Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
कलादालन

निमंत्रण - इंक्रेडीबल फोर्टस ऑफ इंडिया !

म
मालोजीराव
Tue, 04/19/2011 - 08:56
दुर्गअभ्यासक प्रमोद मांडे यांनी टिपलेल्या देशभरातील दुर्गांच्या छायाचित्र प्रदर्शनाला शुक्रवारपासून बालगंधर्व रंगमंदिराच्या कलादालनात सुरवात होत आहे. येत्या २२ ते २७ एप्रिल च्या दरम्यान सकाळी नऊ ते रात्री आठ या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे. सर्व दुर्गप्रेमी,शिवप्रेमींनी याचा लाभ घ्यावा. या प्रदर्शनात महाराष्ट्रातील दुर्गम किल्ल्यांच्या छायाचित्रांसह कर्नाटक, राजस्थान, दिल्ली, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, तमिळनाडू, केरळ अशा विविध राज्यांतील किल्ल्यांची चारशेहून अधिक छायाचित्रे प्रदर्शित करण्यात येणार आहेत. ज्या किल्ल्यांबाबत दुर्गप्रेमी आणि अभ्यासकांना विशेष माहिती नाही, अशा किल्ल्यांच्या दुर्मिळ छायाचित्रांचा या प्रदर्शनात समावेश करण्यात आला आहे. तसेच या काळात प्रफुल्ल केशव घाणेकर,आनंद पाळंदे,निनाद बेडेकर,भगवान चिले या इतिहासतज्ञ, दुर्गतज्ञांशी संवाद साधण्याची संधी दुर्गप्रेमींना मिळेल. सर्व दुर्गप्रेमी,शिवप्रेमींना आग्रहाचे निमंत्रण ! " ट्रेकिंगच्या माध्यमातून, डोंगर-द-या पायाखाली घालत, पायवाटांनी मनमुराद भटकंती केल्यावरच महाराष्ट्राचा इतिहास, निसर्ग, जीवनपद्धती, श्रद्धा, सामाजिक स्थिती, संस्कृती आदींचा परिचय जवळून होऊ शकतो "

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3464 views

💬 प्रतिसाद
य
यशोधरा Tue, 04/19/2011 - 09:54 नवीन
अरे वा! नक्कीच पाहणार हे प्रदर्शन! धन्यवाद.
  • Log in or register to post comments
न
नरेशकुमार Tue, 04/19/2011 - 10:09 नवीन
छान छान !
सर्व दुर्गप्रेमी,शिवप्रेमींना आग्रहाचे निमंत्रण !
जरुर जरुर !
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Tue, 04/19/2011 - 12:19 नवीन
नक्कीच ... धन्यवाद
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानेश... Tue, 04/19/2011 - 12:33 नवीन
माहितीबद्दल आभारी आहे.
  • Log in or register to post comments
व
वपाडाव Tue, 04/19/2011 - 14:16 नवीन
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.... मी तर जाईनच अन सोबत ४ जणांना घेउन जाईन....
  • Log in or register to post comments
म
मालोजीराव Wed, 04/20/2011 - 11:12 नवीन
हेला म्हनत्यात खरा मावळा.....नक्की या !
  • Log in or register to post comments
५
५० फक्त Tue, 04/19/2011 - 16:22 नवीन
अरे वा, खुप छान माहिती, मालोजीराव खुप खुप धन्यवाद. शक्य असेल तर सगळे मिपाकर एकत्र जाउ यात. २३ किंवा २४ संध्याकाळी मला जमेल. अजुन कोण येतं आहे बोला.
  • Log in or register to post comments
म
मालोजीराव Wed, 04/20/2011 - 11:17 नवीन
झक्कास सगळे मिपाकर आले तर आनंदच होईल, शनिवार रविवार मी आहे तिथेच, हिंजेवाडीला असून सुद्धा माझा सरुटॉबाने कट्टा चुकला...किमान इथे तरी मिपाकरांशी ओळख होईल !
  • Log in or register to post comments
व
विनायक बेलापुरे Wed, 04/20/2011 - 07:01 नवीन
धन्यवाद मालोजी राजे , नक्की पाहणार.
  • Log in or register to post comments
अ
अमोल केळकर Wed, 04/20/2011 - 08:21 नवीन
छान माहिती अमोल केळकर
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 32 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 44 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    18 hours 48 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा