Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

शरद पवारांच्या आवाहनात तथ्य किती?

द
देवदत्त
Sun, 04/20/2008 - 10:13
🗣 5 प्रतिसाद

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3370 views

🗣 चर्चा (5)
ह
हेरंब Sun, 04/20/2008 - 14:02 नवीन
शेतकर्‍यांना चांगला भाव मिळत नाही हे खरेच आहे. व त्याचे मूळ कारण आहे मधले दलाल. आपल्या देशांत या दलालांनी धुमाकुळ घातला आहे. परिणामी सर्वच क्षेत्रांत शेतकरी, मजुर, कलाकार वगैरे यांना खरा मोबदला मिळतच नाही आणि हे दलालच गब्बर होतात. राजकारण्यांचीही या दलालांनाच साथ आहे. किंबहुना त्यांचेच पित्ते या दलालीत सामील आहेत. या देशांतल्या गरीब, भोळ्याभाबड्या जनतेला राजरोस लुबाडले जात आहे. पण त्यांना रोजच्या असंख्य कटकटींमध्ये अशा तर्‍हेने गूंतवून ठेवले आहे की एकजूट करुन, या सर्वच सत्तेच्या दलालांना फेकून देणे त्यांच्या आवाक्याबाहेर ठरले आहे. हे सर्व या निलाजर्‍या राजकारण्यांना चांगलेच माहित आहे म्हणूनच भरल्या पोटी ते असे बोलू शकतात. (यांत तथाकथित साम्यवादीही मोडतात.)
  • Log in or register to post comments
द
देवदत्त Mon, 04/28/2008 - 19:25 नवीन
पण त्यांना रोजच्या असंख्य कटकटींमध्ये अशा तर्‍हेने गूंतवून ठेवले आहे की एकजूट करुन, या सर्वच सत्तेच्या दलालांना फेकून देणे त्यांच्या आवाक्याबाहेर ठरले आहे. सहमत. आणखी गेल्या आठवड्यात जे काही आणखी राजकारण झाले त्यावरून तर हेच दिसते की त्यांना पाऊल उचलायचे नाही. फक्त चांगले होत असेल तिकडे कॉलर वर करून उभे राहणे. बाकी महत्वाच्या मु्द्यांकडे दुर्लक्ष करून इतर जमेल त्या विषयावर लोकसभेत्/विधानसभेत गोंधळ घालणे हेच दिसते.
  • Log in or register to post comments
द
देवदत्त Sun, 10/04/2009 - 06:40 नवीन
पवार साहेब स्वतः केलेली वक्तव्ये पडताळून पाहत नाहीत असे पुन्हा एकदा दिसतेय. "वाटेल ती किंमत मोजून महागाई आटोक्यात आणू" आत्ताच लोकसत्तावर वाचल्याप्रमाणे, शरद पवारांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असे वक्तव्य केले. आता जर ते असे म्हणत आहेत, तर गेल्या वर्षी त्यांनी विधान केले होते की "शेतकर्‍यांना भाव मिळत असताना महागाईचा बाऊ नको ", त्या नंतर दीड वर्षात त्यांनी काय केले होते ह्याबाबत माहिती कुठे मिळेल? पाऊस तर दर वर्षीच कमी जास्त पडत असतो. मग त्याबाबत एक ठराविक लक्ष्य ठेवून काहीच का केले जात नाही? निवडणूकीच्या आधी सांगणे की आम्ही काय वाट्टेल ते करू आणि निवडणूका संपल्यावर वेगळी कारणे देणे हेच चालत राहील काय?
  • Log in or register to post comments
ट
टारझन Sun, 10/04/2009 - 09:11 नवीन
सगळेच साले फोकलीचे एकजात ... राज ठाकरे कडून काहीतरी अपेक्षा होत्या ... पण त्याने पण मुंबै मधे दोन टिकीटं उत्तर भारतीयांना दिली !! छ्या !! पवारसाहेबांबद्दल काय बोलावं ? क्रिकेट खेळत बसतात ... साखरकारखाण्यांपासून कापसापर्यंत .. सगळीकडे त्यांची भागिदारी ! यातंच सगळं काही आलं !! सगळे एकसारखेच्च्च !! परवाच डिस्कव्हरी चॅनलवर "वाईल्ड डिस्कव्हरी" नामक कार्यक्रम पहात होतो. त्यात दाखवलं , एक सिंहांचा कळप शिकार खाऊन शांत झोपलेला असतो आणि बाकी प्राणी अगदी त्यांच्या कक्षेत येउन निर्धास्त चरत असतात. समालोचकाच्या म्हणन्यानुसार ,त्या प्राण्यांना माहित असते की ह्यांची आजची शिकार संपलेली आहे , आणि आता हे हमला करणार नाहीत म्हणून ... पहा कंपॅरिझन करून :)
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी Sun, 10/04/2009 - 15:39 नवीन
कृषी या विषयावर त्यांचा दांडगा अनुभव आहे अशी हवा आहे...ते प्रथम कृषीमंत्री आले तेंव्हा सर्वात जास्त आत्महत्या शेतक~यांनि केल्या...व त्या अजुनहि चालुच आहेत...योग्य भाव मिळुन हि का असा शेतकरी प्राण त्याग करेल?....या मारगाने भाववाढ होवुन शेतकरी आत्महत्या करणे थांबवणार असेल तर जनता ति महागाई सहनहि करेल...उध्धव जर शेतक~या साठी काहि करु ईछ्छितो तर ते म्हणतात त्याला शेतितले काहि कळत नाहि....भारतात असा एकहि नेता नाहि ज्याला ह्या आत्म हत्या थाम्बवता येवु नयेत...???..सारेच न कळण्या जोगे आहे.....
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 38 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 51 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    18 hours 54 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा