हतं. सरुटॉबानेच्या कट्ट्यात ठरवलेली ही वर्षा सहल,तशी ठिणगी टाकली होती स्पानं, कट्ट्याच्या वेळी थोडं सरपण आणि तेल टाकलं गेलं आणि पठ्ट्यानं शेवटपर्यंत सर्वांना जमवत घडवुन आणली ही सहल.लोणावळ्यापासुन पुढं अ‍ॅम्बि व्हॅलीकडं जाणा-या रस्तावर साधारण २० किमि वर पेठशहापुर गाव आहे, गाव कसलं वस्ती आहे. तिथुनच रस्त्याच्या बाजुलाच आभाळात गेलेला एक डोंगर आहे, तोच कोरीगड. किल्ला फारसा मोठा नाही, म्हणजे अंगावर येणारा तर मुळिच नाही. अगदी कुटुंबासहित जाउ शकतो असं ठिकाण, पण एक दोन पाउस झाले ना कि इथल्या प्रत्येक डोंगर किल्याला पुन्हा एकदा चैतन्य लाभतं, निसर्ग देत असतो आणि ते देणं अंगा खांद्यावर लेवुन हे डोंगर उभे राहतात,आपल्या सारख्या भटक्यांच्या स्वागताला. आज जिथं लोकं ऑफिसच्या मिटिंगला वेळेत पोहोचत नाहित तिथं चक्क दोन महानगरातुन १२ जण वेगवेगळ्या वाहतुकीच्या साधनांचा उपयोग करुन बरोबर ठरलेल्या वेळेत लोणावळ्यात आले. (आता हि वेळ कोणति ते विचारु नका, प्रत्येकाचं उत्तर वेगळं असेल), असो, वल्ली,मनराव,अन्या दातार तिघं चिंचवडहुन तर प्यारे१,वपाडाव,आत्मशुन्य आणि मी पुण्यातुन सातच्या सुमारास निघुन लोणावळ्यात आलो तर स्पा,सुधांशु आणि ईंटरनेटस्नेही भारतीय रेल्वेनं तर तिसरा ग्रुप गणेशा व किसन शिंदे हे दोघं गणेशाच्या गाडीकम रॉकेट ज्यादावर आले होते. एकत्र आल्यावर गुरुक्रिपा नावाच्या शुद्धलेखनाला फाट्यावर मारणा-या हॉटेलात अर्धा नाष्टा केला, डावीकडुन - सुधांशु, अन्या दातार, मनराव, आत्मशुन्य आणि वपाडाव. डावीकडुन - वल्ली, स्पा, इंट्या आणि प्यारे१. मग तिथुन उठुन शेजारी अन्नपुर्णा मध्ये गेलो, तिथले पोहे संपेपर्यंत खाल्ले. मग उप्पिट आणि शेवटी वडे पण. मग दोन चहा घेउन,मार्गस्थ झालो. पाउस इमानदारित पडत होता, पाण्यानं काळाभोर झालेला रस्ता, त्यावर उठुन दिसणारे पांढरे पट्टॆ यात रस्ता चुकलो नसतो तर हि सहल पुर्णच झालि नसती, रस्ता चुकुन पुन्हा योग्य मार्गाला लागुन, भुशि डॅम मार्गे पुढं निघालो. मध्येच मनरावांनी गाडी बाजुला घेतली, लगेच बाकीच्यांनी पण. खाली उतरुन उजव्या बाजुला पाहिलं, आम्ही ड्युकच्या नाकासमोर टिच्चुन उभे होतो, टिच्चुन म्हणजे वारं फार होतं आणि खालचा दगड घसरडा झाला होता म्हणुन. पावसाला घाबरत घाबरत फोटो काढले, परत निघालो. रस्त्याच्या कडेला एक फोटोजनिक डेडबॉडी पडली होती, बिचारं अजुन कळत-नकळत वय होतं त्या जिवाचं. आठवण म्हणुन त्याचेही फोटो काढले, त्याला रस्त्यावरुन आत मातीवर नेउन ठेवलं आणि पुढं निघालो. दोन पाच वेडीवाकडी वळणं आणि पुढं मठ्ठपणे जाणा-या गाड्यांना शिव्या घालत पेठ शहापुरला पोहोचलो.गाड्या तिथल्या मारुति मंदिराच्या बाजुला लावल्या. बरोबर घ्यायचं सामान घेतलं, नको होतं ते तिथंच ठेवलं आणि रस्ता ओलांडुन सुरु झाली वर्षा सहल, एक छोटुकली टेकडी ओलांडली की लगेच वर जायची पायवाट सुरु होते, लाल माती मस्त निसरडी झालेली, एकमेकांच्या साथीनं कधी संपली आणि सिमेटाच्या पाय-या सुरु झाल्या, पायवाटेवर जास्त बरं वाटत होतं. थोड्या पाय-या चढुन गेल्यावर एका बाजुला एक पाण्याचं टाकं आहे, पिण्याचं स्वच्छ पाणी, नंतर थोडं पुढं गेल्यावर एक गणपतीचं देउळ, म्हणजे एका दगडात एक कोनाडा आणि देव एकत्रच कोरलेला, सभामंडप, गाभारा असला पसारा नाही थेट देव आणि समोर भक्त, डायरेक्ट हॉटलाईन, फारसा रेखिव नसला तरि गणपती प्रसन्न वाटला, हल्ली प्रत्येक गल्लीच्या कोप-यावर लोखंडाच्या जाळीत कैद करुन ठेवलेल्यांपेक्षातरी जास्त प्रसन्न. थोडं अजुन चाललं की एक गुहा लागते, दगडात कोरलेली, बहुधा फर्स्ट लेवल सिक्युरिटी चेक पॉईंट असावा. तिथुन गडाचा मुख्य दरवाजा १५ मिनिटात येतो, दरवाज्याच्या दोन्हि बाजुला मशाली ठेवण्यासाठी दगडी हुक सारखी सोय केलेली आहे. दरवाज्याला कधितरी ओसरि असावि असं वाटतं खरं, पण समोरचा बुरुजावर जाउन कधी एकदा उभारतो असं झालेलं असतं, मग आत आलो की दोन्हि बाजुला गेलेली तटबंदीची भिंत दिसते. काहि काहि ठिकाणी चांगली ३-३ फुट रुंद आहे, आजच्या घडीला किल्यावर चांगल्या अवस्थेत असलेला अवशेष, बाजुलाच एक दोन छोट्या तोफा पडलेल्या आहेत. डाव्या बाजुनं भिंतीवरुन चालायला सुरुवात केली, आणि पहिल्याच बुरुजावर कुणालातरी सुरुवातीला उल्लेख केलेलं गाणं सुचलं,चिंब भिजलेले झाडाखाली बसलेले, अहाहा काय शब्द आहेत, लगेच तिथल्या तिथं यावर एक कॊल आणि एक काथ्याकुट टाकला गेला, आणि त्यावरचे प्रतिसाद किल्यावरुन खालि रस्त्यापर्यंत गेल्यानंतर ते उडवुन टाकुन पुढं चालायला लागलो. अजुन दिवस काढायचा होता, इथंच सर्वरला लोड होवुन चालणार नव्हतं. गडावर जेवढे काढता आले त्यापैकी हे काही फोटो वल्लिनं काढलेले. आता डाव्या हाताला खाली अ‍ॅम्बी व्हॅलि दिसायला लागते, मस्त घरं आणि मोठे मोठे हॉल, छानसे रस्ते. हळुहळु त्या मानवनिर्मित जगाचं कवतिक संपतं कारण गडावर जमा होणा-या पावसाच्या पाण्यानं गडाचा निरोप घेताना घेतलेलं धबधब्याचं रुप फक्त डोळ्यात साठवावं असंच असतं, मावत नसलं तरीही . इथं प्रत्येकालाच फोटो काढायचेत पण भन्नाट वारा आणि बेभान पाउस असल्यानं ते शक्यच नाही, त्यामुळं जे दिसतंय ते पुन्हा स्वप्नात पाहण्यासाठी प्रत्येकजण साठवुन ठेवत होता. आता एकदम गडाच्या मागच्या बाजुला आलो कि खाली दिसते ती अ‍ॅम्बी व्हॅलिची धावपट्टी, आजुबाजुच्या हिरव्यागार गालीच्यावर एकच रेघ मारलेली, पाउस हे रसायनच असं आहे की ते जिवंत नसलेल्या गोष्टीपण जिवंत करुन दाखवतं, या बुरुजाच्या खाली अजुन एक बुरुज आहे पण तिथं जायची वाट बिकट आहे, कुठंही आधार नाही, त्यामुळं ते कॅन्सल केल्म आणि थोडं पुढं धबधब्यात आलो, दोन-तीन टप्यात असलेला हा छोटासाच धबधबा पण एकदम सुरक्षित आहे, तिथं सगळेजण मनसोक्त पाणी खेळलो, मग गडावरच्या कोराईदेवीच्या देवळात आलो, छोटंसं छान रंगवलेलं देउळ, बाहेर एक स्तंभ आहे दगडी कसला तो कळालं नाही, वल्लिनं सांगितलं कि आज जे दागिने मुंबैतल्या मुंबादेवीच्या अंगावर आहेत ते मुळचे या देवीचे आहेत. देवीची साधीच मुर्ती पण फुलांच्या हारामुळं खुप छान दिसत होती. संपुर्ण गडावर फोटो काढण्यास योग्य हि एकच जागा होती, तिथं फोटो घेतले आणि किल्याचा परिघ पुर्ण करण्यासाठी निघालो, इथं पण ब-याच ठिकाणी विशेषत: कड्याजवळ आडवा पाउस अनुभवता येतो, खालच्या दरीतुन फिरत फिरत वर येणारं वारं आभाळातुन पडणा-या थेंबाची दिशाच बदलुन टाकतो. या भागात बरीच तळी आहेत छोटी छोटी. दोन तासात सगळा किल्ला पाहुन होतो, फिरुन होतो. आता फक्त एकच जाणीव होत होती, ती म्हणजे भुक, पटापटा खाली आलो, जिथं गाड्या लावल्या होत्या त्या मागच्या मारुतीच्या देवळात ओले कपडे बदलुन समोरच्या हॉटेलात चहा प्यायला गेलो आणि चांगलं अडीचशे रुपये बिल होइपर्यंत वडे, आम्लेट खाउनच निघालो, उजवीकडुन - किसन शिंदे, ५० फक्त, प्यारे१, अन्या दातार. व्यनित ब-याच गाजलेल्या शंकरपाळ्या खाल्या, किसन शिंदेनी खास घरुन करुन आणल्या होत्या, आता त्यांनी धागा टाकला कि प्रत्येक शंकरपाळीसाठी एक असे चांगले प्रतिसाद द्यायचं ठरलं आहे.(हल्लि खरडी करुन कुणी देत नाहि ओ प्रतिसाद.) मग परत लोणावळ्यात येताना ट्रॅफिक जॅम व रस्ता चुकणे हि नित्यकर्मे करुन परत एकत्र आलो, परत जाताना प्रत्येकाचे प्लॅन वेगळे होते, गणेशा डायरेक्ट पुण्याला आला तर, आत्मशुन्य तिथुनच त्याच्या दुस-या मित्राबरोबर राजमाचिला गेला, इंट्या पुण्यात पुस्तक खरेदी साठि येणार होता. सगळ्यांचं टाटा बाय बाय झालं आणि आम्हि पण आमच्या मार्गाला लागलो. या वर्षातली मिपासद्स्यांबरोबरची तिसरी सहल, मी आणि गणेशा तिन्हि सहलीत होतो, या अशा सहली भविष्यात पण करत राहु एवढं ठरवुनच हा व्रुतांत संपवतो, पुढच्या महिन्यात एक खादाडिचा कार्यक्रम ठरवत आहोत, पक्कं झालं की कळवतोच आहे, तोपर्यंत पावसाची मजा लुटा.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 16684 views

💬 प्रतिसाद
प
प्रचेतस Wed, 06/15/2011 - 11:50 नवीन
तळं पावसाळ्याच्या पहिल्या आठवड्यातच बर्‍यापैकी भरलेलं पाहून अंमळ आश्चर्यच वाटलं. धुकटातून दिसणारं तळ्याचं दृष्य जबराच रे एकदम.
@वल्ली: च्यायला, ग्यांगला मैदानातल्या तोफा नीट ठेवायच्या कामाला नाही का लावलं रे?
पब्लिक आधीच भिजून भिजून चिंबगार पडलेलं होतं, त्यात एकाला तर कोरीगड म्हणजे स्टॅमिनाची सत्वपरीक्षा पाहणारा ट्रेक वाटत होता. ;) मग रे कुठून त्यांना त्या जडशीळ तोफा उचलायला सांगायच्या. :)
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Wed, 06/15/2011 - 12:01 नवीन
त्यात एकाला तर कोरीगड म्हणजे स्टॅमिनाची सत्वपरीक्षा पाहणारा ट्रेक वाटत होता. :D :D :D वल्ली, तुम्ही तर डायरेक बाँड्रीच्या बाहेरच बॉल मारताय.;)
  • Log in or register to post comments
स
स्पा Wed, 06/15/2011 - 12:06 नवीन
और ये लागा bsnl चौक्का बाकी वल्ली थोडा सेहवाग सारखा वाटाय लागलाय हल्ली :D
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Wed, 06/15/2011 - 12:09 नवीन
कसचं कसचं ;)
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Wed, 06/15/2011 - 13:25 नवीन
>>त्यात एकाला तर कोरीगड म्हणजे स्टॅमिनाची सत्वपरीक्षा पाहणारा ट्रेक वाटत होता. चूकलंच राव. कोराईगडाऐवजी हरिश्चंद्रगडच ठरवायला हवा होता. किंवा अंमळ जूना वासोटा! ;) >>तळं पावसाळ्याच्या पहिल्या आठवड्यातच बर्‍यापैकी भरलेलं पाहून अंमळ आश्चर्यच वाटलं आठवड्याभरात किती मर मर करत बदाबदा कोसळलाय राव पाऊस...नशीब ते तळं उतू नव्हतं जात. :D
  • Log in or register to post comments
स
स्पा Wed, 06/15/2011 - 11:35 नवीन
५० फक्त .. तळ्यात उतरायच्या मार्गावर होतेच... पण तळ किती खोल आहे याचा अंदाज नसल्याने बेत रद्द झाला
  • Log in or register to post comments
इ
इंटरनेटस्नेही Wed, 06/15/2011 - 12:52 नवीन
कॅमेरा कोणता वापरला? तसेच फोटो काढताना कोणती विशेष टेक्निक अवलंबली त्याची माहिती हवी आहे.
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Wed, 06/15/2011 - 14:14 नवीन
ईंट्या, बाळा ट्रेकला झोपला होतास का रे?
  • Log in or register to post comments
व
वपाडाव Wed, 06/15/2011 - 15:30 नवीन
=)) =)) =)) तिच्या मारी.... किसन रावांनी तर DLF Maximum मारलेला आहे.... त्यांचा हार अन तुरे देउन सत्कार करण्यात येत आहे.... पण त्यांचं कदाचित लक्ष नसेल (निसर्गातील सौंदर्य पाहताना) पण इंट्याने रेनकोट घातलेला होता.... हे त्यांच्या लक्षात नसावे.... असो...
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Wed, 06/15/2011 - 17:50 नवीन
अंगावर रेनकोट, डुईवर टोपी असलेली एक आकृती एकाच जागी स्थिर असूनही आम्ही फुडं फुडं जात असल्यामुळे हळूहळू धुक्यात लुप्त होताना दिसून येत होती. :)
  • Log in or register to post comments
इ
इंटरनेटस्नेही Wed, 06/15/2011 - 17:58 नवीन
अंगावर रेनकोट, डुईवर टोपी असलेली एक आकृती एकाच जागी स्थिर असूनही आम्ही फुडं फुडं जात असल्यामुळे हळूहळू धुक्यात लुप्त होताना दिसून येत होती. =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
  • Log in or register to post comments
इ
इंटरनेटस्नेही Wed, 06/15/2011 - 18:16 नवीन
तो माझा रेन्कोट नसुन..विंड्चिटर विथ ट्राऊजर होते..
  • Log in or register to post comments
५
५० फक्त Wed, 06/15/2011 - 18:45 नवीन
तो माझा रेन्कोट नसुन..विंड्चिटर विथ ट्राऊजर होते.. आणि ते एवढे जड होते की तुला चालता पण येत नव्हते,
  • Log in or register to post comments
इ
इंटरनेटस्नेही Wed, 06/15/2011 - 18:51 नवीन
आणि ते एवढे जड होते की तुला चालता पण येत नव्हते, सामके बरोबर!
  • Log in or register to post comments
अ
अन्या दातार गुरुवार, 06/16/2011 - 12:29 नवीन
>>पण इंट्याने रेनकोट घातलेला होता.... हे त्यांच्या लक्षात नसावे.... असो... रेनकोट घातल्याने झोप येते काय या प्रश्नावर रिसर्च करावा म्हणतोय!
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Fri, 06/17/2011 - 05:14 नवीन
रेनकोट घातल्याने झोप उडते (उकाड्यामुळे) असे आमचे निरीक्षण आहे.
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Fri, 06/17/2011 - 05:31 नवीन
कधी कधी झोप मोडल्यावर करायचे काय म्हणूनही रेनकोट घातला जातो असे आमचे निरीक्षण आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Fri, 06/17/2011 - 05:46 नवीन
रेनकोट रेनकोट जय इंटेश.....!!!!
  • Log in or register to post comments
स
सूड Fri, 06/17/2011 - 09:07 नवीन
मग पुढे काय ?? 'ठाकुर्लीच्या स्पावडुदेवा जागराला या या' ?? :D
  • Log in or register to post comments
आ
आत्मशून्य Wed, 06/15/2011 - 14:25 नवीन
बाकी सर्व आपोआप सूरळीत होतं जात.
  • Log in or register to post comments
इ
इंटरनेटस्नेही Fri, 06/17/2011 - 09:09 नवीन
उत्तम धागा.. लेखन आवडले.
  • Log in or register to post comments
प
पैसा Tue, 06/21/2011 - 16:39 नवीन
आणि फोटो फारच छान! तुमची धमाल ट्रेकवरून परत आल्यावर मिपावर चालू राहिलेली दिसतेय!
  • Log in or register to post comments
ज
जातीवंत भटका Tue, 06/28/2011 - 08:16 नवीन
मस्तच रे !! तुम्हा भटक्यांना पहिल्यांदाच पहातो आहे (फोटोत) दंगा घातला आहे राव !! मस्तच.
  • Log in or register to post comments
इ
इंटरनेटस्नेही Tue, 06/28/2011 - 09:17 नवीन
मस्तच रे !! तुम्हा भटक्यांना पहिल्यांदाच पहातो आहे (फोटोत) दंगा घातला आहे राव !! मस्तच. ईन्शाअल्लाह लवकरच भेटु, अश्या एखाद्या ट्रेक मध्ये! - इंट्या.
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Tue, 06/28/2011 - 11:09 नवीन
>>>ईन्शाअल्लाह लवकरच भेटु, अश्या एखाद्या ट्रेक मध्ये! कशाला? त्यांच्या ट्रेक ची ...... करायला? मी विंडचिटर घालून आक्खा ट्रेक करणार...! मी इथे थांबतो. तुम्ही येता का जाऊन....? बी पी वाढलंय रे थोडं... वारं फारच आहे... स्टॅमिना संपला... किती बरं चढ आहे इथे? फारच तिखट आहे रे हे... इन्ट्या बास का रे?????
  • Log in or register to post comments
व
वपाडाव Tue, 06/28/2011 - 15:07 नवीन
लहान-लहान मुलांवर चढ-चढ चढणार्‍या प्यारे आजोबांचा णिषेद !!!!! ------------------------------------------------- !! आज हे करुयात, उद्या ते करुयात !!
  • Log in or register to post comments
अ
अन्या दातार Sun, 07/31/2011 - 06:16 नवीन
वप्या काका, शब्द सांभाळून वापर ;)
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 51 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 55 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 58 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा