छान कविता.
"खळाळणार्या" बदलावे, (अष्टाक्षरीत शक्यतो ५/३ अशी यती देऊ नये असा नियम लक्षात येत आहे...) पण
"खळाळत्या ह्या" नाही पटले - उगीच आठ-अक्षर पूर्ती वाटते. "ह्या" म्हणजे कुठल्या?
५/३ यतीचा नियम मला माहिती नव्हता. आता लिहितांना आणखी एक बंधनः)
ह्या - मनातल्या लाटांचा म्हणून घेता येईल असे मला वाटले.
अधिक विचार करून यमक साधणारी व अर्थपूर्ण दुसरी ओळही लिहून बघेन.
सर्वांचे प्रतिसाद आणि सूचनेकरता आभार.
कवितेत केलेला बदल आवडला.
आता कशासाठी पोटासाठीच्या चालीत म्हणून बघायला हरकत नाही:)
फेनफुले हा शब्द माझा नाही. त्यामुळे त्याचे श्रेयही माझे नाही. हा शब्द खूप वर्षापूर्वी वाचनात आला होता, तेव्हापासून लक्षात होता.. पण कोणाच्या लेखनात वाचला ते आता नेमके आठवत नाही.
सोनाली
मस्त कविता. फार आवडली.
गतीमान जसा जसा
सागराचा श्वास होई
ऊर त्याचा फेसाळत
खाली वर झेप घेई
एकामागे एक येते
खळाळत लाट लाट
लपाछपीमध्ये होते
दिनरात नि पहाट
'फेनफुले', 'माणसाला मानसाचा' हे फार आवडले. 'मराठी माणसं मराठी मानसं' हे कुठेशी वाचलेले आठवले :) ;)
(मराठी माणूस)बेसनलाडू
अभिनंदन
>>ऊर त्याचा फेसाळत
खाली वर झेप घेई
ही कल्पना अगदी नवीन आणि मनोरम आहे.
काही शब्दांची द्विरुक्ती खूप परिणामकारक वाटते. उदा., क्षणक्षण, कणकण, जसाजसा, लाटलाट.
खळाळणार्या च्याऐवजी खळखळत्या चालेल का?
ठणठणपाळ
सुवर्णमयी,
अतिशय सुंदर कविता आहे. खूपच छान.... अजून येऊ देत...
माझे नाव त्यात आहे त्यामुळे तर अगदीच स्पर्शून गेली ही कविता :)
शेवट खूपच सुंदर केलात.
--------------------
थांग लागेना अजुनी
माणसाला मानसाचा
मन अथांग सागर
खळाळणाऱ्या लाटांचा!
--------------------
माझीही थोडी भर...
सरिता येथे सागरमय होते
सर्वस्व अर्पून प्रेमा करता...
अथांग सागरात काहूर माजते
एकेक दिशा सावरता सावरता....
(अथांग) सागर
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी