Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

!! मिपा पुणे कट्टा साद्यंत व्रुतान्तःबखर क्र १!!

व
विजुभाऊ
Mon, 03/24/2008 - 06:59
🗣 23 प्रतिसाद
  • !! मिपा पुणे कट्टा साद्यंत व्रुतान्तःबखर क्र १!! चौक २
  • !! मिपा पुणे कट्टा साद्यंत व्रुतान्तःबखर क्र १!! चौक ३
  • !! मिपा पुणे कट्टा साद्यंत व्रुतान्तःबखर क्र १!! चौक ४

Book traversal links for !! मिपा पुणे कट्टा साद्यंत व्रुतान्तःबखर क्र १!!

  • !! मिपा पुणे कट्टा साद्यंत व्रुतान्तःबखर क्र १!! चौक २ ›

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 13764 views

🗣 चर्चा (23)
ड
डॉ.प्रसाद दाढे Mon, 03/24/2008 - 07:05 नवीन
विजुभाऊ, मस्त लिहिताय, आगे बढो स॑मेलन स्थळी तुम्ही पोहोचण्याच्या थोडा वेळ अगोदर साक्षात विसोबा खेचरा॑चा फोन आला होता व सगळ्या॑ना त्या॑नी शुभेच्छाही दिल्या होत्या, तुम्हीच राहून गेलात.
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Mon, 03/24/2008 - 07:11 नवीन
हा हा...विजुभाऊ.... एक न॑ब्बर ! आपली ही बखरीची कल्पना आम्हा॑स बहुत भावली. तसेच आपण ही जिम्मेदारी खा॑देवर घेऊन आपण आम्हा॑स मोठ्या स॑कटातून सोडविले असे आम्ही जरुर नमुद करु इच्छितो ! तसेच आमच्या एकुणच पोरकट व्यवस्थेची अकाळी वर्षावाने उडविलेली खिल्ली कोणिही मनात कि॑तु अथवा किल्मिष न धरता आन॑दे सहन करोन आम्हास वाटणार्‍या दु:खाचा भार हलका केला त्या॑चे काय आभार मानावेत? तेणेकरून धमाल मुलाने जोरात फुंकर( कशाची विचारु नका) मारुन आगोटी जीवित ठेवल च्यामारी, धन्य आहात. एक एक गोष्ट लक्षात ठेवली आहे की :-)) पुढील चौकात भारी मजा येणार अस॑ दिसत॑य! जी जी र जी र जी र जी जी जी जी........
  • Log in or register to post comments
व
विवेकवि Mon, 03/24/2008 - 07:14 नवीन
विजुभाऊ ऊत्तम आहे बखर १ २ री बखर कधी आता विवेक वि.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 03/24/2008 - 07:16 नवीन
विजूभाऊ, झक्कास बर्र का! बखर आम्हास आवडते आहे, पुढील घडामोडी काय घडल्या, कुठली चर्चा, खलबतं कटकारस्थानं रचली गेली याच्या वृत्तांताची वाट पाहतो आहे! :) आपला, (बखरप्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Mon, 03/24/2008 - 07:37 नवीन
झकास वर्णन जाहले. पुढील चौकात वाट पाहत आहो! विजूभाऊंचा विजय असो! "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Mon, 03/24/2008 - 07:44 नवीन
काय वो अजूनही त्याच तारेत? अहो जरा नीट शिस्तशीर लिवा की! किती चुका त्या! तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती.
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Mon, 03/24/2008 - 07:45 नवीन
छान विजुभाउ .. पुढच्या बखरी पटापट अन मोठ्या मोठ्या टाका.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Mon, 03/24/2008 - 08:09 नवीन
ऐशी जबर खबर देणेस बखर निवडलीत ते उचित जाहलें! थोरले सायबांकडून आपणास शाबासी! 'दारुकाम', 'आतषबाजी', सामिष भोजन, कट-कारस्थाने येकयेक वृत्तांत साद्यंत करणे, जेणेकरोन आमचे जीवास तोशीस न होईल! बाकी आपण जाणते आहातच! लेखनसीमा. चतुरंग
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Mon, 03/24/2008 - 08:46 नवीन
उत्तम शिवकालिन भाषा ! फक्त "लेखनसीमा" म्हणजे काय ते नाही समजले. :(
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Mon, 03/24/2008 - 09:28 नवीन
"लेखनसीमा" अजोन जाहली नाही.. ये बखरीची भाषा ही उत्तर शिवकलीन आसोन तीयेचे मूळ गोडसे भटजींच्या १८५७ च्या प्रवास वर्णनात आहे. बाकी वाचकगळ आनंदयात्रींचे उत्तर वाचौन बहुत संतोष जाहला... मूळ बखर्नवीस विजुभाऊ हे त्यांच्या प्रोजेक्ट म्यामेनेजमेंट सारख्या अतीबीन महत्वाच्या कार्यात मग्न असल्यामुळे त्याना बखरीचा प्रवर्गिय भाग उत्खननास काळ उपलब्ध झाल्याबरहुकुम ते त्वरेने जाला वर पोष्ट करतील्.....आणि लेखनसीमा करतील. कळावे लोभ आहेच तो वर्धिष्णु व्हावा ही श्री चरणी पौष्याची विनंती मूळ बखर्कार्....बखर्नवीस विजुभाऊ .. (विजुभाऊंच्या बखरीतुन.........पान३ समास २४)
  • Log in or register to post comments
आ
आर्य Mon, 03/24/2008 - 09:46 नवीन
येऊद्या अजून ............पुढिल भगाच्या प्रतिक्षेत आर्य
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Mon, 03/24/2008 - 12:24 नवीन
.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Mon, 03/24/2008 - 13:07 नवीन
!! मिपा पुणे कट्टा साद्यंत व्रुतान्तःबखर क्र १!!चौक २ ऐका पुढील व्रुतान्त जी जी जी र जी जी जी र जी जी जी ओळख समारम्भ झडु लागला...शकुन सांगावा तैसी कडाडकन वीज तळपली .दुंदुभी झडाव्या तैशा मेघगर्जना होवु लागल्या.आकाशालाही आनंदाचे भरते येउन पुष्पव्रुष्टी व्हावी तैशा झडी पडो लागल्या मिपा सदस्यांचे मिलन पाहोन आसमंतालाही सण साजरा करावाऐसे वाटो लागले. उत्तर पेशवाईत पानपतात व्हावी तैसी भांडी वाजो लागली.भडभुंज्या लाह्या भाजतो तैसे चोहोकडोन आवाज कानी येवो लागले. ये कानाचे त्या कानास कळो नये ऐसी गत. घोडी भीजो लागली..वर्तमान दफ्तर हलवावे ऐसे फर्मान निघो लागले. समस्त दारुगोळा कोठारातुन सावकाशीने बाहेर येवु लागला होता. सरदार धमाल स्वतः जातीने दारुगोळा वाटपात कोणावर अन्याव होवो नये याची सर्वत्र फीरोन दखल घेत होते. तेवढ्यात दस्तूर खुद तात्या भ्रमण्ध्वनीवर सदस्यांच्या भेटीस आले.....आकाशवाणी व्हावी तैशा त्यानी कट्ट्यास शुभेछा दिल्या. एक एक भिडु रन्गी येवु लागला....राज कवी सरदार केशव्सुमार हळुच एखांदी कवीतेची फैर झाडत होते.त्या एकेका फैरीनेच सद्स्य गारद होत होते. येवढ्यात सरदार विजुभाऊंचे आगमन झाले...पुन्हा एकदा तडीताघात झाला...नंगारा वाजावा तैशा मेघ गर्जना झाल्या. सरदार विजुभाऊ नी सरदार धमाल मुलांस हळी घातली...आणि जेजाल्या प्रंमाणे भासणारी वीज पुन्हा गरजली.....मिपा कट्ट्यास तोफांची सलामी मिळाली. ऐका पुढील व्रुतान्त पुढील चौकात जी जी जी र जी जी जी र जी जी जी म्हणे शाहीर विजुभाऊ..मिपा सदस्य होउ... व्रुतान्त मी सांगणार्..तुम्ही ऐकणार ..रन्ग तो चढणार रं जी जी जी धन्य धन्य झाला तो सरदार जी जी जी जी जी जी र जी जी जी आर रं दाजी जी जी रं दाजी जी जी र जी जी जी र जी जी जी
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 03/24/2008 - 14:13 नवीन
ओळख समारम्भ झडु लागला...शकुन सांगावा तैसी कडाडकन वीज तळपली .दुंदुभी झडाव्या तैशा मेघगर्जना होवु लागल्या.आकाशालाही आनंदाचे भरते येउन पुष्पव्रुष्टी व्हावी तैशा झडी पडो लागल्या मिपा सदस्यांचे मिलन पाहोन आसमंतालाही सण साजरा करावाऐसे वाटो लागले. विजूभाऊ, काय सुंदर भाषा आहे! तुमची बखर बाकी रंगते आहे खास! अजूनही येऊ द्या! एक विनंती - पुढचा चौक नवीन भागात सुरू करावा. प्रतिसादाने त्याची सुरवात करू नये ही विनंती. मिपाच्या श्रीमंतीस ते शोभत नाही! आपलाच, तात्या.
  • Log in or register to post comments
प
प्रशांतकवळे Mon, 03/24/2008 - 13:10 नवीन
झक्कास!.. विजुभाऊ, एका दगडात दोन पक्षी मारताय... वॄत्तांत देताय, आणी आम्हाला पण जळवताय.. पुढच्या वेळेला जर भारतात असू, तर नक्की येऊ. प्रशांत.
  • Log in or register to post comments
ड
डॉ.प्रसाद दाढे Mon, 03/24/2008 - 13:20 नवीन
विजुभाऊ, कमाल केलीत..भाऊसाहेबा॑च्या बखरीन॑तर इतिहास स॑शोधका॑ना 'विजुभाऊ॑ची बखर अभ्यासावी लागणार असे दिसते आहे. मी तुमची कैफियत एका फर्ज॑दामार्फत भा.इ.स॑.म॑. ला सिताब रवाना केली आहेच.. बहुत काय लिहिणे..
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 03/24/2008 - 14:15 नवीन
वा वा.. विजुभाऊ, मानलं तुम्हाला. बखर अगदी झक्कास.. पुढचा भाग येऊद्या लवकर. - (सर्वव्यापी)प्राजु
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Mon, 03/24/2008 - 15:07 नवीन
श्री. रा. रा. विजुभाऊ यांसी, आपली बखर पोहोचली. वाचोनि परम संतोष जाहला. मि.पा.करीय जरीपटका पुण्यपत्तनाच्या पार (कात्रजात) फडकला हे ऐकोनि संतोष जाहला. पूर्वी आमच्या दादासाहेबानी म्हणजे राघोबादादांनी जरीपटका अटकेपार फडकवला होता. तेव्हा आम्हास असाच परमसंतोष जाहला होता. नंतर त्यांची बुद्धी फिरली. असो . परंतु पुढील कट्टा सर्व महारष्ट्रनगरीच्या सीमा उल्लंघोन सर्व मि.पा. करीयाना एकत्र आणील याची आम्हास खात्री आहे. आणि वैश्विक मि.पा. करीय कट्ट्याची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत. ते होईल तो सुदिन. आपण बखरीतून सर्व वृत्तांत साद्यंत वर्णन केल्याने आम्ही आपले ऋणी आहोत. इति. लेखन मर्यादा. मोर्तब सुद पुण्याचे पेशवे ता.क. सध्या आमचेकडे उत्तम कारकून नसल्याने खलित्यात काही त्रुटी असतील तर मोठ्या दिलाने माफ करणे.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 03/24/2008 - 15:24 नवीन
श्रीमंत विजुभौ, साष्टांग दंडवत. मिपा कट्टा मुक्काम पुणे शहरचा मजकूर तपशीलवार कळला.सदर्हू भागाने आम्हास संतोष जाहला असुन सरदाराच्या त्यासमयीच्या हकीकती पेश कराव्यात.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ गुरुवार, 03/27/2008 - 09:02 नवीन
ईर्षाद....एका मित्राला हे सगळे सलग पहायचे आहे
  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर गुरुवार, 03/27/2008 - 16:54 नवीन
आनंद जाहला. ऐसेची लिहीत जाणे. शुभेच्छा. अर्धवटराव आचरटाचार्य, सुधीर कांदळकर.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Sat, 05/27/2023 - 11:24 नवीन
मिपाची जुनी पाने चाळताना हे सापडले. माझा पहिलाच प्रयत्न. तात्याने खूप प्रोत्साहन दिले होते. ज्या वेळेस भेटायचा तेंव्हा तेंव्हा या बखरीबद्दल बोलायचाच
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Sat, 05/27/2023 - 14:10 नवीन
व्वा, भारी !
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 17 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 20 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 24 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा