Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

बंगलोर मिसळपाव ओसरी-द्वितीय सत्र.

अ
अभिज्ञ
Tue, 05/06/2008 - 16:05
🗣 17 प्रतिसाद

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 7642 views

🗣 चर्चा (17)
आ
आंबोळी Tue, 05/06/2008 - 16:26 नवीन
यावेळी न चुकता फोटु काढा आणि मिपावर चढवा..... तुमच्या ओसरीला आमच्या शुभेछ्छा...... अवांतर : तेवढ मोटार नियामक कायदा १९८५ चे (कार्यक्रम झाल्यानंतरही)लक्षात आसुद्या म्हंजे झाले.
  • Log in or register to post comments
स
स्वयंभू (verified= न पडताळणी केलेला) Tue, 05/06/2008 - 16:38 नवीन
मी आहेच बैठकीला 8} (स्वगत -महाराष्ट्र ते बंगलोर अंतर व प्रवासखर्च पाहता,पुण्या/मुंबईत "बसणे "स्वस्तात होइल हे सांगणे न लगे ) असं आम्हाला अंडरएस्टीमेट नका करू अबब राव. मुंबई / पुणे ते बँगलोर प्रवासखर्चा पेक्षा जास्त बिल करून दाखवलं तर ह्यावेळीही बिल तुम्हीच भरणार का? बोला लावता पैज? अवांतर - डॉन्या मेल्या तुझ्या भरवशावर पैजे लावतोय रे. ऐन वेळी भरवशाच्या म्हशीचा टोणगा नको होउस. वाटल्यास हा आठवडा उपास कर :D आपला, ऍडी जोशी ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/
  • Log in or register to post comments
म
मानस Tue, 05/06/2008 - 16:47 नवीन
बंगलोर मिसळपाव ओसरीस अनेक शुभेच्छा ................ बाकी तो कायदा "मोटर व्हेईकल ऍक्ट १९८८, कलम १८५" असा आहे बहुतेक. आपले तात्याच नकी सांगतील................... ;) (ह.घ्या)
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Tue, 05/06/2008 - 16:52 नवीन
इथं तर "अबबरावांनी " समदं जाव्हीर करून टाकलं ... स्वयंभूची तर वेगळीच तयारी चाललेली आहे, तरिपण "फिकर नॉट" भाउ [ भय्या म्हणजे आजकाल शिवी समजतात ] आपण एकदम तंदुरूस्त आहे [ तंदुरूस्त : तंदुरी खाण्यास दुरुस्त ] >>वाटल्यास हा आठवडा उपास कर ... कसला उपास भाउ, मागच्या आठवड्यात कशी लागली होती ते माहित आहे ना ? च्यायला अफाट जागरणं, बेफाट खाणं;पिणं;फुकणं , त्यात शनिवारी बघितलेली "चेन्नास्वामी वरची बेंगलोर वि. हैद्राबाद मॅच , त्यात प्रेक्षकातल्या सुंदर्‍या व मोहक चिअरलीडर्स्स यांना साक्षी ठेउन घातलेला धिंगाणा ह्यामुळे तब्येतीचा पार बॅन्ड वाजला होता. घसा तर कामचं देईना ... पण आता ठीक आहे, होउन जाउ दे तिच्यायला .... >>ओसरी वर होणा-या कार्यक्रमांची रुपरेषा छोटा डॉन हे लवकरच जाहीर करतील. अरे बापरे, म्हणाजे तुमच्या मनात नक्की आहे तरी काय ? बाकीचे डिटेल्स सवडीने [ च्यायला ह्या कामाच्या लोड मुळे १० मिनीटे लोडला टेकून झोपायची सोय राहिली नाही. च्यायला कंपनी आहे का सोंग ? ] आंबोळीशेठ, बाकी ते फोटोचं ह्यावेळी नक्की ... स्वगत : आता शुक्रवारी संध्याकाळी म्हणजे हापीसला कहीतरी चाट मारावी लागणार मिसळपाव दक्षिण भारत दिग्विजय आणि उत्कर्ष समिती,बंगलोर. अध्यक्ष- छोटा डॉन. [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Tue, 05/06/2008 - 16:57 नवीन
बंगलोर मिसळपाव ओसरीस शरीराने जमणार नसले तरी मनाने नक्कीच हजर राहू. अनेक शुभेच्छा...!
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 05/06/2008 - 20:36 नवीन
मिसळपाव दक्षिण भारत दिग्विजय आणि उत्कर्ष समिती,बंगलोर आयोजित "बंगलोर मिसळपाव ओसरी-द्वितीय सत्र" ला अनेकानेक शुभेच्छा! यावेळेस फोटू पाहायला मिळतील अशी आशा करतो... मिसळधर्म वाढावा हीच इच्छा! कार्यक्रमाला येणा-या मि.पा.करांनि "कार्यक्रम" झाल्यावर जाताना स्वतः वाहन चालवायचा धोका पत्करु नये. पहा मोटार नियामक कायदा १९८५.त्याकरीता खाजगी वाहन वापरावे.रिक्षा वा टॅक्सी....अर्थातच स्वखर्चाने,हयाचि नोंद घावी तेवढं मात्र सांभाळा रे बाबांनो. अलिकडेच केल्या गेलेल्या काही बदलांनुसार आता कलम १८५ अंतर्गत केलेला गुन्हा हा 'अ-जामिनपात्र' ठरवण्यात आलेला गुन्हा आहे. जजसाहेबांनी नुसता दंड ठोठावून सोडून दिलं तर ठीक, नायतर जेलमध्ये जावं लागेल, जामिनही मिळणार नाही! :) असो, बंगळूर मिपा ओसरीस पुन्हा एकदा शुभकामना.. तात्या.
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Wed, 05/07/2008 - 07:22 नवीन
मिसळपाव दक्षिण भारत दिग्विजय आणि उत्कर्ष समिती,बंगलोर.
अरे काय नाव आहे का चेष्टा? आयला, त्या डुलकीकाढ्या देवेगौडाला आणि त्याच्या चंबू लेकराला हे कळालं तर दोघं लुंग्या सावरत धडाधडा पळत सुटतील की.... शाब्बास रे वाघरांनो...दक्षिण भारत दिग्विजय.... खल्लास!!! लै च आवडलं आपल्याला. धुमाकूळ घाला...मजा करा...मिसळपावी मरहट्टी ताकद दाखवून द्या.... आणि फोटू मुख्य कार्यक्रम सुरु करण्यापुर्वी काढा...नाहीतर लेको नेहमीची कारणं द्याल...'क्यामेरा थरथरत होता', 'थिथल्या वेटराला लकवा झाला होता' इ.इ. ;)
मोटार नियामक कायदा १९८५.त्याकरीता खाजगी वाहन वापरावे.
फोनाफोनी करुन 'पार्वतीपुरम्' मध्ये काही सेटींग लाऊन ठेऊ का? म्हणजे काही लफडी व्हायची नाहीत...;) मिपा बेंगलोर ओसरी ला हार्दिक शुभेच्छा !!!!
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Wed, 05/07/2008 - 08:11 नवीन
पेठकर म्हणतात त्याप्रमाणे मनाने नक्कीच ओसरीत असू..कट्ट्याला भरपूर शुभेच्छा! भारतात पुण्यनगरीत आणि बंगरुळात कट्टे,ओसर्‍या नुसते भरभरुन वाहत आहेत,:-) म्हणून मग आम्हीही स्फूर्ती घेऊन जर्मनीतील 'बिगंसे' ह्या निसर्गरम्य तरुतळी शनिवारी ३ मे रोजी एक मायक्रो कट्टा भरवला.कट्ट्याला ३ मिपाकर- स्वाती दिनेश,दिनेश आणि लिखाळ हजर होते.सोबत सौ.लिखाळ आणि सौ.नीता व श्री.विपिन चिंचाळकर आणि कुमार निखिल हे अमिपाकरही होते.लवकरच ते ही मिपाकर होतील..:) कट्टा उत्तमच झाला हे वेसांनल. स्वाती
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Wed, 05/07/2008 - 08:48 नवीन
अरेच्च्या... स्वातीताई, मग कट्ट्याचा वृत्तांत द्या ना!
मायक्रो कट्टा भरवला.
:D
सौ.नीता व श्री.विपिन चिंचाळकर आणि कुमार निखिल हे अमिपाकरही होते.लवकरच ते ही मिपाकर होतील..
वा वा वा!! मिसळपाव मस्तकी धरावा | मिसळपावधर्म वाढवावा| हल्लकल्लोळ माजवावा| तिन्ही लोकी| ह्या उक्तिला जागता आहात की ! अभिनंदन!
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 05/11/2008 - 10:21 नवीन
स्वाती, तुम्हा सर्व जर्मन कट्टेकरींचे मनापासून अभिनंदन... आज जगभर मिपाचे कट्टे भरत आहेत याचे संत तात्याबांना समाधान आहे. मिसळपावधर्माचा जगभर प्रसार हे त्यांचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरत आहे त्यामुळे ते आता सुखाने समाधी घेतील. आपला, संत तात्याबा महाराज.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Wed, 05/07/2008 - 17:34 नवीन
आणि ते जरा फोटू गिटू टाकायचं बगा की हो ह्या वेळी! नाहीतर बसाल सगळे सुंब होऊन, म्हणतो मी! ;)) चतुरंग
  • Log in or register to post comments
झ
झकासराव Wed, 05/07/2008 - 19:53 नवीन
शुभेच्छा! जरा पुण्याच्या दिशेने एक नजर टाका आणि आमच्या शुभेच्छा घ्या :)
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या Wed, 05/07/2008 - 22:06 नवीन
आमच्याही! अवांतर - डानराव, फोटो काढा. अतिअवांतर - फोटो मिपाकरांचेच काढा. अतिअतिअवांतर - कट्टा झाल्यावर रिक्षा करा अन् गपगार घरी जावा (स्वत:च्याच). मायक्रो अवांतर - जर्मनीनंतर पुढचा लंबर यु.के.चा! कोण कोण हाये यु.के. मध्ये? माताय ह्या राणीच्या देशात कट्टा भरवुयात अन् महाराष्ट्र (अन् पर्यायाने मिपा) धर्म वाढवुयात! - (सुचनांकित) टिंग्या :)
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार गुरुवार, 05/08/2008 - 10:55 नवीन
टिंग्या, :$ लेका आपण राणिच्या देशात केलेल्या मिनीमायक्रो कट्ट्याचा कुणाला पत्याबी नाही लागला :> .. कसे.. दे टाळी.. =D> (मिनीमायक्रो कट्टेवाला)केशवसुमार :B
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या गुरुवार, 05/08/2008 - 21:28 नवीन
केसुशेठ, :$ तो आपला शिक्रेट कट्टा होता ना! आपलं शिक्रेट फोडलं राव तुम्ही......... #o असो, कदाचित तो मिपाचा सातासमुद्रापार पहिला 'अनधिकृत' 'मायक्रो-मिनी' कट्टा असावा! ;) अवांतर - आठवतयं का? कट्ट्याच्या नावाखाली आपण लंडनभर उगाच बोंबलत हिंडत होतो :D (दुसरा मिनीमायक्रो कट्टेवाला) टिंग्या :B
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन गुरुवार, 05/08/2008 - 12:40 नवीन
आता अबबरावांनी येत्या शनिवारी ओसरी जमवायचे मनी योजले आहे त्याला तिढा घालायला खरच मनापासून वाईट वाटत आहे पण सद्य परिस्थीतीची जाणीव करून देणे मी महत्वाचे समजतो ... ह्या "शनिवारी" आमच्या भागातील म्हणजे जवळपास बेंगलोरच्या ४० % भागात "कर्नाटका विधानसभा मतदार संघात" निवडणूकीसाठी मतदान आहे. माननीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार मतदानाच्या "आदल्या, मतदानादिवशी व दुसर्‍या [कदाचित] दिवशी " त्या भागात "दारूबंदी " असते. आज मी केलेल्या सर्वेक्षणात [ म्हणजे काय मला सकाळ सकाळ लावायची सवय नाही, तरीपण चहा पिताना सकाळी दुकान बंद दिसले व मी चौकशी केली ] या तत्वाचे काटेकोर पालन होत असल्याचे मला आढळून आले. म्हणजे अजून २ दिवस नक्की दारूबंदी ... तर आता आपल्यासमोर ३ पर्याय आहेत १. ओसरीचा कार्यक्रम पुढे ढकलणे २. शाकाहारी [ विना दारू /मटन/ मच्छी ] ओसरी साजरी करणे. ३. दारूची सेटिंग होउ शकते पण रिस्क आहे, आपली तयारी आह का ? झाला तर पोलीसांशी पंगा होउ शकतो ...... कदाचित ह्यालाच "डेव्हिल्स अलटरनेटीव्ह" म्हणतात ..... माझ्या ह्या मुद्द्यावर समस्त मिपाकरांची मते जाणून घ्यायला मला आवडेल .... त्यानुसार बाकी आखणी करतो .... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
स
स्वयंभू (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 05/08/2008 - 13:08 नवीन
अरे आपली बैठक शुक्रवारी आहे. टेंशन नको घेउस. फार तर १२ च्या आत संपवावे लागेल. पण त्याची भरपई आपण लवकर सुरुवात करून करू चकतो :D आपला, ऍडी जोशी ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 43 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 55 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    18 hours 59 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    19 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा