Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

काय जेवलात?

म
मनस्वी
Fri, 04/04/2008 - 10:14
🗣 87 प्रतिसाद

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 31173 views

🗣 चर्चा (87)
म
मनस्वी Fri, 04/04/2008 - 10:19 नवीन
बटाटा भाजी (काचर्‍या आणि उकडलेल्या बटाट्याची सोडून तिसरी असते ती - थोडी रश्याची, दाण्याचा थोडा कूट आणि थोडा गरम मसाला टाकलेली), पोळी, लिंबाचं गोड लोणचं.
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Fri, 04/04/2008 - 10:21 नवीन
फुड कोर्टात जेवलो आम्ही. जेवण आचार्‍याने बनवले असणार. आम्ही हे जेवलो: १. दोन तीन पोळ्या २. फ्लॉवरची भाजी, कशाचीतरी उसळ आणी कशाचेतरी वरण ३. काकडी, टोमॅटो, कांदा याच्या चकत्या
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 04/04/2008 - 10:22 नवीन
मी आज शेंगा-वांगी-बटाट्याची भाजी आणि गरमागरम ज्वारीची भाकरी जेवलो आहे. त्यांतर ताकभात आणि सोबत माळेतला कांदा! आपला, (तृप्त!) तात्या.
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Fri, 04/04/2008 - 10:50 नवीन
तात्या ..अरे इथे कुठली रे माळ..आणि कांदा... :( आता मस्त माळेचे कांदे यायला लागले असतील ना,उन्हाळयाची काहिल त्या माळेतल्या कांद्याने जरा शमते नाही.. माळेतला कांदा चौकोनी चिरुन हिरवी मिरची तेल लावून भाजून चुरडून घालून दह्यात कालवायचे आणि चवीला मीठ...अहाहा.. भाकरीबरोबर खाऊन पहाच.. स्वाती
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Fri, 04/04/2008 - 10:56 नवीन
पाणीच पाणी चहुकडे! करून बघीन म्हणते!
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Fri, 04/04/2008 - 10:39 नवीन
कशाचीतरी उसळ आणी कशाचेतरी वरण सहमत रे आ॑द्या! मी नेहमीप्रमाणे २-३ वात्तड पोळ्या, व्हेज कोल्हापुरीच्या नावाखाली केलेला काल-परवाच्या उरलेल्या भाज्या॑चा लगदा, आलू मिर्च चटपटा नावाचा बटाट्याच्या फोडी बुळबुळीत करुन केलेला उपद्व्याप, चिकन६५, ३-३ ग्लासभरुन ताक, म्हैसुरपाक आणि चिक्क्कट्ट भात!!!! -(अतृप्त) ध मा ल.
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Fri, 04/04/2008 - 10:45 नवीन
चामारी त्यांच्या .... ते नुसते अर्धवट उकडवलेले बुळबुळीत बटाटे सगळ्या भाज्यांच्या कॉमन ग्रेव्हीत टाकुन साले आलु मिर्च म्हणतील नाही तर आलु अजुनकाहीतरी म्हणतील ... एखाद्या दिवशी जर गावलं ना बेणं ...
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Fri, 04/04/2008 - 10:49 नवीन
फार वाईट वाटलं वाचून. खाण्या -'पिण्या' बाबतीत कोणाचे हाल झालेले पाहवत नाही. तिन ग्लास ताक म्हणजे नुसते स्वर्गसुख.
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Fri, 04/04/2008 - 10:55 नवीन
तिन ग्लास ताक म्हणजे नुसते स्वर्गसुख.
उदरभरण नोहे, जणिजे यज्ञकर्म.... पोटात काहीतरी भर नको का टाकायला? म्हणून ३ ग्लास ताक, तो हलकट देतच नव्हता, मग भा॑डलो त्याच्याशी. म्हणल॑ "मी भूकेन॑ मेलो तर ब्रम्हहत्येच॑ पातक तुझ्या डो॑बल्यावर!" बाकी आपल्याला ताक लै आवडत॑, म्हणून भागवून नेल॑. -(दुर्दैवी) ध मा ल.
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Fri, 04/04/2008 - 11:02 नवीन
उदरभरण नोहे, जणिजे यज्ञकर्म.... अरे व्वा! हे तर माझ्या व्यवसायाचे ब्रिदवाक्य आहे. 'यज्ञकर्म कॅटरर्स' प्रोप्रा. प्रभाकर पेठकर.
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Fri, 04/04/2008 - 10:58 नवीन
मी बेंगलोरला असताना असाच अचाट आणि अजब पाककृती पचवल्यात! मराठी माणसाचे जाम हाल होतात.
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Fri, 04/04/2008 - 11:15 नवीन
आपल्याला तरी ब॑गळूरात काही वा॑धा झाला नाही बॉ! मस्त आ॑ध्रा-थाळी घ्यायची...आणि मग....दिसल॑ की ओरबाड....दिसल॑ की ओरबाड!!! मला गेली कित्येक वर्ष हाताने भात खाता यायचा नाही, म्हणून मी चमच्याने खायचो. कारण एकच बोट॑ बरबटतात आनि त्याची चारचौघा॑त लाज वाटते. पण ब॑गळूरात गेल्यापासून तिसर्‍या दिवशी माझा भात ओरपायचा सराईतपणा बघून सगळी वेटर॑ माझ्याशी कुडमुडायला लागली होती! ते...गडद चॉकलेटी / काळपट र॑गाच॑ लोणच॑ कुठल॑ ग॑? एकदम मस्त असायच॑. - ध मा ल अण्णा येरकु॑टकर
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Fri, 04/04/2008 - 11:18 नवीन
लोणच्यांतले नक्की कोणते?
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Fri, 04/04/2008 - 13:18 नवीन
नक्की नाव आठवत नाहीय्ये. पण आ॑ध्रा-थाळीबरोबर हमखास असत॑च असत॑. कुठच्याशा गवताच॑ केलेल॑ असल्यासारख॑ दिसत॑ पण जब्बरदस्त लागत॑. (आमच्या लेखी गवत हा शब्द 'पालक' सोडून इतर यच्चयावत पालेभाज्या॑पासून कॉ॑ग्रेस गवतापर्य॑त सगळ्यासाठी फिट्ट बसतो! ) - (विसराळू) ध मा ल.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 04/04/2008 - 15:31 नवीन
आंध्रामध्ये, लाल रंगाच्या आंबाडीचं करतात. एक्दम भारीच लागतं. माझी एक मावशी मस्त करते. - (सर्वव्यापी)प्राजु www.praaju.blogspot.com
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Fri, 04/04/2008 - 16:12 नवीन
प्राजू म्हणते तसं ते अंबाडीच्या भाजीचं करतात. दही - भात - घोंगुरा पिक्कल म्हणजे दुपारी झोपायची तयारी! चतुरंग
  • Log in or register to post comments
म
मैत्र Fri, 04/04/2008 - 17:47 नवीन
बरोब्बर चतुरंग... मी खात्रीने सांगु शकतो... माझी बायको तेलूगू आहे :) ... खवय्यांसाठी "प्रिया" चे लोणचे उत्तम मिळते ... दुसरे आंध्रात विशेष खाल्ले जाणारे लोणचे म्हणजे "आवकाया" - कैरीचे - आंब्याचे लोणचे ... मुख्य आंध्रा म्हणजे कोस्ट्ल आंध्रामध्ये लोक नुसता भात आणि हे लोणचे खातात...
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Mon, 04/07/2008 - 07:36 नवीन
माहितीबद्दल धन्यवाद!!! प्राजुताई, चतुर॑गराव, ते लोणच॑ अ॑बाडीच॑ असत॑?????? एव्हढ॑ मस्त? खल्लास !!! च्यामारी, एखाद॑ पोत॑भर आणून ठेवाव॑ म्हणतो :-)) बाकी दही + भात + घो॑गुरा = भर हापिसात माना टाकून पे॑गायचो मी! मैत्र, मजा आहे तुझी! तेलुगु बायको म्हणजे काय...लय भारी! माझी काकूपण तेलुगु आहे. क्काय एकेक पदार्थ बनवते...तिच्यामुळेच खर॑ तर अस्सल 'कापी' प्यायला शिकलो मी. पण ती कट्टर आहे यार. हैद्राबादची आहे तरी बिर्याणीच॑ नावही काढू देत नाही, करण॑ तर दूरच :-(( -(हावरट) ध मा ल.
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Mon, 04/07/2008 - 20:15 नवीन
"बाकी दही + भात + घो॑गुरा = भर हापिसात माना टाकून पे॑गायचो मी!" अहो शेठ हे काहीच नाही. २ महिन्यापूर्वी आमची पण अशीच भोजनोत्तर विश्रांती ती पण डायरेक्ट डेस्क वर मान टेकवून चाललेली असताना आमचे "मेनेजर" साहेब अवतरले. त्यांना हे सर्व पाहून धक्का बसला [ आणि मला त्याला पाहून धक्का बसला ....] मग नक्की काय झालं हे डिस्कस करण्यासाठी आम्ही "स्मोकिंग झोनमध्ये" गेलो. [ आतल्या गोटातली बातमी म्हणजे हे बेणं माझं 'सिगारेट पार्टनर' आहे ]. मग त्यानं विचारल "काय झालं ?". तोवर विचार करायला भरपूर वेळ मिळाल्याने मी गोष्ट तयार केली होती [ आपण कल्पनाविलास करायला हायगाई करत नसतो ] मग मी सांगितलं की आमच्या "मलिका-ए-हिंदूस्थान' च्या कटकटीमुळे रात्री झोप झाली नाही. मग २ सिगारेट संपूस्तोवरच्या आमच्या डिस्कशन मधून "पोरी ह्या अशाच" हा अभ्यासपूर्ण निष्कर्श काढून आम्ही निघालो व मी सुटलो ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Fri, 04/04/2008 - 10:43 नवीन
कोबीची मटार घालून भाजी,गाजराची कोशिंबिर,मूगाचे वरण (लसणीची फोडणी घालून),पोळ्या ,भात आणि दही.. असा काल रात्रीचा बेत होता.(आज रात्री पेठकरांची पावभाजी..:-)) स्वाती राहता राहिलं जेवण कोणी बनवले?--- स्वयं पाक.. दुसरे कोण?
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Fri, 04/04/2008 - 10:51 नवीन
आज रात्री पेठकरांची पावभाजी. मन कृतकृत्य की काय म्हणतात तसे झाले. भरून पावले.
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Fri, 04/04/2008 - 11:01 नवीन
अहो काय लाजवता उगाच? चीज पावभाजी सहीच झाली होती तुमच्या रेसिपीने..फक्त आज चेडर चीज नाही त्याऐवजी हॉलंड-गौडा चीज घालणार ते ही छान लागते, हे तुम्हाला सांगायला विसरले होते..(चेडर संपले आहे,तेवढेच आणायला बाहेर कोण जाणार?) स्वाती अवांतर- ते मिरचीचे भरीत ट्राय करून पहा..मस्त लागते. आणि तुम्हाला काय माळेतले कांदे सहज मिळतील..:-)
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Fri, 04/04/2008 - 10:44 नवीन
चिकन कॅफ्रिअल अँड राईस.... स्स्स्स्स्स्स....! मझा आया..!
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Fri, 04/04/2008 - 10:50 नवीन
एकंदरीत काहींची मजा तर काहींची सजा!
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Fri, 04/04/2008 - 10:50 नवीन
ह्या दुष्ट मनस्वीचा जाहीर निषेध!!!! आमच्या खाण्या-पिण्याची इतकी वाईट्ट आबाळ होते आहे आणि ही क्रूर, असले काहीतरी विषय काढते आहे! आणि तात्या गरमागरम भाकर्‍या काय चापताहेत, ताकभात काय, माळेतला का॑दा काय!! हे कमी म्हणून स्वातीताईने लगेच वर्णी लावायलाच हवी का? कोबीची मटार घालून भाजी मूगाचे वरण (लसणीची फोडणी घालून) तो॑डाला पाणी सुटून टेबलाखाली तळ॑ झाल॑ तळ॑ !!!! गपा ना राव! आम्हाला घरच॑ खायला मिळत नाही म्हणून का अस॑? -(हावरट) ध मा ल.
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Fri, 04/04/2008 - 10:53 नवीन
निदान यादी तर करून ठेवता येईल, घरी गेल्यावर काय काय खायचे ह्याची....
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Fri, 04/04/2008 - 10:53 नवीन
सहमत. निषेध .. निषेध .. निषेध !!
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Fri, 04/04/2008 - 10:54 नवीन
माझा तुझ्या कोमल मनाला दुखवायचा अजिबात उद्देश नव्हता... अरे येवढच आहे तर शिकून घे ना स्वयंपाक!
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Fri, 04/04/2008 - 11:02 नवीन
आज रातच्याला ये आमच्या गरिबाच्या खोलीवर .. आम्ही बी जमवलीत २-४ बोळकी तिथे .. अन काय जमेल तो डाळ भात शिजवुन खात असतो ... कधी कधी बीटाची कोशींबीर वैगेरे पण करुन बघतो ;) .. बर मुळ मुद्दा असा की तु ये .. थोडा स्वयंपाक करु .. दोन दोन घोट लिंबुपाणी पिउत ... जेवण करुत ... नंतर आंतरजालिय राजकारणावर हलकट्पणे यथेच्छ गजाली करुत... २-४ लोकांना शिव्या देउत .. २-३ गुप्त खबरा एकमेकांना देउत ... बोल काय म्हणतो ?
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Fri, 04/04/2008 - 11:24 नवीन
बेष्टच रे! नक्की... नक्की करु आपण हा 'कारेक्रम' !!! पण माझी मदत तुला फक्त चिराचिरी आणि कापाकापीपुरतीच होईल बर॑! बाकी ते तिखटामिठाच्या अ॑दाजाच॑ आणि आपल॑ जोरात वाकड॑ आहे! हा॑ ! 'इतर तयारी' मध्ये आपण वाघ आहोत हे.वे.सा॑.न.ल. :-)))
नंतर आंतरजालिय राजकारणावर हलकट्पणे यथेच्छ गजाली करुत... २-४ लोकांना शिव्या देउत .. २-३ गुप्त खबरा एकमेकांना देउत ... बोल काय म्हणतो ?
हाण तिच्याआयला, ज ह ब ह र्‍ह्या !!!!
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 04/04/2008 - 11:39 नवीन
नंतर आंतरजालिय राजकारणावर हलकट्पणे यथेच्छ गजाली करुत... २-४ लोकांना शिव्या देउत .. २-३ गुप्त खबरा एकमेकांना देउत ... बोल काय म्हणतो ? कुणाला रे शिव्या देणार आहात? मी पण येऊ का? की मलाच देणार आहात? :))))) आपला, (शंकेखोर!) तात्या.
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Fri, 04/04/2008 - 11:49 नवीन
या ना तात्या ... तुम्ही यावे, मोजकीच दोन तीन ज्युनिअर टाळकी असतील, आमच्या पीसी वर तुमच्या आवडीचे एखादे गाणे लागलेले असेल, ग्लासांचा किणकिणाट चालु असेल, धमाल्या भाजी चिरत असेल, मी भात लावायच्या गडबडीत तुम्ही सांगितलेली भा़जी कशी बनवायची याचा विचार करत असेन. नंतर जेवण झाल्यावर तुम्ही मी धमाल्या आमच्या भारती विद्यापीठाच्या हिरवळीवर बसुन सुखा दु:ख्खाच्या २ गप्पा मारुत, तुम्ही आम्हाला २ अनुभवाचे बोल सांगताल, मुड बनलाच तर एखादी जुनी नाजुक आठवण सांगताल अन त्या अनुषंगाने एखादे दर्दभरे गाणे पण म्हणताल !! अहो या तर खरे तात्या तुम्ही !
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Fri, 04/04/2008 - 13:43 नवीन
काय वातावरणनिर्मिती केलीस रे गड्या! तात्याबा, आता याच तुम्ही, आपण करुच हा बेष्टेष्ट कारेक्रम !!!!
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Fri, 04/04/2008 - 11:10 नवीन
धमु अरे संत ज्ञानेश्वरांनी म्हटलंय ना? जो जे वांछिल, तो ते खाओ! मग कुणी काही खाल्लं तर तू असा दु:खी होऊ नकोस. प्रत्येकाचे खायचे प्यायचे(म्हणजे "ते" नाही म्हणत मी..... आपले ताक रे)दिवस असतात तसे न खाण्याचेही दिवस असतात. सद्या न तुझे न खाण्याचे दिवस आहेत. लग्नानंतर आहेच मग नको म्हणशील इतके नवनवे खाणे! तेव्हा धीर धर. आता माझेच बघ ना! मला आज जेवण बनवायचा कंटाळा आला तर मी चक्क पाणी(शुद्ध पाणी बरं का! रंगीत वगैरे आपल्याला चालत नाही) पिऊन मजा करतोय. मजा करो यार! दुसर्‍यांच्या आनंदात आनंद मानायला शिक.(हे जरा अतीच होतंय नाही? )
  • Log in or register to post comments
भ
भाई Mon, 04/07/2008 - 07:40 नवीन
मला ना, किनई, आपण ना, 'शिशुविहारा'त आहोत असे वाटू लागले गडे. तुम्ही मनस्वीतायडी आणि तात्यादाद्या आणि अपर्णातायडी या सगळ्यांना चिमटाच काढा म्हणजे समजेल. - (न लाडावलेला)भाई
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Fri, 04/04/2008 - 10:54 नवीन
तिकडे तात्याने माळेतला कांदा खाल्ला... आणि इकडे मला वडखळ फाट्यावरच्या माळा दिसायला लागल्या.. आता तात्याला सांगितलेली भरताची रेसिपी मी साधा कांदा घेऊन करणार..काय करणार मजबूरीका नाम.. साधा कांदा! तू ही करुन पहा..सोपी आहे आणि सोपी असून चविष्ठ आहे,:) स्वाती
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 04/04/2008 - 10:57 नवीन
हा काथ्याकूट सुरू केल्याबद्दल मनस्वीचे अभिनंदन! पेठकरसाहेब म्हणतात त्याप्रमाणे यातल्या पदार्थांची नांवे वाचून निदान एक यादी तर करून ठेवता येईल! मला वाटतं, हाच या काथ्याकुटाचा महत्वाचा फायदा! तात्या.
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Fri, 04/04/2008 - 11:00 नवीन
असेच चविष्ट आणि मनोरंजक विषय इथे यावेत हीच इच्छा!
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Fri, 04/04/2008 - 11:06 नवीन
"आजची खादाडी " ढाब्यावरची झुणकाभाकरी खाईन म्हणते...
  • Log in or register to post comments
त
तात्या विंचू Fri, 04/04/2008 - 11:12 नवीन
२ पोळ्या, मेथी मटार मिक्स रस्सा भाजी, हराभरा कबाब्, व्हेज बिर्याणी, दाल आणि सफरचंदाची खीर.... सोबत कोशिंबीर ही....... बाकी आमच्या ओफिसच्या कँटीन्चा जेवण झकास असते....... (दाबुन खाल्ल्याने झोप आलेला....) ---तो मी नव्हेच
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Fri, 04/04/2008 - 11:29 नवीन
तो मी नव्हेच... अहो तो मी नव्हेच... झोपले वाटतं...
  • Log in or register to post comments
त
तात्या विंचू Fri, 04/04/2008 - 12:26 नवीन
आलो आलो.... कोनीतरी हाक मारतय अस स्वप्न पडल... नशिब तुम्हीच होता..... मला वाटल माझा मॅनेजर बोलावतोय........ आत्ताच उठलेला... ---तो मी नव्हेच
  • Log in or register to post comments
त
तात्या विंचू Fri, 04/04/2008 - 12:44 नवीन
अजुन एक राहिलच........ जेवण झाल्यावर एक कॉर्नेटो आइस्क्रीम......
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Fri, 04/04/2008 - 11:17 नवीन
मनस्वी का उगाच आमचा जीव जाळतेस्...इथे प्रो़जेक्ट वर काम करताना वेळेवर जेवायची आठवण होत नाही म्हणुन रोज घरच्या शिव्या खातो. डब्यात असले तर थन्ड भाजी आणि पोळ्या...अन कॅन्टीन मधे गेलो तर कसला तरी जाड भात , आणि भाज्यान्चे प्रयोग. त्या दिवशी दम आलू घेतला...कॅन्टीन वाल्याने साध्या बटाट्याची भाजीज यालाच आजपासून दम आलू म्हणायचे असा दम देत वाढली.
  • Log in or register to post comments
श
शरुबाबा Fri, 04/04/2008 - 11:25 नवीन
आतच ढाब्यावरुन दाल तड्का आणि तदुरि रोटि खाउन आलो.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Fri, 04/04/2008 - 11:29 नवीन
तदुरि रोटि खाउन आलो. हे वाक्य लिहीले आहे तसे म्हंटले की सर्दी झाल्यासारखे वाटते. शरुबाबा शब्दांवर अनुस्वार दे रे बाबा
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Fri, 04/04/2008 - 11:36 नवीन
काल रात्री (विवाहित) मित्राच्या घरी जेवण्याचा योग आला. त्यामुळे साग्रसंगीत जेवण झाले :) गेल्या गेल्या 'जिंजर आलं ' मग थोड्या वेळाने झेक रिपब्लिक मध्ये बनलेली बिअर. मग थोड्या वेळाने मुख्य जेवण- - पनीर मसाला : पनीर चे छोटे तुकडे बेसन आणि मक्याच्या पिठात घोळवून तळलेले आणि मग त्याची टोमॅटो इत्यादीसहित भाजी. - आलूमटर : बटाट्याचे मोठे तुकडे उकडलेले + मटार - उत्तरभारतीय पद्धतीची डाळ (आमटी नव्हे ). - भात जेवणानंतर स्ट्रॉबेरीच्या तुकड्यांवर बोरबॉन वॅनीला आईसक्रीम. -- (तृप्त) लिखाळ. जेवणाची आबाळ टाळण्यासाठी स्वयं-पाक हा एक उत्तम पर्याय आहे, मग तुम्ही जगाच्या पाठीवर कोठे ही असा! यावर आमचा ठाम विश्वास आहे. ता.क. आज दुपारी आम्ही केळं आणि काकडी-टोमॅटो-सअँडविच खाणार. रात्री पुन्हा चांगला स्वयंपाक करु ! -- (योजक) लिखाळ. जेवणाची आबाळ टाळण्यासाठी स्वयं-पाक हा एक उत्तम पर्याय आहे, मग तुम्ही जगाच्या पाठीवर कोठे ही असा! यावर आमचा ठाम विश्वास आहे.
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश Fri, 04/04/2008 - 11:43 नवीन
आणि फाईड राईस सोबत स्प्रिंग रोल.. आज हा मेनु रात्री च्या जेवणाला... फ्रायडे नाईट...
  • Log in or register to post comments
स
सृष्टीलावण्या Fri, 04/04/2008 - 11:46 नवीन
आज ज्वारीची भाकरी, डाळींबीची उसळ, पोळी आणि शेंगदाण्याची कच्चे तेल घातलेली चटणी खाल्ले जेवणात. > > आले देवाजीच्या मना, तेथे कोणाचे चालेना, हरिश्चंद्र ताराराणी डोम्बाघरी भरती पाणी...
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Fri, 04/04/2008 - 11:56 नवीन
ज्वारीची भाकरी आणि शेंगदाण्याची कच्चे तेल घातलेली चटणी म्हणजे जबरा! आणि कांदा पण हवा.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 32 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 44 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    18 hours 48 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा