Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

जॅझ जुगलबंदी

ध — धनंजय, Sat, 04/05/2008 - 05:45

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3761 views

💬 प्रतिसाद
स
सुवर्णमयी Mon, 04/07/2008 - 14:26 नवीन
न्यू ऑर्लियन्सला जॅझ फेस्टिवला गेले होते त्याची आठवण झाली. एक वेगळे रूपक. कविता आवडली
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 04/08/2008 - 04:01 नवीन
सॅक्सोफोनच्या भरारीमागचे स्पंदन होणे त्याला प्राप्त झाले. नाजुक नक्षीची बुलंद इमारत! नि सॅक्सोफोन गहरा धरतो लहरा ज्यावर ड्रमचे तुफान गलबत. सुंदर..! केवळ अप्रतिम शब्दयोजना...!! ड्रमचं सॅक्सोफोनच्या भरारीमागचं स्पंदन आणि ड्रमच्या बुलंद इमारतीला सॅक्सोफोनचा लेहेर्‍याची नाजूक नक्षी, हे मैतर, हे अद्वैत आवडले! धन्याशेठ, क्लासच कविता केली आहेस! जियो...! अवांतर - परंतु इथे ड्रम आणि सॅक्सोफोनच्या ऐवजी तबला आणि सारंगी असती तर कविता अधिक गहरी झाली असती असं वाटतं! हिंदुस्थानी अभिजात संगीताचा आधार असल्यामुळे तबला आणि सारंगी यांची अभिव्यक्ति ड्रम आणि सॅक्सोफोनपेक्षा खूपच अधिक वैविध्यपूर्ण आहे, बहुरंगी आहे! काय म्हणतोस? तात्या.
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Tue, 04/15/2008 - 03:21 नवीन
अशाच प्रकारे वेगवेगळ्या संगीतप्रकारांत आपल्याला सौंदर्यानुभूती होते. शेवटची ओळ लिहिता यावी म्हणून कविता लिहिलेली आहे - दोन ओळखीच्या व्यक्ती माझ्या मनात आहेत. त्यामुळे विवक्षित संदर्भ मला बदलता येत नाही :-)
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 04/08/2008 - 04:38 नवीन
जेव्हा सॅक्सोफोन त्याच्या हरकतींमध्ये
गती आणतो,
त्याच्या सुरांत मध ओघळतो -
तो गोफ विणतो
हृदयातील नसांचा आर्त गीतामध्ये.
ड्रमर कळे-न-कळे शिवतो ताशाला,
आणि मानतो आपल्या भाग्याला -
सॅक्सोफोनच्या भरारीमागचे
स्पंदन होणे त्याला प्राप्त झाले. सुंदर !!!!प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Sun, 04/13/2008 - 17:54 नवीन
धनंजयराव, अतिशय सह्ह्ह्ही!!!!!.. अतिशय प्रभावी रूपके.. जरा उशीराच वाचतोय त्याबद्दल स्वारी ;).. पण कविता खूप आवडली भाषांतराच्या विभागात टाकलिए.. मुळ कविता मिळेल का? -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Sun, 04/13/2008 - 19:30 नवीन
माझीच. ------------------------------ A DUET OF SAX AND DRUMS In this duet of sax and drums None is the soloist None the accompanist. When the sax brings Flow to his riffs, coats Them with honey-notes And into his siren song Twines his heart-strings, The drummer gently daubs The snares - as he hums And thinks himself long On luck That lets him lend A steady throb To the sax's flight. His luck Is redoubled, for what he might Do with a moment's decision: Now! the drummer lets descend A deluge of beats. An ever intricate rhythm, A complex precision An engineering feat. Awhile, the sax meets Him with a tune so soft That he thunders above, And he may glide aloft. None is the soloist None the accompanist In the duet of love. ------------------------------
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Mon, 04/14/2008 - 04:46 नवीन
मला मराठी भाषांतर आवडलेले होतेच. पण , मूळ इंग्रजी कविता फार, फार जास्त चांगली आहे असे वाटले... तुम्हाला इंग्रजी शब्दांचे नेमके अर्थ माहित आहेत यात माझ्या मनात संदेह नाही. पण And into his siren song Twines his heart-strings, मधला नेमकेपणा, भाषेतल्या एका सुंदर वाक्प्रचाराचा तितकाच चपखल वापर तो गोफ विणतो हृदयातील नसांचा आर्त गीतामध्ये. या ओळींच्या फार वरचा आहे. मराठी भाषेत मूळ कवितेला नेताना भाषांतराऐवजी रूपांतर कदाचित जास्त रोचक ठरले असते. इंग्रजी कविता वाचताना "आनंदाचे डोही आनंद तरंग" म्हणजे काय असते त्याची थोडी कल्पना आली :-)
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 43 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 55 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    18 hours 59 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    19 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा