Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

मिनी स्प्रिंग रोल्स

स
स्वाती दिनेश
Mon, 04/21/2008 - 08:31

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 11993 views

💬 प्रतिसाद
स
स्वाती राजेश Mon, 04/21/2008 - 10:48 नवीन
रेसिपी छान आहे. एग रोल घरी सुद्धा करता येतात. तुला माहीत आहे का कृती?
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Mon, 04/21/2008 - 10:54 नवीन
एग रोल/स्प्रिंग रोल शीट घरी करता येतात पण फार वेळ जातो(आणि त्याची रेसिपी इथे आत्ता माझ्याकडे नाहीये,भारतात आहे:( आणि बाजारात मिळतात ग तयार शीट्स :) फरक- एग रोल शीट्स मैदा+कणकेच्या असतात आणि स्प्रिंग रोल शीट्स कॉर्नफ्लोअरच्या असतात. एवढेच लक्षात आहे,प्रमाण बिमाण लक्षात नाही,:( स्वाती
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश Mon, 04/21/2008 - 11:07 नवीन
मी १/४ कप मैदा, १/२ टे.स्पून कॉर्नफ्लोअर ,चिमूटभर बेकिंग्पावडर घालते व घट्ट मळते. अर्ध्या तासाने पातळ पोळी लाटून भाजी भरून रोल करून तळते. पण अंडे घालून, पातळ डोसा बनवून अशी काहीतरी रेसिपी आहे ती तुला माहीती आहे का? म्हणून विचारले.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 04/21/2008 - 12:40 नवीन
वा स्वाती, अतिशय सुंदर पाकृ आणि फोटोदेखील! माझी ही अत्यंत आवडती डिश आहे. चिकन/मटण स्प्रिंग रोल्स - ह्या करता भाज्यांऐवजी चिकन/मटणखिमा वापरणे.बाकी साहित्य व कृती सारखीच. मला मटणखिम्याचे स्प्रिंगरोल्स अधिक आवडतात, सिंगलमाल्ट ग्लेनमोरांजीसोबत फारच छान लागतात! ;) तू पाठवलेला फोटू मिळाला, त्याबद्दल धन्यवाद.. काही फोटू अद्याप रांगेत आहेत, नंबराप्रमाणे तुझ्या स्प्रिंगरोल्सचा फोटूही मिपाच्या मुखपृष्ठावर चढवणार आहे! ;) तात्या.
  • Log in or register to post comments
व
वरदा Mon, 04/21/2008 - 14:20 नवीन
शीट्स आणते आजच ......झक्कास रेसिपी ...फोटो पाहूनच भूक लागली...
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Fri, 04/25/2008 - 02:14 नवीन
पा.कृ.छान वाटते आहे, करुन पहायला हवी. तयार 'स्प्रिंग रोल शीट्स' ग्रोसरी स्टोअरमधे कुठच्या सेक्शनमधे शोधावेत? चतुरंग
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Fri, 04/25/2008 - 10:28 नवीन
कोणत्याही एशियन दुकानात (चिनी,जपानी,थायी,श्रीलंकन्,भारतीय इ. बहुतेक दुकानात असतात) फ्रोझन सेक्शन मध्ये असतात.
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Fri, 04/25/2008 - 05:53 नवीन
स्वाती दिनेश, पाककृती चांगली आहे. ह्यात पाणी सुटणार्‍या, म्हणजे भोपळी मिरची सरख्या, भाज्या टाळाव्यात किंवा कमी वापराव्यात. कोबी, गाजर, फरसबी अशा भाज्या वापराव्यात. भाज्या पाण्यात टाकून शिजवून नंतर पाणी काढून टाकण्या पेक्षा तेलावर (किंचित) थोडे आलं-लसूण परतून त्यावर भाज्या डायरेक्ट टाकाव्यात त्यातच तुम्ही लिहील्याप्रमाणे इतर साहित्य घालून भाज्या टॉस कराव्यात किंवा फुल गॅसवर झरझर परताव्यात. ह्या अर्धवट शिजवायच्या असतात, पूर्ण नाही. गॅस बारीक असेल तर ह्या भाज्यांनाही पाणी सुटण्याची शक्यता असते. असो. भाज्या अर्धवट कच्या/अर्धवट शिजलेल्या असणे महत्त्वाचे. तेलावर परतल्या मुळे, पाण्यात शिजवण्यापेक्षा, वेगळी आणि चांगली चव येते. झंझटही कमी आहे. ज्यांना अंडे नको असेल त्यांनी पाण्याचा हात लावून बंद करावे नुसत्या पाण्यापेक्षा मैद्याची पातळ पेस्ट वापरावी. स्वाती राजेश, अंडे घालून, पातळ डोसा बनवून अशी काहीतरी रेसिपी आहे ती तुला माहीती आहे का? मैदा, कॉर्नफ्लोर आणि अंडे मिसळून थोडे पाणी घालायचे आणि हे मिश्रण हाताने एकाच दिशेने खूप - खूप फेसायचे. नंतर एक छोट्टेसे धीरडे टाकून, फ्राय पॅन फिरवून, त्याचा पात्तळ थर पॅनला द्यायचा. हे एका बाजूनेच शिजवायचे. असे धिरडे आपल्या मनासारखे पातळ झाले तर बाकीची धिरडी टाकायची अन्यथा थोडे पाणी घालून बॅटर जरा पातळ करून घ्यायचे. एका रिकाम्या ताटलीवर कॉर्नफ्लोर भुरभुरून टाकायची. त्यावर पॅन मधून काढलेले धिरडे काढायचे त्यावर पुन्हा जरा कॉर्नफ्लोर भुरभुरायची (म्हणजे गरम धिरडी एकमेकांना चिकटत नाहीत) आणि त्यावर दुसरे धिरडे टाकायचे. प्रत्यक्ष स्प्रिंग रोल्स करताना एका धिरड्याचे मधून सुरीने दोन भाग करायचे. कापलेला सरळ भाग आपल्याकडे घेऊन गोलाकार भाग समोर घ्यायचा. ह्यात आता तयार सारण भरून डाव्या-उजव्या कडा त्यावर वळून नंतर स्वतःजवळची बाजू सारणावर वळत साधारण घट्ट वळकटी वळायची , अंडे लावून बंद करायची. बाकी कॄती वर दिल्या प्रमाणे.
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Fri, 04/25/2008 - 08:13 नवीन
तुमच्या टीप्स बद्दल धन्यवाद, ह्म्म.. भाज्या टॉस केल्या तर छान क्रिस्प राहतील आणि झंझट कमी,:) बरोबर ! पुढचे स्प्रींग रोल असेच करेन.:) स्वाती
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Fri, 05/23/2008 - 21:34 नवीन
ह्या वेळी स्प्रिंग रोलच्या भाज्या तुम्ही सांगितल्याप्रमाणे जास्त आचेवर अर्धकच्च्या परतून घेतल्या.त्यामुळे कमी झंझट आणि क्रिस्पी राहिल्या भाज्या,असे २ फायदे झाले.धन्यु. स्वाती
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश Fri, 04/25/2008 - 10:22 नवीन
धन्यवाद, मी किती दिवसापासून पाहात होते. पण एक शंका..ह्या धिरड्या करून फ्रीज मधे ठेवल्या तर चालतील का? कारण ऐनवेळी करायच्या म्हणजे जरा वेळखाऊ काम आहे नाही?
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Fri, 04/25/2008 - 10:27 नवीन
ह्या धिरड्या करून फ्रीज मधे ठेवल्या तर चालतील का? नाही. त्या थंडीने गारठून एकाच जागी बसून राहतील. हा: हा: हा: ओके. विनोद राहू दे बाजूला. करून फ्रिज मध्ये ठेवायला हरकत नाही. २-३ दिवस टिकतील.
  • Log in or register to post comments
व
वरदा Fri, 04/25/2008 - 19:50 नवीन
गॅस बारीक असेल तर ह्या भाज्यांनाही पाणी सुटण्याची शक्यता असते. बरं झालं काका मी करुन पहाण्याआधी तुम्ही आयडीया दिली आता तेलावर टॉस करुनच करेन्...शीटस आणुन ठेवल्यात कालच...
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 04/26/2008 - 16:56 नवीन
मिनी स्प्रिंग रोल्स बटाटाच्या समोश्याप्रमाणे दिसताहेत तेव्हा अस्सं काही खादाडीला आवडेलच. रेसेपी नेहमीप्रमाणेच जोरदार !!!
  • Log in or register to post comments
च
चकली Tue, 05/27/2008 - 19:35 नवीन
मी स्प्रिंग रोल्स पट्टी अशी बनवते ..दूवा चकली http://chakali.blogspot.com
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 35 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 39 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 43 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा