Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • राजस्थानची रोजनिशी : २ : सिटी पॅलेस, जंतर मंतर, हवा महल
  • दरम्यान
  • दोसतारः शाळेत लग्न लागते २
  • संध्येच्या व्याकूळ छाया.
  • राजस्थानची रोजनिशी : १ : गलताजी मंदिर आणि चोखी धानी
  • मुर्डेश्वर भेट, उत्तर कर्नाटक
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ५: मुन्सियारीतून केलेलं आकाश दर्शन
  • ‘नेक्सस’ युवाल नोव्हा हरारी(ऐसी अक्ष्ररे-४०)
  • खाडीवरचे दिवस!!
  • गोकर्ण भेट, उत्तर कर्नाटक
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
जे न देखे रवी...

(कुणि जाल का, सांगाल का..)

च — चतुरंग, Tue, 03/18/2008 - 17:09

  • Log in or register to post comments
  • 9446 views


वाचनखूण लावा
| 9446 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Tue, 03/18/2008 - 17:12 नवीन
आवडले ! हे गाणे आम्चे अत्यंत आवडते आहे, म्हणून आपले विडंबन त्या नितांतसुंदर चालीत लावून पाहिले. अधे मधे खडे लागताहेत. - (वसंतरावांचा भक्त) सर्किट
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Tue, 03/18/2008 - 18:23 नवीन
कुणि जाल का, सांगाल का, सुचवाल का ह्या 'केशवा'? आता तरी फाडू नको, कवनास ही गझलेस वा आधीच काव्यानदीतीरी ही रांग आहे लांबली दाद देता काव्य किंचित लिहित जाली थांबली श्वास पूर्वी आमुचा हा 'काव्य' वाचुन थांबला समजुनी मेलाच हा, तो शोक कवने वाहिला सांभाळुनी सार्‍या कवींना मी जरासे घेतले इतक्यात हलके पाय ते मग 'केशवाचे' वाजले सांगाल का त्या 'केशवा', की सोड रे आता तरी 'काळजी' आता कवींची घेई हा 'रंग्या' जरी
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Tue, 03/18/2008 - 10:24 नवीन
विडंबनांतील खडे निवडण्याचे तुमचे कौशल्य वाखाणण्यासारखे आहे, सुनीत शेठ ! जियो !! - सर्किट
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Wed, 03/19/2008 - 00:55 नवीन
जात्याला टाकी लावल्याने थोडी कचकच आली होती ती गेली! चतुरंग
  • Log in or register to post comments
अ
अविनाश ओगले Tue, 03/18/2008 - 18:29 नवीन
विडंबन आवडले. खडे वगैरे सोडा. पण विडंबनासाठी कुठल्या कविता निवडाव्यात किंवा निवडू नयेत यावर चर्चा चालू आहे. माझ्या जे खावे पचण्याचे वय निघून गेले या कवितेच्या निमित्ताने.. या चर्चेत भाग घ्या...
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 03/19/2008 - 01:27 नवीन
'सांभाळुनी' त्या सार्‍या कवींना मी जरासे घेतले इतक्यात हलके पाय ते 'केशवाचे' वाजले वा रंगराव, वरील ओळी बाकी मस्तच! आमचा हा केशवा जिथ्थे तिथ्थे दबक्या पावलाने फिरत असतो! :) तात्या.
  • Log in or register to post comments
स
सृष्टीलावण्या Wed, 03/19/2008 - 03:44 नवीन
फार पूर्वीच श्वास माझा 'काव्य' वाचुन थांबला समजुनी मेलाच हा, तो शोक कवने वाहिला आपली आणि केशवसुमारांची प्रतिभा अजरा + अमर आहे. त्याचा श्वास थांबणे कसे काय शक्य आहे? लोक हो, मूळ काव्याची वसंतरावांच्या आवाजातील MP3 तुम्हाला इथे डाऊनलोड करता येईल. > > आत आपुल्या झरा झुळझुळे निळा निळा स्वच्छंद, जगणे म्हणजे उधळीत जाणे, हृदयातील आनंद...
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 03/19/2008 - 03:53 नवीन
आवडले. खूपच छान. सांगाल का त्या 'केशवा', की सोड रे आता तरी सार्‍या कवींची 'काळजी' घेई आता 'रंग्या' जरी आवांतर : केशवसुमार नुसति विडंबनेच लिहित नाहित. ते सुंदर गझलाही लिहितात. फक्त इथे विडंबनेच प्रकाशित करतात.. कारण त्यांनी लिहिलेल्या अप्रतिम गझलांचे दुसर्‍या कोणी विडंबन पाडू नये ही भिती असावी बहुधा... - (सर्वव्यापी)प्राजु
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Wed, 03/19/2008 - 04:12 नवीन
ते सुंदर गझलाही लिहितात. --- हो का? कविता लिहितात, हे माहीत होते; पण मग प्रतिसादांनची, माला या प्रकारच्या शाब्दिक दिवाळखोरीत का कसे निघाले, हा इतिहास सर्वज्ञात असावा :) फक्त इथे विडंबनेच प्रकाशित करतात.. कारण त्यांनी लिहिलेल्या अप्रतिम गझलांचे दुसर्‍या कोणी विडंबन पाडू नये ही भिती असावी बहुधा... --- अहो पेराल तसे उगवेल :) :) (शेतकरी)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Wed, 03/19/2008 - 05:03 नवीन
ह्या असल्या वैचारीक दिवाळखोळी पेक्षा शाब्दिक दिवाळखोरी परवडली पण हे वैचारीक दिवाळखोरांना कळणार कसे.. (शाब्दिक दिवाळखोर्)केशवसुमार
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Wed, 03/19/2008 - 04:34 नवीन
चुकीची माहिती.. जालावर नीट शोधल्यास आपल्याला आमच्याच गझलेंची आम्हीच केलेली विडंबने वाचायला मिळतील.. सर्वांना समान न्याय..कंपूबाजी अजिबात नाही.. आणि तशी भिती असती तर गझलाच प्रसिद्ध केल्या नसत्या.. असो.. केशवसुमार
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 03/19/2008 - 05:03 नवीन
सर्वांना समान न्याय..कंपूबाजी अजिबात नाही.. आणि तशी भिती असती तर गझलाच प्रसिद्ध केल्या नसत्या.. केशवाशी सहमत आहे. कंपूबाजी असली की दुसर्‍याच्या गझला, कविता, विडंबने तिसर्‍याच नावाने चवथ्या संस्थळावर प्रकाशित करायची वेळ येते! :) ज्ञानेश्वर महाराज की जय! :) आपला, (महान कंपूबाज) तात्या.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Wed, 03/19/2008 - 14:08 नवीन
दुवा द्याल का? चतुरंग
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 03/19/2008 - 17:52 नवीन
खरंतर, तुमची इथलि विडंबने मस्तच असतात. आणि सुरेश भटांच्या साईटवर गझलाही सुंदर आहेत. त्याची विडंबने कुठे आहेत हे सांगितलेत तर वाचेन मी नक्की. पण तुमच्यावर सरस्वतिचा वरदहस्त आहे एवढंच मला म्हणायचं होतं आणि तुमच्या (ओरिजिनल)गझला मिपाकरांना वाचायला मिळाव्यात म्हणून मी इथे तसे लिहिले. - (सर्वव्यापी)प्राजु
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Wed, 03/19/2008 - 14:07 नवीन
असो. विडंबन आवडून तसे सांगणार्‍या, खडे निवडणार्‍या आणि आवडून देखील आवडले नाही असे दाखविणार्‍या सर्वांना समान धन्यवाद!!;) चतुरंग
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Wed, 03/19/2008 - 15:03 नवीन
...मूळात आवडलेले होते. म्हणूनच "खडे" काढण्याचा प्रकार केला. राग नसावा.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Wed, 03/19/2008 - 15:34 नवीन
अहो कोपरखळी होती. तुमची भाषेवरची पकड नेमकी आहे आणि शब्दसंग्रह चांगलाच समृध्द आहे त्याचा माझ्यासारखाला फायदाच होतो. चतुरंग
  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर Wed, 03/19/2008 - 16:01 नवीन
प्रतिभावंतांच्या या कोपरखळ्याच होत्या हे वाचून बरे वाटले. चतुरगराव विडंबन चान आहे. आणखी येऊ द्यात. केसु फक्त विडंबने लिहीत नाहीत, गजला देखील करतात हे वाचून आश्चर्य वाटले नाही. आम्हाला संशय होताच. दुवा जरूर द्या. अर्धवटराव आचरटाचार्य, सुधीर कांदळकर.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 34 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 46 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 48 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 50 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 54 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: भालचंद्र लिमये
    नोंदणी: Fri, 08/04/2023 - 18:58
  • सदस्य: निमी
    नोंदणी: Fri, 08/04/2023 - 13:17
  • सदस्य: महिरावण
    नोंदणी: Fri, 06/23/2023 - 10:47
  • सदस्य: पंचक
    नोंदणी: Mon, 06/19/2023 - 19:37
  • सदस्य: पाव्हणं
    नोंदणी: Sun, 06/04/2023 - 15:06
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा