Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
कलादालन

आयूष्य एक रंगभूमी....

ह
हर्षद प्रभुदेसाई
Mon, 03/14/2011 - 06:33
आयूष्याच्या ह्या रंगभूमीवरचे, आपण जणू एक कलाकारच असतो । आपापल्या परीने प्रत्येक जण, आपापली भूमिका ति बजावत असतो । प्रत्येक दीवस तो नवा प्रयोग ह्या, रंगमंच्यावर मांडत असतो । असंख्य अंकांतले विविध प्रवेश हे, आपण येथे साकारत असतो । कुणास जमतो-कुणास न जमतो, अभिनय येथे परी करावाच लागतो । दुःखात हसून डोळे हळूच पुसून, नाट्यमय देखावा उभाऱ्हावाच लागतो । कितीही लांबला जरी खेळहा तरी तो, शेवट त्याचा अपूल्या हातीच नसतो । खेळावेच लागते म्हणूनी खेळत राहणे, ह्या परी कोणता मग मार्गच नसतो । ह्या खेळाचा सुत्रधार तो, एकमेव हा देवच असतो । आपण फक्त जणू ताबेदार ते, हुकमावर त्याच्या नाचत असतो । तोच ठरवितो आपूली भूमिका, अन क्रमा-क्रमाने बदलत नेतो । शेवटी देउनी वृद्धपणा तो, आपूली रजाही मानूनी घेतो । हर्षद अ. प्रभुदेसाई......

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3193 views

💬 प्रतिसाद
ट
टारझन Mon, 03/14/2011 - 06:39 नवीन
आहो सगळी कला एकाच दिवशी सादर करताय काय ? एवढे कलेचे जुलाब उप्स कलेचे सुनामी बर्‍याच दिवसांनी पहायला मिळाले .. प्रसवा .. अजुन विसेक टाकले की पहिल्या पाणावर फक्त तुम्हीच :) बाकी सगळे फोटु बेस्ट आहेत , खालुन ६१ वा आणि वरुन ६२ वा तर केवळ अप्रतिम :) कोणत्या कॅमेर्‍याने काढले फोटू ? टेक्निकल डिटेल्स काय ? - हर्षवायु सोडुदेबाई
  • Log in or register to post comments
ह
हर्षद प्रभुदेसाई Mon, 03/14/2011 - 06:53 नवीन
खर तर माझ मि मराठी ह्या साइट वर देखील खात आहे... तिथे मि ह्या कविता सादर केल्या होत्या...गेले काही दीवस मी येथे खाते उघडायचा प्रयत्न करत होतो... खाते चालु होण्यास बरेच दिवस लागले....त्यामुले तिकडे प्रकाशीत केलेल्या सगल्या कविता मी येथे एकदम टाकल्या..... ते राहूदे पण कविता आवडल्याना.....मग झाल तर.....
  • Log in or register to post comments
ट
टारझन Mon, 03/14/2011 - 07:38 नवीन
खर तर माझ मि मराठी ह्या साइट वर देखील खात आहे...
होका ? मी तर गेली कित्येक वर्ष घरीच खात आहे. कधी मधी हॉटेलचे पण खात आहे .. :)
तिथे मि ह्या कविता सादर केल्या होत्या...गेले काही दीवस मी येथे खाते उघडायचा प्रयत्न करत होतो...
खुलाश्याबद्दल धन्यवाद . काय काय प्रयत्न केले ते खुलाशेवार येऊ द्यात :) नविन प्रयत्नार्थींना लाभ होईल ;)
खाते चालु होण्यास बरेच दिवस लागले....त्यामुले तिकडे प्रकाशीत केलेल्या सगल्या कविता मी येथे एकदम टाकल्या.....
अरे वा .. मस्तंच ... गेल्या जन्मीही काही कविता खंड पाडले असतील तर ते ही येऊ द्यात .. सगळेच आवडतील ह्यात काही शंकाच नाही ... तुम्ही खरंच बोल्ड कवी आहात .. तुमचा बोल्डनेस आवडला मला :) प्लेबॉय साठी पण कविता लिहीता का तुम्ही ? :)
  • Log in or register to post comments
न
नन्दादीप Mon, 03/14/2011 - 06:54 नवीन
डोंबिवलीत सुनामी आली की काय?? तुम्ही एक्दम काव्यविभागातून कलादालनात येवून पडलात म्हणून बोल्लो. बाकी टारूभाऊ शी सहमत.....>>बाकी सगळे फोटु बेस्ट आहेत , खालुन ६१ वा आणि वरुन ६२ वा तर केवळ अप्रतिम Smile कोणत्या कॅमेर्‍याने काढले फोटू ? टेक्निकल डिटेल्स काय ? >> यापुढे मी तर म्हणेन की पहिलाच फटू चान आहे. कोणता कॅमेरा वापरता हो तुम्ही???
  • Log in or register to post comments
स
स्वानन्द Tue, 03/15/2011 - 17:10 नवीन
छान कविता. अवांतरः कविता टाकण्यासाठी काव्य ( छंदशास्त्र / जे न देखे रवी ) विभाग आहे. 'कलादालन' हा विभाग चित्रे, रेखाटने, छायाचित्रे यासाठी वापरा.
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Wed, 03/16/2011 - 03:05 नवीन
कलादालनाचे चित्रकलादालन असे नामकरण केले जावे अशी माझी नम्र सूचना आहे.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 24 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 28 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 31 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा