Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

पीके - २

व
वेदश्री
Fri, 04/25/2008 - 14:20
🗣 54 प्रतिसाद

Book traversal links for पीके - २

  • ‹ पीके !
  • Up
  • पीके - ३ ›

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 16748 views

🗣 चर्चा (54)
म
मुक्तसुनीत Fri, 04/25/2008 - 14:22 नवीन
३. बर, सगळे प्राणी पिकनिकला जातात, फक्त जिराफ सोडुन का? - शितल कारण तो फ्रिजात असतो ना !
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Fri, 04/25/2008 - 14:23 नवीन
वा वा ... च्यामारी शुक्रवारची संध्याकाळ साजरी झाली :)
  • Log in or register to post comments
व
वेदश्री Fri, 04/25/2008 - 14:25 नवीन
कोड्याचे लॉजिकल उत्तर जर ते कोडे विचारणारालाच द्यावे लागले, तर इतरांना काय शिक्षा? एक मिसळपाव पार्टी ! कसें? असा जर काही नियम झाला तर मला दोन पार्ट्या मिळतील असा नूर दिसतोय एकंदरीत.. :-)
  • Log in or register to post comments
व
वेदश्री Fri, 04/25/2008 - 14:30 नवीन
अरे बापरे ! पार्टी द्यावी लागेल म्हणून सगळ्यांचा सुंबाल्या का???? मी नुसतं गमतीने म्हणाले होते.. :))))
  • Log in or register to post comments
न
नारदाचार्य Fri, 04/25/2008 - 14:32 नवीन
डोकं पकवणं चांगलं नव्हे. मिसळ पाठवून देतो. पण आता उत्तरं द्या.
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Fri, 04/25/2008 - 14:34 नवीन
जास्त पिळू नका.
  • Log in or register to post comments
व
वेदश्री Fri, 04/25/2008 - 14:35 नवीन
१३ च्या निम्मे ८ रोमन पद्धतीचे आकडे वापरून मिळवता येते का बघा बरं.. पक्यावाल्या कोड्याचे उत्तर द्यायला भीती वाटत आहे.. कारण ते खर्रंच पकाऊ कोडे आहे ! पकाऊ उत्तर वाचून मला मिपावरून हद्दपार केले तर काय घ्या?!!! :-)
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Fri, 04/25/2008 - 14:37 नवीन
पक्यावाल्या कोड्याचे उत्तर द्यायला भीती वाटत आहे.. कारण ते खर्रंच पकाऊ कोडे आहे ! पकाऊ उत्तर वाचून मला मिपावरून हद्दपार केले तर काय घ्या?!!! :-)
आताऽऽऽऽ.... नाही दिले तर हद्दपार करू!
  • Log in or register to post comments
व
वेदश्री Fri, 04/25/2008 - 14:44 नवीन
>आताऽऽऽऽ.... नाही दिले तर हद्दपार करू! बापरे ! ठीके.. देते बापडी उत्तरे.. १३ हा आकडा रोमन लिपीमध्ये XIII असा लिहितात तर त्यात मध्ये आडवी रेष मारायची.. म्हणजे निम्मा केल्याचाच प्रकार ना? वरती जो भाग राहील ( VIII ) तो असेल रोमन ८ सारखा.. म्हणजे झाले की नाही १३ च्या निम्मे ८?! आता जाऊया पक्याकडे.. प्रकाशला त्याचे दोस्त काय म्हणायचे - पक्या पक्याच्या उलट काय होते? - कॅप कॅप म्हणजे काय? - टोपी टोपीच्या उलट काय? - पीटो पीटो म्हणजे काय? - मारा माराच्या उलट काय? - रामा रामा हा कोण होता? - देव देवच्या उलट काय? - वदे वदे म्हणजे काय? - बोलो बोलोच्या उलट काय? - लोबो लोबो हा कोण होता - शास्त्रज्ञ.. म्हणून पक्यादेखील शास्त्रज्ञ !!! हुश्श... :-)
  • Log in or register to post comments
न
नारदाचार्य Fri, 04/25/2008 - 14:46 नवीन
तुमच्या पायांचा फोटो पाठवा. ते उलटे नाहीत ना पाहू द्या. सरळ असतील तर वंदन करतो. उलटे असतील तर टांगून ठेवतो. आयला काय डोकं पकवलंय... लय भारी. नारायण, नारायण...
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Fri, 04/25/2008 - 14:49 नवीन
अरे काय हे? काय चाललय काय नक्की? मला माझा टी.एल. रोखून बघतोय...नजरेत "च्यायला मेंटल हॉस्पिटलात' फोन करावा लागणार " भाव!!! मी एकटाच गडगडाटी हसतोय पण आणि स्वत:चे केस ओढतोय.... शेजारची तामिळी-कानडी गाढवं बावचळून गेलीयेत.... अगं ए वेदश्रीताई....पाय कुठायत तुझे? फोटो चढव इथेच त्यांचा...हार फुलं हळद-कुंकु वाहीन म्हणतो....
  • Log in or register to post comments
झ
झकासराव Sat, 04/26/2008 - 14:57 नवीन
=)) हे त्या कोडाच्या उत्तरासाठी. धमाल माझी अवस्था देखील तुझ्यासारखीच झाली रे. फक्त आज वीकेंड असल्याने आमचा टी ली लवकर पळालाय. :)
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Fri, 04/25/2008 - 14:51 नवीन
लोबोच्या उलटे काय - बोलो बोलो म्हणजे काय - वद वदच्या उलटे काय - दव दवच्या उलटे काय - वद वदतात कुठून - तोंड तर तुझे तोंडभरून कौतुक!
  • Log in or register to post comments
न
नारदाचार्य Fri, 04/25/2008 - 14:38 नवीन
मिसळ पाठवतोय. आईनस्टाईनकन्ये, दे आता उत्तर. भास्कराचार्यकन्ये, दे आता उत्तर.
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Fri, 04/25/2008 - 14:38 नवीन
XII आणि VII (मधे आडवी रेघ देउन.)
  • Log in or register to post comments
न
नारदाचार्य Fri, 04/25/2008 - 14:39 नवीन
जरा समजावून सांगा रे हे काय आहे ते....
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Fri, 04/25/2008 - 14:41 नवीन
मुनीवर्य.... रोमन १३ म्हणजे XIII आता निम्मे करायला.. बरोब्बर मधे १ आडवी रेघ द्या.. झाले ८.. म्हणजे रोमन VIII
  • Log in or register to post comments
न
नारदाचार्य Fri, 04/25/2008 - 14:43 नवीन
थोडं चुकलं काय मनस्वी? तिथं बारा आणि सात दिसताहेत...
  • Log in or register to post comments
व
वेदश्री Fri, 04/25/2008 - 14:45 नवीन
अरे वा ! म्हणजे नविन पीके १२च्या निम्मे ७ सिद्ध करा !!! :))
  • Log in or register to post comments
व
वेदश्री Fri, 04/25/2008 - 14:50 नवीन
एकदम सहीये मनस्वी ! मला उगाच धमकावलं म्हणजे मगाशी.. :-(
  • Log in or register to post comments
न
नारदाचार्य Fri, 04/25/2008 - 14:42 नवीन
निषेध, निषेध, निषेध. आमचं डोकं खाणाऱ्यांचा आणि त्यानंतर तंगवणाऱ्यांचा निषेध.
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश Fri, 04/25/2008 - 14:45 नवीन
नारायण नारायण करत नारदाचार्य तुम्ही इकडचे तिकडे करता.... साधी एक काडी तुम्हाला इकडची तिकडे करता आली नाही.;))) तुम्ही कसले हो नारद? ह.घ्या.:))))
  • Log in or register to post comments
न
नारदाचार्य Fri, 04/25/2008 - 14:49 नवीन
नारद नव्हे. नारदाचार्य. ते काड्या इकडून तिकडं करायचे. आम्ही फक्त काड्या घालत असतो. 'ह. घ्या.'ची गरज नाही हो. येऊन जाऊन चार घटका विरंगुळ्याचा इथं हेतू. त्यात ते ह. घ्या. हे टंकीत करण्याचे कष्ट कशाला. सारं काही ह.च घेऊ.
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Fri, 04/25/2008 - 14:50 नवीन
ते कोडे पाहून नारद सुद्धा गारद झाला म्हणायचा. बाकी काड्या लावणार्‍या नारदाला साधी एक काडी हलवता येऊ नये याचे आश्चर्य वाटतंय. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Fri, 04/25/2008 - 14:54 नवीन
हे आवडले!
  • Log in or register to post comments
व
वरदा Fri, 04/25/2008 - 14:46 नवीन
रोमन १३ म्हणजे XIII आता निम्मे करायला.. बरोब्बर मधे १ आडवी रेघ द्या.. झाले ८.. म्हणजे रोमन VIII हे मला खूप आवडलं ते पक्याचं काय? शास्रज्ञ पकाऊ असतात असं काहीतरी आहे का?
  • Log in or register to post comments
न
नारदाचार्य Fri, 04/25/2008 - 14:50 नवीन
थोडं वर जाऊन पहा. उत्तर पडलंय तिथं.
  • Log in or register to post comments
व
वरदा Fri, 04/25/2008 - 14:54 नवीन
पाहिलच नाही...सॉलीड पकाऊ आहे ... आवडलं
  • Log in or register to post comments
व
वेदश्री Fri, 04/25/2008 - 14:54 नवीन
लगोलग पैसे डबल करायचे आहेत.. काही उपाय आहे का?
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Fri, 04/25/2008 - 14:59 नवीन
लगोलग पैसे डबल करायचे आहेत.. काही उपाय आहे का? बँक ऑफ बिहार मध्ये गुंतवा. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे
  • Log in or register to post comments
व
वेदश्री Fri, 04/25/2008 - 15:01 नवीन
अम्ह्म.. गुंतवा मग बँकेकडे तोंड ताणा.. वो झोल नहीं मंगता है.. अभ्भीके अभ्भी अपनका रोकडा डबल होनेको मंगता है.. :))
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Fri, 04/25/2008 - 15:01 नवीन
दुमडा....
  • Log in or register to post comments
व
वेदश्री Fri, 04/25/2008 - 15:02 नवीन
नाही.. दुमडा, फाडा.. असे नाही करायचे.
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Fri, 04/25/2008 - 15:06 नवीन
मग झेरॉक्स करा. सोप्पय की नाई? समर्थ झेरॉक्स,डेक्कन जिमखाना,पुणे-४ (आमच्याकडे कोर्‍या कागदाच्या झेरॉक्स काढल्या जातील) कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे
  • Log in or register to post comments
व
वेदश्री Fri, 04/25/2008 - 15:08 नवीन
नाही हो.. झेरॉक्स करण्याइतकापण वेळ नाहीये आपल्याकडे. लग्गोल्लग दामदुप्पट पायजेल आपल्याला..
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Fri, 04/25/2008 - 15:12 नवीन
लई पकवलं.आता सांगून टाका एकदाचं. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे
  • Log in or register to post comments
व
वेदश्री Fri, 04/25/2008 - 15:13 नवीन
शिंपल.. पैसे आरशासमोर ठेवायचे !!!
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Fri, 04/25/2008 - 15:20 नवीन
Image removed.वाटलंच होतं,हे असं काही उत्तर असेल ते.(मग सांगीतलं का नाहीस लेका?) कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे
  • Log in or register to post comments
न
नारदाचार्य Fri, 04/25/2008 - 15:23 नवीन
पक, पक, पकाक!
  • Log in or register to post comments
व
वरदा Fri, 04/25/2008 - 15:15 नवीन
देऊन दोनदा सुट्टे मागा..थोडं भांडण झालं तरी चालेल ते घ्याच....
  • Log in or register to post comments
व
वरदा Fri, 04/25/2008 - 15:15 नवीन
मी उगाच डोकं खाजवलं.....
  • Log in or register to post comments
व
वेदश्री Fri, 04/25/2008 - 15:23 नवीन
लाल आहे पण मिरची नाही, कृष्ण आहे पण काळा नाही, आड आहे पण पाणी नाही आणि वाणी आहे पण दुकानच नाही.. असे काय?
  • Log in or register to post comments
न
नारदाचार्य Fri, 04/25/2008 - 15:25 नवीन
लालकृष्ण आडवाणी
  • Log in or register to post comments
व
वेदश्री Fri, 04/25/2008 - 15:26 नवीन
:-) बरोबर !
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Fri, 04/25/2008 - 15:27 नवीन
अरे ..... श्वास घ्यायला जागा द्याल का नाही ! नुसते टणाटणा फुटाणे फुटत आहेत .... हापिसातले लोक मला वेड्यात काढणार ! :-)
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Fri, 04/25/2008 - 15:28 नवीन
१ आहे पण २ नाही.. सांगा काय?
  • Log in or register to post comments
व
वेदश्री Fri, 04/25/2008 - 15:29 नवीन
वरून आली घार तिला मारले ठार रक्त पिले घटाघटा मास खाल्ले चटाचटा ! तर असे हे काय?
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Fri, 04/25/2008 - 15:30 नवीन
कृपया बालवाडीतील कोडी घालू नयेत.
  • Log in or register to post comments
न
नारदाचार्य Fri, 04/25/2008 - 15:32 नवीन
हेच म्हणतोय (दहावी फ) नारदाचार्य
  • Log in or register to post comments
व
वेदश्री Fri, 04/25/2008 - 15:34 नवीन
सॉऽऽऽरी !
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    19 hours 58 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    20 hours 10 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    20 hours 11 minutes ago
  • सुंदर !!
    20 hours 14 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    20 hours 17 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा