हाही भावानुवाद आवडला. फक्त शेवटून दुसर्या ओळीत विदग्ध (हृदयी) याऐवजी भग्न किंवा ध्वस्त चालू शकेल का? विदग्धचा शब्दशः अर्थ जरी पूर्णपणे जळून गेलेला असला तरी अधिक प्रचलित अर्थ चतुर, निपुण, विद्वान असा आहे, म्हणून असं वाटलं.
संपूर्ण 'मधुशाले'च्या अनुषंगाने विचार केला असता 'विदग्ध' शब्द जास्त योग्य वाटतो कारण ह्यात दोन्ही अर्थच्छटा दाखवायच्या आहेत.
एक म्हणजे कवी भग्न हृदयी तर आहेच पण तो वाचकाला वाटही दाखवतो आहे, अनुभवाचे सार देतो आहे त्यामुळे तो निपुण आहे दुनियादारीने शहाणा झालेला आहे!
पुढच्या रुबायांच्या जोडीने हा अर्थ योग्य आहे असे तुम्हालाही जाणवेल.
चतुरंग
पण तरीहि तू घाबरुन जाऊ नकोस, तुला समजून घेण्याइतकी संवेदनशीलता आहे ह्या मधुशालेजवळ, असा आश्वासक सल्ला द्यायलाही तो विसरत नाही.. एकदा का तुझी तिच्याशी ओळख झाली की पहाच कसा गुरफटत जाशील त्या मायाजालात!!जळण्यातला आनंद ज्यांना समजलेला आहे त्यांच्यासाठीच ही मधुशाला आहे, इतरांनी त्याच्या वाटेला न जाणेच शहाणपणाचे; अशी एक गर्भित धमकीही इथे आहे असे वाटते.
वा वा! सुरेख विवेचन आणि सुरेख अनुवाद!!
रंगराव, तुमच्या मधुशालेला 'केवळ अप्रतिम!' असंच म्हणावं लागेल...
ह्या मधुशालेमुळे मिपा खूप खूप श्रीमंत झाली आहे आणि अजूनही होईल असे वाटते!
पुढील लेखनाकरता अनेकानेक शुभेच्छा!
तात्या.
> जलतरंग जणु हा वाजतसे, तव चुंबन करता हा प्याला,
ऐवजी असे चालेल का?
जलतरंग जणु हा वाजतसे, चुंबन करता प्याल्या प्याला, ...
("तव" प्याला चुंबिता जलतंरंगासारखा आवाज येणार नाही, प्याल्यास प्याला चुंबिता तसा आवाज येईल.)
आपण योग्य दुरुस्ती सुचविता आहात त्या बद्दल आपले कौतुक वाटते.
मुळात मला शब्दांची योग्य जुळणी काही केल्या सुचेना मग प्रयत्न सोडून दिला.
आज तुम्ही दुरूस्ती सुचविल्यावर पुन्हा एकदा उचल घेतली आणि शब्द मिळाले - दुरुस्ती केली आहे.
धन्यवाद!
चतुरंग
चतुरंग,
तुमचा हा भावानुवद.. मराठी काव्य जगतात एकदम खळबळ उडवून देइल नक्की... अतिशय सुंदर विवेचन. मधुशाला मराठीत येणं हे मराठी वाचकांच भाग्यच म्हणावं. आणि ते मिपावर सगळ्यात आधी यां हा मिपाचा सन्मान आहे.
धन्यवाद.
- (सर्वव्यापी)प्राजु
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी