Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
कलादालन

(मिळमिळीत आणि बुळबुळीत)

स
सुनील
Fri, 01/22/2010 - 05:38

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 5640 views

💬 प्रतिसाद
प
प्रमोद देव Fri, 01/22/2010 - 05:47 नवीन
असल्यामुळे आरोग्याला हितावह असतं. ;) ********** भले तर देऊ कासेची लंगोटी । नाठाळाचे माथी हाणू काठी ॥
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Fri, 01/22/2010 - 14:27 नवीन
भेंडिबाजार! ------------------------ Image removed. डायबेटीस विरुद्ध लढा - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या-(इंजन मेक्यॅनीक)
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 01/22/2010 - 14:31 नवीन
भेंडीची भाजी म्हणजे लैच बोगस. अशा भाजीला आठवड्यातून एकदा-दोनदा फेस करावंच लागतं....!:( >>मिळमिळीत आणि बुळबुळीत सहमत आहे. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Fri, 01/22/2010 - 14:35 नवीन
>>अशा भाजीला आठवड्यातून एकदा-दोनदा फेस करावंच लागतं....! माझ्या मुलीला फार आवडते. :( त्यामुळे फेस करायला लागतं. नितिन थत्ते
  • Log in or register to post comments
अ
अक्षय पुर्णपात्रे Fri, 01/22/2010 - 14:47 नवीन
सर, भेंड्याची भाजी मला खूप आवडते. तुम्हाला का आवडत नाही बरे? श्री थत्ते यांनाही आवडत नसावी असे दिसते.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 01/22/2010 - 14:53 नवीन
लैच मिळमिळीत लागते, म्हणून आवडत नाही. [अर्थात सुगरणीचा बनविण्याचा काही दोष असेल] भेंडीची भाजी रस्सा असलेली नाही का बनवता येत ? किंवा दुसरी अशी काही भेंडीची चवदार रेसेपी ? लाल लसुन झाले की, मीरची परतून घेऊन मग भेंडी टाकायची आणि चवीनुसार मीठ टाकायचे...भेंडी हजर...! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Fri, 01/22/2010 - 14:58 नवीन
बर्‍याच पद्धतीने बनवतात. भरली भेंडी,ताकातली भेंडी,परतलेली भेंडी,चिंचगुळ घालून केलेली भेंडी वगैरे वगैरे. मला हे सगळे प्रकार आवडतात. ********** भले तर देऊ कासेची लंगोटी । नाठाळाचे माथी हाणू काठी ॥
  • Log in or register to post comments
अ
अक्षय पुर्णपात्रे Fri, 01/22/2010 - 15:01 नवीन
अर्थात सुगरणीचा बनविण्याचा काही दोष असेल
सर हे बरोबर नाही.
भेंडीची भाजी रस्सा असलेली नाही का बनवता येत ?
माहीत नाही पण रस्सा पोष्टातल्या डिंकासारखा असेल असे वाटते.
किंवा दुसरी अशी काही भेंडीची चवदार रेसेपी ?
गुगल शोध घेतला तर बर्‍याच आहेत असे दिसते.
  • Log in or register to post comments
J
JAGOMOHANPYARE Fri, 01/22/2010 - 14:38 नवीन
सुंदर अप्रतिम भाजी......... सोबत ज्वारीची शिळी भाकरी आणि दही......... अन्नदाता सुखी भवेत| *************************** प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Fri, 01/22/2010 - 14:49 नवीन
ही भेंडीची भाजी हिच्यावर आमचा भारी जी. :) पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 01/22/2010 - 14:54 नवीन
जिथे तुमच्या पाकृ संपतात तिथे माझी भेंडीची भाजी सुरू होते. अदिती
  • Log in or register to post comments
ट
टारझन Fri, 01/22/2010 - 15:20 नवीन
शी बै .. ती भेंडी मला नै बै आवडत ... लैच्च बुळबुळीत =)) लहानपणी आई ने भेंडी कापली की तिचे चिकट देठ पुर्ण चेहरॅवर लावून आरशात स्वतःलाच घाबरवायचा बालपणा केलेला आठवला , असो ! - बालदेव
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Fri, 01/22/2010 - 15:23 नवीन
घाबरवायला तुला भेंडीची मदत घ्यावी लागावी?? छे छे..काहीतरीच! हे म्हणजे माईक टायसनने तालुका पातळीवर बॉक्सिंगची प्रॅक्टीस करण्यासारखं आहे! ;) (हेवीवेट)चतुरंग
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 01/22/2010 - 15:51 नवीन
ठ्ठ्यॉ!!!! सौ सुनार कि.. एक.. ;) - प्राजक्ता http://www.praaju.com/
  • Log in or register to post comments
ट
टारझन Fri, 01/22/2010 - 16:06 नवीन
ओ .. लहाणपणी मी लहाण होतो .. आणि अंमळ गोंडसही होतो .. कोणही कुठलाही नातेवाईक यायचा न माझे गाल चावायचा .. मला त्यांना फार मारावसं वाटायचं त्यावेळी :( लहाणपणीच "असा" असायला काय मी टारासुन आहे का ? यज्ञातनं हिहॉहॉहॉ करत प्रकट व्हायला ? आणि तरी शंका आलीच .. म्हंटलं हा टोला बसणारंच म्हणून :) असो .. कधीतरीच हसणार्‍या प्राजुतैंच्या एका हास्यलहरीस आम्ही "निमित्त मात्र" झाल्याने स्वतः विषयीचा आदर दुणावला :) अजुन एक प्रकार आठवला .. बाजारातून गवार आणली की तीला हातांत घेऊन घासली की तिचे बारीक फायबर्स हाताला लागतात मग पटकन् मित्र मंडळींत जाऊन कोणाच्या तरी गालाला ते चोळले की तो जाम बोंबलायचा :) - (भेंडी-गवार च्या आठवणींत) संदिप खरेभेंडीत भरे
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Fri, 01/22/2010 - 15:16 नवीन
सुनील ह्यांचे चित्रमय विडंबन नेहेमीप्रमाणेच खास! ;) भेंडीची भाजी अतिशय सुंदर होते. मला फार आवडते. भेंड्या मात्र लुसलुशीत कोवळ्या हव्यात. सुकी भाजी करायची असेल तर भेंड्या नीट धुवून पुसून कोरड्या करुन घ्याव्यात. फोडणीला टाकली की व्यवस्थित परतून घ्यावी. ह्या भाजीवर कधीही झाकण ठेवू नये आणि शिजताना त्यात थोडा लिंबाचा रस घालावा अजिबात चिकट होत नाही. तसेच गूळ घालून रसाची भाजी सुद्धा करतात पण त्याची कृती मला नीटशी लक्षात नाहीये. (वरती प्रमोदकाकांनी भरली भेंडी, ताकातली वगैरे सांगितली आहेच..) सर्व सुग्रणींनो आणि बल्लवांनो येऊद्यात भेंडीच्या पाकृ!! चतुरंग (खुद के साथ बातां : अजून 'भेंडीबाजार'ची प्रतिक्रिया कशी आली नाही? :? )
  • Log in or register to post comments
ग
गणपा Fri, 01/22/2010 - 15:41 नवीन
भेंडी चे चींच,कोलंबी कांदा घालुन केलेले कालवण जबरा लागते. भेंडी शॅलो फ्राय हा अजुन एक आसाच आवडणारा पदार्थ (पण याची क्वाँटिटी खुपच कमी होते फ्राय केल्यावर.)
  • Log in or register to post comments
च
चिरोटा Fri, 01/22/2010 - 15:51 नवीन
अरे किती वाट लावताय?!! :D भेंडी गोश्त्/मटन हा प्रकारही चांगला लागतो. भेंडी P = NP
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 01/22/2010 - 15:59 नवीन
रटाळ भेंडीचा कायतरी सोक्षमोक्ष लावा बॊ ! -दिलीप बिरुटे [गणपाचा विद्यार्थी]
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 01/22/2010 - 16:06 नवीन
भेंडी धुऊन, एका भेंडीचे उभे , पातळ २-३ काप करून, त्याला दही, गरम मसाला, मीठ, हळद आलं लसूण पेस्ट लाऊन मॅरिनेट करून २० मिनिटे ठेवा. दह्यामुळे भेंडीचा बुळबुळीतपणा कमी होतो. मग ही भेंडी, थोड्याशा कॉर्न स्टार्च मध्ये घोळवून, डीप फ्राय करा.. स्टार्टर म्हणून एक जबरा प्रकार आहे हा. करून पहा.. कळवा मला भेंडीबाई कशा वाटल्या. ;) - प्राजक्ता http://www.praaju.com/
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 01/22/2010 - 16:25 नवीन
भेंडीबाईच्या पाकृ सुचवणीबद्दल धन्यु....! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
J
jaypal Fri, 01/22/2010 - 16:55 नवीन
घालवन्यासाठी भेंडीचे काप बारीक हवेत. वरील चित्राप्रामाणे लांब नकोत. तसेच भेंडी ही भाजी सारक आणि शुक्रज असल्याचे ऐकिवात आहे. *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Fri, 01/22/2010 - 17:17 नवीन
हा हा हा अच्छा म्हणजे बुळबुळीत पणाला पुरकच की. (अन काय भेंडीचा फटो नाय मिलाला का?) ------------------------ Image removed. डायबेटीस विरुद्ध लढा - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या-(इंजन मेक्यॅनीक)
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 16 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 19 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 23 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा