Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

विनोदाचा बादशाह - दादा कोंडके

श
शेखर
Fri, 03/14/2008 - 08:38
💬 11 प्रतिसाद

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 15525 views

💬 प्रतिसाद (11)
व
विवेकवि Fri, 03/14/2008 - 09:13 नवीन
आजच वर्तमान पत्रात बातमी वाचली की दादा॑नी जे अविरत हसवण्याचे कार्य केलेले आहे ते अविस्मरणीय आहे. सकाळ पेपर नी त्यासाठी एक बक्षिस ही ठेवले आहे.. याची नो॑द घ्यावी.. आपलाच... विवेक वि.
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Fri, 03/14/2008 - 09:57 नवीन
केवळ विनोदाचाच नव्हे तर इतरही बाबतीत दादा हे 'दादा' व्यक्तिमत्व होते. कुठेस॑ वाचलेल॑ आठवत॑, एका अभिनेत्रीला एक प्रोड्युसर / डायरेक्टर जास्तच लगट करुन छळत असे, एकदा त्याने रात्री उशीरा त्या अभिनेत्रीस एके ठिकाणी बोलावले. सहाजिकच ती घाबरली. तिने दादा॑शी स॑पर्क साधला आणि हे सा॑गितले, त्यावर दादा तिच्याबरोबर यायला निघाले. त्या॑नी तीला 'तू दुसर्‍या वाहनाने पुढे हो, मी तुझ्या मागोमाग येतो आणि त्याला आपण र॑गेहात पकडू अस॑ सा॑गितल॑. ठरलेल्या स्थळी पोहोचल्यावर तो प्रो. / डा. पुढे झाला आणि अभिनेत्रीस जवळ बोलाऊ लागला, तेव्हढ्यात दादा तिथे पोहोचले आणि त्या॑नी आपल्या 'खास' भाषेत त्याची खरडपट्टी चालू केली तर हा माणूस तिथून अक्षरशः पळून गेला. ह्या क्षेत्रात असे परस्त्रीचा मान ठेवणारे आणि काहीही घेण॑देण॑ नसताना अशी मदत करणारे तसे विरळेच. (अर्थात ह्याला काही सन्माननिय अपवाद आहेतच.) सार्वजनीक ठीकाणी (चित्रपटाच्या माध्यमातून) शालजोडीतून मारावेत तर दादा॑नीच. आणिबाणीची काय खिल्ली उडवलीये. आता माणूस म्हणल॑ की कुठेतरी कमी-जास्त आल॑च. त्यामूळे दादा वाद॑गातही अडकले. पण चालायच॑.
  • Log in or register to post comments
र
राजमुद्रा Fri, 03/14/2008 - 13:26 नवीन
मला वाटतं ती अभिनेत्री (बहुतेक)मधु कांबीकर असावी :) मीही वाचलयं, तिचा लेख आला होता पेपरमध्ये. राजमुद्रा :)
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Fri, 03/14/2008 - 13:36 नवीन
येस्स्स... मधु का॑बीकरच. आता आठवल॑. धन्यवाद्स राजमुद्राताई.
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Fri, 03/14/2008 - 10:15 नवीन
विनोदाच्या बादशहाला आणि आमच्या लाडक्या दादांना आमची श्रद्धांजली... "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Fri, 03/14/2008 - 12:33 नवीन
दादा कोंडके ग्रेटच होते. एका विशिष्ट प्रेक्षकवर्गाची नाडी त्यांनी बरोब्बर हेरली होती. विनोद द्व्यर्थी असले तरी पिक्चर बघायला मजा येते. मला त्यांची 'जीवाशिवाची बैलजोडं' आणि 'अंजनीच्या सूता' ही गाणी आवडतात. आत्ताच्या पिक्चरांमधील ओढूनताणून आणलेले पाचकळ विनोद (?) बघता दादांची महती पटते. सेन्सॉर बोर्डाचे आजचे 'कामकाज' बघता दादांनी आत्ता धूम केली असती असे वाटते... विनोदाच्या बादशहाला आमची श्रद्धांजली मनस्वी
  • Log in or register to post comments
स
सृष्टीलावण्या Fri, 03/14/2008 - 12:38 नवीन
येका शिनिमात... त्ये समोर दिसतंय ना त्ये, त्ये श्येत माजं न्हाई आनि बाकीची श्येतं लोकाची हायेत... > > सदा सर्वदा देव सन्निध आहे । कृपाळूपणे अल्प धारिष्ट पाहे ।।
  • Log in or register to post comments
स
सर्वसाक्षी Fri, 03/14/2008 - 19:40 नवीन
दादा कोंडके नावाच्या एका मराठी माणसानं आपल नाव गिनीज् च्या जागतिक विक्रम पुस्तिकेत घट्ट शाईनं लिहुन ठेवलाय - बहुधा कधीच न पुसलं जाण्यासाठी "ओळीने सलग नऊ चित्रपटांना रजतजयंतीपार नेणारा जगातला एकमेवाद्वितीय दिग्दर्शक" या लोककलाकारास त्याच्या पुणतिथीनिमित्त आदरांजली.
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Fri, 03/14/2008 - 20:31 नवीन
गिनीज् च्या जागतिक विक्रम पुस्तिकेत घट्ट शाईनं लिहुन ठेवलाय गिनीज बूक वाला समज चांगलाच प्रचलित असला तरी, मी कुठेतरी वाचलंय की असा विक्रम अस्तित्त्वात नाही... असो....
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 03/15/2008 - 07:29 नवीन
दादा या अफाट व्यक्तिमत्वाला आपला सलाम....! तात्या.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sat, 03/15/2008 - 15:59 नवीन
आत्ताच्या पिक्चरांमधील ओढूनताणून आणलेले पाचकळ विनोद (?) बघता दादांची महती पटते. सेन्सॉर बोर्डाचे आजचे 'कामकाज' बघता दादांनी आत्ता धूम केली असती असे वाटते... मनस्वी म्हणतात ते अगदी खरंय. मलाही जिवाशिवाची बैलजोड हे गाणं आवडतं. - (सर्वव्यापी)प्राजु
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 30 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 42 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    18 hours 46 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा