बिरुटे साहेब तुम्ही छुपे रुस्तम निघालात. एकदम गजल लिहीलीत! तब्येत वगैरे ठीक आहे ना?
प्रयत्न चांगला आहे. फारच निराशावादी सुर लावलाय तुम्ही असे वाटतेय. पण मला त्यात जास्त काही कळत नाही तेव्हा मनावर घेऊ नका बरं का.
आता इथले तज्ञ त्यावर साधक बाधक चर्चा करतीलच. झालंच तर सुचवण्या देतील. तेव्हा तयार राहा मरणाला.(जाल कुठे म्हणा!)
:)))))))))
मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहेमराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
बिरुटे सर,
तुम्ही पुन्हा काव्यस्फुरण आमच्यापर्यंत पोचवू लागलात, ही आनंदाची गोष्ट आहे.
बेहराची साधक-बाधक चर्चा येथील वजनदार गझलकार करतीलच.
(विडंबनाला तयार राहा !! :-)
देवसाहेब, धनंजय, प्रतिक्रियेबद्दल आभारी !!! 'एका असाहाय तरुणीची जातीय कारणातून झालेली होरपळ' अशा आशयाची रचना गझलेत बांधता येते का ? एक प्रयत्न केला !!! पण ही गझल नसावी असे वाटते. गझलेचे स्वतःची काही वैशिष्टे आहेत. एकतर गझलकार उत्तम कवी असला पाहिजे आणि दुसरी अट की त्याला वृत्तांच ज्ञान असलं पाहिजे. या दोन्हीही अटीत आम्ही बसत नाही !!! :) प्रत्येक शेर एक स्वतंत्र कविता असते तेच आम्हाला जमले नसावे असे वाटते. अर्थात गझलप्रेमींची यावर मते येतील, बेहराची साधक-बाधक चर्चा येथील वजनदार गझलकार करतीलच. त्याचीच आम्हीही वाट पाहत आहोत.
प्रा.बिरुटे ,
गझल छान आहे , पण याला सुरेश भट यांच्या "एल्गार" या गझलेचा फारच दरवळ आहे .....
या २ शेवटच्या ओळी बघा :
ही जात कोण माझी , जाताच जात नाही
पण "जाती"वादींची , "लोकसभे" त धाव आहे !
पाळू नयेत कोणी जाती-जमाती येथे
सगळ्या गल्लाभरूंचा आरक्षणाचा घाव आहे !
----------------राम नगरकर यांच्या "रामनगरी" मधील वाक्य आठवले : जी जात नाही, ती जात !
तेव्हा मुकीच होते आता मुकीच आहे
आता मुकेपणाचा झाला सराव आहे
या ओळी फारच सुंदर!
क्या बात है बिरुटेशेठ! च्यामारी, तुम्ही इतकं उत्तम काव्य करता हे माहितीच नव्हतं!
अजूनही येऊ द्या!
आपला,
(बिरुटेसरांचा विद्यार्थी) तात्या.
जमवा की राव ...
अहो, काही कवी वृत्तबद्ध काव्याशिवाय कशालाच कविता म्हणत नाहीत.
काही कवींच्या मते वृत्तापेक्षा वृत्तीला पहावे.
मला आपल्या काव्यात सचोटी वाटली.
(आपला पुणेरी)
अ. अ. जोशी
गझल म्हणत नाही पण तुम्ही केलेली रचना, तुम्हाला काय सा॑गायचे आहे ह्याचा उलघडा करते,
कारण, आन॑द समजुन घेण्याच्या अनेक वाटा आहेत , पण दु:खाचे तसे नाही, म्हणुन दर्दी काव्याच्या वाटा फार विरळ.
तुमच्या आणखी काव्य रचना वाचायला आवडतील.
बिरुटे सर, तुमचा पहिलाच प्रयत्न एवढा चा॑गला आहे कि असे वाटत नाही हा तुमचा पहिला प्रयत्न आहे. तुमच्या अजुन काच्यरचना वाचायला आवडतील. जर आशावादी असतील तर अजुन आवडतील.
तुमचा एक विद्यार्थी,
शेवटचा बाजीराव
गझल शिर्षक असलेल्या पण मिसरा, मतला, काफिया,रदीफ,मक्ता ( शब्द माहित आहेत हो, उपयोग करता येत नाही ) यांचा कोणताच ताळेमळ नसतांना केलेल्या कौतुकाने प्रा.डॉ. मिसळनवाज खूष झाले आहेत. पुढे जेव्हा गझल लिहू तेव्हा गझलेचे सर्व धर्म पाळण्याचा प्रयत्न करु !!!
प्रमोद देव, धनंजय, तात्या,सप्रेम साहेब,आनंदयात्री, अजय जोशी,मदनबाण,शितल, विदेश,सुर्य, विसुनाना,शेवटचा बाजीराव्,चतुरंग,चित्रा,आणि स्वाती....आमच्या अशा प्रकारच्या पहिल्या वाहिल्या प्रयत्नाला मनापासून दाद दिल्याबद्दल आम्ही आपले आणि वाचकांचेही शुक्रगुजार आहोत.
विशेष आभार :- मिसळपाववर अक्षररंगाची सुविधा उपलब्ध करुन दिल्याबद्दल निलकांतचे, तात्याचे, आभार !!!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बिरूटे सर.. यू टू???? :))
आवडली कविता. ..अतिशय सुरेख अर्थ..
गझल लिहिण्याचा मी ही कित्येक दिवस प्रयत्न करते आहे पण जमत नाहिये... पण नक्की जमेल एकेदिवशी...
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
देवसाहेब, धनंजय,
प्रतिक्रियेबद्दल आभारी !!!
'एका असाहाय तरुणीची जातीय कारणातून झालेली होरपळ' अशा आशयाची रचना गझलेत बांधता येते का ? एक प्रयत्न केला !!!
पण ही गझल नसावी असे वाटते. गझलेचे स्वतःची काही वैशिष्टे आहेत. एकतर गझलकार उत्तम कवी असला पाहिजे आणि दुसरी अट की त्याला वृत्तांच ज्ञान असलं पाहिजे.
या दोन्हीही अटीत आम्ही बसत नाही !!! :)
प्रत्येक शेर एक स्वतंत्र कविता असते तेच आम्हाला जमले नसावे असे वाटते. अर्थात गझलप्रेमींची यावर मते येतील, बेहराची साधक-बाधक चर्चा येथील वजनदार गझलकार करतीलच. त्याचीच आम्हीही वाट पाहत आहोत.