Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

संस्कृत १

स
सृष्टीलावण्या
गुरुवार, 03/13/2008 - 03:50
💬 69 प्रतिसाद
  • संस्कृत२

Book traversal links for संस्कृत १

  • संस्कृत२ ›

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 25627 views

💬 प्रतिसाद (69)
स
सुधीर कांदळकर गुरुवार, 03/13/2008 - 16:45 नवीन
कदाचित शिकायची असेल.
  • Log in or register to post comments
य
यन्ना _रास्कला गुरुवार, 03/13/2008 - 09:03 नवीन
असले प्रश्न विचारून मेंदुला ताण देऊ नका हो. हा शब्द मी ओम शांति ओम मध्ये ऐकला.
  • Log in or register to post comments
र
राजमुद्रा गुरुवार, 03/13/2008 - 09:11 नवीन
मला वाटले तुम्हाला अर्थ माहित आहे म्हणून तुम्ही तो स्वतःसाठी वापरला, मला वाटले होते की तो कन्नड / तामिळ असावा :) म्हणून उस्तुकता होती. असो, आपल्याला काय करायचय हो ना :) शब्द वेगळा आहे. पुन्हा एकदा सुस्वागतम् :) राजमुद्रा :)
  • Log in or register to post comments
म
मनस्वी गुरुवार, 03/13/2008 - 09:33 नवीन
मला वाटते की तू सरळ लेखमालेची प्रस्तावना आणि तो संस्कृत विषयाशी निगडीत आहे येवढे देउन विषयाला म्हणजे "सत्यकाम जाबालीची कथा" याला हात घालायला हवा होतास. मूळ विषय राहिला बाजूला. कोणाला काय वाटते, काय वाटावे, काय आवडावे, कशावर प्रेम करावे हे सांगणारे आपण कोण? आपल्याला विषय आवडला - प्रकाशित करा - ज्याला आवडेल तो वाचेल - प्रतिक्रिया देईल - काम संपले - विषय संपला. (कथेच्या प्रतिक्षेत) मनस्वी
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे गुरुवार, 03/13/2008 - 09:41 नवीन
परखड मत आवडले. (बिनधास्त इनोबा) "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा गुरुवार, 03/13/2008 - 09:54 नवीन
ह्याला म्हणतात समजुतदारपणा. आवडल॑ बुवा आपल्याला :-)
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Fri, 03/14/2008 - 08:14 नवीन
१००% सहमत.
  • Log in or register to post comments
आ
आर्य गुरुवार, 03/13/2008 - 09:42 नवीन
प्राणभूतञ्च यतत्वम सारभूतं तथैव च । संस्कृतौ भारतस्यास्य तन्मे यच्छ तु संस्कृतंम् ॥ अनेक भारतीय भाषांची जननी आहे, पुराण काला पासुन हिच भाषा प्रचलीत आसल्याने यात ज्ञानभांडार सामावल आहे. संस्कृतं देवभाषास्ति वेदभाषास्ति संस्कृतम् । प्राचीनज्ञानभाषा च संस्कृतं भद्रमण्डनम् ॥ आणि वेदान्तानां पुराणानां शास्त्रानां च तथैव च । मन्त्राणां तन्त्रसूत्राणामाद्यभाषास्ति संस्कृतम् ॥ मराठी भाषा ही मुळातच संस्कृतप्रचुर आहे, त्यामुळे मराठीभाषिकांनी मला संस्कृत येत नाही / कळत नाही हे म्हणणेच मुळी साफ चुकीच आहे. ऐका भाषेचे प्रेम इतर भाषांना शिव्या देऊनही व्यक्त कघीच करता येत नाही. प्रत्येक भाषेचे आपले ऐक सौंदर्य आहे, जशी ऊर्दू मधे आर्जव आहे, संस्कृतमधे प्रत्येक शब्दाला आणि अक्षराला अर्थ आहे.यात भाषेचे सौंदर्य आहे. रामायणम् महाकाव्यम् महाभारतमेव च । उभे च विश्ववि़ख्याते संस्कृतस्य महानिधे ॥ पण "मराठी भाषिक उद्धट आहेत आहेत असे मी म्हणेन - ना कि भाषा" हे विधान मला मराठी भाषिक असुनही मान्य आहे. अग्रतः संस्कृतं मेSस्तु पुरतो मेSस्तु संस्कृतम् । संस्कृतं ह्रदये मेSस्तु विश्वमध्येSस्तु संस्कृतम् ॥ आपला (संस्कृत प्रेमी) आर्य
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे गुरुवार, 03/13/2008 - 09:47 नवीन
पण "मराठी भाषिक उद्धट आहेत आहेत असे मी म्हणेन - ना कि भाषा" हे विधान मला मराठी भाषिक असुनही मान्य आहे. आपला प्रतिसाद वाचून काही मराठी भाषिक उद्धट आहेत याची खात्री झाली.असो. "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 03/13/2008 - 11:18 नवीन
अग्रतः संस्कृतं मेSस्तु पुरतो मेSस्तु संस्कृतम् । संस्कृतं ह्रदये मेSस्तु विश्वमध्येSस्तु संस्कृतम् ॥ म्हण्जे काय? ओ काय कळंल असं तरी लिवा की तिच्यायला! तात्या. बाय द वे, संस्कृतात 'तिच्यायला'ला काय म्हणतात हो? :)
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा गुरुवार, 03/13/2008 - 11:24 नवीन
'तद् माताय' कस॑ वाटत॑य? बसत॑य का फिट्ट ??? -हलकट ध मा ल.
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार गुरुवार, 03/13/2008 - 14:11 नवीन
धमाल्या.. ह.ह.मु.व. 'तद् माताय' हाआआआ हाआआआआआ हाआआआआआअ केशवसुमार
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत गुरुवार, 03/13/2008 - 15:51 नवीन
>>>अग्रतः संस्कृतं मेSस्तु पुरतो मेSस्तु संस्कृतम् । >>>संस्कृतं ह्रदये मेSस्तु विश्वमध्येSस्तु संस्कृतम् ॥ >>>म्हण्जे काय? ओ काय कळंल असं तरी लिवा की तिच्यायला! माझ्यापुढे नित्य माझी मराठी पृष्ठावरी देई आशीसही तेवेल ज्योती तिची अंतरी या विश्वास देईल तेजोनिधी
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 03/13/2008 - 12:22 नवीन
कालिदासशेठच्या, कश्चित् कान्ताविरहगुरुणा स्वाधिकारात्प्रमत्त: शापेनास्तड्ग्मितहिमा वर्षभोग्येण भर्तु: । यक्षश्चक्रे जनकतनयास्त्रानपुण्योदकेषु स्त्रिग्धच्छायातरुषु वसतिं रामगिर्याश्रमेषु या मेघदूताच्या पहिल्याच श्लोकाला आपण यमनकल्याणात चाल लावली होती. हा श्लोक इथे पाहा व ऐका! आणि ऐकून कसं वाटलं ते अवश्य सांगा बरं का मंडळी! :) आपला, (कालिदासाच्या मेघदूताचा संगीतकार!) तात्या.
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री गुरुवार, 03/13/2008 - 13:36 नवीन
:)))))))))))))))))) तद माताय |
  • Log in or register to post comments
क
किशोरी गुरुवार, 03/13/2008 - 14:34 नवीन
>>आपली पण तिच्यायला शाळेत असताना संस्कृतक्ची साफ बोंब होती. मास्तरीण बाई काय शिकवत आहेत ते सालं समजायचंच नाही. सगळं डोक्यावरून जायचं आणि जाम झोप यायची! :) हा हा ..मला तर अजुन संस्कृतचा पहीला तास आठवतो आहे,बाई आल्या आणी 'अहं आवां वयं प्रथमा 'हे शिकवायला लाग़ल्या ,मागे बसल्या मुळे मागच्या बरयाच जणांना नुसत पॉम पॉम ऐकायला येत होते, हसायला खुप येत होत आणी बाई नक्की काय म्हणतायेत ते विचारायची हिम्मंत पण झाली नाही, बाई एकदम भारदस्त होत्या,एक हाथ पडला असता तर सगळी हाड मोड्ली असती,त्या गेल्यावर इतके हसलो,लोळायचेच बाकी रहीले होते...बाकी नंतर गोडी निर्माण झाली, संस्कृतबद्द्ल बाईंबद्द्ल नाही..:)) बाकी तुमचे चालु द्या...सत्यकाम जाबालीची कथा वाचण्यास उत्सुक,पुढच्या भागा॑च्या प्रतिक्षेत.
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 03/13/2008 - 17:05 नवीन
बाकी संस्कृत कोणाला आवडावी आणि कोणाला नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मला संस्कृत फार आवडते. आणि साधारण सोप्या संस्कृताचा अर्थ पण कळतो. उदा. संस्कृत बातम्या. आणि राहीले भारतीय संस्कृतीबद्दल आणि संस्कृताबद्दल पिंक टाकणारे लोक. 'तद माताय' गेले तेल लावत. आता हिंदी भाषा मला पण मनापासून गुलामांची भाषाच वाटते. :) परत लिहीतात तसे बोलतही नाहीत. उदा. लिहीतात 'जैन' आणि म्हणतात 'जॅन' . पण मग 'बँक' ला मात्र लिहीतात 'बैंक'. कुठलाच उच्चार पूर्ण करत नाहीत. उदा. 'अर्क' चा उच्चार 'अर्क्', 'कुटुंब' चा उच्चार 'कुटुंब्' असा करतात. असो ही विधाने माझी वैयक्तिक मताची पिंक झाली. :) आता राहीला मराठी भाषा उद्धट असण्याचा संबंध. माझे बरेच अमराठी मित्र आईला, आजीला, सख्ख्या काकाला/मामाला 'आप' म्हणतात. पण मराठीत मात्र हीच नाती एकेरी असतात. त्यामुळे त्यांचा कल देखील मराठी भाषेला उद्धट म्हणण्याकडे असतो. माझे मत या बद्दल असे आहे की आई, आजी, सख्खे काका/मामा(काही अपवाद वगळता) आत्यंतिक प्रेमाची मंडळी असतात त्यामुळे आपण त्याना एकेरी नावाने संबोधतो. पण म्हणूनच मला हिंदी भाषा जरा कृत्रिमता अधिक असलेली वाटते. असो 'जय भारत, जय भारती'| (ही दिव्या भारती नव्हे... ;)) पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर गुरुवार, 03/13/2008 - 17:17 नवीन
अहंकार यामधील सीमारेषा फसवी आहे. आपण कधी फसू सांगता येणार नाही. तसेच तडफदार उत्तर आणि उद्धट उत्तर यामधील रेषासुद्धा फसवी आहे. ही जाणण्या साठी संस्कार आणि शिस्त अंगी बाणवावे लागतात. मी जे तडफदार उत्तर माझ्या धाकट्या बंधूना देईन तेच उत्तर मोठ्या बंधूना दिले तर ते उद्धटपणाचे होईल. हे डबल स्टँडर्ड नव्हे. रूढ संस्काराची रीत उल्लंघिली जाते म्हणून उद्धट. माझ्या मते एखाद्या व्यक्तीच्या आत्मसंन्मानाला धक्का लागेल असे विधान जर केले तर ते उद्धट विधान होईल. मग ती व्यक्ती लहान असो वा मोठी. (लहान असो वा मोठी : म्हणजे दुहेरी वर्तणूक किंवा डबल स्टँडर्ड होणार नाही) मग ते विधान तथाकथित गुळमुळीत हिंदीत असो वा तथाकथित उद्धटपणाकडे झुकणा-या मराठीत. मराठी उद्धट नसल्याचा उत्तम पुरावा म्हणजे वाहतो ही दुर्वांची जुडी मधील मुलगी तिच्या बाबांशी बोलते ती भाषा. किंवा श्यामची आई मधील श्यामची भाषा. तेजस्वी हिंदी भाषा अडवाणीची आपण नेहमी ऐकतोच. नेताजींची ऐकली नाही तरी वाचलेली आहेच. कोणतीहि भाषा ही उद्धट वा गुळमुळीत नसते. तसे गुण तिला लाभतात ते ती बोलणा-या माणसांमुळे. मला वाटते माझे वरील प्रतिपादन उद्धट नाही वा गुळमुळीतहि नाही. प्रत्येक भाषेचा वेगळा गोडवा असतो, बाज असतो. 'ही' भाषा 'त्या' भाषेपेक्षा श्रेष्ठ असे काही नसते. संस्कृत ही आपल्या बहुतेक सर्व भाषांची जननी आहे हे भाषातज्ञांनी मान्य केले आहे. वैचारिक क्रांती(रेनेसाँ)पूर्वी संस्कृत नक्कीच शिखरावर होती. परंतु नंतर प्रचारात नसल्यामुळे तसेच तांत्रिक शब्द विकसित न झाल्यामुळे तिचे पुनरुज्जीवन आवश्यक आहे. सृलाताईंना त्याबद्दल माझ्या शुभेच्छा. परंतु त्यांनी संतुलित धोरण स्वीकारून सर्वांना बरोबर घेऊन जावे. विरोधकांना आपल्या समवेत नेण्यास एक कौशल्य लागते. ज्याला आपण इंग्रजीत 'इंटीग्रिटी' म्हणतो. परंतु ज्येष्ठच नव्हे कुणाहि सदस्यांचा उपमर्द होईल अशी विधाने टाळावीत. जेणेकरून मिपा ची प्रतिष्ठा वाढेल अन्यथा मिपा ला टपोरी कट्ट्याचे स्वरूप येईल. सर्व ज्येष्ठ सभासदांना पण माझी नम्र विनंति आहे की जर कोणी चुकत असेल वकिली प्रतिपादने करून चुका दाखवून द्याव्यात. असो. सृलाताई, पटले नाही तर सोडून द्या. शुभेच्छा. आपला नम्र सदस्य सुधीर कांदळकर.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Wed, 07/16/2008 - 16:07 नवीन
सध्याच्या युगात कोणतीही भाषा स्वतःचा शुद्धपणा टिकवण्याचा प्रयत्न करेल तर ती टिकणे अवघड होईल. मराठीप्रेमी माणसाने मराठी बोलण्याचा आग्रह धरावा. पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    21 hours 21 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    21 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    21 hours 34 minutes ago
  • सुंदर !!
    21 hours 37 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    21 hours 40 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा