धन्यवाद...
ही चित्रे इथे देण्यात काही कॉपीराईट वगैरे भानगडी काय आहेत, हे ठाऊक नाही, परंतु इतकी सुंदर चित्रे बघितल्यावर रहावले गेले नाही.....
अशी काही भानगड असल्यास कळवावे.
चित्रगुप्त
ही चित्रे बघताना एकदा (किंवा वाटल्यास दोनदा) कंट्रोल की दाबलेली ठेऊन "प्लस" की दाबावी. म्हणजे एकंदरीत देखावा व अक्षरे मोठी होऊन जास्त बरे दिसेल. मुख्य चित्र पडद्याच्या बरोबर मध्यभागी करून घ्यावे.
या चित्रांवर आणखी भाष्य केल्यास छान वाटेल...
चित्रगुप्त.
खालच्या हिरवाईवर इथे तिथे लाजत लाजत पसरलेलं थोडंस ऊन्ह.... आकाशाचा पसारा मोठा असला, तरी जमिनीच्या हिरव्या गहिराईमुळे आणि त्यातील अनेक बारकाव्यांमुळे एकंदरित तोल बरोबर साधला जातो,
चित्रे तर अप्रतीम आहेतच पण मोजक्या व तरल भाषेतील आपल्या रसग्रहणाने चित्रकथेला एक गूढात्मक पार्श्वभूमी लाभली आहे.
शशिकांत
मिपावर उचकापाचक करत असता अचानक माझ्या मिपावरील लेखनापैकी अगदी सुरुवातीच्या काळातील हा मार्च २०१० चा धागा दिसला. तेंव्हाच्या लेखनाची जरा गंमत वाटली, तस्मात वर काढत आहे.
भन्नाट आहेत सगळी चित्रे ! धन्यवाद हा धागा वर काढल्याबद्दल.
पाऊस अगदी कोसळण्यात आहे,पटकन त्या झाडाखाली जाऊया....पण वीज तर नाही ना कोसळणार?
हे चित्र आहे, फोटो नाही, हे सांगितल्याशिवाय कळणार नाही ! चित्राच्या तळाशी असलेली पायवाट म्हणजे अशक्य चित्रकला आहे !!!!!!!!!!!!!!!!!!!
माझा हा चौदा वर्षांपूर्वीचा मिपावरील अगदी पहिला धागा. यातला एकही फोटो आता दिसत नाहिये, आणि माझ्या लक्षातही नाहिये कोणते फोटो होते ते. यावर काही उपाय आहे का ?
फूल एचटीएमल, पीएचपी कोड, प्लेन टेक्स, यात मिपावर काही काळापासून घोळ आहे, तांत्रिक बाबीत जरा मिपा मागे पडत आहे आणि जग पुढे चालले आहे, फुकट आहे म्हणून आपल्याला आहे तसं इंजॉय करावे लागते.
मिपाची तांत्रिक बाजू सांभाळणारे प्रशांत यांना कळवून बघा. काही रिप्लाय आला तर, नशीब समजावे. कोण बघतं रे तांत्रिक बाजू...!
गुढीपाडव्याच्या सर्व मिपाकरांना शुभेच्छा.
-दिलीप बिरुटे
(आहे तसं मिपा सोसणारा मिपाकर)
जानेवारीत पुण्यात प्रशांतची भेट झाली तेंव्हा या विषयावर चर्चा झाली होती. त्याने सांगितलेल्या तांत्रिक माहितीप्रमाणे जुन्या लेखातले फोटो अदृष्य होणे हे अटळ आहे. त्यावर उपाय म्हणजे खुद्द मिपावर फोटो चढवता येणे. परंतु सध्यातरी ते शक्य दिसत नाही, असे म्हणाला होता.
फोटोचा संदर्भ घेऊन मांडलेलं मुक्तक आवडलं !
फोटो गायब होण्याला उपाय नाही असं दिसतंय !
मिपाने हे धागे संपादित करून नवे फोटो चढवण्याची सोय द्यावी.
ते मुळ फोटो नाही मिळाले तर धाग्याला, लेखाला साजेसे दुसरे फोटो चढवता येतील !
पाऊस अगदी कोसळण्यात आहे,पटकन त्या झाडाखाली जाऊया....पण वीज तर नाही ना कोसळणार?हे चित्र आहे, फोटो नाही, हे सांगितल्याशिवाय कळणार नाही ! चित्राच्या तळाशी असलेली पायवाट म्हणजे अशक्य चित्रकला आहे !!!!!!!!!!!!!!!!!!!