सगळ्याना ओपन चॅलेंज........र ला ट न जुळवता चारोळी
💬 प्रतिसाद
स
सागर
Fri, 03/14/2008 - 07:51
नवीन
विजुभाऊ ,
तुम्हाला यमक न जुळवता केलेली चारोळी म्हणायची आहे का?
तसे असेल तर माझा हा एक प्रयत्न,
काय हे आव्हान दिले कोणी
पेलायची ताकद मनगटात असते
वादळाशी ही झुंझ मी घेईन
पण वावटळीला ते का विचारु?
विजुभाऊ... जमले का हे?
(फाश्ट कवी) सागर
- Log in or register to post comments
य
यन्ना _रास्कला
Fri, 03/14/2008 - 07:52
नवीन
घ्या माझी चारोळी. र ला ट च काय, कोणत्याच अक्षराला इतर कुठलेही अक्षर जोडलेले नाही.
............
..........
...............
..................
:)
:)
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
Fri, 03/14/2008 - 07:57
नवीन
सागर्...........झकास...अजून तात्या / डॉन्या विचार करत बसले आहेत
- Log in or register to post comments
क
केशवसुमार
Fri, 03/14/2008 - 10:03
नवीन
१.ओ भाऊ, तुमच्या गमज्या चल्यात चालू द्या ...
२.ही समदी काठावर बस्लित गुमान..बसु द्या त्यांना..उगाच कशाला चिखलात दगड मारताय..
३.तात्या, डांबिसकाका, धमु, सगळे डॉन ,
४.घ्यारं त्या भाऊला राऊंडात
केशवसुमार ठोकरे
बघा लिव्हल्याकी नाही चार ओळी
आनि कुठ बी र ला ट नाय जोडला..
उगा आपल्याल चालेंज नाय द्ययाचा..
काय कलं की नायं
तदमाताय.. परत चार ओळि झाल्या..
- Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे
Fri, 03/14/2008 - 10:32
नवीन
आयला डोक्याची मंडई
रोजचा नवा वाद
हा काही बोलला तर
तो वढतोय पाय
जमलं का हो? आयला जमलंच पायजे आपल्याला.
(पद्य क्रांतीकारक-इनोबा )
"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे
- Log in or register to post comments
ज
जुना अभिजित
Fri, 03/14/2008 - 10:39
नवीन
पावसाच्या सरींनी
दरवळला मृद्-गंध
गुंजतो आहे नाद
अजून थेंबांचा
ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित
- Log in or register to post comments
स
स्वयम्भू (verified= न पडताळणी केलेला)
Fri, 03/14/2008 - 11:13
नवीन
बसलो होतो काल,
मित्रन्च्या संगे,
सुर्य उगवला,
बाटली रिकामी.
आपला,
स्वयंभू
- Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा
Fri, 03/14/2008 - 11:25
नवीन
स्वयम्भू राव,
लय भारी...सुर्य उगवला, बाटली रिकामी :-)))
कोणाला वाटत असेल कै च्या कै, तर असुदे, आपल्याला आवडली. एकदम वस्तुस्थितीचे यथार्थ वर्णन :-)
विजुभाऊ,
जरा दम धरा, मला जरा वेळच लागेल रि॑गणात यायला. पण सुटलो ना तर मला आवरण॑ उभ्या मिपाला अवघड होईल. तात्या डायरेक्ट मला तडीपार करतील :)
के.सु.शेठ,
आपण खुन्नस नाय धरायची. ऊठ-सुठ ह्याला ठोकरे त्याला ठोकरे नको बॉ. त्यापेक्षा जरा राजकारन खेळू. आपन म्हनजे आमी वो, ल्हितो चारोळ्या-बेदाने जमतील तशे. ईजुभाव आन बाकी सगळे आपसुक गप होत्याल 'हे असल॑ झे॑गाट कशापाई उरावर घेतल॑ म्हनून' :-)
अवा॑तर : शेठ तद् माताय लैच आवडलेल॑ दिसत॑य. कालधरन॑ चार-पाच ठिकानी पाह्यल॑ :-))
- Log in or register to post comments
क
केशवसुमार
Fri, 03/14/2008 - 12:13
नवीन
१.'तिच्यामायला' म्हणल की लोक उगाच तोंड हाय की गटार हाय म्हणत्याती..
२.तद माताय म्हणल म्हण्जे कस (कुनालच कलत नाय)...संस्कृतमधे बोलतुया .. साना मानुस दिसतुया .. किती गार वाटतया....अजून येऊदे, आम्ही वाचतोय ..अस म्हणत्यात
३.बाकी तदमाताय.. हे ज ह ब ह रा..
४.र्हाता राहिल त्या विजुभाऊच..आर.. ठोकून काढायच म्हण्जे.. तू म्हणतोस तसच ईजुभाव आन बाकी सगळे आपसुक गप गार होईस्तोवर चरोळ्या पाडायच्या..
अर् !!तद् मातय!! झाल्या का पुन्हा चार-ओळी
(चारोळा)केशवसुमार
- Log in or register to post comments
म
मनस्वी
Fri, 03/14/2008 - 13:52
नवीन
आवडलं.
मनस्वी
- Log in or register to post comments
स
संदीप चित्रे
Fri, 10/17/2008 - 16:07
नवीन
तुझी चारोळी आवडलीच एकदम :)
- Log in or register to post comments
च
चन्द्रशेखर गोखले
Sat, 10/18/2008 - 03:52
नवीन
मी पण बसलो होतो
मित्रांसंगे रात्रभर
सूर्य उगवला सकाळी
झिंगत.. झिंगत..!
- Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या
Fri, 03/14/2008 - 11:41
नवीन
शांती पडली
सांवरियाच्या प्रेमात
धोनी युवराजनंतर
पुढचा जोकर रणबीरचा
-छोटी टिंगी ;)
- Log in or register to post comments
प
प्रमोद देव
Fri, 03/14/2008 - 12:02
नवीन
माझा होशील का(गडी)
कशाला?
आज मोलकरीण नाही आली
जरा भांडी घास ना!
- Log in or register to post comments
स
स्वयम्भू (verified= न पडताळणी केलेला)
Fri, 03/14/2008 - 12:12
नवीन
ये ना गड्या घरी,
असे ती म्हणाली,
जेंव्हा तो घरी गेला,
तिने त्याचा खरंच गडी केला.
आपला,
स्वयंभू
- Log in or register to post comments
छ
छोटा डॉन
Fri, 03/14/2008 - 12:03
नवीन
हे घ्या ... हिंदीतून आहे ....
"चांद गया भजिया तलने,
सितारे तोडकर लाऊंगा,
विजूभाऊ तू 'चारोळी' की बात करता है,
तेरेलिये तो "शाकुंतल" लिख डालुंगा ...."
अवांतर : जे लिहलय ते ग्वाड मानून घ्या कारण आ.का. व. चा. घं. क. ना. हे. ज.जा. आ.
[ म्हणजे आम्हाला काव्य व चारोळीतलं घंटा कळत नाही हे जग जाहीर आहे .....]
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
- Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा
Fri, 03/14/2008 - 12:16
नवीन
कोण म्हणतो मी एकटा आहे,
एका॑तही जसा मित्र माझा
क॑टाळतो मी गर्दीला,
गर्दीतही मी एकटाच आहे!
हा हा हा..घ्या तद् माताय!
मीटर, मात्रा, यम,नियम सगळ॑ तिच्याआयला नेऊन घातल॑ तिकडे....सात गडगड्याच्या विहीरीत.
आपला
-ध मा ल रावसाहेब.
- Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा
Fri, 03/14/2008 - 12:27
नवीन
कुणाच्या खा॑द्यावर कुणाचे ओझे,
कोणि झोकलेली
अन् भोग कोणाच्या नशिबी !
आयला, चारोळी बेदाणे म्हणता म्हणता हे काय? जर्दाळूच झाला :-)
ना चार ओळी
ना दोन ओळी
काय म्हणावे ह्याला
प्रश्न माझ्या अ॑तरी
घ्या च्यामारी, अजुन एक.
- ध मा ल.
(मॅनेजि॑ग डायरेक्टर, पौष्टीक ड्रायफ्रूट्स प्रा. लि.)
- Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या
Fri, 03/14/2008 - 12:31
नवीन
थोडेसे 'सुमार' विडंबन -
कुणाच्या खांद्यावर कुणाचे डोके,
कोणि ओकलेली
अन् वास कोणाच्या नशिबी !
- Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा
Fri, 03/14/2008 - 12:44
नवीन
वाह वाह!!!
च्यायला ह्याला म्हणतात काव्यप्रतिभा !!!!
हे म्हणजे एकदम हाsssण तिच्याआयला !!!
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
Fri, 04/24/2015 - 11:30
नवीन
लैच्च भारी
- Log in or register to post comments
स
सृष्टीलावण्या
Fri, 03/14/2008 - 12:33
नवीन
की काय अज्याबात न्हाई... पन र ला ट जुळवने काय कटिनबी न्हाई. हे पाह्य म्या पाडली जिलबी मी चार वळींची. च्या मारी टोपी आहे काय नी न्हाई काय.
चायलेंज खेल आपल्याला बी आवडतु,
माझ्या तीन रान्या असे कोनतरी बोलतं,
मी विचार करतु च्या मारी माज्या हातात दोन लाल रान्या,
मग ह्याच्याकडं काय घंटा...
>
>
सदा सर्वदा देव सन्निध आहे । कृपाळूपणे अल्प धारिष्ट पाहे ।।
- Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा
Fri, 03/14/2008 - 12:45
नवीन
मी विचार करतु च्या मारी माज्या हातात दोन लाल रान्या,
मग ह्याच्याकडं काय घंटा...
हा हा हा..सृष्टीताई, फर्मास....लगे रहो !!!!
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
Fri, 03/14/2008 - 12:45
नवीन
कुणाच्या खांद्यावर कुणाचे डोके, मस्तच की रे
बघा कसं एक्दम वस्तुस्थिती ला धरून काव्ये होताहेत की नाय.
हातातल्या सिगरेट ने मला मोठे केले
तारुण्य नेले आणि म्हातारपण आणले
माझा हात तुझ्या हाती असावा
आणि माझे डोके उशाशी......
स्टेथास्कोप छातीशी
मी खोकतो ठक ठक....
आता ओकतो मी सगळी दु:खे
केवढा सागर साठला....
तुला पामराला
राहीला दूर किनारा
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
Mon, 03/17/2008 - 15:43
नवीन
एकटा मी असतो प्रिये
विना तक्रार जीणे जगतोय तुझ्या विना
पण खरे सांगू प्रिये
जगणे हे जीणेच उरले नाही तुझ्या विना......
(या कवितेला आंधी च्या तेरे बिना जिंदगी से कोइ..चा वास आला तर तो केवळ योगायोग समजावा)
- Log in or register to post comments
त
तात्या विन्चू
Fri, 03/14/2008 - 12:49
नवीन
पु. ल. नी हा .प्रयोग फार आधीच केलेला.
http://cooldeepak.blogspot.com/2007/01/blog-post.html
आपला,
ओम फट स्वाहा....
तात्या विन्चू
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
Fri, 03/14/2008 - 13:02
नवीन
तात्या उगाच पु लं च्या मागे दडू नका.....तुम्ही अजून हा चॅलेंज स्वीकरला नाय.
- Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा
Fri, 03/14/2008 - 12:53
नवीन
तिला पाहिले एकदा
तळ्याच्या पलिकडे,
मनी आस तिला आणण्याची
मळ्याच्या खोलीकडे
- (धाकल॑) देशमुख-पाटील.
(स्वगत :आता खातोय जोडे सगळ्या॑चे)
- Log in or register to post comments
स
स्वयम्भू (verified= न पडताळणी केलेला)
Fri, 03/14/2008 - 13:07
नवीन
तिला म्हणालो तुझ्या डोळ्यात,
बुडावसं वाटतंय,
ती म्हणाली लाजून,
पोहता येतं का तुला?
आपला,
स्वयंभू
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
Fri, 03/14/2008 - 13:18
नवीन
आरं तद माताय्.......धमाल्या मस्त रे....
बघा बघा मंडळी स्वतःला काव्यातले काहीही कळत नाही म्हणणारा धमल्या कसा मस्त रंगलाय
आन स्वयंभूशेठ्.....हाण तद माताय्..........जबरदस्तच
- Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा
Fri, 03/14/2008 - 13:58
नवीन
कसल॑ काय विजुभाऊ,
इथ॑ कशाचा कशाला पायपोस नाही म्हणून आपल॑ चालल॑य आमच॑ प्राची ला गच्ची.
बाकी, मजा येते हो स्वतः असल॑ काहीतरी जुळवायला. अन् त्याहून जास्त मजा ते वाचायला देऊन इतरा॑ना छळायला :-))
कोणि म्हणे तू बडा माणूस,
कोणि नि॑दे तू आय.टी. हमाल
मी ना होतो दु:ख्खी मुळीच
मी तर आहे ध मा ल धमाल !!!!
कै च्या कै काव्यसम्राट
-ध मा ल.
- Log in or register to post comments
म
मनस्वी
Fri, 03/14/2008 - 13:47
नवीन
पिझ्झा घेणार की बर्गर..
नाहीच जमणार आपलं!
वेटर, १ मिसळपाव.. कांदा जास्त
बिल वेगवेगळं
मनस्वी
- Log in or register to post comments
स
स्वयम्भू (verified= न पडताळणी केलेला)
Fri, 03/14/2008 - 13:52
नवीन
मिसळी वर लिम्बू,
ताटा मधे पाव,
सन्गती येउ दे,
कोकम सरबत.
आपला,
स्वयंभू
- Log in or register to post comments
म
मनस्वी
Fri, 03/14/2008 - 13:55
नवीन
मला पन्हे चालेल.
मनस्वी
- Log in or register to post comments
स
स्वयम्भू (verified= न पडताळणी केलेला)
Fri, 03/14/2008 - 14:13
नवीन
उन्हाळा वाढला,
वाळ्याचे पडदे,
आंब्याच्या झाडाला,
पन्ह्याची तहान.
आपला,
स्वयंभू
टिपः- ही चारोळी मनावर घेउ नका मनस्वी ताई.
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
Fri, 03/14/2008 - 15:30
नवीन
तो तिच्या कानाशी हळूच कुजबुजला
..........
आपण डायल केलेल्या मार्गावर
सर्व लाइन्स व्यस्त आहेत
कृपया थोड्या वेळाने डायल करा
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
Fri, 03/14/2008 - 15:37
नवीन
.
- Log in or register to post comments
च
चतुरंग
Fri, 03/14/2008 - 15:33
नवीन
विजुभाऊ म्हणतात 'सगळ्याना' 'ओपन' च्यालेंज?
हे तर 'शाकाहारी' 'आहार' झालं?
'पुन्हा' 'द्विरुक्ती' बघून फारच रहावेना,
तेव्हा म्हटलं द्यावी टाकून एक 'चार ओळींची' 'चारोळी'!:))
चतुरंग
- Log in or register to post comments
अ
अनिता
Fri, 03/14/2008 - 18:47
नवीन
मागितली रसमलाई
कान्हा खातो लोणी
सकाळची शाळा
डोक्याची कल्हई
- Log in or register to post comments
प
प्राजु
Fri, 03/14/2008 - 15:39
नवीन
गेले घेऊन गुलाबी फुले
त्याला भेटायला..
आर्जव करीत म्हणाले,
इथे भेटलास वर भेटू नको....
- (सर्वव्यापी)प्राजु
- Log in or register to post comments
च
चन्द्रशेखर गोखले
Sat, 10/18/2008 - 04:06
नवीन
फुले घेउन मी म्हणालो
तुला आजिबात "वर" भेटणार नाही
माझ्या इतका सुयोग्य
चल मधुचन्द्रावर....!
(सर्वसाक्षी )चन्दु
- Log in or register to post comments
च
चन्द्रशेखर गोखले
Sat, 10/18/2008 - 04:06
नवीन
फुले घेउन मी म्हणालो
तुला आजिबात "वर" भेटणार नाही
माझ्या इतका सुयोग्य
चल मधुचन्द्रावर....!
(सर्वसाक्षी )चन्दु
- Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll
Fri, 03/14/2008 - 15:53
नवीन
खूप पिऊन ना चढली
तेव्हा राग मला आला
तेव्हा म्हणे कोणी मला
"काय रे आज पाणीच का?"
-बळच कवि
पुण्याचे पेशवे
- Log in or register to post comments
प
प्राजु
Fri, 03/14/2008 - 16:01
नवीन
पाऊस इतका पडला
की शिगघ्रकवी जन्मले
बघ माझी आठवण येते..का..?
सर्रास विचारू लागले
- (सर्वव्यापी)प्राजु
- Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर
Fri, 03/14/2008 - 20:34
नवीन
प्रयत्न करून पाहिला खूप
नको नको ते यमक...
अरेरे ...
तरीही जुळलेच...
- Log in or register to post comments
स
स्वयम्भू (verified= न पडताळणी केलेला)
Fri, 03/14/2008 - 16:09
नवीन
शेकडो पावसाळे पाहीले,
तरी मी कोरडाच,
शेवटी स्वताला ढग म्हणून,
मनाचं समाधान केलं.
आपला,
स्वयंभू
- Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस
Fri, 03/14/2008 - 18:14
नवीन
शेकडो पावसाळे पाहीले,
तरी मी कोरडाच,
शेवटी स्वताला ढग म्हणून,
मनाचं समाधान केलं.
छान आहे, मला आवडलं!
- Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll
Fri, 03/14/2008 - 17:28
नवीन
ढग म्हणून गडगडलो
पण बरसलो कधीही नाही
म्हणूनच कायम नोकर मी
न झालो कधीही साहेब
पुण्याचे पेशवे
- Log in or register to post comments
स
सौरभ
Mon, 03/17/2008 - 13:01
नवीन
साहेबच कय घेउन बसलात
नोकर म्हणुन गडगडून बघा
साहेबाचे होइल पाणी पाणी
होताल लिडर
- Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस
Fri, 03/14/2008 - 18:07
नवीन
केशवसुमार तात्या, डांबिसकाका, धमु, सगळे डॉन ,सगळे अभिजीत ,सॄष्टीलावण्य मावशी..सगळ्याना ओपन चॅलेंज
र ला ट न जुळावता चारोळी लिहुन दाखवा?
चायलेंज देऊन,
आम्हाला चढवता
अंतस्थ कावा,
कळला बरं का
-डांबिसकुमार
(डिसक्लेमरः वरील चार ओळींत कुणाला काव्याचा संशय आला तर तो केवळ योगायोग समजावा)
- Log in or register to post comments
- 1
- 2
- ›
- »