Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
कलादालन

पोर्ट्रेट फोटोग्राफिचा एक प्रयत्न.

य
येडाखुळा
Tue, 04/26/2011 - 08:38
नमस्कार मंडळी, श्री शरद यांचा "मिपावरील छायाचित्रे ... एक निरिक्षण" हा लेख वाचला आणि मला माझ्याकडे असलेली काही पोर्ट्रेट अपलोड करायचा मोह झाला. ही काही फार सुंदर छायाचित्र आहेत असं नाही म्हणता येणार पण त्या क्षणी मला जे कॅमेर्यात पकडावस वाटलं ते इथे मांडतोय. सासवड-जेजुरी च्या परिसरात फिरत असताना हा धनगर दिसला. यांची पागोटे घालण्याची पद्धत खूप मस्त असते. आणि मला सगळेच धनगर फोटोजेनिक वाटतात! IMG_0259 गोव्याला गेलेलो असताना समुद्रात खेळून आलेल्या आणि मग दमून स्वस्थ बसलेल्या एका लहान मुलाचा हा फोटो. आधी मला ती मुलगीच वाटली होती. त्याच्या घरच्यांनी माझा तो गैरसमज दूर केला. अतिशय गोड आणि निरागस चेहरा. Picture 102 रंगीला.. बदामी ( कर्नाटक ) ला देवीच्या दर्शनाला गेलो असताना जत्रेच्या वेळी याचा फोटो मिळाला. IMG_ 024 हम्पी ला या मुलीचा फोटो मिळाला. इतकी खळखळून हसत होती ती. IMG_ 389 सासवड च्या एका मंदिरात ही स्त्री एका खांबाला टेकून बसली होती. तिच्या मुद्रेवर एक प्रकारचा करारी पणा दिसत होता. Picture 065-1 बुलंद दरवाजा पाहायला गेलो असताना हा एक माणूस नुसता फुकट होता. एक संपली कि दुसरी बिडी पेटवायचा. मी फोटो काढत असताना त्यान एकदा थकलेल्या डोळ्यांनी माझ्या कडे पाहिलं आणि आपलं काम चालूच ठेवलं. Picture 279 आमचा एक अतिशय झोपाळू मित्र. याला कुठेही, कधीही, कशीही झोप येऊ शकते. ट्रेन मध्ये झोपलेला असताना त्याच्या वरचा लाईट आवडला मला. खिडकीतून येणारा. Picture 429 माझा एक फोटोग्राफर मित्र. हा मी मुद्दाम थोडा अंडरएक्सपोज ठेवला आहे. कारण मला फक्त त्याची त्या वेळची शारीरिक ठेवण आणि हातातला कॅमेरा एवढंच दाखवावास वाटलं. Picture 016 राजगड ला एक दिवस जात असताना ही बाई दिसली. शेळ्या हाकताना. कपाळावरच कुंकू आणि नाकातली रिंग ( कोणाला त्याला नक्की काय म्हणतात सांगितला तर बर होईल) आवडली. Picture 005 फोटो काढायला लहान मुल नेहमीच उत्सुक असतात. पण हा थोडासा लाजरा होता. शेवटी तो खांबाआड असतानाच त्याचा असा फोटो घेतला. IMG_0284 घोष पथकामधले एक आजोबा. त्यांचे थिजलेले डोळे, चेहऱ्यावरच्या वार्धक्याच्या खुणा आणि त्यांचा तो ड्रेस यात मला काहीतरी विसंगती सापडली. Picture 057

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 9526 views

💬 प्रतिसाद
ग
गवि Tue, 04/26/2011 - 08:55 नवीन
सर्वच फोटो अतीव सुंदर. फारच आवडले.
  • Log in or register to post comments
स
सूर्य Tue, 04/26/2011 - 09:04 नवीन
सर्व फोटो मस्त. - सूर्य
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Tue, 04/26/2011 - 09:07 नवीन
ऑफिसमधून दिसत नाहीयेत, घरुन बघेन :)
  • Log in or register to post comments
प
प्रास Tue, 04/26/2011 - 09:09 नवीन
आवडले.....
  • Log in or register to post comments
व
विकाल Tue, 04/26/2011 - 09:14 नवीन
+१
  • Log in or register to post comments
आ
आचारी Tue, 04/26/2011 - 09:49 नवीन
गुरु एक नम्बर ....................!!
  • Log in or register to post comments
आ
आचारी Tue, 04/26/2011 - 09:50 नवीन
क्यमेरा कोणता वापरता ते सान्गा ना...............
  • Log in or register to post comments
ग
गणपा Tue, 04/26/2011 - 10:00 नवीन
सगळेच फोटो आवडले.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Tue, 04/26/2011 - 10:17 नवीन
काहि खूपच आवडले विषेशतः शेवटून २रा व ३रा काही काहि छायाचित्रांमधे क्रॉपिंग +/किंवा एक्स्पोजर +/किंवा अँगल वगैरे बदलता यावे असे वाटले. आता घाईत आहे नंतर जमल्यास डिलेलवार मत लिहितो
  • Log in or register to post comments
ख
खादाड अमिता Tue, 04/26/2011 - 10:17 नवीन
तुम्ही प्रोजेक्ट ३६५ चे मेम्बर आहात का?
  • Log in or register to post comments
५
५० फक्त Tue, 04/26/2011 - 10:28 नवीन
खुप मस्त फोटो रे, मला कधी येणार असे फोटो काढायला काय माहित ?
  • Log in or register to post comments
अ
अमोल केळकर Tue, 04/26/2011 - 11:40 नवीन
सुंदर :) अमोल केळकर
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Tue, 04/26/2011 - 11:41 नवीन
२रा आणी ७वा क्लाSSSSSSSस आहेत.
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Tue, 04/26/2011 - 12:27 नवीन
सुंदर प्रकाशचित्रे!
  • Log in or register to post comments
य
येडाखुळा Tue, 04/26/2011 - 12:45 नवीन
सर्वान्चे मनापासून आभार. खादाड अमिता : नाही. मी प्रोजेक्ट ३६५ चा मेंबर नाही. प्रोजेक्ट ३६५ काय आहे हे मीच पहातो गुगलून. हा हा हा. आचारी : क्यामेरा आहे निकॉन डी ६०. ऋषिकेश : आपल्याकडून शिकायला आवडेल.
  • Log in or register to post comments
अ
अनामिक Tue, 04/26/2011 - 15:13 नवीन
छान आहेत फोटू! आवडले, अजूनही असतील तर टाका की इथे.
  • Log in or register to post comments
स
स्मिता. Tue, 04/26/2011 - 15:37 नवीन
सगळेच फोटो आवडले... २रा आणि ७वा तर लई भारी!
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Tue, 04/26/2011 - 16:37 नवीन
फोटो दिसत नसल्याने फक्त प्रतिक्रियेवरुनच आनंद घेतला ....
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Tue, 04/26/2011 - 17:02 नवीन
मला दोन्ही मित्रांचे फोटो आवडले. ह्या दोन्ही फोटोंमध्ये प्रकाश-अंधाराचा छान खेळ केला आहे.
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Tue, 04/26/2011 - 19:56 नवीन
मात्र एकदोनच दाखवायला हवे होते! फोटो छानच आहेत.
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Tue, 04/26/2011 - 21:01 नवीन
छान फोटो आले आहेत. फोटोशॉप वापरले आहे का? तुमच्यामध्ये एक कलाकार दडलेला आहे.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Wed, 04/27/2011 - 04:29 नवीन
दोनही स्त्रिया आणि अंडर एक्स्पोझ्डवाला अधिक आवडले. छान फोटो.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 04/27/2011 - 06:35 नवीन
सुंदर... :)
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Wed, 04/27/2011 - 08:18 नवीन
अंडर एक्स्पोझ्ड फारच छान ! बाकिचे ही छान्च.
  • Log in or register to post comments
च
चिंतातुर जंतू Wed, 04/27/2011 - 08:23 नवीन
सासवडच्या मंदिरातल्या स्त्रीचं छायाचित्र आवडलं. सहसा लोक दाखवत नाहीत असं काहीतरी एका क्षणात पकडता आलं आहे असं वाटलं. कार्तिए-ब्रेस्साँची 'Decisive Moment' ही संकल्पना आठवली. अवांतर: मूळ फोटोंमधला अ‍ॅस्पेक्ट रेशो बरोबर आहे, पण इथल्या प्रतिमांमध्ये तो बरोबर नाही. जमल्यास दुरुस्त करा.
  • Log in or register to post comments
च
चिगो गुरुवार, 04/28/2011 - 13:46 नवीन
सगळेच फोटो मस्त.. जबरा पोर्ट्रेट्स आहेत..
  • Log in or register to post comments
म
माझीही शॅम्पेन गुरुवार, 04/28/2011 - 14:07 नवीन
सगळेच फोटो क्लास आलेत , मला ह्यातल फारस माहिती नाही पण माझा मते चेहरा / डोक पूर्ण दिसल पाहिजे ! जे इथे काही फोटोत होत नाहीए
  • Log in or register to post comments
ज
जयंत कुलकर्णी Mon, 05/02/2011 - 13:37 नवीन
सुंदर फोटो. पोर्ट्रेट हा प्रकार मला तरी फार अवघड वाटतो.
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत राजवाडे Wed, 11/23/2011 - 23:50 नवीन
सर्व प्रकाशचित्र छान आली आहेत.
  • Log in or register to post comments
श
शिल्पा ब गुरुवार, 11/24/2011 - 01:17 नवीन
मस्त आहेत.
  • Log in or register to post comments
स
स्वानन्द गुरुवार, 11/24/2011 - 06:14 नवीन
आवडले.
  • Log in or register to post comments
व
वपाडाव गुरुवार, 11/24/2011 - 10:09 नवीन
प्रत्येक चित्र गुंतवुन ठेवु पाहत होते....
  • Log in or register to post comments
र
रुमानी गुरुवार, 11/24/2011 - 10:17 नवीन
मस्त आहेत. आवडले.
  • Log in or register to post comments
म
मोहनराव गुरुवार, 11/24/2011 - 10:38 नवीन
मस्त फोटो आले आहेत!!
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 47 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 59 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    19 hours ago
  • सुंदर !!
    19 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    19 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा