Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

आरक्षण!

अ
अजिंक्य
Fri, 05/02/2008 - 07:52
🗣 88 प्रतिसाद

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 43452 views

🗣 चर्चा (88)
प
प्रकाश घाटपांडे Sat, 05/03/2008 - 10:00 नवीन
आरक्षण हे प्रवेश, नोकरीत नियुक्ती, बढती या वेळी प्रामुख्याने महत्वाचा रोल करते. येथील चर्चेत सुद्धा प्रवेश हा घटक कळीचा ठरलेला दिसतो. या बाबत आरक्षणाला न्याय्य पर्याय हा राजीव साने यांचा ६/६/२००६ च्या लोकसत्तातील लेख वाचण्यासारखा आहे. आरक्षणाच्या राजकारणातूनच मला पोलिस बिनतारी विभागातून अकाली स्वेच्छा निवृत्ती घ्यावीशी वाटली. तरी देखील मी हा विद्रोह क्षम्य मानतो. विवेकवादी चळवळीतील टी बी खिलारे हे माझे मित्र आजच्या सुधारक च्या 'जात आरक्षण' विशेषांकाचे अतिथि संपादक आहेत. प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
ड
डॉ.प्रसाद दाढे Sat, 05/03/2008 - 11:04 नवीन
विरोध फक्त आरक्षणाच्या राजकारणाला असावा. सहमत
  • Log in or register to post comments
म
मन Sat, 05/03/2008 - 13:12 नवीन
इथं काहिच (थेट)न बोलता बरीच कमेंट केलिए. मानलं बुवा ह्यांना. आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)
  • Log in or register to post comments
अ
अजिंक्य Sat, 05/03/2008 - 15:26 नवीन
हे जे चर्चेचं गुर्‍हाळ चालू आहे, त्यातून मलातरी असंच निष्पन्न होतंय की - १) आरक्षणाला विरोध नसावा, तर त्यामुळे होणार्‍या राजकारणाला असावा. २) आरक्षण हे फक्त शैक्षणिकच नव्हे, तर अनेक प्रकारचे असू शकते. त्या सर्वच बाबतीत पहिली अट लागू होते. ३) चर्चा केल्यामुळे आपले विचार मांडता येतात, विचारांची देवाणघेवाण करता येते आणि त्यात सुधारणा देखील करता येते. एकंदरीत फायदाच होतो. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मनापासून विचार करणारे आणि कॉपीबहाद्दर यांचं "क्लासिफिकेशन" करता येतं! आणखी काही फायदे "आठवल्यास" जरूर सांगावेत. त्यांचं स्वागतच होईल.
  • Log in or register to post comments
व
विकि Sun, 05/04/2008 - 10:16 नवीन
माझा स्वतःचा अनुभव सांगतो : माझी ऍडमिशन झाली तेव्हा, माझा मित्र (जो ओबीसी आहे) त्याचीही ऍडमिशन झाली. त्याला माझ्यापेक्षा कमी गुण असूनही, त्याला युनिव्हर्सिटी मध्ये जागा मिळाली, पण मला मिळू शकली नाही. माझा मित्रावर राग अजिबात नाही. अजूनही आम्ही दोघे चांगले मित्र आहोत. पण, हे कितपत योग्य आहे? तुला माहीत होते की खुल्या प्रवर्गातून प्रवेश मिळविण्यासाठी जास्त टक्के मिळवावे लागतात. ते तू मिळवायला हवे होते. त्यासाठी आरक्षणावर घसरायची गरज नव्हती. त्यासाठी स्वत:च्या मित्राला कशाला दूषण देतोस. मित्र ही म्हणवतोस आणि त्याची जात ही काढतोस. याला मैत्री म्हणत नाही कळले का. उगाच मैत्री चे नाव बदनाम करू नकोस. आरक्षण हे मागासलेल्या समाज घटकांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी केले गेलेले आहे . तुमच्या सारख्या लोकांना आरक्षण घेऊन विकास झालेली मूठभर लोकच दिसतात. अजूनही समाजात मागास प्रवर्गातील हातावर पोट घेऊन जगणारा कष्टकरी असा वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे की ज्यांना आरक्षण असल्याशिवाय शिक्षण घेणे परवडणारच नाही . त्यांच काय करायचे . आणि शिक्षणात आरक्षण असून हल्ली फायदा काय आहे . त्या त्या जातीजमातीत स्पर्धा वाढू लागली आहे आणि शिक्षण घेतल्यानंतर फायदा काय त्या प्रमाणात सरकारी नोकर्‍या निर्माण होत आहेत का? आपला कॉ.विकि
  • Log in or register to post comments
व
विकि Sun, 05/04/2008 - 10:17 नवीन
तुला माहीत होते की खुल्या प्रवर्गातून प्रवेश मिळविण्यासाठी जास्त टक्के मिळवावे लागतात. ते तू मिळवायला हवे होते. त्यासाठी आरक्षणावर घसरायची गरज नव्हती. त्यासाठी स्वत:च्या मित्राला कशाला दूषण देतोस. मित्र ही म्हणवतोस आणि त्याची जात ही काढतोस. याला मैत्री म्हणत नाही कळले का. उगाच मैत्री चे नाव बदनाम करू नकोस. आरक्षण हे मागासलेल्या समाज घटकांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी केले गेलेले आहे . तुमच्या सारख्या लोकांना आरक्षण घेऊन विकास झालेली मूठभर लोकच दिसतात. अजूनही समाजात मागास प्रवर्गातील हातावर पोट घेऊन जगणारा कष्टकरी असा वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे की ज्यांना आरक्षण असल्याशिवाय शिक्षण घेणे परवडणारच नाही . त्यांच काय करायचे . आणि शिक्षणात आरक्षण असून हल्ली फायदा काय आहे . त्या त्या जातीजमातीत स्पर्धा वाढू लागली आहे आणि शिक्षण घेतल्यानंतर फायदा काय त्या प्रमाणात सरकारी नोकर्‍या निर्माण होत आहेत का? आपला कॉ.विकि
  • Log in or register to post comments
व
विकि Sun, 05/04/2008 - 20:18 नवीन
आजकाल लोक इतर मागास वर्गीयांवर पण घसरायला लागली आहेत.आजपर्यंत अ.जाती आणि अ.जमातीवर घसरत होते आता ओ.बी.सी समाजावर .अरे वा आश्चर्य आहे. आपला कॉ.विकि
  • Log in or register to post comments
च
चेतन Mon, 05/05/2008 - 07:36 नवीन
आश्चर्य "तुला माहीत होते की खुल्या प्रवर्गातून प्रवेश मिळविण्यासाठी जास्त टक्के मिळवावे लागतात. ते तू मिळवायला हवे होत त्यासाठी आरक्षणावर घसरायची गरज नव्हती" अरे वा...! काय पण विचार आहेत! हे म्हणजे आरक्षणाचा बचाव करण्यासठी काही पणं कारणं द्यायची "अजूनही समाजात मागास प्रवर्गातील हातावर पोट घेऊन जगणारा कष्टकरी असा वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे की ज्यांना आरक्षण असल्याशिवाय शिक्षण घेणे परवडणारच नाही " त्यानां खरचं आरक्षणं मिळतं का....? कि जे श्रीमंत आहेत त्यानाचं हे मिळतं सवलतीला विरोध कोणाचाही नाही. गुणवत्तेला डावलण्याला विरोध आहे. माझे असेहि काही मित्र आहेत ज्यांची परिस्थिती हातावर पोट घेऊन जगणार्यांपेक्षा वेगळी नाही (पण त्यांना आरक्षण नाही....?) पन्नास वर्षांनंतरही मागास प्रवर्गातील हातावर पोट घेऊन जगणारा कष्टकरी असा वर्ग मोठ्या प्रमाणावर का आहे याचा विचार केलाय का...? "जिनके घर शिशे के होते है वो दुसरो के घरपर पथ्थर फेका नही करते" चेतन
  • Log in or register to post comments
व
विकि Mon, 05/05/2008 - 08:40 नवीन
चेतन राव काय लिहीले आहेस ते तुला कळले का? तुझ्या मूठभर मित्रांसाठी आरक्षण काढून टाकायचे का? आणि गुणवत्ता ठरवणारे तुम्ही कोण ? म्हणजे तुला अस म्हणायच का की मागास जातीतील लोकांना गुणवत्ताच नसते. आपला कॉ.विकि
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Mon, 05/05/2008 - 09:14 नवीन
प्रश्न आरक्षण रद्द करण्याचा नाहीये, तर तो जातीयवादावर आधारीत नसावा असा असावा.
म्हणजे तुला अस म्हणायच का की मागास जातीतील लोकांना गुणवत्ताच नसते.
हा सूर मलातरी कुठं दिसला नाही. फक्त सूर असा आहे, की ज्यांना गुणवत्ता नाही, त्यांना केवळ जातीआधारे आरक्षण मिळाल्याने एकूणात भंपाळं वाजल्याचं दिसतं... एखादा (की बहुतांश? हा विषय आणि आकडेवारी संशोधनाचा विषय आहे हे नक्की!) ५०-५५ टक्केवाला आरक्षणाच्या आधारे प्रवेश मिळवतो..वर्षांनुवर्षे गोते खातो, बी.ई.च्या शेवटच्या सेम ला ८-८ केट्या घेऊन शेवटच्या सेमचेही विषय सोडवायला बसतो...एक ना धड भाराभार चिंध्या होऊन बसतात. आयुष्यातली महत्वाची वर्षं वाया जातात ते वेगळंच. आता अशा क्वालीटी नॉर्म्सला सोडून असलेल्या प्रॉडक्ट (प्रोफेशनल कोर्सचा हा विद्यार्थी) कडून परफेक्ट फंक्शनॅलिटीची अपेक्षा करणंच चूकीचं ठरतं मग होतं काय? बांधलेले रस्ते उडखतात, पूल पडतात, बिल्डिंग्ज कोसळतात... इंटरव्ह्यू क्लिअर होताना त्रास होतो...झाला तरी शैक्षणिक मार्गक्रमणात बरेच उलटेसुलटे वळसे घेतले गेल्याने कामाचा दर्जा 'ऍट पार' देणं जमत नाही.... (ही वस्तुस्थिती आहे..ज्यांना पटत नसेल त्यांनी कार्पोरेट जगाचा थोडासा अभ्यास करावा) असे आरक्षण घेऊन पडत-धडपडत शिक्षण पुर्ण केलेल्या बेरोजगारांचा जथ्था होतो...नोकरी न मिळाल्याने शिक्षणाचाही उपयोग नाही...शिक्षणात बराच काळ गेल्याने वाढत चाललेलं वय, त्याबरोबर येणारं नैराश्य ह्यांचा फायदा गर्दीची मनोवृत्ती ओळखणारा एखादा उपटसुंभ घेतो...आणि मग संप-बंद / मोर्चे, दगडफेक इ.इ. प्रकारांनी नैराश्य बाहेर काढण्याचा यत्न सुरु होतो. ह्याने नुकसान सगळ्यांचेच होते.
अस म्हणायच का की मागास जातीतील लोकांना गुणवत्ताच नसते.
नक्कीच असते. त्याबद्दल वाद नसावा. पण मग आरक्षण हे गुणवत्तेला धरुन का नसावे? म्हणजे एकाच सीटसाठी २ जणांचे अर्ज आले, त्यातला एक सो-कॉल्ड उच्चवर्णिय आणि दुसरा मागास असेल तर ज्याला जास्त गुण आहेत त्यालाच का प्राधान्य मिळू नये?...आणि आरक्षण यावं ते जर दोघांचे गुण समान असतील (फारतर आपण सापेक्षतेसाठी ५-१०% कमी-जास्त म्हणू) तर ते मागासाच्या फायद्याचे. त्याने गुणवत्ताही टिकवली जाईल..आणि मागासांवर अन्यायही होणार नाही. मागास जातीतील लोकांनाही गुणवत्ता असतेच. मग ही आरक्षणाची (कमी गुणावर प्रवेश) भीक नाही का वाटत त्या गुणवंतांना? आणि महत्वाची गोष्ट अशी, की मुळात किती मागासवर्गिय मुलभूत शिक्षणाची पायरी ओलांडून पुढे येतात? ज्यांना हे जमत नाही, आरक्षण खरे तर त्यांच्यासाठी आहे...आधीच पोळीवर तूप ओढून गबर झालेल्या आणि भरल्या पोटी उच्चवर्णियांविरोधात गळे काढणार्‍यांसाठी नव्हे! ज्यांना खरोखरच चाड आहे, त्यांनी आधी बहुतांश मागासवर्गिय समाज जो मुलभूत शिक्षणापासूनच वंचित आहे त्यांना मूळ प्रवाहात आणावं...मग उच्च शिक्षणाच्या गोष्टी कराव्यात...तेव्हाच खरं काय ते समोर येइल. सध्या आरक्षण हे प्रकरण केवळ तुंबड्या भरण्याचं साधन म्हणून वापरलं जातं....राजकारण्यांकडूनही आणि बरेचदा (बरेच सन्माननीय अपवाद वगळता) त्याच्या लाभार्थींकडून केवळ स्वार्थासाठी वापरलं जातं. बाकी, श्री.पेठकर ह्यांच्या बर्‍याच मतांशी सहमत!
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Wed, 05/07/2008 - 11:32 नवीन
५०-५५ टक्केवाला आरक्षणाच्या आधारे प्रवेश मिळवतो..वर्षांनुवर्षे गोते खातो, बांधलेले रस्ते उडखतात, पूल पडतात, बिल्डिंग्ज कोसळतात...
माझा आक्षेप पूर्णतः वरच्या मुद्द्यावर आहे. रस्ते उखडणे, पूल कोसळणे, बिल्डिंग कोसळणे हे काय कमी टक्के मिळालेल्या आणि आरक्षणातून प्रवेश घेतलेल्याचा परिणाम आहे? रस्ते उखडणे, पूल कोसळणे, बिल्डिंग कोसळणे - यामागे खूप वेगळे राजकारण असते. कितीतरी खुल्या वर्गातले सुद्धा राजकारण करून नोकर्‍या मिळवतात. "रस्ते उखडणे, पूल कोसळणे, बिल्डिंग कोसळणे " यात आरक्षण येतेच कुठे? हा तर पूर्णपणे "राजकारणाचा" विषय आहे. अरे (खुल्या / आरक्षित) ५०% पडलेल्यांना तुम्ही अशा जबाबदारीच्या पदाची नोकरी देताच कशी आणि का? आणि ९९% किंवा १००% मिळवलेला (खुल्या / आरक्षित) जर लाचखोर निघाला तर ही परिस्थिती उद्भवू शकत नाही काय?
इंटरव्ह्यू क्लिअर होताना त्रास होतो...झाला तरी शैक्षणिक मार्गक्रमणात बरेच उलटेसुलटे वळसे घेतले गेल्याने कामाचा दर्जा 'ऍट पार' देणं जमत नाही
ही तर कोणत्याही कमी मार्क पडलेल्याची स्थिती असेल. आरक्षण घेणार्‍यांचा या मुद्द्याशी प्रत्यक्ष संबंध काय? आरक्षण घेणार्‍या सगळ्यांनाच ५५% पडतात? आणि खुल्या वर्गातील सगळ्यांना ९०% च्या वरच मार्क असतात? माझ्यामते नाही. त्यातले काही टॉपरसुद्धा असतात. आणि बरेचसे ऍव्हरेज मार्क मिळविणारे आणि काही ५०% वाले आणि काही नापास - खुल्या वर्गात पण हीच परिस्थिती असते. त्यामुळे चांगल्या नोकरीचा आणि चांगल्या कामगिरीचा निकष गुणवत्तेवर लावावा. नोकरीतल्या राजकारणाचा संबंध आरक्षणाशी लावू नये.
  • Log in or register to post comments
क
कुंदन Wed, 05/07/2008 - 12:00 नवीन
मनस्वीच्या मतांशी सहमत . उदाहरण १) खुल्या वर्गातील माझा एक मित्र , अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करायला याने तब्बल ८ वर्षे घेतली. साला याला कॅप जेमिनी सारख्या कंपनीत नोकरी कशी मिळाली हा एक गहन प्रश्ण आहे. उदाहरण २) माझी पहिली नोकरी, स्थळ - मुंबई , फोर्टातील एक राष्ट्रीयीकृत बँक. माझी जबाबदारी : बँकेच्या संगणक प्रणालीची जबाबदारी बँकेतर्फे ३ जण आमच्या बरोबर दैनंदीन कामकाज करणे जसे की डाटा बॅक अप घेणे आणि तत्सम कामे करणे ( 1st level support ) यासाठी होते. त्यातील एक जण , पारशी : कारण परशांची बँक , दुसरा तथाकथित खुल्या वर्गातील आणि तिसरा आरक्षणातून आलेला. पण कामचुकार पणाच्या बाबतीत म्हणाल तर एकाला झाकावे आणि दुसर्‍याला काढावे , दुसर्‍याला झाकावे आणि तिसर्‍याला काढावे. थोडक्यात कामचुकार पणाच्या बाबतीत त्याची परस्परांशी स्पर्धाच होती म्हणाना ... माझ्यामते अशा लोकांना ना धर्म असतो , ना जात असते , ना पंथ. त्यांची जात एकच ती म्हणजे हरामखोर.... रस्ते उखडणे, पूल कोसळणे, बिल्डिंग कोसळणे - यामागे खूप वेगळे राजकारण , भ्रष्टाचार असतो. इथेही अशा लोकांना ना धर्म असतो , ना जात असते , ना पंथ. त्यांची जात एकच ती म्हणजे हरामखोर.... ( माझा धर्म : प्रामाणिकपणा ) कुंदन
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Wed, 05/07/2008 - 12:12 नवीन
आपल्या एकूणातच असलेल्या वैचारिक प्रवाहाशी मी सहमत आहे. पण तरीही :
आता अशा क्वालीटी नॉर्म्सला सोडून असलेल्या प्रॉडक्ट (प्रोफेशनल कोर्सचा हा विद्यार्थी) कडून परफेक्ट फंक्शनॅलिटीची अपेक्षा करणंच चूकीचं ठरतं
हा देखील त्या मुद्द्यातला महत्वाचा भाग आहेच. आता, कमी गुणांवर ओपन कॅटेगरीतल्या मुलांना प्रवेश मिळतो का? उत्तर नाही हेच आहे ना?
रस्ते उखडणे, पूल कोसळणे, बिल्डिंग कोसळणे हे काय कमी टक्के मिळालेल्या आणि आरक्षणातून प्रवेश घेतलेल्याचा परिणाम आहे? रस्ते उखडणे, पूल कोसळणे, बिल्डिंग कोसळणे - यामागे खूप वेगळे राजकारण असते.
१००% सत्य. मी उदाहरणादाखल काही प्रकार दिले होते..ह्यामध्ये आपण ती उदाहरणं बदलून सरकारी खात्यात काम करताना हिशेबात गल्लत होणे, सर्क्युलर्सचा अर्थही न समजणे, चुकीचा अर्थ काढून त्यावर काम करणे, प्रॉजेक्ट डॉक्युमेंटेशन न समजणे, समजण्यात चुका करणे, प्रॉडक्शन एन्हायर्नमेंटमध्ये गडबड करणे इ.इ. प्रकार घेऊ.
अरे (खुल्या / आरक्षित) ५०% पडलेल्यांना तुम्ही अशा जबाबदारीच्या पदाची नोकरी देताच कशी आणि का?
:) आरक्षण !!! तिथेही आहेच की! (सरकारी कार्यालयं म्हणतोय मी)
आणि ९९% किंवा १००% मिळवलेला (खुल्या / आरक्षित) जर लाचखोर निघाला तर ही परिस्थिती उद्भवू शकत नाही काय?
जर लाचखोर निघाला तर? आहेतच की! माझा मुद्दा असा आहे, की समजा, एकजण ५०-६० टक्के(नक्की कट-ऑफची कल्पना नाही, क्षमस्व! ) मिळवून मेडिकलला प्रवेश मिळवून डॉक्टर झाला (कसाबसा...कारण आधीच्या प्रतिसादात आहेच...गोते..इ.इ.) तर त्याच्याकडून ज्याला 'पर्फेक्ट ट्रीटमेंट' म्हणतात ती मिळेल काय? इथं प्रश्न मागासवर्गिय / खुल्या गटाचा नाही...कोणीही असेल तो!
ही तर कोणत्याही कमी मार्क पडलेल्याची स्थिती असेल. आरक्षण घेणार्‍यांचा या मुद्द्याशी प्रत्यक्ष संबंध काय? आरक्षण घेणार्‍या सगळ्यांनाच ५५% पडतात? आणि खुल्या वर्गातील सगळ्यांना ९०% च्या वरच मार्क असतात?
नक्कीच नाही...पण खुल्या वर्गातल्या विद्यार्थ्यांचा पाया मुळातच ७०-८० टक्के मार्कांचा असल्याने आकलनक्षमता जास्त चांगल्या प्रकारे काम करत असल्याने अभ्यासक्रम ५०-५५ वाल्यांइतका जड जात नाही..पर्यायाने विषयातलं ज्ञानही काहीप्रमाणात चांगलं असु शकतं ! "समथिंग गुड इज बेटर दॅन लॉट ऑफ मेस्ड ऑफ!"
त्यातले काही टॉपरसुद्धा असतात.
ते खर्‍या सोन्यासारखे झळाळून उठतातच...त्यांना कुबड्या लागत नाहीत!
आणि बरेचसे ऍव्हरेज मार्क मिळविणारे आणि काही ५०% वाले आणि काही नापास - खुल्या वर्गात पण हीच परिस्थिती असते.
ते न झेपणारे प्रोफेशनल कोर्सेस जागा न मिळाल्याने करु शकतच नाहीत..त्यामुळे साकल्याने विचार करता, सर्वांगिण प्रगतीला मारक असे निर्णय घेण्याची कुवत / अधिकार त्यांना मिळत नाहीत!
त्यामुळे चांगल्या नोकरीचा आणि चांगल्या कामगिरीचा निकष गुणवत्तेवर लावावा.
आणि फक्त गुणवत्तेवरच !!! :) मीही कुठे वेगळं काय सांगितलं?
नोकरीतल्या राजकारणाचा संबंध आरक्षणाशी लावू नये.
राजकारण नव्हे, परिणामांबद्दल बोललो :)
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Wed, 05/07/2008 - 12:44 नवीन
>> राजकारण नव्हे, परिणामांबद्दल बोललो << मी तेच म्हटले ना की राजकारणाचा आणि आरक्षणाचा थेट संबंध आहे. कोणीही (खुले / आरक्षित) अपात्र असेल तर परिणाम वाईटच. आरक्षणाचा आणि परिणामांचा नव्हे. आणि दैनंदीन जीवनात आपण अनेक उदाहरणे बघतो की शिक्षणात फार मजल मारू न शकलेला सुद्धा नोकरी / व्यवसाय / कौशल्यात यशस्वी होतो, तर बोर्डात वगरे आलेली व्यक्ती (खुली / आरक्षित) अयशस्वी!
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Wed, 05/07/2008 - 11:40 नवीन
.
  • Log in or register to post comments
र
रम्या Wed, 05/07/2008 - 13:14 नवीन
आणि आरक्षण यावं ते जर दोघांचे गुण समान असतील (फारतर आपण सापेक्षतेसाठी ५-१०% कमी-जास्त म्हणू) तर ते मागासाच्या फायद्याचे. त्याने गुणवत्ताही टिकवली जाईल..आणि मागासांवर अन्यायही होणार नाही. हे पटण्यासारखं आहे खरं!
  • Log in or register to post comments
र
राजमुद्रा Wed, 05/07/2008 - 10:50 नवीन
फक्त एक करावं लागेल. आरक्षणवाल्यांनी आरक्षणातूनच प्रवेश घ्यायचा. खुल्या गटातून नाही. आहे कबूल? नाही ना........ म्हणजे तुम्हाला दोन्हीकडचं लोणी हवंय, हो ना? आरक्षणाच्या जागा कमी असल्या की तुम्ही येणार खुल्या गटात हो ना? आणि ज्यांच्यासाठी आरक्षण आहे त्यांना मिळतं का आरक्षण? त्यांना माहित तरी आहे का आरक्षण म्हणजे काय? अवांतरः मला आजपर्यंत आरक्षणाच्या कुबड्या घ्याव्या लागल्या नाहीत, याचा मला अभिमान आहे. राजमुद्रा :)
  • Log in or register to post comments
र
रम्या Wed, 05/07/2008 - 13:08 नवीन
तुझ्या मूठभर मित्रांसाठी आरक्षण काढून टाकायचे का? पण झोपडपट्टीत राहून ज्याची आई धूणी भांडी करते तो आरक्षणामुळे डॉक्टर झाला असे विद्यार्थी तरी कुठे ढिगाने आहेत?
  • Log in or register to post comments
च
चेतन Mon, 05/05/2008 - 10:00 नवीन
"मनूष्य स्वभावानुसार दुसरा पुढे जाताना बघून आपला जळफळात होणे स्वाभाविक आहे" बाकी तुमच्यकडे चार बोटं आहेत हे सोयिस्करपणे विसरा.... (चालायचचं कॉ. म्हणवता ना) चेतन राव काय लिहीले आहेस ते तुला कळले का? मला व्यवस्थीत कळ्तयं.पण ज्यांची समजायची इच्छाच नाही त्यंना काय समजणार. असो.... तुझ्या मूठभर मित्रांसाठी आरक्षण काढून टाकायचे का? हाच प्रश्न स्वतःला विचरून पहा आणि गुणवत्ता ठरवणारे तुम्ही कोण ? ती फक्त तुम्हीच ठरवणार का... म्हणजे गुण मिळवणार्याकडे गुणवत्ता नसते? म्हणजे तुला अस म्हणायच का की मागास जातीतील लोकांना गुणवत्ताच नसते. हे मी म्हणलेले नाही अथवा कोणिहि म्हणलेले नाही. माझ्या महितिमध्ये असे अनेक गुणवान लोक आहेत. पणं सत्य हे कटु असतं आणि ते ऐकणार् याच्या इच्छेचा विचार करत नसतं ते असतं त्या स्वरुपात समोर येतं असतं (म्रुत्युंजय) असो ज्यांचा पुर्वग्रह दुषित आहे त्या कॉ.ना काय समजणारं चेतन
  • Log in or register to post comments
अ
अजिंक्य Mon, 05/05/2008 - 10:25 नवीन
मित्रहो, शांत व्हा. मला मान्य आहे, की हा अत्यंत ज्वलंत आणि तापलेला विषय आहे. पण, तरीही त्यावर योग्य ती चर्चा व्हावी हा हेतू होता, आपापसात भांडणे करावयाचा नव्हे. विकि, तुझं म्हणणं योग्य आहे. मला हे आधीच माहित होतं की माझ्या साठी ५० % जागा आहेत, आणि मीही त्याच जागांसाठी प्रयत्न केला. (बाकी माझ्या हातात तेवढंच होतं की!) पण माझा मुद्दा वेगळाच आहे. आरक्षण हे मागासलेल्या समाज घटकांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी केले गेलेले आहे ..... आपल्यात मतभेद असतीलही, पण या मुद्द्यावर मात्र मी तुझ्याशी पूर्ण सहमत आहे. आणि मी तुला निश्चितपणे सांगू शकतो, की माझा कुठल्याही जाती-जमातीवर घसरण्याचा अजिबात हेतू नाही. आणखी एक गोष्ट, मैत्री बद्दल माझ्या कल्पना स्पष्ट आहेत. मैत्री मध्ये जात येण्याचा प्रश्नच येत नाही. अगदी कबूल. मी तसं कधीच म्हटलं नाही. म्हणणारही नाही. 'धमाल मुलगा' चा मुद्दा बरोबर आहे. एखादा (की बहुतांश? हा विषय आणि आकडेवारी संशोधनाचा विषय आहे हे नक्की!) ५०-५५ टक्केवाला आरक्षणाच्या आधारे प्रवेश मिळवतो..वर्षांनुवर्षे गोते खातो,............ .....एक ना धड भाराभार चिंध्या होऊन बसतात. आयुष्यातली महत्वाची वर्षं वाया जातात ते वेगळंच. जर आरक्षणा चा लाभ मिळणारा आणि एखादा विना-आरक्षण अशा दोघांन समान गुण असतील, तर आरक्षणाचा मुद्दा यावा. नाहीतर, फक्त गुणांवर आधारित प्रवेश मिळावा. - अजिंक्य.
  • Log in or register to post comments
व
विकि Mon, 05/05/2008 - 11:14 नवीन
तु आपल्या मताशी थोडाफार सहमत झालास त्याबद्दल धन्यवाद. कॉ.विकि
  • Log in or register to post comments
र
रम्या Wed, 05/07/2008 - 13:23 नवीन
जर आरक्षणा चा लाभ मिळणारा आणि एखादा विना-आरक्षण अशा दोघांन समान गुण असतील, तर आरक्षणाचा मुद्दा यावा. नाहीतर, फक्त गुणांवर आधारित प्रवेश मिळावा. या विषयावर कधी फार विचार केला नव्हता. पण हे सर्वात जास्त पटणारे वाटते.
  • Log in or register to post comments
अ
अजिंक्य Mon, 05/05/2008 - 10:48 नवीन
आरक्षण ही समस्या नाही, असूच शकत नाही. कारण, आरक्षण हा समस्या सोडवण्यासाठी काढलेला तोडगा आहे. खरी समस्या ही आहे की - १) ज्या लोकांना आरक्षणाची खरी गरज आहे, त्यांच्या ऐवजी ते इतरांनाच मिळते. कारण, आरक्षित यादीमध्येदेखील गुणांवर आधारित उप-यादी काढतात. त्यामुळे, ज्यांना आरक्षण मिळते, ते बव्हंशी जास्त गुण मिळवणारे असतात. (यावरूनच हे सिद्ध होते की, मागास जातीतील विद्यार्थ्यांमधेही गुणवत्ता असतेच. खरं म्हणजे, तथाकथित उच्चवर्णियांइतकीच असते.) २) आरक्षणामुळे, बर्‍याच वेळा (सर्व वेळेस नव्हे) गुणवत्ता नसणारी मुले प्रवेश मिळवतात, आणि इतरांचे, जे गुणवत्तावान असतात(यांत, मागासवर्गीयसुद्धा येतात) ते मागे पडतात. ३) ज्या जागी गुणवत्तेची खर्‍या अर्थाने गरज असते, अशा जागी तर आरक्षणामुळे जास्तच नुकसान होते. तात्पर्य :- आरक्षणाची गरज तर अजूनही आहेच. पण त्याचा ढाचा बदलणे आवश्यक आहे. (ताजा कलम :- गुण आणि गुणवत्ता यात, तसं बघायला गेलं तर बराच फरक आहे. पण आपल्याकडील शिक्षणव्यवस्थेप्रमाणे, गुणांवरूनच गुणवत्तेची पारख केली जाते. त्यामुळे, गुण आणि गुणवत्ता समानच समजणे आवश्यक आहे. अर्थात, माझ्या मते, त्यात फरक राहतोच. यासंदर्भात 'विकि'चे म्हणणे बरोबर आहे - एखाद्याची गुणवत्ता परस्पर गुणांवरून ठरवणे चूक आहे. पण त्यासाठी मूळ शिक्षणव्यवस्थेतच बदल होणे गरजेचे आहे. अर्थात, तसे आपल्या शिक्षणव्यवस्थेत आणखी बरेच बदल होणे गरजेचे आहे म्हणा!!) - अजिंक्य.
  • Log in or register to post comments
व
विकि Mon, 05/05/2008 - 11:07 नवीन
काय तर म्हणे स्वतःला प्रश्न विचारून पहा. कुठले प्रश्न . मागास जातीतील लोकांकडे गुणवत्त्ता नसते हे तुमच्या लिखाणावरून स्पष्ट होत आहे. आमच्या लिखाणावरून नाही. समजले का? आपला कॉ.विकि
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Wed, 05/07/2008 - 14:12 नवीन
आरक्षण हा विषय विविधांगी आहे. लिखाणात गोबेल्स तंत्र प्रणालीचा उपयोग करुन विद्रोह जागृत ठेवण्याचा प्रयत्न सातत्याने काही स्तरात होत असतो. विवेक जागृत ठेवण्यासाठी स्वतःशी अंतर्गत संघर्ष करावा लागतो. विद्रोह जागृत ठेवण्यासाठी इतरांच्यातील विवेक नष्ट करावा लागतो. मह्तप्रयासाने अनेक विवेकी लोकांनी फुगवलेला प्रबोधनाचा फुगा हा एक विद्रोही टाचणी लावून नष्ट करु शकतो. काही लोक व्यक्तिगत मानापमानाचा बदला घेण्यासाठी संपुर्ण समाजाला वेठीस धरतात. तसे करण्यासाठी साम दाम दंड भेद या नीतीचा वापर ते करत असतात. शाळेतला एक किस्सा आठवतो . पेटवण्यासाठी काही वर्गबंधु याच नितीचा वापर करीत." अयौ बाळ्या . त्यो सक्या लई घान घान श्या देत व्हता तुपल्याला. आपन त नस्त ऐकुन घेतल बॉ." कि बाळ्याचा मित्र असलेल्या सक्याविषयी 'मित्रत्वा'ऐवजी 'शत्रुत्वा'ची भावना तयार झालीच समजा. तात्पर्य- विद्रोहाचा सकारात्मक वापर हा आत्मपरिक्षणासाठी होतो तर दुरुपयोग हा स्वार्थी लोक आपली पोळी भाजून घेण्यासाठी करतात. यासाठी वाहक म्हणुन अर्थातच तरुणांचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. आरक्षणावर मत मतांतरे होत राहतील . पण आपण आपल्या विवेकाचे रक्षण केले पाहिजे. प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Wed, 05/07/2008 - 14:23 नवीन
अतिशय संतुलित, वैचारिक आणि अभ्यासपुर्ण अशी प्रतिक्रिया! प्रकाशराव, हॅट्स ऑफ टू यू! आरक्षणाच्या बाबतीत दोन्ही बाजूनी (समर्थनिय आणी विरोधी) टोकाचे विचार समाजात हेतुपुर:सर पसरवले जातात. कारण...स्वतःची पोळी भाजुन घेणे! आपणच ठरवायचं नक्की काय योग्य आणि काय अयोग्य...भावनेच्या भरात नव्हे तर नीट विचार करुन!
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे गुरुवार, 05/08/2008 - 09:42 नवीन
आजच्या सुधारक चे अतिथी संपादक श्री टी बी खिलारे यांनी मिसळ पाव ला भेट दिली. त्यांचे मते इथे कुणी आजचा सुधारकचा जात आरक्षण विशेषांक वाचलेला दिसत नाही. सदर अंक रु. ७५ ला उपलब्ध आहे. अधिक माहिती साठी इथे पहा प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Sun, 08/17/2008 - 10:35 नवीन
एक डायालिसिस वर दुसर्याला आण़खी काही. भर्पुर जगा रे बाबानो . अजुन खुप जागा आहेत तुमच्यासाठि आरक्श्णाचे शिंग खुपसायला. घोडा पळाला. आता कसली चर्चा कर्ताय. आता ह्यात बदल होणे नाही. परिस्थितिला सामोरे जाय्चे. कडवट्पणा न बाळ्गता. तुमचे दुख्तेय. तुम्चे मलम तुम्ही शोधा की.एका चाकाने दुसर्या चाकाशी दुश्मनी करु नये. मेल ओपन साठि मलमाचे कोठार विनायक प्रभु
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Sun, 08/17/2008 - 11:31 नवीन
एक डायालिसिस वर तर दुसरा आणखी कशाने. दोन चाकात मारामारी लावुन तुम्ही मोकळे. भरपुर जगा रे बाबानो. अजुन बर्याच जागा शिल्लक आहेत आरक्श्णाचे शिंग घुस्वायला. उदा. सुलभ शॉचालय. ओपनवाल्यानो- घोडा पळाला. चर्चा करुन उपयोग नाही. आता ह्यात बदल होणे नाही. तुम्चे दुखतय ना? शोधा की मलम. कडवट्पणा न बाळ्ग्ता. मेल ओपन करिता मलमाचे कोठार, विनायक प्रभु
  • Log in or register to post comments
ख
खादाड_बोका Mon, 08/18/2008 - 04:28 नवीन
फक्त ऐकच गोष्ट सांगाविशी वाट्ते कि अमेरिकेत आरक्षण नाही म्हणुन ती ऐक सुपर पॉवर आहे, आणि जो पर्यंत भारतात आरक्षण आहे तो पर्यंत भारत सुद्धा कधीही सुपर पॉवर होऊ शकत नाही. निर्सगात कुठेही आरक्षण नाही, हे सगळ्यांना समजतो, पण ऊमजत नाही. Survival of the fittest....
  • Log in or register to post comments
श
शुभान्गी Mon, 01/19/2009 - 17:27 नवीन
१००% खरे...... तुमच्या मताशी सहमत......
  • Log in or register to post comments
ह
हर्षद आनंदी Mon, 08/18/2008 - 06:50 नवीन
अजिंक्य, एक उदा- एक गुजराती मुलगा , अजुन शुभ्-मंगल झालेले नाही..पण जेव्हा त्याची चर्चा होते, तेव्हा उदार मनाने ब्राम्हण समाजातील मुलीसाठी परवानगी दिली जाते. पण इतर समाजाचे नाव जरी घेतले तरी विविध पध्दतीने ब्लॅकमेल केले जाते आता मला सांगा : घरातील सुसंस्कृत, सुविद्य, लोक जातीवर अडुन बसतात, हट्ट करतात, मग हा जातियवाद हद्दपार कधी होणार? मग राजकारणी लोक त्याचे भांडवल करणारच की जो पर्यंत जातियवाद अस्तित्वात आहे, आरक्षण होणार!! [तो सतत पेटलेला तवा आहे, कोणीही पोळी भाजुन घेणारच की राव] खरी गरज शिकलेल्यांना शहाणे करण्याची आहे बाकी सर्व आपोआपच येईल.
  • Log in or register to post comments
न
नेत्रेश Mon, 08/18/2008 - 08:17 नवीन
आरक्षण विषया वरील बर्याच विरोधी प्रतिक्रीया वाचुन वाइट वाटले. बहुतेक जणाना आरक्षण या वीषयावर जास्त माहिती नाही. बहुतेकानी आरक्षणाच्या (त्याना भोगाव्या लागलेल्या) परीणामा विषयी लिहीले आहे. फक्त शैक्षणीकच नाही तर सर्व प्रकारच्या आरक्षणाची गरज सामाजीक समतोलासाठी निर्माण करण्यासाठी आवश्यक असुन जो समाज इतक्या टोकाच्या सामाजीक असमतोला साठि जबाबदार आहे, त्या समजाला, त्यातील प्रत्येक घटकाला, आरक्षणाचे परीणाम भोगावे लागतील. माझ्या कॉलेज प्रवेशा वेळी माझ्या भावना तीव्रपणे आरक्षणाच्या विरोधात होत्या, जश्या बर्याच जणानी दिल्या आहेत. त्यावेळी मलाही वाटले होते कि माझी सन्धी / जागा कुणा दुसर्याला, त्याची लायकी नसताना मीळत आहे. पण आज मला पटते की त्यावेळी मीच कमी पडलो होतो. आज थोड्या त्या विषया वरील वाचन व थोडा विचार केल्यावर मला आरक्षणाची आवश्यकता पटली आहे. आरक्षणाचा मला व माझ्या कुटुम्बाला कधीही फायदा होणार नसुनही मी पुर्ण पणे आरक्षणाच्या बाजुने आहे. आरक्षणाचा अप्रत्यक्ष फायदा आरक्षण नसलेल्या लोकाना सुद्धा खुप होतो. त्याना नवीन, चन्गल्या सन्धि शोधाव्या लागतात/ मिळतात. त्यान्चिही प्रगती होते. उदा. परदेशी शिक्षण, नोकरी. अथवा स्वदेशातच धन्दा, उद्योग. थोडे मागे पडलेल्याना अधीक कष्ट करण्याची इछया होते. आणी शेवटी, ज्याची जी लायकी असते, तो तसे जीवन जगतो. (फुटपाथ वरील फेरीवाल्याकडुन खरेदी करणार्याला, फुटपाथ वर चालायला जागा नाही अशी तक्रार करयचा अधीकार नाही. तसेच रस्त्यावर कागद, कचरा, पिचकारी टाकणार्याला परदेशाच्या तुलनेत भारतात कीती घाण आहे असे बोलायचा अधीकार नाही.) - विशयान्तरा पद्दल क्षमस्व. - नेत्रेश
  • Log in or register to post comments
ए
ए. प्रशांत Sun, 01/18/2009 - 18:57 नवीन
जर कुणाला वारंवार अभ्यास (वाचन) करुन ९०-१००% गुण मिळाले तर तो हुशार असता तर काँम्प्युटर इंजिनीअरिंग शिकत असलेला तो/ती स्वतःचे प्रोजेक्ट स्वतः तयार करता, कुणा १०-१२ वी शिकलेल्यांकडुन करुन घ्यायला गेला नसता. माझा स्वतःचा अनुभव एक उच्च वर्णिय मुलगी V.B. चा प्रोजेक्ट शिक्षीकेने सांगीतल्या प्रमाणे पुर्ण केला, परंतू त्यामध्ये शिक्षीकेने मुद्दाम ठेवलेली "डेटाबेस कनेक्टीव्हिटि" करु शकली नव्हती. तिला तिच्या प्रोजेक्ट मधल्या प्रोजे़क्टचा उद्देश विचारला तर त्र सुद्धा तिला माहित नव्हते. असो... आरक्षण माझ्या मते सुद्धा नको, कारण आरक्षणाचा फायदा ज्यांच्या हातात पैसा व सत्ता आहे तेचे उकळत आहेत. ज्यांना गरज आहे ते आहेत तिथेच राहतात. आरक्षणाचा फी माफिचा फायदा राजकारन्याचे मुल, श्रीमंताचे मुल उपटत आहेत. गरीब तो एस्.सी असो वा ब्राम्हण ह्यांना मिळावयास हवा. मी स्वतः एस्.सी . आहे पण मला मनापासुन वाटते कि आरक्षण पुर्ण बंद करुन फक्त ज्याची शिक्षण घेण्याची ऐपत नाही त्याला सवलत द्यावी.
  • Log in or register to post comments
ए
ए. प्रशांत Mon, 01/19/2009 - 06:58 नवीन
आरक्षण हटवा मोहिम राबवा
  • Log in or register to post comments
क
कालिन्दि मुधोळ्कर Mon, 01/19/2009 - 08:05 नवीन
मित्रानो, एक इतिहास. अनेक शतके उच्च वणीयानी आरक्षण उपभोगले. सामाजिक "ऍडमिशन" मधे कमी गुण असूनही, त्यांना जागा मिळाली, पण इतरांना मिळू शकली नाही. उच्च वणीयांवर राग अजिबात नाही. पण, हे कितपत योग्य आहे? गुण हाच निकष मानला जावा असं मला वाटतं. कदाचित माझा सूर थोडा वरच्या पट्टीतला असेल, पण ....... मला नाही वाटत माझा मुद्दा चुकीचा आहे.
  • Log in or register to post comments
श
शुभान्गी Mon, 01/19/2009 - 17:04 नवीन
अगदी बरोबर.... मला असे वाट्ते आरक्षणची गरजच नाही. अशाने खूप हुशार लोक मागे पडतात.. आरक्षणा साठी जात, आड्नाव बद्ललेले लोक ही आम्ही पाहीली आहेत..... असा भेदभाव असायलाच नको असे वाटते.
  • Log in or register to post comments
म
मृगनयनी Tue, 01/20/2009 - 11:33 नवीन
"आरक्षण" हे जातीय निकषांवर आधारित न राहता, आर्थिक निकषांवर आधारित असायला हवे. आजच्या जातिनिहाय समाजव्यवस्थेत, अनारक्षित म्हणुन गणला गेलेला ( की गंडला गेलेला ! :-? ) समाज तोंड दाबुन बुक्क्यांचा मार सहन करत आहे. :( . आजकाल तर, समाजातील एका मूलत: अनारक्षित प्रवर्गाला, "आरक्षित" करवुन घेण्यासाठी काही (देशद्रोही ! ? !)संघटना म्हणे "आत्मघातकी पथके" ही उभारत आहेत!!!! कुठवर चालणार हे ? सर्वसामान्य जनतेला भडकवुन, जातीय दंगली घडवुन आणणे, रस्ते अडवुन दगडफेक करणे, महापुरुषांच्या-संतांच्या मिरवणुकी अडवुन जाळपोळ करणे, ""आमच्या आरक्षणाच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर तुम्हाला सुरक्षित राहू देणार नाही"" अश्या धमक्या देणे, इ. इ. इ. "आरक्षण" तर केवळ एक कारण आहे. धूर्त राजकारणी मात्र त्याचा व्यवस्थित वापर करुन बहुसंख्य लोकांचे मत आपल्या बाजुने वळवण्याच्या प्रयत्नात आहेत. पण यात भरडला जाणार आहे तो "सर्वसामान्य समाज"च. मग भले तो आरक्षित असो किन्वा अनारक्षित! ""जातीय निकषांवर आधारित आरक्षण"" हे ६० वर्षांपूर्वी योग्य होते, असे म्हणता येइल. कारण तेव्हाचा समाज शिक्षणाच्या बाबतीत तितकासा जागरुक नव्हता. "निरक्षरता आणि गरीबी" यांनी ग्रासलेल्या विशिष्ट समाजाला तेव्हा "आरक्षणा"ची खरोखर आवश्यकता होती. त्यामुळे पण ६० वर्षांपासून साक्षरतेसाठी जागृत झालेल्या समाजाला, आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम असलेल्या समजाला.....जर आजही २१व्या शतकात आरक्षणाच्या कुबड्या लागत असतील तर खरोखर शरमेची गोष्ट आहे. आजच्या घडीला देशात आर्थिकदृष्ट्या मागासलेला आणि तरीही अनारक्षित असलेला समाज बर्‍याच प्रमाणात आहे, आणि तो वाढतो आहे. कित्येक वर्षांपासुन, "समता आणि प्रेम" या तत्वांचा पुरस्कार करणार्‍या समाजाची "समता" अशावेळी का बरे दिसत नाही? :-? शिकून , संघटित होउन,(आणि पैसा कमवून) जर पुन्हा पुन्हा आरक्षणासाठीच "संघर्ष" होणार असेल, तर तो समाज केवळ ""शिक्षित"" होईल, पण सुशिक्षित आणि सुसंस्कृत मुळीच नाही. कारण या समाजात साहजिकच नीतिमत्तेचा अभाव असेल. पण हे कुठेतरी थाम्बवायलाच पाहिजे. समाजाला स्वार्थी बनण्यापासुन वाचवायला हवे. त्यामुळेच आर्थिक निकषांवर आधारित आरक्षण हवे, जातीय निकषांवर आधारित नको. जय हिन्द ! युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    20 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    20 hours 17 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    20 hours 18 minutes ago
  • सुंदर !!
    20 hours 21 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    20 hours 24 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा