Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
कलादालन

शिवराज्याभिषेक सोहळा ६ जून २०११

म
मालोजीराव
Fri, 06/10/2011 - 13:30
रायगडावर ६ जून रोजी हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचा ३३८ वा राज्याभिषेक सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला.जबरदस्त पावसात आणि धुक्यात सोमवारी पहाटे मुख्य सोहळ्याला सुरुवात झाली. मंत्रोच्चार आणि संस्काराबरोबर कुलदेवतेला स्मरून शिवरायांच्या सुवर्णमूर्तीवर श्रीमंत युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते राज्याभिषेक संपन्न झाला.यावेळी महाराजांच्या जयजयकाराने सारा आसमंत दणाणून गेला होता. पोवाडे, ललकारी,तुतारी च्या आवाजाने वातावरण भारुन गेलं होतं. यावेळी नितीन देसाई यांनी पुढील वर्षी सोहळा आणखी दिमाखदार आणि भव्य होणार असल्याचा सांगितलं....तसंच रायगड,राजगड आणि सिंधुदुर्ग हे मॉडेल(?) किल्ले करणार आणि शिवरायांच्या जीवनावर भव्य इंग्रजी चित्रपट काढणार असल्याची पण घोषणा केली. सहस्त्र जलधारांच्या अभिषेकात हा राज्याभिषेक सोहळा सुंदररित्या पार पडला...काही क्षणचित्रे जोडीत आहे. तारीख आणि तिथीचा घोळ इथेही होणार हे सामनामध्ये वाचून वाईट वाटलं.... ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या तिथीप्रमाणे १३ जून २०११ रोजी हिंदवी स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड येथे राज्याभिषेक सोहळा पुन्हा साजरा होत आहे... ज्यांना ६ जूनला जायला मिळालं नाई ते १३ जूनला तिथीप्रमाणे होणार्या या सोहळ्याला हजेरी लाऊ शकतात. छायाचित्रे साभार - बाजी जेधे,संभाजी छत्रपती

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 9945 views

💬 प्रतिसाद
M
michmadhura Fri, 06/10/2011 - 13:34 नवीन
अतिशय सुन्दर फोटो !
  • Log in or register to post comments
व
विकास Fri, 06/10/2011 - 13:35 नवीन
येथे छायाचित्रवृत्तांत दिल्याबद्दल धन्यवाद!
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Fri, 06/10/2011 - 13:36 नवीन
धन्यवाद मालोजीराजे, आभारी आहे. जबरदस्त फोटो आहेत. शिवराज्याभिषेकाचा एवढा मोठ्ठा सोहळा होतो ह्याची खरोखर कल्पना नव्हती. फार आनंद झाला हे पाहुन, धन्यवाद :) - छोटा डॉन
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Fri, 06/10/2011 - 13:41 नवीन
मस्त वृत्तांत. महाराजांना मानाचा मुजरा...!!! १३ जूनला तिथीप्रमाणे (आमचा पुप्या जाणार आहे शाखेत ;) ) राज्याभिषेक दिन आहे. अवांतरः शेवटचा फटु प्रतिक्रियाखेचक. व्यक्ति त्रासदायक वाटल्या..!!! ;)
  • Log in or register to post comments
स
सूड Fri, 06/10/2011 - 13:42 नवीन
ती धातूची मूर्ती कोणाची आहे ?? म्हणजे शेवटून अकरावा फोटो .
  • Log in or register to post comments
म
मालोजीराव Fri, 06/10/2011 - 14:05 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
स
सूड Fri, 06/10/2011 - 14:35 नवीन
ह्म्म !! अशी पुर्णाकृती मूर्ती पहिल्यांदाच पाह्यली. पण तरीही सर्व फोटो झक्कास.
  • Log in or register to post comments
स
साबु Fri, 06/10/2011 - 13:51 नवीन
मस्त फोटो... नुसते फोटो पाहुन...वातावरण किती भारलेले असेल याचा अन्दज येतोय... काटा आला ना राव. सुरेख ..
  • Log in or register to post comments
५
५० फक्त Fri, 06/10/2011 - 13:53 नवीन
मस्त रे खुप छान खुप छान पुढच्या वर्षी आमाला पण न्या बरोबर, इसरु नका. धुक्यातल्या झेंड्याचा फोटो एकद्म खल्लास, @ सुड, ती प्रतिमा महाराजांची आहे, ती सिंधुदुर्ग किल्यावरजे महाराजांचे मंदिर आहे त्या मंदिरातील मुर्तिची रिप्लिका आहे अशी माहीती आहे, तज्ञांनी क्रुपया खुलासा करावा हि विनंती.
  • Log in or register to post comments
म
मालोजीराव Fri, 06/10/2011 - 14:11 नवीन
नक्की नेणार दर वर्षी ५०-६० हजारांहून अधिक शिवभक्त हजर असतात सोहळ्याला! लवकरच छत्रपतीकृपेने हा महाराष्ट्राचा सर्वात मोठा सण व्हावा .....अशी मनोकामना आहे
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Fri, 06/10/2011 - 14:50 नवीन
>लवकरच छत्रपतीकृपेने हा महाराष्ट्राचा सर्वात मोठा सण व्हावा .....अशी मनोकामना आहे काय बोललात द्येवा.... व्वा! खरं सांगतो, हे वाक्य वाचलं अन का कोण जाणे टचकन डोळे भरुन आले.
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Fri, 06/10/2011 - 14:00 नवीन
भारलेलं वातावरण आणी अतिशय सुंदर फोटो...विशेषतः वरून १२ वा सजावटीचा फोटो.. महाराजांना मानाचा मुजरा...!!!
  • Log in or register to post comments
म
मालोजीराव Fri, 06/10/2011 - 14:16 नवीन
हो,तो फोटो २०१० चा आहे,यावेळी जोरदार पावसाने फारशी फुलांची सजावट होऊ शकली नाही ! यातील २-३ फोटो २०१० शिवराज्याभिषेकाचे आहेत...आणि शेवटचा नितीन देसाई यांच्या सेटवरचा आहे
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Fri, 06/10/2011 - 14:49 नवीन
वाह!!! नुसते फोटो पाहूनच तबियत खुश जाहली! ओमकार बिन मालोजीराजे, शतशः धन्यवाद!
  • Log in or register to post comments
म
मालोजीराव Fri, 06/10/2011 - 15:09 नवीन
धमालराव पुढील वर्षी आपण सगळे जाऊया म्हणतो, ३३९ व्या शिवराज्याभिषेकाला !
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Fri, 06/10/2011 - 15:25 नवीन
मालोजीराव, नक्की! आई जगदंबेच्या कृपेनं, पुढच्या सोहळ्याला आपण नक्कीच हजर राहू.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Fri, 06/10/2011 - 15:29 नवीन
महाराजांना मानाचा मुजरा...!!! मालोजीराजे आदले २ दिवस रायगडावरच होतो आम्ही.. तुम्ही आहात हे आधी माहिती असते तर मज्जा आली असती की. फोटो खुपच छान आहेत.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Fri, 06/10/2011 - 15:32 नवीन
महाराजांना मानाचा मुजरा. धन्य झालो फोटो पाहून. मालोजीराव, धन्यवाद.
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Fri, 06/10/2011 - 20:58 नवीन
फोटोंद्वारे सोहळा आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल अनेक धन्यवाद!
  • Log in or register to post comments
अ
अग्रजा Sun, 06/12/2011 - 18:12 नवीन
रोमांचित करणारे फोटो
  • Log in or register to post comments
अ
अमोल केळकर Mon, 06/13/2011 - 07:51 नवीन
असेच म्हणतो अमोल केळकर
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 46 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 58 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    19 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    19 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा