मिसळ पाव म्हणजे एक लयी भारी संकेत स्थळ आहे काय ?
व
Mon, 08/09/2010 - 06:48
नवीन
नमस्कार,
गांधीवादीने, "हे साफ चुकीचे आहे" हा धागा काढून संपादकांवर टिका चालू केली. म्हणून झोपायला जायच्या आधी मी खालील व्य.नि. पाठवला आहे. आता जे जागे असतील (आणि झोपेत नसतील ;) ) त्यांनी कृपया विचार विनिमय करून योग्य निर्णय घ्यावा. त्यांना मी खालील व्य.नि. पाठवला आणि त्याच वेळेस त्यांचा व्य.नि. देखील संपादकमंडळाच्या आयडीवर आला होता. पण तो मी नंतर वाचला.
धन्यवाद.
नमस्कार, तुमचे "मिसळ पाव म्हणजे एक लयी भारी संकेत स्थळ आहे काय ?" हे लेखन सध्या अप्रकाशीत करण्यात आले आहे. आपले मिपासंकेतस्थळाच्या नावाचा वापर करत विचारत असलेले, "३) त्यांच्या दृष्टीने इतर संकेत स्थळ फडतूस आहेत कि काय ?, आणि ४) बाकी संकेत स्थळावर चर्चा करणारे लोक बावळट, मूर्ख आहेत काय ?" हे प्रश्न, आपल्या नकळत असेल, पण येथील सदस्यांवर अप्रत्यक्ष आरोप करत त्यावरच चर्चा करत दुखावणारे आहेत, असे वाटल्याने तुर्तास संपादक मंडळ ते प्रकाशीत करायचे का नाही यावर विचारविनिमय करत आहे. योग्य निर्णय घेऊन पुढील काही तासांमधे कळवू अथवा धागा प्रकाशीत करू. आपण "हे साफ चुकिचे आहे."धागा काढण्याऐवजी संपादक मंडळास व्यनि अथवा खरडीने विचारू शकता. म्हणून तो धागा देखील अप्रकाशीत केला आहे. धन्यवाद संपादक मंडळ
Mon, 08/09/2010 - 15:07
नवीन
धागा अप्रकाशित केल्याबद्दल आभारी........! :)
इतर संकेतस्थळावरील चर्चा मिपाच्या विचारपिठावर चालू द्यायच्या की त्याबाबत धोरण ठरवले पाहिजे. टीका सोडून इकडचे दुवे तिकडे, तिकडचे दुवे असे हरकत नाही. पण मागे एकदा मी मनोगताबद्दल टीका करणारेच असे काही तरी लिहिले होते तर, तेव्हाच्या संपादकांनी निरोपानिरोपी करुन हा प्रतिसाड उडवला पाहिजे असे सांगितले होते. आणि माझा सुंदर टीका करणा-या एका मोठ्ठ्या प्रतिसादाला दोन संपादक मित्रांनी सुरुंग लावला होता. :)
”तिकडची धुणी तिकडेच धुतली पाहिजे” अशा माझ्या प्रतिसादामुळे सदस्यांच्या भावना दुखावल्या दिसतात. त्यामुळे चर्चाप्रस्ताव आलेला दिसतो. आपण संपादकांनी योग्य निर्णय घ्यावा.
-दिलीप बिरुटे
Mon, 08/09/2010 - 15:33
नवीन
आधी इकड-तिकडची धुणी म्हणजे काय?
वसुलि नावाचे एक सदस्य मिपावर चर्चा आली की त्या अनुषंगाने काहीतरी उपक्रमावर टाकतात. याला कोणी धुणी म्हटले तर मला पटण्यासारखे आहे.
गांधीवादींनी एकच चर्चा उपक्रमावर आणि मिसळपावावर टाकली. याप्रमाणेच, काही इतर लेखकही एकच लेख अनेक संकेतस्थळांवर टाकतात. त्यांना धुणी धुणे वगैरे म्हटलेले मला आठवत नाही.
बाकी, मनोगताच्या प्रतिसादाचे वगैरे काय झाले हे मला माहित नाही. टिका सकारात्मक असेल तर जरूर करावी परंतु तत्या टिकेतून उगीच व्यक्तिगत स्कोर सेटल होत असेल तर ती अनावश्यक वाटते.
असो. वरील धागा अनावश्यक होता. विकास यांनी काढला ते उत्तम झाले.
इतर संकेतस्थळावरील चर्चा मिपाच्या विचारपिठावर चालू द्यायच्या की त्याबाबत धोरण ठरवले पाहिजे.माझ्यामते, जे संकेतस्थळांवर दिसते/ प्रकाशित होते ते जाहीर असते. त्यावरून दुसरी चर्चा सुरु करणार्याचा हेतू नेहमीच स्वच्छ असेल असे नाही परंतु जाहीर विषयाला पकडून सुरु झालेली/ केलेली चर्चा अप्रकाशित करणे म्हणजे मुस्कटदाबी आहे. (पुन्हा यात धोरणात बसणे, संकेतस्थळांवर उगीच टीका वगैरे मुद्दे आहेतच) त्यापेक्षा अशा चर्चा सकारात्मक दिशेने वळवणे किंवा जर सदस्य गोंधळ माजवणारे प्रतिसाद देऊ लागले तर त्याचा हवाला देऊन चर्चा अप्रकाशित करणे मला योग्य वाटते.
Tue, 08/10/2010 - 11:49
नवीन
हो ते करायला हवे होते. गांधीवादी यांनी तशी तक्रारही संपादक मंडळाकडे केली आहे. त्यांचे म्हणणे मला रास्त वाटते. अवलियांचा प्रतिसाद अनावश्यक होता आणि बेजबाबदारही. एखाद्याचे रॅगिंग करावे तसे. असो.
परंतु गडबडीत ते प्रतिसाद अप्रकाशित ऐवजी डिलिट झाले याची सर्वांनी नोंद घ्यावी.
आता त्यावर अवलियाने गोंधळ घालणे सुरु केले आहे. त्यामुळे सदर व्यक्तीकडे विशेष लक्ष असावे.
प्रियाली
Mon, 08/09/2010 - 15:48
नवीन
>>>>>जाहीर विषयाला पकडून सुरु झालेली/ केलेली चर्चा अप्रकाशित करणे म्हणजे मुस्कटदाबी आहे.
सहमत आहे. (प्रा.डॉ.दिलीप बिरुटे आणि अवलिया ह्यांनी तर नक्कीच प्रतिसाद द्यावेत.) इतकी ओळ वगळून चर्चाप्रस्ताव प्रकाशित करायचा असेल तर माझी कोणती हरकत नाही. व्यक्तिगत रोखाचे लेखन सोडून कोणत्याही सदस्याची लिहिण्याच्या बाबतीत मुस्कटदाबी व्हायला नको याच्याशी सहमत.
-दिलीप बिरुटे
Mon, 08/09/2010 - 15:57
नवीन
जाहीर विषय म्हणजे "संकेतस्थळावर टीका" असा नाही.
जाहीर विषय म्हणजे
वटसावित्रीची पूजा
बुडीत खाते - तुम्ही बेल वाजवली का?
वगैरे. तिथे खोडसाळपणा लक्षात आला तरी विषय मांडताना मिसळपाव या संकेतस्थळावर जाहीर टिका नाही (मिपा लय भारी आहे का?) वगैरे. येथे विषयातच अनावश्यकता आहे.
काढला ते बरे झाले.
Mon, 08/09/2010 - 16:11
नवीन
प्रियालींच्या प्रतिसादाशी सहमत.
त्या लेखात म्हणजे गांधीवादींच्या मूळ धाग्यात केवळ एकच चर्चा दोन ठिकाणी टाकली आहे. दोन्ही संकेतस्थळांच्या नियमात बसणारी ती चर्चा आहे, त्यामुळे त्या चर्चेचा विषय आवडला नाही तर त्या संदर्भात अवश्य लिहावे, म्हणजे बिरूट्यांचे पहीले वाक्य सोडल्यास जो इतर प्रतिसाद आहे तसे लिहीण्यात काहीच गैर नाही.
ज्याला सक्रीय मराठी संकेतस्थळे म्हणता येतील अशी माझ्या लेखी तरी अजूनही हाताच्या बोटावर मोजता येण्याइतकीच आहेत. मायबोली, मनोगत पासून ते उपक्रम, मिसळपाव पर्यंत. प्रत्येकाचा फोकस वेगळा आहे, रीडरशीप वेगळी आहे. त्यातले काही (व्यक्ती/लेखन/विचार) आवडू शकेल अथवा नाही. म्हणून त्या संस्थळांनाच नावे ठेवण्याची काय गरज आहे?
म्हणूनच इतर संकेतस्थळांच्या उल्लेखाबाबत मला एकंदरीत काहीतरी भुमिका असावी असे वाटते: