Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

वसंतागमनाचा पहिला दिवस नक्की कोणता?

च
चतुरंग
गुरुवार, 03/20/2008 - 21:07
🗣 13 प्रतिसाद

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 8697 views

🗣 चर्चा (13)
न
नंदन गुरुवार, 03/20/2008 - 21:24 नवीन
या दुव्यावर दिलेल्या माहितीप्रमाणे संपातबिंदू २० किंवा २१ मार्चला येऊ शकतो. शाळेतल्या पुस्तकांत २१ मार्च ही तारीख दिलेली मलाही आठवते, पण गेली तीन वर्षे संपातबिंदू २० तारखेला येतो आहे, असं दिसतंय

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
ध
धनंजय गुरुवार, 03/20/2008 - 22:09 नवीन
"प्रिसेशन ऑफ एक्विनॉक्स"चे भारतीय ज्योतिषशास्त्रातले नाव सांगू शकतील. संपात बिंदू दर ७०-७१ वर्षांत एक दिवस मागे जातो.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 03/20/2008 - 22:13 नवीन
पृथ्वीचे स्वतःच्या आसाभोवतीचे डोलणे घडल्याने (७०-७१ वर्षांचे अर्धे आंदोलन)एक दिवस कमी मग पुन्हा एक दिवस जास्त असा तो संपात बिंदू हेलकावत रहातो....असे काहीसे वाचल्याचे स्मरते... चतुरंग
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Fri, 03/21/2008 - 16:42 नवीन
पण ७०-७१ वर्षांत मागेच. मागे जात जात २५,७६५ वर्षांत संपातबिंदू पूर्वपदाला येतो. वैदिक काळात संपात बिंदू १-२ नक्षत्रे पुढे येत असे. (आजकालच्या फाल्गुन-चैत्राऐवजी पूर्वी चैत्र-वैशाखात.) किंवा जसे खाली "ज्योतिर्वैभव"मध्ये दिले आहे तसे म्हणता येईल : पूर्वी संपातबिंदू मेष-राशीत येई, आजकाल तो मीन-राशीत येते. हा बिंदू मात्र मुळीच मागे-पुढे होत नाही - मागेमागेच जातो.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Fri, 03/21/2008 - 17:15 नवीन
चतुरंग
  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर Fri, 03/21/2008 - 14:41 नवीन
धन्यवाद. अर्धवटराव आचरटाचार्य, सुधीर कांदळकर.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Fri, 03/21/2008 - 15:09 नवीन
precession of equinox याला परांचन हा भारतीय ज्योतिषातला प्रतिशब्द आहे. याचे श्रेय हे बाळशास्त्री जांभेकरांना जाते. Image removed. २१ मार्च व २३ सप्टेंबरला विषुव दिन समान दिवस समान रात्र. २१ मार्च ला (भासमान) सुर्य हा वसंत संपात बिंदुशी येतो तर २३ सप्टेंबरला तो शरद संपात बिंदुशी जातो प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Fri, 03/21/2008 - 15:18 नवीन
माहिती खरोखरच अत्यंत छान आहे. शतशः धन्यवाद!! दुसर्‍या पानावर दिलेला दॄष्टांत "जात्यांतले दळण संपले म्हणजे त्याची वरची तळी किंचित् तिरपी करुन जागच्या जागी फिरवावी.." केवढा सुंदर आहे!! अशा मनोरंजक पध्दतीने भूगोल शिकता आला तर काय बहार येईल!! (अवांतर - 'ज्योतिर्वैभव' हे पुस्तक अजूनही बाजारात उपलब्ध आहे का? चित्रात दाखविलेली प्रत बरीच जुनी असावी असे दिसल्याने विचारले..) चतुरंग
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Fri, 03/21/2008 - 15:35 नवीन
सदर पुस्तक दुर्मिळ आहे. http://mr.upakram.org/node/992 या ठिकाणी संदर्भ सुची पहा. प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
ग
गंधार Sat, 03/22/2008 - 18:55 नवीन
धन्यवाद. पुस्तकाचे पान स्कॅन करून दिल्याबद्दल विशेष आभार. त्यानिमित्याने पुन्हा एकदा खगोलशास्त्राच्या आठवणी उजळल्या.
  • Log in or register to post comments
S
srahul Sat, 12/22/2018 - 10:04 नवीन
साहेब , हे ज्योतिर्वैभव पुस्तक कुठे मिळेल ?
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sat, 12/22/2018 - 11:49 नवीन
अगदी तेच पुस्तक नसले तरी मराठीतल्या माहितीसाठी आपले दोन ज्ञानकोश ( संस्कृती मंडळ वाई किंवा केतकरांचे ) पाहा. तारा पंचांग संपात या शब्दांपुढे सर्व सापडेल.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sat, 12/22/2018 - 11:52 नवीन
सापडेल म्हणजे आहेच. त्यातून मी बरीच पाने लिहून घेतली आहेत.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 33 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 45 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    18 hours 49 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा