Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
कलादालन

कोसळत्या सरींचा राजमाची

ज
जातीवंत भटका
गुरुवार, 03/10/2011 - 08:06
कोसळत्या सरींचा राजमाची शनिवार रविवार राजमाची !!! म्हणताच ब-याच मंडळींची नावे आली होती पण त्यातले १३ मावळेच शब्दाला जागले होते त्यात मी, लकी प्रशांत, राहूल-वसुधा(दांपत्य), शितल जाधव, श्रीकांत, अभिजीत अशा जुन्या मंडळींसोबत विजया, अश्विनी, प्रसाद, महेश आणि शितल ( नावावर जाऊ नका हा मुलगा आहे ) अशी नवी मंडळीही होती. पहाटे ६.३० ची लोकल पकडून लोणावळा गाठायचे असे ठरविले होते. पण कुंभकर्ण लकी आणि दरवेळी उशीर करण्यात पटाईत असलेला प्रशांत यांच्यामुळे ६.३० आणि ८.०५ या दोन्ही लोकल गमावून आम्ही लाल डब्याला शरण गेलो. ८.४० ची फ़लटण-मुंबई गाडी पकडून १०.३० ला लोणावळ्यात पोहोचलो. एस.टी. स्टॅंडवरच नाश्ता उरकून तुंगार्ली धरणाची वाट धरली. पुण्यातूनच पावसाला सुरुवात झाली होती आणि त्याचा जोर वाढतच चालला होता. कंटाळवाणा डांबरी रस्ता संपून एकदाची तुंगार्लीची भिंत लागली. सुट्टीचा दिवस असल्याने धरणावर बरेच पर्यटक दिसत होते. आमच्या सोबत राजमाचीकडे जाणारेही बरेच लोक होते. धरणाच्या आसपासची रिसॉर्ट्स सोडून आम्ही पुढे निघालो आणि मला आमच्याच लोकांचा आरडाओरडा ऐकू आला. मागे बघतो तर मिस. शितल आणि प्रशांत अक्षरशा: लहान मुलांसारखे रस्त्यांवरच्या डबक्यातलं चिखलपाणी एकमेकांच्या आणि इतरांच्याही अंगावर उडवत होते. उगीच त्यांना खोटाखोटा रागावून मी आपली दादागिरी सिध्द करायचा प्रयत्न करताच त्या दोघांनी माझ्या अंगावरही यथेच्छ चिखल उडवला.थोड्या वेळाने अश्विनीही त्यांना सामील झाली. राजमाचीकडे जाणारी ती ओली पायवाट धुक्याची दुलई पांघरून बसली होती. पाऊस मन मानेल तसा कोसळत होता. एखाद्या वा-याच्या झोताबरोबर धुके बाजूला होताच खंडाळ्याच्या बाजूच्या दरीचे विहंगम दृश्य मनाला भुरळ घालत होतं. याच ठिकाणी कायमचे वास्तव्यास यावे असे राहून राहून वाटत होते. गो.नि.दां.च्या प्रसिध्द झालेल्या "माचीवरला बुधा" कादंबरीतील संदर्भ डोळ्यासमोरून सरकत होते. त्या कादंबरीचा नायक बुधा अचानक समोर आला तर ??? असा पुसटसा विचार मनाला चाटून गेला आणि कथेचा शेवट आठवताच अंगावर शहारे आले. कादंबरीतून परत वास्तवात आलो आणि मुकाट पायाखालची वाट तुडवू लागलो. जाताना लागणारा छोटासा घाट उतरल्यावर डाव्या हाताला एक सुंदर धबधबा लागला. लगेचच सगळे त्या दिशेने धावात निघाले. ब-याच प्रयत्नांने मी त्यांना, पुढे अजून सुंदर जागा आहेत !! असे सांगून पुढे दामटले. थोडी नाराजी व्यक्त करून जनता पुढे निघाली. त्यानंतर येणा-या प्रत्येक धबधब्याला आणि ओढ्याला त्यांनी "अमोल ~!! अमोल ~!!" अशा आरोळ्या देत माझाविरूध्द निषेध नोंदवला. राहूल आणि वसुधा हे दांपत्य आपल्याच नादात मागे मागे रेंगाळत होतं. त्यामुळे सगळ्यांना क्षणभर का होईना पण विश्रांती मिळत होती. राजमाचीहून दिसणारा प्रसिध्द कातळधार धबधबा जिथून सुरु होतो त्याजागी आम्ही पोहोचलो. तिथल्याच एकुल्या टपरीत चहा घेऊन पुढे निघालो. पावसाने सगळ्यांना झोडपून काढायच ठरवलं होतं बहुदा, त्याचा जोर वाढतच चालला होता. त्या धुकट आसमंतात हिरव्या रंगाची झालेली मुक्त उधळण डोळ्यांचे पारणे फ़ेडत होती.वाटेत एक मोठ्ठा ओढा आडवा आला. यावेळेस मात्र मी कोणाला थांबवायचे धाडस केले नाही, नाहीतर या जनतेने मला हाणून काढले असते. लकी, प्रशांत, श्रीकांत, मिस. शितल, शितल्या आणि दांपत्य खांद्यावरच्या सॅक टाकून पाण्यात पळाले. एकमेकांच्या अंगावर यथेच्छ पाणी उडवून झाल्यावर मंडळी पुढचं मार्गक्रमण करु लागली . वाटेत लागणारे अगणित ओढे आणि धबधबे एखाद्या मोहजालाप्रमाणे आम्हाला खुणावत होते पण उधेवाडीत वेळेत पोहोचायचे होते त्यामुळे आम्ही त्यास बळी न पडता आम्ही उधेवाडीकडे सरकत होतो. विजया आणि वसुधा दर पंधरा मिनिटांनी "अजून किती राहीलं आहे ??" असा प्रश्न विचारीत होत्या आणि मी त्यांना "आता आलंच .... पंधरा मिनिटात ...." हे माझं ठरलेलं उत्तर देत होतो. अखेरीस साडेचार तासांनी उधेवाडीची वेस आली आणि महिला मंडळाचा जीव भांड्यात पडला. आता मात्र पावसाने चांगलाच जोर धरला होता. तोंडावर तर अक्षरशा: असंख्य सुया टोचल्याचा भास होत होता. शेवटच्या टप्प्यात असलेला चिखलाचा डोह पार करून आम्ही जिथून कातळधार धबधबा दिसतो त्या ठिकाणी आलो. थोडं पुढं जाताच तो मनोहारी धबधबा आपले रौद्ररुप दाखवत होता. तिथल्याच टपरीवरच्या उंबरेंकडुन कळालं की आम्ही किती भाग्यवान आहोत ते !!! सकाळ्पासून सुमारे १५०-२०० लोकं इथून गेली होती पण दरीत साठलेल्या धुक्यामुळे कोणालाच त्या धबधब्याचे दर्शन झाले नव्हते. याच कातळधार धबधब्याचा मागल्या वर्षी काढलेला फोटॉ. तिथे थोडे फोटो काढून आम्ही तुकाराम उंबरेच्या घराचा मार्ग धरला. अरे हो सांगायचे राहीले .... या उधेवाडीत उंबरे कुटुंबीयांची संख्या लक्षणीय आहे. दरवेळेस मी ज्या तुकाराम उंबरेकडे उतरतो त्याला मी पुण्यातूनच फ़ोनकरून आगाऊ कल्पना दिली होती त्यामुळे आमचा राहण्याचा अणि जेवणाचा प्रश्न मिटला होता. मुक्कामी पोहोचण्यास नियोजित वेळेपेक्षा उशिर झाला होता म्हणून मनरंजन बालेकिल्ला पहायचा बेत आम्ही रद्द केला. उधेवाडीतून दिसणारा धुक्याची गोधडी पांघरलेला मनरंजन बालेकिल्ला. सलग ५ तास चालून मंडळी भलतीच दमली होती. अंगावरचे ओले कपडे बदलून आम्ही जेवण उरकले आणि फ़ावला वेळ सत्कारणी लावण्यासाठी "डम्ब शेराज" चा खेळ सुरु झाला. जनतेची दोन टिम मधे विभागणी झाली. आणि एकेकाची एक्टींग पहाता पहाता सगळे हसून हसून गडाबडा लोळत होते. प्रशांतने तर उच्छाद मांडला होता. त्याच्या मते तो एक्टींगचा बादशहा होता !! त्याच्या या वाक्यावर परत लोक पोट धरधरून हसले. तेवढ्यात तुकारामच्या भावाने आमची जेवणाची ताटं लावायला घेतली. गरम गरम तांदळाच्या भाकरी, भाजी, आमटी-भात आणि पापड असा भन्नाट मेनू होता. यथेच्छ हादडी झाल्या मंडळी पेंगू लागली होती. तरी अंताक्षरीचा मोह काही जणांना आवरता आला नाही आणि मग रात्री २ पर्यंत गाण्यांची मैफ़िल रंगली होती.शेवटी मी थोडा दम भरल्यावर सगळी शांत झाली. सकाळी सात वाजता पोटोबाला चहा पोह्यांचा नैवेद्य देऊन आम्ही श्रीवर्धनकडे निघालो. वाटेतल्या गुहा पाहून भैरोबाच्या मंदीरापाशी आलो. दर्शन घेउन श्रीवर्धनच्या पाय-यांकडे सरकलो. महादरवाज्यातून आत शिरताच समोरच्या पायवाटेवर चांगलं ३ फ़ुट खोल आणि जवळ्पास २० फ़ुट लांब पाण्याचा चर तयार झाला होता. तो पार करुन आम्ही किल्ल्याच्या सर्वोच्च भागावर गेलो पण दुर्दैव !! सगळीकडे दाट धुकं आणि मुसळधार पाऊस असल्यामुळे आम्हाला काहीच दिसत नव्हते. वरुणराजाला साकडं घातल्यावर आमच्या मनाची होणारी तगमग त्याला कळाली असावी. पावसाचा जोर थोडा ओसरला आणि समोरच्या दरीवर दाटलेली धुक्याची दाट साय हलकेच बाजूला गेली. क्षणार्धात कॅमे-यांचा क्लिकक्लिकाट झाला आणि परत ती दरी धुक्याने माखली. मिळालेल्या एक दोन फोटोवर समाधान आणि त्याबद्दल वरूणराजाचे आभार मानत उधेवाडीकडे उतरू लागलो. श्रीवर्धनहून दिसणारे भैरवाचे राऊळ.. श्रीवर्धनहून दिसणारा कातळधार धबधबा आणि टेहाळणी बुरुज.. गेला दिड दिवस आम्ही राजमाचीच्या कुशीत होतो. वेळ कसा गेला कळालेसुध्दा नाही. परतायची इच्छा नसतानाही चाकरमानी पावले सिमेंटच्या जंगलाकडे चालू लागली. लोकलमधून परत येताना डोळ्यासमोर पुन्हा पुन्हा राजमाचीच्या आठवणी नाचत होत्या. दरवर्षी प्रमाणे यंदाच्याही राजमाची ट्रेकने धम्माल आणली होती आणि यावेळेसही माचीवरला बुधा भेटेल ही माझी वेडी इच्छा अपुर्णच राहीली .... --- जातीवंत भटका

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 15495 views

💬 प्रतिसाद
प
प्राजु गुरुवार, 03/10/2011 - 22:36 नवीन
अशक्य फोटो आणि वर्णन!!! असेच फिरत रहा दर्‍या खोर्‍यातून! :)
  • Log in or register to post comments
ध
धनंजय गुरुवार, 03/10/2011 - 23:16 नवीन
आणि निषेध म्हणून कथन वाचले नाही. फारच छान!
  • Log in or register to post comments
र
रेवती गुरुवार, 03/10/2011 - 23:23 नवीन
अग्ग्ग्ग्ग! काय ते सुंदर फोटू आणि भन्नाट वर्णन. सगळ्यात क्युट फोटो आहे तो वरून दिसणार्‍या देवळाचा! गडाच्या पायथ्याची असलेली छोटी छोटी गावे अतिषय सुंदर दिसतात एवढेच पूर्वी वाटायचे. त्या गावांची जमीन कोणता बिल्डर कधी विकत घेइल अशी आता भीती वाटत राहते.
  • Log in or register to post comments
व
वपाडाव Fri, 03/11/2011 - 05:36 नवीन
त्या गावांची जमीन कोणता बिल्डर कधी विकत घेइल अशी आता भीती वाटत राहते.
हे असं लिहुन त्यांच्या विचारांना खत-पाणी घालायचे का जा. भ. सारखे नेहेमी नेहेमी तिथे जाउन (५-२५ जण सोबत घेउन) लोकांमध्ये जागृती घडवुन आणायची. -आपल्या मिपावर वावरत असलेल्या, बिल्डरांकडे काम करणार्या वर्गाची क्षमा मागुन हे वरचं वाक्य जा. भ. नी चमुचा ठरलेला प्लॅन आम्हाला कळविण्यासाठी.
  • Log in or register to post comments
ज
जातीवंत भटका Fri, 03/11/2011 - 07:07 नवीन
रेवती ,वपाडाव प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद !! आपल्याला वाटणारी भिती सार्थ आहे, पण याच साठी आपण सर्वांनी गावागावात जनजागृती केली पाहीजे, वपाडावशी सहमत. आम्ही हे काम सुरु केले आहे. तिकोना आणि आसपासच्या परिसरात. वपाडाव : आपण सारे मिपाकर मिळूनच प्लॅन करुयात :)
  • Log in or register to post comments
व
वपाडाव Fri, 03/11/2011 - 09:48 नवीन
तुंग, तिकोना अन कोराईगड ५ वर्षांपुर्वी केले होते. सहारा अ‍ॅम्बी वॅली विकसित झालिये तिकडे. स्तुत्य उपक्रम. हे नाव इथे घेता येत नाही. ;)
  • Log in or register to post comments
न
निनाद Fri, 03/11/2011 - 00:14 नवीन
सुंदर फोटो, मस्त वर्णन भटक्या ही एक झकास भटकंती! नेहमीचीच विनंती - चित्रे विकी ला द्याल काय? तेथे नेमक्या लेखात दिलीत तर अजून उत्तम!
  • Log in or register to post comments
ब
बहुगुणी Fri, 03/11/2011 - 00:49 नवीन
सर्व सुयोग्य विशेषणं वर आलेलीच आहेत, लिखाण आणि प्रकाशचित्रे दोन्ही पुन्हा-पुन्हा निरखावीत अशी. विमुक्त यांनी इथेच टाकलेला राजमाचीचा सचित्र वृत्तांत आठवला....ते ही उत्तम भटकंती-विषयक लिखाण करीत असत, हल्ली बर्‍याच दिवसांत त्यांचं काही लिखाण वाचल्याचं आठवत नाही....
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Fri, 03/11/2011 - 03:53 नवीन
अत्यंत सुंदर! डोळ्याचे पारणे फिटले आणि तिथे जाऊन आल्याच्या आनंदाची पुनरानुभूति मिळाली.
  • Log in or register to post comments
स
सुहास.. Fri, 03/11/2011 - 04:12 नवीन
झक्कास !!
  • Log in or register to post comments
प
प्रभू-प्रसाद Fri, 03/11/2011 - 04:37 नवीन
फोटो आणि लिखान फारच छान आहे. प्र्स्तुत स्थळाला भेट देऊ न शक्ल्याने पाहुनच दुधाची तहान ताकावर भागवित आहे. असेच सुन्दर लिहीत चला.
  • Log in or register to post comments
स
स्पा Fri, 03/11/2011 - 05:09 नवीन
अतिशय अप्रतिम फोटू एकदम गारेगार वाटलं :D
  • Log in or register to post comments
च
चिगो Fri, 03/11/2011 - 06:30 नवीन
सुंदर जागा, सुपर्ब फोटोज आणि झक्कास वर्णन... स्वॉलिड कॉम्बीनेशन आहात राव तुम्ही.. भटका मस्त. आम्हाला बसल्या जागी खैरात मिळतेय.. :-)
  • Log in or register to post comments
ह
हरिप्रिया_ Fri, 03/11/2011 - 07:07 नवीन
:) मस्त फोटो..मस्त लेख.. मस्त जागा..मस्त वेळ.. सगळच अफलातून आहे..
  • Log in or register to post comments
ब
बबलु Fri, 03/11/2011 - 07:34 नवीन
अप्रतिम !! वर्णन आणि फोटोज... दोन्हीही. १० वर्षांपूर्वीचे दिवस आठवले.
  • Log in or register to post comments
न
नि३सोलपुरकर Fri, 03/11/2011 - 07:37 नवीन
केवळ अप्रतिम.. पुडच्या ट्रेकच्या आवतानाची वाट पाहतोय..
  • Log in or register to post comments
न
नि३सोलपुरकर Fri, 03/11/2011 - 07:37 नवीन
केवळ अप्रतिम.. पुडच्या ट्रेकच्या आवतानाची वाट पाहतोय..
  • Log in or register to post comments
र
राघव Fri, 03/11/2011 - 10:11 नवीन
खूप आवडले. :) राघव
  • Log in or register to post comments
प
पप्पू Fri, 03/11/2011 - 12:06 नवीन
व्वा रे पठ्ठे आम्ही नक्की जाऊ
  • Log in or register to post comments
म
मितान Fri, 03/11/2011 - 13:10 नवीन
अप्रतिम फोटो :) गारेगार वाटलं एकदम ! :) फोटोवर वॉटरमार्क नक्की टाक.
  • Log in or register to post comments
प
प्राजक्ता पवार Fri, 03/11/2011 - 13:55 नवीन
सुरेख वर्णन व अप्रतिम फोटो. खुप आवडले.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा गुरुवार, 05/17/2012 - 15:40 नवीन
म हा न!!
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 49 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    19 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    19 hours ago
  • सुंदर !!
    19 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    19 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा