Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

खतखते

प
प्रभाकर पेठकर
Sun, 05/11/2008 - 10:51

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 51550 views

💬 प्रतिसाद
स
स्वाती राजेश Sun, 05/11/2008 - 11:42 नवीन
झटपट पाककृती आहे. सोपी सुद्धा दिसते. नक्की करून पाहीन.
  • Log in or register to post comments
र
रंगीला रतन Mon, 10/23/2023 - 16:43 नवीन
लै झ्याक...
  • Log in or register to post comments
र
रंगीला रतन Mon, 10/23/2023 - 16:44 नवीन
लै झ्याक...
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Sun, 05/11/2008 - 13:13 नवीन
सध्या इथे हवा चांगली असल्याने ताज्या भाज्या चांगल्या मिळत आहेत,तेव्हा आता खतखते करून पाहिन आणि तुम्हाला सांगेनच कसे झाले ते, स्वाती
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Sun, 05/11/2008 - 15:04 नवीन
तिरफळे इकडे अमेरिकेत मिळतात का ते माहीत नाही. त्याला इंग्रजीत काय म्हणतात? तिरफळे न घालताच 'खतखते' नीट होते का? होत असेल तर करुन बघावे म्हणतो. चतुरंग
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Sun, 05/11/2008 - 15:14 नवीन
तिरफळे इकडे अमेरिकेत मिळतात का ते माहीत नाही. बहुतेक मिळत नसावित. मिळत असली तर ती गुजराथी दुकानात मिळू शकतील. किंवा कुणा 'मासेखाऊ' दर्दी मित्राकडे (भारतातून आणलेली) मिळू शकतील असे वाटते. त्याला इंग्रजीत काय म्हणतात? कल्पना नाही. तिरफळे न घालताच 'खतखते' नीट होते का? होत असेल तर करुन बघावे म्हणतो. तिरफळे वगळून खतखते करता येईल पण ते एक काडी तुटलेल्या छत्री सारखे होईल. छत्रीचे काम तर करेल पण 'समाधान' मिळणार नाही.
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Sun, 05/11/2008 - 15:18 नवीन
तिरफळे वगळून खतखते करता येईल पण ते एक काडी तुटलेल्या छत्री सारखे होईल. छत्रीचे काम तर करेल पण 'समाधान' मिळणार नाही. आवडले, स्वाती
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Tue, 05/13/2008 - 05:27 नवीन
तिरफळाचा मिरमिरणारा वास हा एकदम मस्त वाटते. झक्कास. तसे तिरफळ हे जास्तकरून कोकणात वापरले जाते असे मला वाटते. विषेशतः मालवणी पदार्थात तिरफळ जास्त वापरले जाते. माझे वडील सांगतात कि पूर्वी कोकणात बांबूच्या नळीची बंदूक करून त्यातून हे तिरफळ मारले जायचे. जाम चरचरते म्हणे हे तिरफळ लागले की. असो . खतखते, माझ्या आजीने केलेले मी उदंड खाल्ले आहे. बघू आता परत भारतात गेलो परत की कोकणात जाऊन खाईन म्हणतो. :) पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
श
शितल Sun, 05/11/2008 - 15:20 नवीन
माझी आजी खतखते करत असे, त्या मध्ये जास्तकरून क॑द वर्गातील भाज्या॑चा वापर केला जात असे. पण मला त्या भाज्या॑ची नावे आठवत नाहीत. पण हे खतखते देखिल करून पहायला हवे.
  • Log in or register to post comments
र
रोचीन Mon, 05/12/2008 - 08:39 नवीन
म्हणजे मसाल्यांच्या पदार्थातीलच ना!!! का वेगळे असतात? यालाच त्रिफळा असेही म्हणतात का?? आमच्याकडे कधी वापरत नाही म्हणून म।हीत नाही. :(
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Wed, 05/14/2008 - 04:37 नवीन
म्हणजे मसाल्यांच्या पदार्थातीलच ना!!! होय. खाली चित्र दिले आहे. यालाच त्रिफळा असेही म्हणतात का?? नाही. त्रिफळा वेगळे. त्यात आवळा, बेहडा आणि अजून एक फळ असते. ही औषधी फळांची त्रयी आहे. आणि तिरफळ वेगळे ते एकच फळ असते. मसाल्यात वापरतात.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Wed, 05/14/2008 - 07:52 नवीन
आवळा + हिरडा + बेहडा = त्रिफळा. (अवांतर - रात्री कोमट पाण्याबरोबर घेतले तर सकाळी एकदम 'त्रिफळा'चीत! ;) ) चतुरंग
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Wed, 05/14/2008 - 10:11 नवीन
धन्यवाद श्री. चतुरंग.
  • Log in or register to post comments
र
रोचीन Tue, 06/17/2008 - 19:39 नवीन
चित्र आणि माहितीबद्दल!!! :) >>>>त्रिफळा वेगळे. त्यात आवळा, बेहडा आणि अजून एक फळ असते. ही औषधी फळांची त्रयी आहे. :) हे माहीत होते मला!! पण आमच्या इथे एका गुजराथी वाण्याच्या दुकानात याचे नाव त्रिफळा असे लिहीलेले आहे. म्हणून मला असे वाटले की तिरफळ हे त्रिफळा चा अपभ्रंश आहे. असो!! पुन्हा एकदा मनापसून धन्यवाद!!!!!!!!! :)
  • Log in or register to post comments
म
मनिष Mon, 05/12/2008 - 09:44 नवीन
तिरफळ काय असते?
  • Log in or register to post comments
ऋ
ऋचा Mon, 05/12/2008 - 10:11 नवीन
तिरफळ काय असते? त्याला दुसरं काही नाव आहे का??
  • Log in or register to post comments
र
रघुनाथ.केरकर गुरुवार, 07/28/2016 - 08:52 नवीन
हे वीषेशता मासे करताना वापरतात, तीरफळामुळे माश्यांना जो हीमुस (वैतस) वास येतो तो तीरफळाच्या वापराने येत नाही, आणी माश्याची कडी / तीकलं अधीक रुचकर होते. तीरफळाचे झाड सावरी च्या झाडा सारखे दीसते, पण खोडावर मगरीच्या पाठीसारखे काटे/टोके असतात. तीरफळImage removed. आंम्ही वर्षाला ५०० ते ८०० कीलो तिरफळ वीक्री करतो.
  • Log in or register to post comments
र
रघुनाथ.केरकर गुरुवार, 07/28/2016 - 14:07 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
स
सूड गुरुवार, 07/28/2016 - 14:15 नवीन
फारच विचित्र दिसतंय.
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश Mon, 05/12/2008 - 10:39 नवीन
तिरफळ हे गोवा,कारवार साइडला जास्त वापरतात. ते तपकिरी काळपट रंगाचे , बोरासारखे असते. त्याचे बी काढून टाकून फक्त वरचे कवच वापरतात. बी खूप कडू असते. तसेच याचे झाड कडलिंब (कडिपत्ता) सारखे असते. तिरफळ ही घड/गुच्छ सारखी असतात. अशीच बाजारात मिळतात. ते डायरेक्ट फोडणीत वापरत नाहीत तर ते शिजताना कालवणात टाकतात. चवीला, आणि वासाला खूप छान लागते. शेजारी कामतकुटुंब राहत असल्यामुळे ही माहिती आहे, तसेच ते मासे करताना याचा उपयोग करायच्या. मी मात्र कधी कधी आमटीत वापरते.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋचा Mon, 05/12/2008 - 10:41 नवीन
खूप छान माहीती दिलिस, धन्यवाद!!!
  • Log in or register to post comments
स
सुनील Mon, 05/12/2008 - 10:48 नवीन
तिरफळ काय असते? हाय कम्बख्त तुमने तिरफळ चखाही नही? वर स्वाती राजेश यांनी तिरफळाचे वर्णन केले आहेच. तिरफळाला इंग्रजीत शेझ्वान पेपर असे म्हणतात. टीप - तिरफळे घातलेल्या बांगड्याच्या आमटीला जगात तोड नाही (आणि दुर्दैवाने हे टंकण्याची पाळी माझ्यावर सोमवारी यावी, हा दैवदुर्विलास!! ). Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Mon, 05/12/2008 - 16:37 नवीन
तिरफळाला इंग्रजीत शेझ्वान पेपर असे म्हणतात. तुमचे म्हणणे बरोबर दिसते आहे. कारण चायनिज जेवणात शेझवान मध्ये तिरफळांचा वापर करतात.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Mon, 05/12/2008 - 16:56 नवीन
'तिरफळे' शोधायला हरकत नाही :) चतुरंग
  • Log in or register to post comments
ऋ
ऋचा Mon, 05/12/2008 - 11:13 नवीन
नही चखा तो क्या बच्चेकी जान लेगा क्या???? :W
  • Log in or register to post comments
म
मनिष Mon, 05/12/2008 - 11:41 नवीन
ह्यालाच 'भोकर' म्हणतात का? गुजराती लोणच्यांमधे खाल्लेले असेच एक फळ आठवते.
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Mon, 05/12/2008 - 16:32 नवीन
नाही. भोकरं वेगळी.
  • Log in or register to post comments
र
रुस्तम गुरुवार, 07/28/2016 - 16:00 नवीन
भोकर म्हणजे गुजरातीत गुंदा
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Mon, 05/12/2008 - 16:35 नवीन
Image removed. डाव्या बाजूची 'तिरफळं', उजव्या बाजूला त्यातील बिया. ह्या वापरत नाहीत. काढून फेकून द्यायच्या. दोन्ही कसे दिसते ह्याचा अंदाज यावा म्हणून बिया दाखविल्या आहेत.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Mon, 05/12/2008 - 16:58 नवीन
आता चायनीज स्टोअरमधे 'तिरफळे' म्हणजे नक्की काय शोधायचं हे पक्कं झालं! चतुरंग
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Tue, 05/13/2008 - 06:20 नवीन
आता चायनीज स्टोअरमधे 'तिरफळे' म्हणजे नक्की काय शोधायचं हे पक्कं झालं! चतुरंग, त्यापेक्षा मागा नं! आम्ही मित्र नाहीतर काय कामाचे? घरांत तिच्यायला, बाटल्या भरल्यांत तिरफळांच्या!!! प्रत्येक वर्षीच्या हंगामाची चव वेगवेगळी!! बाकी प्रभाकरजी, एक गोष्ट सांगायची विसरलांत या अनभिज्ञ जनांना!!:) तिरफळं ही चोखून टाकून द्यायची अस॑तात, ती चावून खायची नसतात! जीभ जर पोळून घ्यायची नसेल तर!!:)) अच्च गोंयकार, पिवळा डांबिस
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 05/13/2008 - 12:27 नवीन
काका, अहो कोणतीही नवीन गोष्ट शोधण्यात एक गंमत असते! :) आणि तरीही नाहीच गावली तर हक्काने मागून घेऊच की ;) चतुरंग
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Tue, 05/13/2008 - 14:05 नवीन
बिया फेकण्याऐवजी तिरफळाचे झाड लावले तर?
  • Log in or register to post comments
र
रघुनाथ.केरकर गुरुवार, 07/28/2016 - 08:56 नवीन
तिरफळाची झाडे स्वताहुन लावलेली मी तरी अजुन पाहीलेली नाहीयत, जी काही झाडे रानात आहेत / असतात ती अशीच रुजुन आलेली आहेत. कोकणात अशी झाडे लाउन त्यांचे संगोपन करण्याबाबत खुप उदासिनता होती. पण आता ती बदल्तेय. नर्सरी मध्ये तिरफळांच्या सीडलींग्ज विक्री साठी उप्लब्ध आहेत.
  • Log in or register to post comments
व
वरदा Mon, 05/12/2008 - 16:39 नवीन
हे तिरफळ काय असते ह्यावर संशोधन करावे म्हणते...भारतात गेल्यावर नक्की करुन पाहीन.... मला फक्त आळूचे फतफते माहीत आहे.. अवांतरः काय छान लागतं ना आळूचे फतफते ..मि इथे वडीच्या आळूचं करुन पाहीलं पण ते तिथल्या भाजिच्या आळूसारखं नाही लागत्...आणि फुकट दारात उगवलेलं तोडून भाजि करण्यातलि मजाच वेगळी.. ;)
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Tue, 05/13/2008 - 08:04 नवीन
हं,त्याची चव तर वेगळीच! अळूत डाळ,दाणे तर असतातच पण आमच्याकडे डाळिंब्या आणि ओले काजू घातलेले अळू करतात. वावा,बोटं चाटत खाल्लं जातं,:)
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Mon, 05/12/2008 - 18:40 नवीन
>>> काय छान लागतं ना आळूचे फतफते... वरदाताई, एकदम मोठ्ठा अनुमोदक तुम्हांला!! अळूच फतफतं शेंगदाणे घालून नाहीतर डाळ घालून........ आई गं, चांगल्या पदार्थांच्या आठवणी ते पदार्थ समोर नसताना आणि लगेच मिळायची शक्यताही नसताना काढू नयेत हेच खरं!! वाट पाहते फतफत्याची...... :W
  • Log in or register to post comments
व
विशाखा बहुलेकर Tue, 12/09/2008 - 15:31 नवीन
आळुच्या फतफत्यात चुक्याचि भाजी व मुळ्याचे तुकडे घातल्यास ती जास्त चान्गलि होते.
  • Log in or register to post comments
व
वरदा Mon, 05/12/2008 - 18:48 नवीन
शेंगदाणे, डाळ आणि मस्त नारळाचं दूध, चिंच गूळाची चव्..आहा!!!
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Mon, 05/12/2008 - 19:11 नवीन
>>> शेंगदाणे, डाळ आणि मस्त नारळाचं दूध, चिंच गूळाची चव्.. =P~
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 05/13/2008 - 05:31 नवीन
प्रभाकरशेठ, खतखतं एकदा खाऊन पाहिलं पाहिजे बर्रका! :) तात्या.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋचा Tue, 05/13/2008 - 07:25 नवीन
L) तिरफळ म्हणजे मला वाटतय की, जे लहानपणी आम्ही मुले "फटुक फळी" नावाचा १ खेळ खेळायचो त्यात जे फळ घातले जात असे ते. (जे खुपच जोरात लागते.)
  • Log in or register to post comments
व
वरदा Tue, 05/13/2008 - 15:05 नवीन
डाळिंब्या आणि ओले काजू घातलेले अळू पक्की कोकणी गं तू माझ्यासारखी....आता मला ते लाळ लाळ म्हणावसं वाट्टंय्.. नुसती ओल्या काजुची उसळ पण आठवतेय.. आईला सांगून ठेवलय आल्या आल्या माझ्यासाठी डाळिंब्या कर म्हणून....तात्यांनी तांदुळाच्या भाकरीचा फोटो टाकून चिडवलय ते वेगळच...
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Tue, 05/13/2008 - 20:01 नवीन
मी कालच केली होती डाळिंब्यांची उसळ,:) इथे जरा हवा बरी झाली आहे त्याचा फायदा घेऊन वाल भिजत घातले...एस्टिमेटेड टाईमपेक्षा १ दिवस जास्तच लागला मोड यायला,पण चलता है!
  • Log in or register to post comments
च
चकली Tue, 05/13/2008 - 19:55 नवीन
आज मि पा वर मेजवानी आहे. एका मागून एक .. चकली http://chakali.blogspot.com
  • Log in or register to post comments
स
सहज Wed, 05/14/2008 - 04:18 नवीन
करुन पाहीलेच पाहीजे असा पदार्थ. पेठकरकाकांच्या पाककौशल्याबरोबर फोटो काढायचे कसब देखील लई भारी. त्यांच्या प्रत्येक पदार्थाचे फोटो पाहून तोंडाला पाणी सुटते.
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Wed, 05/14/2008 - 04:33 नवीन
स्वाती राजेश, स्वाती दिनेश, चतुरंग, पुण्याचे पेशवे, शितल, रोचीन, मनिष, ॠचा, सुनिल, पिवळा डांबिस, मनस्वी, वरदा, यशोधरा, विसोबा खेचर, चकली, आणि सहज.... तुमच्या प्रतिसासादात्मक कौतुका बद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
  • Log in or register to post comments
व
वरदा Wed, 05/14/2008 - 16:32 नवीन
काका धन्यवाद वगैरे काय म्हणता? आम्हि तर शिकतोय तुमच्याकडून्....तुम्हाला धन्यवाद आम्हाला एवढ्या नवीन पा क्रु. सांगितल्याबद्दल.......
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Wed, 05/14/2008 - 19:25 नवीन
पेठकरबाब, तुका मोगाचो देवबरेकरूं. तुएं सांगले आसा तशे खतखते करचे म्हणता - हे शनवार-आयतारा. म्हजेकडे त्रफळां आसात, पुणून सुरण खंय मेळटा पळयचे पडतले.
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Mon, 05/19/2008 - 03:01 नवीन
रुच्चीक जाले.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 12 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 16 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 20 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा